Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

मराठी समजत नसल्याने युवराजला शेहेनशाह यांनी टपली मारून उभा केलं

64,268 görüntüleme • 1 yıl önce •via X (Twitter)

0 Yorum

Yorum bulunmuyor

Orijinal gönderinin yorumları burada görünecek

Benzer Videolar

हीच ती पत्रा चाळ! आता प्रशस्त अशी मराठी माणसांची सोसायटी तयार झाली. 😍 बिल्डरांना हाताशी धरून याच चाळीतून संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी 627 मराठी माणसांना बेघर केलं होतं. 17 वर्षे बेघर केलं, अनेकांना तर आयुष्य उध्वस्त झालं म्हणून जीव सोडला जे जिवंत आहेत त्यांनी लढा चालू ठेवला होता. 2017 मध्ये राज्याचे तत्कालीन व आताचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis जी यांनी गोरेगाव मध्ये असलेल्या महाराष्ट्र मंडळांच्या गणपतीचे दर्शनासाठी आले होते, तेंव्हा पत्राचाळीच्या लोकांनी देवेंद्रजी यांची भेट घेऊन त्यांच्यावर संजय राऊत आणि बिल्डरने केलेल्या अन्यायाचा पाढा वाचून दाखवला. देवेंद्रजी यांनी तात्काळ लक्ष घालात पहिली कारवाई केली म्हाडा अधिकाऱ्याचे चोवीस तासाच्या तात्काळ निलंबन केलं, बिल्डरांने बांधलेल्या खाजगी टोलेजंग इमारतीचा OC रद्द केला. जोपर्यंत पत्राचाळीतील मराठी माणसाचे घरे बांधून देणार नाही तोपर्यंत बिल्डरने बांधलेल्या खाजगी इमारतीला OC देयच नाही. तेंव्हा पत्राचाळीतील रहिवाश्यांना बिल्डरने घर बांधून कामाला सुरुवात केली. देवेंद्रजी यांनी आज मराठी माणसांना हक्काचे घर मिळवून दिलेत. ज्या मराठी माणसांना मुंबईतून हद्दपार करण्यासाठी संजय राऊत उबाठा याने बिल्डर सोबत हातमिळवणी करून मराठी माणसाला बेघर केलं होता. फक्त आणि फक्त भाजप आणि देवेंद्रजी फडणवीस हे एकमेव मराठी माणसाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलेत. मराठी माणसाचा खरा वाली कोण? याच उत्तर शोधायचं असेल तर पत्रा चाळीतील मराठी कुटुंबियांना विचारा..

Prakash Gade

20,215 görüntüleme • 9 ay önce

मराठीची मागणी केली म्हणून काही रेल्वेच्या tc ने मराठी प्रवाशाला २ तास झाले बंदीस्त (कैद) करून ठेवले आहे, मराठीची मागणी करणे कामात अडथळा केव्हा पासून होऊ लागला..?? मराठी tc ला पुढे करून प्रवाशाला अंधेरी पूर्व RPF Western Railway इथे बंदिस्त केलं आहे. मराठीची मागणी केल्यावर आता प्रवाशाला नाहक त्रास देणार? मराठी प्रवाशाला सोडवायला आम्ही मराठी एकीकरण समिती चे पदाधिकारी 4.45ला पोहचतोय अंधेरी पूर्व rpf DRM - Mumbai Central, WR Western Railway GRP Mumbai यांनी लक्ष घालावे मुंबई पोलीस Mumbai Police मराठी माणसाला रेल्वे आता मराठी मागणी केली म्हणून त्रास देतेय CMO Maharashtra Devendra Fadnavis Uday Samant LoksattaLive ABP माझा TV9 Marathi Pudhari News Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार

मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti

35,594 görüntüleme • 2 ay önce

"भाषा बोलणे, ऐकणे, समजणे इतपर्यंत मर्यादित नाही. भाषा तुमची ओळख आहे, संस्कृती आणि इतिहासाशी त्याच नातं असतं. जगाशी संपर्क ठेवण्यासाठी इंग्रजी येणं जरी आवश्यक असलं तरी स्वतःची ओळख आणि पाळंमुळं घट्ट फक्त मातृभाषाच ठेवू शकते." २७ फेब्रुवारी, मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरमराठी पुस्तक प्रदर्शन आयोजित केलं होतं. त्या प्रदर्शनाच्या उदघाट्न सोहळ्याच्या कार्यक्रमात ज्येष्ठ पटकथा लेखक श्री. जावेद अख्तर यांनी मातृभाषा का जपली पाहिजे, वृद्धिंगत केली पाहिजे हे विशद करणारं एक अप्रतिम भाषण केलं. #अभिजात_पुस्तक_प्रदर्शन२०२५

