Loading video...

Video Failed to Load

Go Home

मराठी थोर की बंगाली गोड 🤔 अशी ही जुगलबंदी... खरच आपल्या संस्कृतीचा थोरवा गोड... दोन्ही गोड गोड...❤️

81,901 views • 2 years ago •via X (Twitter)

9 Comments

Vanni🚩's profile picture
Vanni🚩2 years ago

मस्तच.. तरी बंगाली जास्तच गोड वाटतो..

पाटील™'s profile picture
पाटील™2 years ago

नवीन आहे काहीतरी म्हणून

Ak Hendre_कॅमेरामन‌ डोळंस's profile picture
Ak Hendre_कॅमेरामन‌ डोळंस2 years ago

पाटीलसाब, पंचमदांची गाणी ऐका, हिंदीत आणि बंगाली भाषेत ही. हिंदी किशोरदा आणि बंगाली पंचमदा किंवा अमितकुमार. 1942 A Love story जशी हिंदीत तशीच बंगालीमधे. RHTDM, साथिया जशी हिंदीत तशीच तमीळ मधे. प्रत्येक भाषेचा गोडवा जबरदस्तंच आहे. 🙏🙏🙏

विशली...вышал's profile picture
विशली...вышал2 years ago

बंगाली आयटेम चालेल पण भाषा मराठीच 🫡 . . . पहिल्यांदा ऐकलं म्हणून बरी वाटेल😊

पाटील™'s profile picture
पाटील™2 years ago

काय रे तुझे शब्द😭

Anjali🇮🇳 (Modi ji ka Pariwaar)'s profile picture
Anjali🇮🇳 (Modi ji ka Pariwaar)2 years ago

One of my favorite marathi songs 😍

Cool_DevD𝕏's profile picture
Cool_DevD𝕏2 years ago

लै गोड ❤️❤️

Abhi's profile picture
Abhi2 years ago

Very few people know Bengali is the original version.

पाटील™'s profile picture
पाटील™2 years ago

नाही...मूळ मराठी गाण आहे...नंतर त्याला बंगाली मध्ये नेलं..मूळ गीत हेमंत दा ने गायलं आहे...त्यांना आवडलं म्हणून त्यांनी ते तिकडे नेलं....माझी माहिती तरी अशी आहे..

Related Videos

सोलापूर, महाराष्ट्रातील एक तरुण जोडपं – **आकाश नारायणकर** आणि **अंजली बाई शिंदे** – त्यांच्या गोड-गोड रील्समुळे सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध झालं. लग्नानंतर मंदिरात दर्शनाला जाताना अंजलीला अपघात झाला. उपचारादरम्यान डॉक्टरांना कळलं की लहानपणापासूनच तिच्या मेंदूत ट्यूमर आहे. शस्त्रक्रिया यशस्वी झाली, पण उजव्या बाजूला पूर्ण लकवा मारला गेला. आजही आकाश तिच्यासोबत खंबीरपणे उभा आहे. तो स्वतः रील्स बनवतो, अंजलीचा उत्साह जागवतो आणि लाखो लोकांना प्रेरणा देतो. त्यांचा हा खरा प्रेमकथा पाहून कन्नड चित्रपट दिग्दर्शक कुमार यांनी **‘लव्ह यू मुद्दू’** हा चित्रपट बनवला, जो ७ नोव्हेंबरला प्रदर्शित होतोय. **आकाशच्या शब्दात:** 💕💕 “ती हसते तेव्हा जग हसतं, मी फक्त कॅमेरा धरतो.” दोघांना मनापासून शुभेच्छा! 🙏💑