Raj Thackeray

83,392 görüntüleme • 1 yıl önce

आज पुण्यात विश्व मराठी संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमात, माझ्या हस्ते अभिनेते आणि माझे मित्र, श्री. रितेश देशमुख यांचा सत्कार झाला. या संमेलनाला मी उपस्थित रहावं अशी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री आणि मराठी भाषा मंत्री श्री. उदय सामंत यांनी मला गळ घातली. आणि त्याचा मान राखून, मी या समारोपाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. यावेळी माझं मनोगत मी व्यक्त केलं. त्या मनोगतातील महत्वाचे मुद्दे... '... मी हल्ली अनेक ठिकाणी बघतो की २ मराठी माणसं भेटली की ती एकमेकांशी हिंदीत किंवा इंग्रजीत बोलतात, का असं ? आपणच आपल्या भाषेचं अस्तित्व टिकवलं नाही तर कसं होणार ? आज महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये मराठी माणसांना जसा मानसन्मान मिळायला हवा तो मिळत नाहीये. त्यात आपली भूमी, इथली जमीन बाहेरचेच गिळंकृत करत आहेत. आपण इतिहास असं म्हणतो तो कुठल्यातरी प्रदेशाला पादाक्रांत करण्यासाठी झालेल्या लढाईचा इतिहास असतो. आज महाराष्ट्रातील जमीन गिळंकृत करण्याचा जो डाव सुरु आहे, त्यातून उद्या जर आपलं म्हणजे मराठी माणसाचं अस्तित्वच पुसलं गेलं, तर मराठी भाषेचं अस्तित्व तरी काय राहणार आहे? मग आपला इतिहास तरी काय असणार ? यामुळे सरकारने मराठी भाषा टिकवण्यासाठी जसे प्रयत्न केले पाहिजेत, तसे प्रयत्न मराठी माणूस टिकावा म्हणून केले पाहिजेत. आम्ही आमच्या परीने मराठी भाषेसाठी, मराठी माणसासाठी जे जे करणं शक्य आहे ते करत आहोत, करत राहू. सरकारने त्याला साथ द्यावी, काही वेळेला आमचे मार्ग वेगळे असतात, त्यामुळे सरकारने आमच्यावर केसेस टाकू नये, कारण जे आम्ही करत आहोत ते मराठी माणसासाठी करत आहोंत. बाकी साहित्यिकांनी साहित्य निर्माण केलंच पाहिजे पण भूमिका पण घेतली पाहिजे. आणि मराठी तरुण-तरुणींनी पण साहित्य वाचायला हवं, पुस्तक वाचलीच पाहिजेत. बौद्धिक मशागतीसाठी पुस्तकांना पर्याय नाही. आपला इतिहास, आपले महापुरुष हे जगापर्यंत आपण पोहचवले पाहिजेत, पण हे करताना सध्या आपल्या महापुरुषांना जातीत विभागणं सुरु आहे, ते थांबलं पाहिजे... आपण मराठी भाषिक म्हणून एकत्र आलो, आपल्या भाषेशी, संस्कृतीशी घट्ट राहिलो तर जगात आपलं कोणीच वाकडं करू शकणार नाही हे विसरू नका....' या भाषणाची चित्रफीत सोबत जोडली आहे. ती जरूर बघा..

Raj Thackeray

49,591 görüntüleme • 1 yıl önce

५२ पात्रे आणि हास्याचा वारसा... डॉ. लक्ष्मण देशपांडे यांच्या प्रतिभेला आणि त्यांच्या ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या अद्वितीय कलाकृतीला शब्दांत बांधणे म्हणजे भावनांना आकार देण्यासारखे आहे. हे नाटक म्हणजे केवळ रंगमंचावरील सादरीकरण नव्हते; ते मराठवाड्याच्या मातीचा सुगंध घेऊन लंडनच्या रस्त्यांवर पोहोचलेले एक सांस्कृतिक आंदोलन होते. एकटा कलाकार, पण रंगमंचावर संपूर्ण गाव जिवंत करणारा! देशपांडे यांनी अभिनयाच्या माध्यमातून मराठवाडी बोलीला इतके सजीव केले की प्रेक्षकांना प्रत्येक पात्र, प्रत्येक प्रसंग स्वतःच्या डोळ्यांसमोर उभा असल्याचा भास झाला. त्यांच्या कलाकृतीतून दिसते की कला ही केवळ मनोरंजनाची साधनं नाही, तर ती समाजाच्या भावविश्वाला जोडणारी एक अदृश्य दोरी आहे. मराठवाड्यापासून लंडनपर्यंत पोहोचलेला हा प्रवास प्रत्येक नाट्यप्रेमीला सांगतो की रंगभूमीवर विश्वास ठेवला तर ती जग जिंकू शकते. डॉ. देशपांडे यांनी अभिनय केला नाही, तर त्यांनी रंगमंचावर एक जीवंत गाव उभं केलं. त्यांच्या आवाजात, हावभावात आणि बोलीतून मराठवाड्याची आत्मा प्रकट झाली.

बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ

10,711 görüntüleme • 4 ay önce

महाराज आम्हाला माफ करा! तुम्ही हिंदवी स्वराज्य घडवलं … अठरापगड जाती स्वराज्यात गुण्यागोविंदानं नांदत होत्या. मात्र आज या महाराष्ट्रात जाती-पातीत फूट पाडली जात आहे आणि तुमच्या स्वराज्याला सुरुंग लावण्याचा कृत्य महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. यांनी तुमच्या नावानं फक्त राजकारण केलं… तुमच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या, तुमच्या पराक्रमाची प्रत्येक पिढीला साक्ष देणाऱ्या गड-किल्ल्यांवर जेव्हा अतिक्रमण झाले तेव्हा मतांच्या हव्यासापोटी मविआ नेत्यांची ते अतिक्रमण हटविण्याची हिंमत सुध्दा झाली नाही. कारण महाराज तुमच्यापेक्षा यांना सत्ता कायम महत्त्वाची वाटली. मात्र शिवरायांच्या विचारांनी प्रेरित एक सच्चा मावळा, आपल्या गड-किल्ल्यांवर होणारे अतिक्रमण हटवत आहे. पण हे देखील महाविकास आघाडीच्या डोळ्यात खुपत आहे, म्हणूनच या सच्च्या मावळ्याविरोधात या असुरी शक्ती उभ्या आहेत. उभा महाराष्ट्र हे पाहतोय! #छत्रपती_शिवाजी_महाराज #रायगड #हिंदवी_स्वराज्य Devendra Fadnavis

भाजपा महाराष्ट्र

35,183 görüntüleme • 2 yıl önce

आमच्यातलाच "तो" एक... मी जरी भाजपा महायुती समर्थक असलो तरी हे लिहितो... बरोबर दीड एक वर्षांपूर्वी काल एन्काउंटर झालेल्या रोहित आर्य ने पुण्यात एक महिना उपोषण केले होते... थकलेल्या पैश्यासाठी. त्याच्याकडे तेव्हा कुणाच लक्ष नाही गेले...शेवटी तो फिट येऊन पडला...दीपक केसरकर यांनी पैसे थकवले म्हणून ही झालं होतं अस त्याचा बायकोच म्हणणं आहे...व्हिडिओ पाहा. कालच्या गोष्टी मधे त्याची मेथड नक्कीच चुकली...पण त्याच्यावर ही वेळ का आली? म्हणजे दीड वर्षे त्याने कसे सहन केले असेल?? काल देखील त्याला डायरेक्ट यमसदनी पाठवण्याची गरज का पडली?? पायांवर गोळी मारून देखील त्याला जेरबंद केलं जाऊ शकलं असतं.. असो.. एवढच सांगेन.. खूप काही गोष्टी तो त्याच्यासोबत घेऊन गेला... इथून पुढे तरी सर्वसामान्यांवर ही वेळ येऊ नये याची काळजी सरकार ने घ्यावी🙏...आणि घटनेची सखोल चौकशी करावी.

यदुनाथ जवळकर🔥

66,466 görüntüleme • 10 ay önce

आजचा गोवा एक्सप्रेस मधला किस्सा आहे. दोन पायावर उभा राहायला जागा नाही इतकी गर्दी. टॉयलेट्स सामानने भरलेली. वाट काढत टॉयलेटपर्यंत जाण सुद्धा अवघड होतं. या लहानुसा मुलग्याचं कुटुंब जळगाव वरून सकाळी 9:30 वाजता ट्रेन मध्ये चढले होतं. साधारण 2 वाजता या मुलाला लघवी लागली. त्याआधी त्याने 100% टक्के थोडं तरी कंट्रोल केलं असणार. कारण भयंकर गर्दी होती. याला अक्षरशः दरवाज्यात उभा करून मूतवावं लागलं. काहीजण आदल्या रात्री बसलेले दुसऱ्या दिवशी दुपार झाली तरी टॉयलेट नाही. मोदीजी म्हणाले 2022 ला बुलेट ट्रेन येईल. त्या मुलाचं कुटुंब पाहून वाटत नव्हतं कि त्याच्याकडे तितके पैसे असले तरी तो बुलेट ट्रेन ने प्रवास करेल. देशात अजूनही फक्त स्वस्तात पडत म्हणून general class/ स्लीपर क्लास नेच प्रवास करणारे लोकं खूप आहेत. जास्तकरून मजूर. बुलेट ट्रेन आली तर नाहीच पण उगाच जनतेला मोठमोठ्या थापा मारून गेल्या नऊ वर्षात मूलभूत सुविधा सुद्धा देणं झालं नाही मोदी सरकार ला. लोकांना या गोष्टी कळत नाहीत का ? अजून किती दिवस मोदीजींच्या थापांना भुलणार आहेत लोक. वंदे भारतचा एव्हडा गाजावाजा करतय सरकार त्यांची सच्चई तुम्हाला सांगतो मित्रानो. मी महिन्यातून एकदा तरी पुणे-कुर्डूवाडी प्रवास करतो इंटरसिटी ने. आमच्या मार्गावर वंदे भारत सुरु झाली आहे. सर्वसामान्यांना अजिबात परवडत नाही. त्यापेक्षा अजून एक इंटरसिटी सुरु केली असती तर परवडलं असतं. गोरगरिबांना लुटून मोठ्यांची घरं भरणे हाच अमृतकाळ आहे मित्रांनो.

Samadhan Kate

69,719 görüntüleme • 3 yıl önce

बातमी आहे एबीपी माझामुळे आपल परदेशात शिक्षण घेण्याच स्वप्न पूर्ण करणाऱ्या आदिवासी टॅक्सी ड्रायव्हर तरुणीची. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यापासून जवळपास ७० किलोमीटर दूर असलेल्या रेगुंठा गावात टॅक्सी ड्राईव्हर म्हणून काम करणाऱ्या किरण कुर्मावार हीची दोन वर्षापूर्वी एबीपी माझाने बातमी दाखवली होती. किरण दररोज अनेक आव्हानांचा सामना करत रेगुंठा ते सिरोंचा या आदिवासीं भागात टॅक्सी चालवून आपल्या कुटुंबाचा गाढा ओढत होती. आशा ही परिस्थितीत आपलं परदेशात शिकण्याच स्वप्न पूर्ण व्हाव यासाठी किरण प्रयत्न करत होती. अनेक प्रयत्न केल्यानंतर किरणला लंडन येथील लीड्स युनिव्हर्सिटीत एमएससी इन मार्केटिंग मॅनेजमेंट या विषयाचा अभ्यास करण्यासाठी प्रवेश मिळाला मात्र जायच कस हा प्रश्न उभा राहिला. एबीपी माझाने किरणची उच्च शिक्षण घेण्याची धडपड दाखवली आणि त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या विशेष अधिकारातून ४० लाख रुपयांची रक्कम किरणसाठी उपलब्ध करून दिली. या शिष्यवृत्ती मुळे किरणने आपलं उच्च शिक्षण घेण्याच स्वप्न पूर्ण केलं. नुकतीच तिचा पदवीप्रधान समारंभ लीड्स युनिव्हर्सिटी लंडन येथे पार पडला. यासाठी प्रामुख्याने मदत झाली ती एबीपी माझा संपूर्ण टीम, आमदार सचिन अहिर, पत्रकार राजेश कोचरेकर, प्रा. सुषमा अंधारे, वैशाली जाधव, विशाल ठाकरे, प्रवीण निकम तुम्हा सर्वांचे मनपुर्वक आभार. Eknath Shinde - एकनाथ शिंदे CMO Maharashtra Sachin Ahir SushmaTai Andhare University of Leeds