Shekhar

49,871 views • 10 months ago

मिर्झा बेग या प्रसिद्ध हास्यकवींच्या निधनाने मराठी साहित्यजगताला मोठा धक्का बसला. हास्यकवी असताना ते केवळ हसवणारे नव्हते; तर हास्यामधून गंभीर विषय अतिशय नेमकेपणाने मांडण्याची त्यांची खास शैली होती. त्यांची मराठी वर्हाडी बोली ही त्यांच्या कवितेची खरी ताकद—साधी, सहज आणि मनाला थेट भिडणारी. विनोदाच्या ओघातही वास्तवाची जाणीव प्रेक्षकांच्या मनात सहज पोहोचवण्याचा त्यांचा हातखंडा होता. गावाकडचं जगणं, मानवी भावना आणि सामाजिक प्रश्न यांचा हलक्याफुलक्या शैलीत घेतलेला खोलवर वेध त्यांच्या प्रत्येक ओळीत दिसून येतो. आज ते आपल्यात नाहीत, पण त्यांची निरागस विनोदशैली, वर्हाडी भाषेचं गोड आकर्षण आणि आशयघन विचार अनेकांना पुढेही प्रेरणा देत राहतील. मिर्झा बेग यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून भावपूर्ण आदरांजली. “मायमराठी”साठी हास्यकवी मिर्झा बेग यांची ही अप्रतिम कविता— “मराठी माणसाने मराठी माणसाशी मराठीतच बोलावे..!” #MNSAdhikrut

MNS Adhikrut - मनसे अधिकृत

13,609 views • 9 months ago

Every journey tells a story. Every commuter has a reason. From saving time and travelling comfortably to feeling safe and connected, these are the voices that define the Maha Mumbai Metro experience. Mumbai has spoken. Now it's your turn. ❤️ What's your Maha Mumbai Metro Moment? Share it in the comments. ____________ प्रत्येक प्रवास एक कथा सांगतो. प्रत्येक प्रवासामागे एक खास कारण असतं. वेळेची बचत, आरामदायी प्रवास, सुरक्षिततेची भावना आणि सहज जोडलेली प्रवास व्यवस्था... हेच आहेत महा मुंबई मेट्रोच्या प्रवासाचे गोड अनुभव.. मुंबईने आपलं मत व्यक्त केलं आहे. आता तुमची पाळी! ❤️ तुमचे महा मुंबई मेट्रो सोबतचे गोड क्षण कोणते? ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा.. #MumbaiInMinutes #MMRDA #MahaMumbaiMetro #MetroMoments #MumbaiMetro #RealVoicesRealJourneys #PublicTransport #Mumbai CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr. Sanjay Mukherjee MMRDA MAHARASHTRA DGIPR

Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd

24,905 views • 2 months ago

ना. धों. महानोर हे 'निसर्गकवी' म्हणून ओळखले जातात. त्यांनी या गाण्यात निसर्गातील घटकांचा वापर करून मानवी भावना आणि प्रेमाचे सुंदर वर्णन केले आहे. जांभूळ हे फळ पूर्ण पिकल्यावर त्याचा रंग गडद होतो आणि ते गोड लागते. गाण्यात 'जांभूळ पिकणे' हे तारुण्य, प्रेम आणि भावना परिपक्व होण्याचे प्रतीक म्हणून वापरले गेले आहे. गाण्यातील "चोचीमंदी चोच टाकुनी दाणं उष्टं झालं जी" ही ओळ पक्ष्यांच्या प्रेमाचा संदर्भ देऊन, नायक-नायिकेमधील जवळीक आणि उत्कट प्रेम दर्शवते. हो, जांभुळ पिकल्या झाडाखाली, ढोल कुणाचा वाजं जी? समिंदराचं भरलं गाणं, उधाण वारं आलं जी गीत - ना. धों. महानोर संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर स्वर -आशा भोसले, रवींद्र साठे चित्रपट - जैत रे जैत

बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ

15,346 views • 1 month ago

भ्रष्टाचार हीच भक्ती आणि सत्ता हीच श्रद्धा असणाऱ्या सत्ताधाऱ्यांना तपोवनाचं महत्व काय कळणार? सत्ताधाऱ्यांना विशेषतः नाशिकच्या कारभाऱ्यांना केवळ आणि केवळ प्रॉफिटची भाषा कळते. कुंभमेळ्याच्या नावाखाली जमीन मोकळी करायची आणि कुंभमेळा संपताच एखाद्या संस्थेच्या नावाने जमीन लीजवर घेऊन लाटायची हाच सत्ताधाऱ्यांचा खरा डाव असून तपोवनाची जमीन लाटण्यासाठीच एवढा अट्टहास सुरु आहे. गुंडाचा वापर करून एखादं दुसरी नगरपालिका बिनविरोध केली म्हणजे प्रॉफिट कमवण्यासाठी त्याच पद्धतीने तपोवन खाली करता येईल हा कोणाचा समज असेल तर हा तथाकथित संकटमोचकांचा गोड गैरसमज आहे. असो, हा व्हिडीओ पाहून श्रद्धेचा बाजार मांडून विकासाच्या नावाखाली शहर भकास करू पाहणाऱ्यांचे डोळे उघडतील ही अपेक्षा ! Devendra Fadnavis Pankaja Gopinath Munde Girish Mahajan #SaveTapovan | #NashikForNature |

Rohit Pawar

30,772 views • 9 months ago

...महात्मा फुलेंनी या मातीत पाया घातलेले 'मराठी नाटक' बहुजनांपासुन कुणी हिरावून घेतले? “नाटक हे मराठी माणसाच्या संस्कृतीचा वगैरे भाग आहे“ ही निव्वळ थाप आहे ! महाराष्ट्रातल्या ग्रामीण आणि निमशहरी भागात लोक नाटक बघत नाहीत. आजही तिथल्या लोकांना विचारा की “आत्ता व्यावसायिक रंगभूमीवर कुठली नाटकं सुरू आहेत?” त्यांना सांगता येणार नाही… फक्त २% लोक मराठी व्यावसायिक नाटक पाहतात. गीतांजली कुलकर्णी अगदी परखड सत्य बोलली आहे ! खुप जणांना हे टोचेल, पण कटू असले तरी वास्तव नाकारून कसे चालेल? मराठीमधले पहिले नाटक १८५० साली महात्मा फुले यांनी लिहिले होते… ते नाकारून विष्णुदास भावेंना उगाचच ‘नाटकाचे उद्गाते’ वगैरे ठरवले ! पायाच खोटा घातल्यामुळं बहुजन वर्ग नाटकापासून दूर गेला. आमच्या क्षेत्रात क्वचित असं कुणी निर्भीड सत्य मांडतं तेव्हा ‘माझिया जातीचे’ भेटल्याचा आनंद होतो… लब्यू गीतांजली ❤️ - किरण माने.

Kiran Mane

38,384 views • 1 year ago

समाजाला जागं करणारा प्रश्न - “आपण कोणावर विश्वास ठेवतोय?” वादग्रस्त ज्योतिष **कॅप्टन अशोक खरात** यांच्या संदर्भात समोर येत असलेल्या घडामोडींनी एक गंभीर आणि अस्वस्थ करणारा प्रश्न समाजासमोर उभा केला आहे. आज सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये काही लोक त्यांचे स्वागत करताना, फुलांची उधळण करताना दिसतात. पण दुसऱ्या बाजूला गंभीर आरोप, पोलिसांची कारवाई आणि संशयास्पद बाबीही समोर येत आहेत. मग प्रश्न असा - 👉 जर एखाद्या व्यक्तीकडे इतका पैसा, प्रभाव आणि मोठा पाठिंबा असेल, तर तो खरोखर “सच्चा” आहे का? 👉 की हा सर्व फक्त लोकांच्या अंधविश्वासावर उभा असलेला दिखावा आहे? ❗ समाजासमोर उभे राहिलेले महत्त्वाचे प्रश्न 👉 आपण कोणावर आणि कशाच्या आधारावर विश्वास ठेवतो? 👉 फक्त गोड बोलणे, भविष्य सांगणे किंवा प्रसिद्धी - हेच विश्वासाचं मापदंड आहे का? 👉 गंभीर आरोप असूनही लोक अशा व्यक्तींच्या पायावर का पडतात? 👉 समाजात शिक्षण आणि माहिती असूनही अंधश्रद्धा का टिकून आहे? ⚠️ अंधविश्वास की वास्तव? अशा प्रकरणांमध्ये अनेकदा लोक भावनिक, आर्थिक किंवा वैयक्तिक अडचणींमुळे “कोणीतरी मदत करेल” या आशेने अशा व्यक्तींवर विश्वास ठेवतात. पण याच विश्वासाचा गैरफायदा घेत अनेक भोंदू लोक स्वतःचं साम्राज्य उभं करतात. 👉 मोठे दावे 👉 राजकीय किंवा सामाजिक संपर्क 👉 दिखाऊ जीवनशैली हे सगळं “विश्वासार्हता” निर्माण करण्यासाठी वापरलं जातं - पण ते खरं असतंच असं नाही. 🚨 समाजासाठी महत्त्वाचा संदेश 👉 कोणत्याही व्यक्तीवर आंधळा विश्वास ठेवू नका 👉 संशयास्पद गोष्टी दिसल्यास दुर्लक्ष करू नका 👉 स्वतः जागरूक व्हा आणि इतरांनाही जागरूक करा 👉 आणि सर्वात महत्त्वाचं - जर अशा प्रकारचा त्रास, फसवणूक किंवा गैरप्रकार तुमच्या किंवा तुमच्या ओळखीतील कोणासोबत होत असेल, तर त्वरित **नाशिक पोलीस** किंवा संबंधित प्रशासनाकडे तक्रार करा. 🧠 निष्कर्ष हा विषय फक्त एका व्यक्तीपुरता मर्यादित नाही - हा आपल्या समाजाच्या विचारसरणीचा आरसा आहे. 👉 आपण प्रश्न विचारायला सुरुवात केली, तरच बदल होईल 👉 जागरूक समाजच सुरक्षित समाज असतो