Nilesh Budhawale

21,440 görüntüleme • 1 yıl önce

आज, ११ जानेवारी २०२६ रोजी शिवतीर्थ दादर येथे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवशक्तीची जाहीर सभा पार पडली. या सभेत माझे व शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांचे भाषण झाले. माझ्या भाषणातील प्रमुख मुद्दे - - आज या क्षणाला आम्ही दोन भाऊ एकत्र आल्यानंतर आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि माँ. मिनाताई असायला हवे होते. - गेले अनेक दिवस मराठीच्या या लढ्यात आम्हाला दीपक पवार व त्यांचे सहकारी, टेलिव्हिजन चॅनल्सचे पत्रकार आणि संपादक यांसारख्या अनेकांनी मदत केली त्यांचे मनःपूर्वक आभार! - मी आणि उद्धव आम्ही एकत्र येण्याचं मूळ कारण म्हणजे या मुंबईवर आलेलं संकट. - अकोटमध्ये भाजपने एमआयएमसोबत युती केली. बदलापुरात भाजपने काँग्रेससोबत युती केली. - भाजपचे ६६ जण बिनविरोध निवडून आले. म्हणजे ६६ ठिकाणी मतदार मतदान करू शकत नाहीत. - तुळजापूरात ड्रग्ज रॅकेटमधला आरोपी विनोद गंगणेला भाजपने तिकीट दिलं. बदलापुरातील बलात्काराच्या प्रकरणातील सह-आरोपी तुषार आपटेला नगरसेवक केलं. ही हिंमत भाजपमध्ये आली कुठून? - सध्या महाराष्ट्रात जे काही सुरू आहे त्याचं चित्र पाहून तुम्हाला भीती वाटली नाही तर निवडणुका न लढवलेल्याच बऱ्या. - जगामध्ये अदानींप्रमाणे १० वर्षांत इतक्या मोठ्या प्रमाणात श्रीमंत झालेला दुसरा माणूस नसेल. सरकारची एकट्या अदानींवर इतकी मेहरबानी का? - वाढवणला बंदर येतंय ठीक आहे. पण विमानतळ कशासाठी तर, सगळे कार्गो वाढवणला नेणार आणि मुंबई विमानतळावरची सगळी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणं नवी मुंबईत हलवणार आणि नंतर मुंबई विमानतळाची जमीन विकायला काढणार. - आधीपासून त्यांच्या डोक्यात आहे मुंबई गुजरातला न्यायची. त्यासाठी पालघरचा जिल्हा ताब्यात घ्यावा लागेल, ठाणे जिल्हा आणि एमएमआर परिसराचा भाग ताब्यात घ्यावा लागेल आणि नंतर मुंबई गुजरातला जोडून घेणं सोपं होईल. - एकदा मुंबई हातातून गेली तर महाराष्ट्र झारखंडपेक्षा वेगळा करणार नाहीत हे. - देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी भुजबळांना जेलमध्ये टाकलं होतं. अजित पवारांविरोधात बैलगाडीभरून पुरावे फडणवीसांनी सादर केले आणि आता त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसलेत. आणि आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करताय? - काल उत्तर भारतातला एक माणूस बोलला, मुंबई महापालिकेत नोकऱ्या द्यायच्या असतील तर इथल्या उत्तर भारतीयांना दिल्या पाहिजेत, बाहेरून कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातून येणाऱ्यांना कशाला द्यायच्या. आमच्या कोल्हापूर, सातारा, सांगलीतून येणारी लोकं बाहेरची झाली? - तुम्ही मराठी म्हणून एकत्र येता कामा नये म्हणून यांचा हा खेळ सुरू आहे. - मराठी माणसाला एकटं पाडण्यासाठी हा डाव रचला जातोय. पण एकटे असलो तरी बास आहोत. - माझा कोणत्याही भाषेला विरोध नाही पण तुम्ही आमच्यावर लादणार असाल तर लाथच मारू. - हिरे, मोती, सोनं, चांदी व अन्य कितीही मौल्यवान वस्तू असतील तरी फक्त जमिनीला रिअल इस्टेट म्हंटलंय कारण तीच खरी संपत्ती आहे. जर जमीन तुमच्या हातातून गेली तर तुमचे अस्तित्व संपते. - ही मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक आहे. आज जर चुकलात तर मुकलात म्हणून समजा. - माझं इतर पक्षांतील मराठी माणसांनाही आवाहन आहे. सोडा ते सगळं मराठीसाठी एक व्हा, महाराष्ट्रासाठी एक व्हा. - ही मुंबई, हा महाराष्ट्र मराठी माणसाच्या हातात रहावा, तुमच्या हक्काचं असावं तुमचंच आहे ते. - जो लढा आजवर मराठा साम्राज्याने दिला तो लढा आता आपल्याला उभा करायचाय. हा महाराष्ट्र वाचवायचाय, महाराष्ट्र समृद्ध करायचाय, ही मुंबई आपल्याला वायचायचीये यासाठी आपण कामाला लागाल अशी अपेक्षा करतो. - 'हिंदीची सक्ती राष्ट्रीय एकतेसाठी घातक ठरेल हे सत्य कोणीही लपवू शकत नाही' हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हे किती घातक आहे हे तेव्हाच लिहून ठेवलंय.