Shekhar

17,829 views • 6 months ago

आज २ ऑगस्ट २०२५ रोजी शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापनदिनाच्या मेळाव्यात संवाद साधला. त्यातील महत्वाचे मुद्दे १) गेले २ दिवस तब्येत थोडीशी बरी नव्हती. हल्लीच्या आजारांचं काही कळत नाही, हल्लीचे आजार आणि महाराष्ट्राचं राजकारण यांत खूप साम्य आहे. पूर्वीचे आजार नाव घेऊन ताठ मानेने समोर यायचे. हल्लीचे आजार तसे येत नाहीत ते इकडून व्हायरल होत फिरत राहतात. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या बरेच व्हायरल फिरत आहेत. २) स्वातंत्र्याच्या १२ दिवस अगोदर ज्या पक्षाची स्थापना झाली, तो शेतकरी कामगार पक्ष. महाराष्ट्रातील स्वातंत्र्यपूर्व काळात निर्माण झालेला हा एकमेव पक्ष, जो अजून पण टिकून आहे, हे खरंच आश्चर्य आहे. ३) १९८१ ला शिवसेनेच पहिलं अधिवेशन झालं होतं आणि त्याला प्रमुख पाहुणे म्हणून कम्युनिस्ट पक्षाचे श्रीपाद अमृत डांगे आले होते. खरंतर शिवसेना आणि कम्युनिस्ट पक्ष यांच्यात विस्तवही जात नव्हता. पण राजकारण आणि राजकारणी मोठ्या मनाचे होते, आता मोठं मन संकुचित व्हायला लागलं आहे. श्रीपाद अमृत डांगे शिवसेनेच्या व्यासपीठावर येणं म्हणजे भगव्या व्यासपीठावर लाल ध्वज येण्यासारखं होतं. आज लाल ध्वजाच्या व्यासपीठावरती दोन भगवे ध्वज आले आहेत. जेंव्हा जयंतराव येऊन म्हणाले की तुम्ही येऊन फक्त मराठीवर बोला, मला शेतकरी कामगार पक्षाच्या खूप बोलायचं होतं पण मी आज फक्त मराठीवर बोलेन. आणि मी शेतकरी कामगार पक्षाच्या व्यासपीठावर दुसऱ्यांदा येतोय. ५ वर्षांपूर्वी मी जयंतरावांच्या प्रचाराला आलो होतो, आणि आज आलो. ४) आज महाराष्ट्र आणि रायगड जिल्ह्यापुढचा जो महत्वाचा प्रश्न आहे तो राजकीय पक्ष कोणता आहे हे न बघता सोडवला पाहिजे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातील लहान मुलांना हिंदी कशी शिकवता येईल याचा विचार करतात, पण महाराष्ट्रात बाहेरून कामाधंद्यासाठी येणाऱ्यांना मराठी शिकवावी याविषयी त्यांना काही आस्था नाही. ५) रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी चालले आहेत. जमिनीचे व्यवहार करणारे आपले, कुंपणच शेत खात आहे, शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत, त्यावर उद्योगधंदे येत आहेत आणि त्या उद्योगधंद्यात काम करायला बाहेरच्या राज्यातील माणसं येत आहेत. एका बाजूला शेतकरी बरबाद होतोय आणि दुसऱ्या बाजूला कामगार देशोधडीला लागत आहेत. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जयंत पाटील यांनी रायगड जिल्ह्यातील शेतकरी आणि कामगार हे बरबाद होणार नाहीत हे पाहिलं पाहिजे. ६) उद्योगधंदे महाराष्ट्रात येतात तिथं भूमिपुत्रांना नोकरी मिळावी यासाठी सर्व पक्षांनी एकत्रित काम करणं गरजेचं आहे... ७) जेंव्हा भाषावादावर अमित शाह यांना प्रश्न विचारला तेंव्हा ते म्हणाले की मी हिंदी भाषिक नाही मी गुजराती आहे.... मोदी पंतप्रधान झाल्यानंतर महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला गेले. प्रत्येकाला आपल्या भाषेबद्दल आणि प्रदेशाबद्दल प्रेम असतं तेच आम्ही केलं तर संकुचित कसे होतो ? ८) गुजरातमध्ये हिंदी नाही तर महाराष्ट्रात का ? गुजरात टेनन्सी अँड ऍग्रीकल्चर लँड ऍक्ट या कायद्यानुसार गुजरातमध्ये, जे गुजरातचे रहिवासी नाहीत किंवा अनिवासी भारतीयांना शेतजमीन विकत घेता येत नाही. आणि समजा ती विकत घ्यायची असेल तर फेमा कायद्याच्या अंतर्गत रिझर्व्ह बँकेकडून विशेष परवानगी घ्यावी लागते. जर प्रत्येक जण आपल्या राज्याचा विचार करतोय तर मग आम्ही का नाही करायचा ? ९) रायगडमध्ये जमिनी कोण घेतंय हे कळत नाहीये. उत्तरेतले धनदांडगे इथे कोकणात जमिनी घेत आहेत. माझी तुम्हाला विनंती आहे की तुमच्याकडे कोणी उद्योगधंद्यासाठी जमिनी घ्यायला आले तर त्यांना सांगायचं की आम्ही नुसत्या जमिनी विकणार नाही. त्यांना अट घाला. तुमच्या उद्योगांमध्ये आम्ही पार्टनर असू. १०) महाराष्ट्र जन सुरक्षा कायदा आणून, आता प्रकल्पाना विरोध करणाऱ्यांना अटक करणार म्हणे. तुम्ही अटक करून दाखवाच. या महाराष्ट्रात मराठी माणसाच्या थडग्यावर उद्योग उभे राहणार नाहीत, उद्योग आणायचे असतील तर मराठी माणसाचा मान राखलाच पाहिजे. ११) हा रायगड जिल्हा आहे, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची खणा-नारळाने ओटी भरणाऱ्या शिवछत्रपतींची राजधानी असणाऱ्या रायगडमध्ये डान्स बार सुरूयेत? बरं हे सगळे डान्सबार कोणाचे तर अमराठी माणसांचे... इथून तिथून मराठी माणसाला पिळून काढण्याचे प्रकार सुरु आहेत... १२) ज्यावेळी तुमच्या कृतीतून महाराष्ट्राला नख लागतंय असं समजेल त्यावेळी अंगावरच येऊ १३) कान बंद ठेऊ नका, डोळे बंद ठेऊ नका. आपल्या आजूबाजूला काय सुरू आहे याकडे लक्ष ठेवा नाहीतर कालांतराने पश्चातापाचा हात डोक्यावर मारावा लागेल.. बाहेरच्या राज्यांमध्ये आपली प्रतिमा आहे की ज्यांना सहज विकत घेता येऊ शकतो अशी ही लोकं आहेत... १२५ वर्ष या हिंद प्रांतावर राज्य करणाऱ्या महाराष्ट्रबद्दलची ही प्रतिमा ? मग काय करायचेत फक्त महाराजांचे पुतळे व्यासपीठावर ठेऊन जर आपण काही शिकणारच नसू तर... रोजच्या बोलण्यातले फारसी शब्द जाऊन मराठी शब्द यावेत म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी एक राज्य भाषा व्यवहार कोश करून घेतला होता. आणि इथे आपण ना भाषेबद्दल कडवट आहोत ना संस्कृतीबद्दल... १४) देशाला दिशा देणारा हा महाराष्ट्र आहे त्याची अशी दशा नाही झाली पाहिजे... १५) अल्पेश ठाकूरनं गुजरातमधून २० हजार बिहारी लोकांना हाकलून दिलं तेव्हा भाजपनं त्याचा सत्कार केला, त्याला आमदार केला. मग हेच मी करत असेन तर राज ठाकरे संकुचित कसा?