Raj Thackeray

75,944 görüntüleme • 8 ay önce

कसबा विधानसभेचे उमेदवार श्री. गणेश भोकरे यांच्या प्रचारार्थ पुण्यात कसबा पेठेत सभा घेतली. त्यात मांडलेले मुद्दे १) माझ्यासाठी कसब्याचं वेगळं महत्व आहे. मी जेंव्हा शिवसेनेतून बाहेर पडलो आणि महाराष्ट्राचा दौरा केला आणि पक्षाची स्थापना केली, त्यावेळी कसबा गणपतीची पूजा करून पक्षाची स्थापना केली होती. याचं कारण या जागेचं महात्म्य. या जागेचं महत्व काय आहे समजून घ्यायला हवं. शहाजी राजांनी जेंव्हा बंड केलं ते बंड मोडण्यासाठी संपूर्ण पुणे उध्वस्त केलं. मग शहाजीराजे आदिलशाहीकडे गेले आणि नंतर कित्येक वर्ष शाहजी राजे आणि जिजाऊ माँसाहेब बंगलोरला राहिले. पुढे जेंव्हा महाराज आणि जिजाऊ महाराज इकडे परत आले. इथे लाल महाल बांधला गेला. तेंव्हा इकडे आपलं देऊळ नव्हतं. जिजाऊ महाराजा २) या भागाने अख्ख्या हिंदवी प्रांतावर जवळपास एक शतक राज्य केलं. पण आपण आपला इतका दैदिप्यमान इतिहास विसरलो. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज फक्त त्यांच्या जयंतीलाच आठवतात. परदेशात बघा लहान लहान मुलांना कसा त्यांचा इतिहास शिकवला जातो. ३) ज्या कस्ब्याचा इतिहास इतका दैदिप्यमान आहे आज त्या कसब्याची परिस्थिती किती भीषण आहे. इतक्या छोट्या गल्ल्या, कशीही पसरलेली वस्ती. पण तुम्हाला काहीच वाटत नाही. ४) आज मी उमरखेडला गेलो, तिकडे मी बोललो की या राज्यातील पहिली शेतकरी आत्महत्या उमरखेडला झाली त्यावर लोकांनी टाळया वाजवल्या. काय झालंय लोकांना ? आत्महत्या झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाबद्दल पण आपल्याला सहानभूती नाही वाटत. काय झालं आहे या महाराष्ट्राला? ५) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांची कारकीर्द संपायच्या आधी १० दिवस असताना एक कायदा केला, की युद्धावरती जे कुत्रे बॉम्बचा शोध घेण्यासाठी पाठवले जातात त्या कुत्र्यांना युद्धाच्या ठिकाणी जखमा झाल्या किंवा तो अपंग झाला तरी त्याला अमेरिकन भूमीत परत आणलं पाहिजे, कारण काय तर तो कुत्रा पण अमेरिकन नागरिक आहे. कुत्र्यांचा पण जगभरात सन्मान होतो आणि भारतात नागरिकांना पण किंमत दिली जात नाही. काय अवस्था झाली आहे आपली ? ६) आज पुण्यात मेट्रो, फ्लायओव्हर बनत आहेत, पण ही प्रगती नाही. पुणे शहर आतून पोखरले जातंय. आज पुण्यात हॉस्पिटलमध्ये जागा मिळत नाहीये, बागा नाहीत, चालायला धड रस्ता नाही, मला सांगा तरीही तुम्ही कसं म्हणू शकाल की पुण्याची प्रगती झाली म्हणून ? ७) २०१९ ला आधी अजित पवारांचा शपथविधी झाला, पण ते लग्न पंधरा मिनिटं नाही टिकलं, काकांनी डोळे वटारले आणि अजित पवार परत आले. पुढे उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जाऊन बसले. मग शिंदेंना म्हणे अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसताना घुसमट होते म्हणून शिंदे ४० आमदार घेऊन गेले, बरं हे जाताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कळलंच नाही. ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसायला नकोसं वाटत होतं तेच अजित पवार मांडीत येऊन बसले. अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद द्यायच्या आधी १० दिवस नरेंद्र मोदी म्हणाले होते की ७०,००० कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्याला आम्ही जेलमध्ये टाकू, पण पुढे १० दिवसांत जेलमध्ये टाकायच्या ऐवजी त्यांना उपमुख्यमंत्री केलं. ८) माझ्या पक्षाने जितकी आंदोलनं केली तितकी आंदोलनं कोणी केली ते सांगा? मोबाईलवर जे मराठी ऐकू येतं ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कानफटीमुळे सुरु झालं. मी मोबाईल कंपन्यांना सांगितलं की ४८ तासाच्या आत मोबाईलवरमराठी ऐकू यायला पाहिजे आणि ते करून घेतलं. हे का नाही इतर कुठल्या पक्षांना सुचलं ? ९) मी मराठीपण सोडलं नाही आणि कधीही सोडणार नाही. मी जितका कडवट हिंदुत्ववादी आहे तितका कडवट मराठी आहे. इतर भाषिक लोकं किती कडवट असतात. मी सिंगापूरला गेलो होतो तेंव्हा एका दुकानात एक तामिळ बाई तमिळ रेडिओ ऐकत होती. आपण असं करू कधी ? महाराष्ट्राला जो इतिहास आहे तो देशात कुठल्याही प्रांताला नाही. आपण भाषेबद्दल कडवट नाही, इतिहासाबद्दल आपल्याला प्रेम नाही. १०) काही वर्षांपूर्वी वर्तमानपत्रांत मी फोटो पाहिले की रेल्वे स्थानकावर उत्तर प्रदेश, बिहार मधून आलेली मुलं झोपली आहेत. मग जरा चौकशी केली तेंव्हा कळलं की ती रेल्वेभरतीसाठी आली आहेत. बरं रेल्वेभरती महाराष्ट्रातील पण त्याच्या जाहिराती महाराष्ट्राच्या बाहेर. मग असं का म्हणून आम्ही संघर्ष केला, त्या संघर्षानंतर महाराष्ट्रात रेल्वेच्या परीक्षा मराठीत घ्यायला सुरुवात झाली आणि हजारो मराठी मुलांना रेल्वेत नोकरी मिळाल्या. ११) मराठी पाट्या होत नव्हत्या, आमच्या आंदोलनामुळे त्या झाल्या. मी त्या आंदोलनाच्या वेळेस त्यांना एक पत्र लिहिलं, त्यात लिहिलं की दुकान महाग आहे का पाटी महाग आहे का हे ठरवावे आणि शेवटची ओळ लिहिली की तरी पण तुम्ही पाट्या मराठीत नाही केल्या तर माझे महाराष्ट्र सैनिक त्यांना भेटायला येतील. पाट्या झाल्या मराठीत. १२) मशिदींवरचे भोंगे उतरवले पाहिजेत म्हणून मी आंदोलन केलं. उद्धव ठाकरेंचं सरकार होतं, मी सरकारला समज दिली की मशिदींवरचे भोंगे नाही उतरवलेत तर माझे महाराष्ट्र सैनिक मशिदीसमोर जाऊन हनुमान चालीसा लावतील. त्यावर उद्धव ठाकरेंनी भोंगे उतरवायच्या ऐवजी माझ्या महाराष्ट्र सैनिकांवर केसेस टाकल्या. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा मशिदींवरचे भोंगे उतरवायचा ऐवजी आंदोलन करणाऱ्यांवर केसेस टाकतो ? १३) राहुल गांधींना एका सभेत खासदार गायकवाड छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट देत होत्या तर राहुल गांधी सरळ दुर्लक्ष करून निघून गेले. आपल्या महाराजांचा अपमान करणाऱ्यांना तुम्ही निवडून देणार ? स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला तुम्ही निवडून देणार ? १४) महाराष्ट्राच्या राजकारणाची पार रया घालवली ती संत शरद पवारांनी. इतर संतांनी जातीभेद विसरा म्हणून सांगितलं तर शरद पवार नावाच्या संताने मात्र जाती जातीत भांडण लावणे, एकमेकांना शिव्या द्यायची शिकवण देत आहेत. १५) या महाराष्ट्राला आकार देण्याचं माझं स्वप्न आहे. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवण्याचं माझं स्वप्न आहे, इथल्या प्रत्येक तरुण-तरुणीला नोकरी मिळायला हवी, इथल्या महिला सुरक्षित राहिल्या पाहिजेत, शेतकरी सुखी व्हायला हवेत ही माझी इच्छा आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की एकदा माझ्या हातात सत्ता देऊन बघा, इतरांना संधी दिलीत मला एकदा संधी देऊन बघा. #विधानसभ_२०२४