Raj Thackeray

33,719 views • 1 year ago

आज २५ जुलै २०२४ रोजी, मुंबईतील रंगशारदा सभागृहात, मी आगामी विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यातील काही महत्वाचे मुद्दे... १) मध्यंतरी २०,२५ दिवस मी अमेरिकेत होतो, तिथे बृहन महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात माझी मुलाखत होती. या निमित्ताने तिथे स्थायिक झालेल्या असंख्य मराठी बांधव-भगिनींशी भेट झाली. त्याच दरम्यान एकदा एक मराठी तरुण शिवलकर आडनावाचा मला भेटायला आला, म्हणाला की मी तुमची लहानपणापासून भाषणं ऐकत आलो. आणि त्यातून प्रेरणा घेऊन इथे मी स्वतःच रेस्टोरंट सुरु केलं आहे. त्याच्या रेस्टोरंटला मी कसंही करून भेट द्यावी अशी त्याची इच्छा होती, म्हणून त्याच्या रेस्टोरंटला गेलो. आतमध्ये जवळपास १०० आणि बाहेर ५० लोकं बसतील अशा क्षमतेचं ते रेस्टोरंट होतं, जे मी गेलो तेंव्हा पूर्ण भरलेलं होतं. आणि मला कळलं की तिकडे टेबल मिळायला कमीत कमी दीड तासांची प्रतीक्षा असते. भारतीय आणि अभारतीय लोकं मोठ्या प्रमाणावर आपलं जेवण जेवायला येतात हे पाहून मला खूप आनंद झाला. एकूणच आपल्या मराठी लोकांनी अमेरिकेत व्यवसाय उद्योगात मोठं यश मिळवलं आहे हे पाहून खूप छान वाटलं. २) अमेरिका, कॅनडा या दोन देशांमध्ये अनेक मोठे तलाव आहेत, पण त्यातले ५ मोठे तलाव आहेत ते इतके मोठे आहेत की ते जर तुम्ही गुगल अर्थ किंवा इतर एखाद्या माध्यमावर जाऊन बघायला गेलात तर तुम्हाला त्याचा अतिप्रचंड आकार दिसेल. हे तलाव इतके मोठे आहेत की अवकाशातून पण हे तलाव दिसतात. या तलावांच्यातला एक छोटा ठिपका म्हणजे जगप्रसिद्द नायगारा धबधबा. इतकं अतिप्रचंड पाणी, जंगलं असलेला हा प्रदेश आहे. इथे फिरताना मला नेहमी एक जाणवत रहायचं की हे सगळं असताना पण इथे पाणी वाचवणं, जंगल वाचवणं याचा किती विचार करतात. ३) पण आपल्याकडे हा विचार होताना दिसत नाही. दरवर्षी मे महिना आला की, पाऊस पडेल का? पडला तर पुरेसा पडेल का? दुष्काळ तर नाही ना पडणार? अशा चिंतांनी महाराष्ट्र ग्रासलेला असतो. पण म्हणून जे पाणी पावसाच्या रूपाने येतं त्याचं नियोजन आपण करत नाही. आपण आपली जंगलं पण वाचवत नाही. कुठलंही सरकार असू दे त्याला या गोष्टीशी काही घेणंदेणं नाही. आपल्याकडे अंतिमकर्म करायला दहन करायला लाकडं वापरतात, पण माझं म्हणणं आहे की काय हरकत आहे आपण विद्युतदाहिनीचा वापर केला तर? किती लाकूडतोड थांबेल याचा आपण विचार करतोय का? सरकारने मग ते केंद्रातील असो की