Raj Thackeray

62,399 görüntüleme • 1 yıl önce

आज मुंबईतील "शिवतीर्थ" या मैदानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्याला संबोधित केलं या भाषणातील महत्वाचे मुद्दे - १) गेल्या निवडणुकीत ज्यांनी मतदान करून ज्यांची मतं दिसली त्या मतदारांचे मी आभार मानतो आणि ज्या मतदारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मतदान करून देखील, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये ज्यांची मतं दिसली नाहीत त्यांचे पण मी आभार मानतो. निवडणुकीत जे झालं ते झालं आता पुढे काय ते बघूया.. २) गेल्या काही दिवसात ज्या काही घटना घडल्या त्यांच्याबद्दल मला बोललंच पाहिजे. पहिला विषय कुंभमेळा. बाळा नांदगावकरांनी गंगेचं पाणी आणलं मी पिणार नाही सांगितलं. नव्याने वारं शिरलेल्या हिंदुत्ववाद्यांना वाटलं मी कुंभमेळ्याचा अपमान केला. आपल्या देशातील नद्यांची जी अवस्था आहे जिला आपण माता म्हणतो, त्या नद्यांकडे आपल्या राज्यकर्त्यांचं काय लक्ष आहे त्यावर मी बोललो. स्व. राजीव गांधींनी गंगा साफ करण्याचं काम सुरू केलं, पुढे २०१४ ला मोदीजी पंतप्रधान झाले आणि त्यांनी पण गंगा साफ करण्याचा प्रकल्प हाती घेतला. कुंभमेळ्यानंतर ज्यांनी तिकडे जाऊन स्नान केलं त्यातले लाखो लोक आजारी पडले. प्रश्न कुंभमेळ्याच्या अपमानाचा नाहीये तर गंगा स्वच्छतेचा आहे. ज्यागंगेला आपण माता म्हणतो तिची आजची परिस्थिती काय आहे हे दाखवणारी एक चित्रफीत मी आणली आहे... गंगा शुद्धीकरणावर ३३ हजार कोटी खर्च झालेत. तिकडे घाटावर मृत व्यक्तीला अग्नी दिल्यासारखं करतात आणि नंतर पाण्यात ढकलतात. हा कोणता धर्म ? आपल्या नैसर्गिक गोष्टींच्या आड जर धर्म येणार असेल तर काय उपयोग ? हजार वर्षांपूर्वीची गोष्ट वेगळी होती, आता तीच परिस्थिती कशी चालेल ? आपण निसर्गासाठी काही सुधारणा करणार आहोत की नाही ? आपल्या नद्या स्वच्छ राहिल्या पाहिजेत. धर्माच्या नावाखाली आपण नद्या बरबाद करतोय. प्रत्येकाला धर्म प्रिय असतो पण त्या धर्मात सुधारणा केल्या पाहिजेत. ३) महाराष्ट्रात पण हीच परिस्थिती आहे. सावित्री नदी केमिकलने भरली आहे. देशभरात एकूण ३११ नदीपट्टे प्रदूषणामुळे धोक्याच्या पातळीवर असून यात महाराष्ट्रातील तब्बल ५५ नदीपट्टे प्रदूषित आहेत. ४) प्रदूषणाच्या मानकांनुसार (स्टँडर्ड्स नुसार ) उल्हास, मिठी, मुळा-मुठा, सावित्री, भीमा, पवना, कान्हा, तापी, गिरणा, कुंडलिका, दारणा, इंद्रायणी, नीरा, वैनगंगा, चंद्रभागा, मुछकुंडा, घोड, तितुर, रंगवली, वर्धा, कृष्णा, पाताळगंगा, सूर्या, वाघूर आणि ढोरणा या नद्यांच्या पात्रांमधील पाणी हे अति वाईट आहे. भातसा, पेढी, मोर, बुराई, वेल,पांझरा, सिना, काळू, वेण्णा, कोयना, मांजरा, पैनगंगा, पूर्णा, उरमोडी व कान या नद्यांच्या पात्रांचे पाणी वाईट या कॅटेगरीत म्हणजे तुलनेने कमी वाईट आहे. ५) मुंबईत ५ नद्या होत्या. त्यातल्या चार मेल्या म्हणजे मारल्या. सांडपाणी, झोपडपट्ट्या यांनी मारल्या. मिठी नदी पण मरायला टेकली आहे. मुंबईतील एकमेव राहिलेली नदी मिठी तिची काय अवस्था आहे ते बघा... दरवर्षी मुंबई महापालिका मिठी नदी साफ करणार असं म्हणते, जोपर्यंत नदीच्या दोन्ही बाजूला असलेली घरं हटवत नाही, तोपर्यंत मिठी नदी स्वच्छ होणार नाही. निसर्गाच्या हानीबद्दल कोणी बोललं की आपण म्हणणार धर्माच्या आड येतो. धर्माचं मला सांगूच नका. आपण भिंतीवर झाडं जगवा झाडं लावा असे संदेश लावतो. आणि देशातील हिंदूंचे अंतिम संस्कार लाकडांवर होतात. लाकडं कुठून येतात, जंगलं तोडूनच ना ? विद्युतदाहिन्या आल्या आहेत पण तरीही अनेक लोकं विद्युतदाहिनी नाकारतात. पंतप्रधानांना जंगलांची आवड आहे. आत्ता ते मध्ये अंबानींच्या वंताराला गेले. म्हणजे त्यांना प्राण्यांची आवड आहे. मग जंगलं त्यांनी वाचवली पाहिजेत. ६) भारताचा जन्म-मृत्यूचा आकडा हा दररोज ८१ हजार ७४६ जन्म होतात दररोज २९ हजार ६७९ मृत्यू होतात. दररोज पन्नास हजाराने लोकसंख्या वाढत आहे ७) महिन्याला २४ लाख ५२ हजार ३८० जन्म होतात महिन्याला ८ लाख नव्वद हजार ३७० मृत्यू होतात महिन्याला १५ लाख लोकांची वाढ होते. ८) वर्षाला २ कोटी ९४ लाख २८ हजार ५६० जन्म होतात, वर्षाला १ कोटी ६ लाख ८४ हजार ४४० मृत्यू होतात म्हणून दर वर्षी १ कोटी ८० लाखाने लोकसंख्या वाढते. एका बाजूला आपण दुष्काळाने त्रस्त आहोत म्हणून बोंबलत बसायचं आणि दुसरीकडे जंगलं तोडायची. ९) आपण अडकलोय औरंगजेबाची कबर तोडली पाहिजे का राखली पाहिजे या चर्चेत. आत्ता कुठून आठवला औरंगजेब ? चित्रपट पाहिल्यावर हिंदुत्व आठवलं ? चित्रपट पाहिल्यावर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य आठवतं ? हल्ली कोणीही विधानसभेत इतिहासावर बोलतात... माहिती तरी आहे का हे औरंगजेब प्रकरण ? औरंगजेबाचा जन्म गुजरातमधल्या दाहोदमधला. मग यावरून ब्राह्मण, मराठा आणि इतर जातीत भांडणं लावायची. यांना फक्त तुमची माथी भडकवायची आहेत. यांना छत्रपती संभाजी महाराजांशी घेणंदेणं नाही. या हिंद प्रांतात एक कडवट, प्रभावी स्वप्न ज्यांना पडलं त्या जिजाऊ साहेब. हे त्यांचं स्वप्न. त्यांना कळायचं नाही की आमचीच लोकं यांच्याकडे का चाकरी करत आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराज हिंद प्रांतावर केलेला संस्कार आहे, तो एक चमत्कार आहे, तो एक विचार आहे. १०) छत्रपती शिवाजी महाराज हा विचार जन्माला यायच्या अगोदर या हिंद प्रांताची काय स्थिती होती ? शहाजी राजे पण आधी आदिलशाहीत होते मग पुढे निजामशाहीत गेले. महाराजांचा लढा या सर्वांच्या विरोधात होता. त्यांना तुम्ही जातीत का पाहता ? अफजल खानाचा वकील ब्राह्मण होता आणि महाराजांच्या वतीने त्याच्याशी बोलायला गेलेला पण ब्राह्मणच होता. त्यावेळेस काय निर्णय घेतले असतील आपल्याला काय माहिती ? आग्र्याच्या दरबारात संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर औरंगजेबाची पाच हजारी मनसबदारी घेतली. महाराजांच्या परवानगीशिवाय घेतली असेल काय ? त्या परिस्थितीत जे करणं आवश्यक होतं ते महाराजांनी केलं. मिर्जाराजे जयसिंग, उदयभान राठोड यांच्याशी जो संघर्ष झाला तेही हिंदू होते ना ? औरंगजेब विषय निघाला म्हणून परत सांगतो, त्याचं राज्य अफगाणिस्तान ते दक्षिणेपर्यंत आणि इकडे बंगाल पर्यंत. छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झाल्यावर, औरंजेबाच्या एका मुलाला आसरा छत्रपती संभाजी महाराजांनी दिला आहे. १६८१ ते १७०७ औरंजेब महाराष्ट्रात लढत होता. आमच्या संभाजी राजांसोबत लढला, त्यांना क्रूर पद्धतीने मारलं. राजाराम महाराज लढले, संताजी धनाजी लढले. नरहर कुरुंदकरांच्या पुस्तकात एक छान वाक्य आहे, मराठे सर्व लढाया हरत होते पण औरंगजेब एकही लढाई जिंकला नाही. ११) औरंगजेबाची कबर सजवली आहे ती सजावट काढा आणि तिथे लिहा की आम्हा मराठ्यांशी लढायला आलेल्या औरंगजेबाला आम्ही इथेच गाडला. १२) मरहट्ट्यानी ज्यांना ज्यांना गाडलंय त्यांची प्रतीकं उखडून चालणार नाही, उलट आपण जगाला ओरडून सांगितलं पाहिजे की आम्ही कोणाकोणाला गाडलंय ते... शाळेपासून लहान मुलांना दाखवलं पाहिजे महाराजांनी आपल्या धर्माला भ्रष्ट करणाऱ्या औरंजेबाला गाडला... माझी महाराष्ट्रातील तरुण-तरुणींना विनंती आहे की इतिहास व्हाट्सअप वर वाचू नका. इतिहास तुम्हाला जातीतून शिकवायचा प्रयत्न केले जातात त्यामागे कुठलातरी राजकीय पक्ष असणार आहे. तुम्ही एकमेकांच्यात भांडता आणि हे कामं उरकून घेतात. १३) महाराष्ट्रात एअरपोर्ट असेल की बंदर असेल सगळं अदानीला देणं सुरु आहे. अदानी हुशार आहे आणि आपण अडाणी निघालो. १४) लाडकी बहीण योजनेचं काय चाललं आहे? विधानसभेत चर्चा सुरू आहे कशावर तर औरंजेबावर... तुमच्या प्रश्नावर नाही. १५) आपण ज्यांना मुघल म्हणतो ते तुर्की -मंगोल आहेत. धर्माच्या आधारावर देश नाही उभं करता येत. हे समजलं टर्कीला. केमाल पाशा तिकडे आला. तिकडे इस्लाम आता मवाळ आहे. तिकडे मशिदी आहेत पण रस्त्यावर धर्म दिसत नाही. केमाल पाशानी ओट्टोमन खलिफाचे पद संपुष्टात आणले, जे इस्लामिक जगताचे धार्मिक नेतृत्व मानले जात होते. १६) तुर्कीच्या राज्यघटनेत तुर्कीला धर्मनिरपेक्ष राष्ट्र घोषित केले. इस्लामला राज्य धर्माचा असलेला दर्जा काढून टाकला. सध्याच्या टर्कीच्या अध्यक्षांनी पण मवाळ धर्म स्वीकारला. आज टर्कीला पर्यटनासाठी ५ कोटी लोक