राज्यातील, त्यांनी विद्युतदाहिन्यांवर भर दिला तर प्रचंड जंगलतोड वाचेल. आपण आपल्या धर्माबद्दल अभिमानी असलं पाहिजे, त्यात जे सांगितलं आहे ते पाळायला हरकत नाही फक्त हे करताना काळाच्या ओघात आपण निसर्गाची हानी करत नाही आहोत ना हे देखील बघायला हवं. ४) पण सध्या कोणाचं लक्ष नाहीये. सगळे व्यस्त आहेत 'लाडकी बहीण', 'लाडक्या भावात'. लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडकी बहीण एकत्र आले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते. मुळात अशा योजना राबवायला राज्यसरकारकडे पैसे आहेत का? सरकारकडे रस्त्यांवरचे खड्डे बुजवायला पैसे नाहीत, योजनांना कुठून पैसे येणार ? ५) माझी महाराष्ट्र सैनिकांना विनंती आहे की, आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती आहे. लोकांना मदतीची गरज आहे. त्यामुळे तुम्ही या लोकांकडे जा, त्यांना मदत करा, त्यांना काय हवं नको ते पहा. ६) महाराष्ट्राचे खरे प्रश्न काय आहेत यांकडे कोणाचं लक्ष नाहीये. या प्रश्नांकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, कारण इतर कोणाला काही पडलेली नाही. हेच तुमचं प्रचाराचं कॅम्पेन पाहिजे. ७) आज कुठला आमदार कुठल्या पक्षाचा, कुठल्या गटाचा आहे हे कळत नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांची स्पर्धा कुठवर जाईल हे सांगता येत नाही. मध्ये मला कोणीतरी सांगितलं की आपल्याकडचे एक, दोन लोकं दुसरीकडे जायला निघालेत. मी म्हणलं जरूर जा, हवं तर जाण्यासाठी मीच रेडकार्पेट घालतो. तिथे जे आहेत त्यांचंच काही खरं नाही, यांचं काय होणार आहे. ८) निवडणुका आल्या की सर्व्हे करणाऱ्या एजन्स्या येतात, ते सर्व्हे करतात, ती किती लोकांना भेटतात देव जाणे. पण आपल्याकडे मी मध्यंतरी पदाधिकाऱ्यांच्या टीम्स जिल्ह्या-जिल्ह्यात पाठवल्या होत्या, ते पदाधिकाऱ्यांना न भेटता, तिथल्या स्थानिकांना, पत्रकारांना भेटून त्यांचा अहवाल घेऊन मला भेटले. आता त्या टीम्स पुन्हा मी तुमच्याकडे पाठवणार आहे, त्या आता तुम्हाला भेटणार आहेत. त्यांना तुमच्या मतदारसंघातील परिस्थिती समजवून सांगा. त्यांना प्रामाणिकपणे वस्तुस्थितीची माहिती द्या, तुम्ही जे सांगाल, जी माहिती द्याल ती मी चेक करणार आहे, त्यामुळे जे खरं आहे तेच सांगा. आणि मी आत्ताच सांगतो लढण्याची,जिंकण्याची तयारी असलेल्यानाच तिकीट मिळेल, तिकीट मिळालं आणि मी आता पैसे काढायला मोकळा असल्याना मी तिकीट देणार नाही.

Raj Thackeray

43,359 views • 2 years ago