भेट देतात. विचार करा किती सुंदर देश बनवला असेल. १७) आम्ही मशिदींवरचे लाऊडस्पिकर बंद करा म्हणून आंदोलन केलं तर माझ्या महाराष्ट्र सैनिकांवर केसेस टाकल्या. देवेंद्र फडणवीसांनी आता सांगितलं की रात्री १० ते सकाळी ६ लाऊड स्पीकर लावता येणार नाही. अहो प्रश्न सकाळी ६ ते १० चा नाहीच, दिवसभर भोंगे वाजतात त्याचं काय ? योगी आदित्यनाथ यांनी उत्तरप्रदेशमध्ये मात्र मशिदींवरचे भोंगे उखडून टाकले. त्यांना जमतं मग आम्हाला का नाही जमत ? १८) बीडमध्ये संतोष देशमुख यांना क्रौर्याने मारलं. जे घडलं वीज कंपनीच्या राखेवरून. राखेतून फिनिक्स पक्ष जन्माला येतो म्हणतात बीडमध्ये राखेतून गुंड जन्माला येतात. संतोष देशमुखांना वाल्मिक कराड यांच्या लोकांनी खंडणी आणि पैशाच्या विषयातून मारलं. मग त्यावर कोणीतरी पुढे केलं वंजाऱ्यांनी मराठा माणसाला मारलं. मारणाऱ्याची आणि ज्यांचा मृत्यू झाला त्यांची जात कशी निघू शकते ? १९) आज मुला-मुलींना नोकऱ्या मिळत नाहीत त्याकडे लक्ष नाहीये. इतके मराठा मुख्यमंत्री झाले पण मराठा समाजाची अवस्था का नाही सुधारली ? जात जातीला सांभाळत नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असं आश्वासन दिलं होतं, का नाही झाली कर्जमाफी ? अजित पवारांनी काल सांगितलं की तुम्ही ३० तारखेच्या आत पैसे भरून टाका. २०) लाडकी बहीण योजना सरकार चालवू शकत नाही. सरकारला दरवर्षी ६० हजार कोटींचा या योजनेचा बोजा आहे. सरकारला या योजना परवडणार नाहीत. २१) आज तरुण-तरुणींच्या नोकऱ्यांबद्दल कोणीच बोलत नाहीये, त्यांना सगळ्यांना जातीत गुंतवून त्यांना एकमेकांची डोकी फोडायला लावत आहेत. तुम्ही मराठी म्हणून एकत्र आलं पाहिजे. २२) टॉरस नावाची कंपनी दुप्पट परतावा देतो म्हणून आमिषं दाखवून लुटून गेली. मराठी माणूस सध्या असुरक्षित आहे. आमच्या राज्यात येऊन आम्हाला सांगणार असाल की मराठी बोलणार नाही, कानफाट फोडेन त्यांचं. उद्यापासून बँकांमध्ये जाऊन मराठी कारभार होत आहे का हे बघा. नसेल तर त्यांना करायला लावा. २३) ( आज मी माझ्या आजोबांच्या उठ मराठ्या उठ या १९६६ सालातील पुस्तकातील एक उतारा वाचून दाखवणार आहे. तो काळजीपूर्वक ऐका... "आज महाराष्ट्राचा मराठा आत्मस्वरूपाला पारखा होऊन ना अरत्री ना परत्री अशा मोहमयी अवस्थेत आहे. त्याचा उज्ज्वल भूतकाळ त्याने चुकूनही आठवू नये, या धोरणाने त्याच्या त्या इतिहासाची जडणघडण नव्या राजकारणी रंगढंगाला साजेशी बदलण्याचा उद्योग चालू आहे. काळाच्या कचक्यालाही न जुमानता ग्रंथ दस्तात आणि पिढ्यांपिढ्यांच्या स्मरणात परंपरेने चिरंजीव झालेल्या ठळक ऐतिहासिक घटनांवर ही निरनिराळे बनावट अर्थ बनविण्यात येत आहेत. जिकडे पाहावे तिकडे - गलबला बुद्धी नासते । नाना निश्चय सांगती । ऐकावे कोणकोणाचे । बोलताहे बहुचकी । करंटे मिळाले सर्वही । जो तो बुद्धीच सांगतो ।। असा समर्थोक्त देखावा दिसत आहे. बुद्धिभेदाच्या या वावटळीत शिक्षितांपासून अशिक्षित मजुरांपर्यंत सारे गुरफटले गेले आहेत. जागृतीचा, उत्थानाचा बोध करील, तो जातीयवादी, संकुचित वृत्तीचा, देशद्रोही म्हणून त्याची सर्वत्र निंदानालिस्ती आणि जाहीर सभांतून निषेध करण्यात येतो. कारण स्पष्ट आहे. महाराष्ट्राचा मऱ्हाठा जागा होऊन आपल्या आत्मस्वरूपाचा शोध घेण्याइतका कदरबाज स्वाभिमानी बनू लागला, तर सत्ता स्पर्धेच्या, शर्यतीच्या रिंगणात आपापल्या पक्षीय घोड्यावर स्वार झालेल्याचे रिकिबीतले पाय लटपटल्याशिवाय राहणार नाहीत." प्रबोधनकार ठाकरे । ) २४) तुम्ही मराठी म्हणून एक व्हा आणि बघा यांचे पाय कसे लटपटतील ते... आजच्या मराठी नववर्षाच्या निमित्ताने शपथ घ्या की आम्ही मराठी म्हणून एकत्र येऊ, आणि जो कोणी मराठी माणसाच्या किंवा मराठी भाषेच्या अंगावर येईल त्याला मराठी म्हणून अंगावर घेऊ. आणि जर कोणी हिंदूंच्या अंगावर आलं तर त्यांना हिंदू म्हणून अंगावर घ्या.. २५) आपला एक अहिल्या नगर जिल्ह्यातील महाराष्ट्र सैनिक प्रमोद अरणे हा कोल्हापूरला जाऊन अंबाबाईचं दर्शन घेऊन आजच्या मेळाव्याला चालत आला आहे. अशा सैनिकांमुळे मला ऊर्जा मिळते. #गुढीपाडवामेळावा२०२५

Raj Thackeray

140,202 görüntüleme • 1 yıl önce