Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी प्रखर हिंदुत्वाच्या रक्षणासाठी सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना.. आशीर्वाद शिवछत्रपतींचे एक वर्ष सुराज्याचे.. #Shivsena #VarshSurajyache #varshpurti

47,123 просмотров • 3 лет назад •via X (Twitter)

Комментарии: 0

Нет доступных комментариев

Здесь появятся комментарии из оригинального поста

Похожие видео

राम जन्मभूमी न्यास कोषाध्यक्ष तसेच अयोध्याधाम मथुरा जन्मभूमी उपाध्यक्ष प. पू. स्वामी गोविंद देवगिरी महाराजांनी माझ्या वाढदिवसानिमित्त आशीर्वाद रुपी दिलेल्या शुभेच्छासाठी मन:पूर्वक आभार. स्वामी महाराज आपण दिलेल्या शुभेच्छा या माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहेत. जनसेवेचे घेतलेले हे व्रत कायमस्वरुपी जपण्यासाठी आणि आपल्या सनातन धर्माचा भगवा अविरत फडकत रहावा यासाठी माझ्या हातून सत्कार्य घडो यासाठी आपले आशीर्वाद असेच माझ्या पाठीशी राहतील असा विश्वास आहे. आपल्या शुभेच्छांसाठी पुन्हा एकदा आपले मनःपूर्वक आभार. #EknathShinde #Shivsena #Maharashtra Shivsena - शिवसेना

Eknath Shinde - एकनाथ शिंदे

19,925 просмотров • 1 год назад

#शिवसेना पक्षाचे नाव व चिन्हाच्या सुनावणीसाठी आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा मिळाली तारीख!! चीड आहे, जे सुरू आहेत भयंकर आहे!!! कुठे आहे न्यायालय??? कुठे आहे न्याय? माननीय 'सर्वोच्च न्यायालय' हे न्याय देण्यासाठी की न्याय प्रलंबित करण्यासाठी? लोकशाहीचा खेळ सुरू आहे! चिन्हाचा गैरवापर करून निवडणूकांच्या मागे निवडणूका सुरूच आहेत... एवढे सरन्यायाधिश झाले, न्याय मिळत नाही... संविधान वगैरे बाजुला, 'आमच्या मनात येईल ते संविधान' असे सन्मानानीय सर्वोच्च न्यायालयाने एकदा सांगुन टाकावे. ह्याच संदर्भात आज माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया!!! - खासदार अरविंद सावंत नेते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) #ShivsenaSymbol #Shivsena #SupremeCourt Office of Uddhav Thackeray Aaditya Thackeray Shivsena UBT Communication ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray

Arvind Sawant

12,878 просмотров • 8 месяцев назад

मध्य रेल्वे ही खरोखर 'मध्य रेल्वे' आहे की 'उत्तर भारतीय रेल्वे'? रेल्वेच्या पक्षपाती धोरणामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात , विशेषतः कोकणी आणि मराठी माणसांमध्ये प्रचंड संताप आहे. १५०० विशेष गाड्यांच्या घोषणेत महाराष्ट्राच्या वाट्याला काय आले? 🚩 बिहारसाठी: ४५० गाड्या 🚩 उत्तर प्रदेशसाठी: ३३२ गाड्या 🚩 कोकणासाठी: फक्त ३६ गाड्या! दादर - रत्नागिरी ही महत्त्वाची गाडी बंद केली? या पक्षपातामुळे लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. आधीच हिंदी भाषेची सक्ती केल्यामुळे लोक नाराज होते, आता गाड्यांच्या बाबतीतही हाच भेदभाव होत आहे. आज लोकसभेत शून्य प्रहरामध्ये (Zero Hour) रेल्वेकडून होणार्‍या ह्या पक्षपाताबद्दल आवाज उठवला. उपस्थित केलेले मुख्य मुद्दे: 🚨सीएसएमटी-गोरखपूर रोज धावते, पण सीएसएमटी-मडगाव आठवड्यातून फक्त एकदाच का? 🚨कोकणवासीयांची महत्त्वाची दादर-रत्नागिरी गाडी बंद करून सरकारने काय साध्य केले? 🚨पुणे-नांदेड, नांदेड-हडपसर यांसारख्या महत्त्वाच्या गाड्यांची क्षमता का घटवली? 🚨ज्या कोकणवासीयांनी रेल्वेसाठी लढा दिला, त्यांच्यावरच हा अन्याय का? ह्यामुळे माननीय रेल्वे मंत्र्यांकडे खालील मागण्या केल्या : १. दादर-रत्नागिरी गाडी तात्काळ पुन्हा सुरू करा. २. कोकणासाठी गाड्यांची संख्या वाढवा. ३. हडपसरला टर्मिनेट केलेल्या गाड्या पुन्हा पूर्ण क्षमतेने चालवा. - खासदार अरविंद सावंत नेते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) #ArvindSawant #LokSabha #ShivsenaUBT Office of Uddhav Thackeray Aaditya Thackeray Shivsena UBT Communication ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray

Arvind Sawant

19,791 просмотров • 6 месяцев назад

देवेंद्र फडणवीस आपण महाराष्ट्र विरोधी भूमिका घेऊ नये. उत्तरप्रदेशच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तुम्ही हुकूमशहा सारखे वागत आहात. आयुष्यभर फक्त निवडणुका आणि मतांचे गणित मांडण्यात तुम्ही मराठी ओळख संपवायला निघाला आहात. लाज वाटते आम्हाला की आपण एक भाषिक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात हे सांगायला. साका पाटील गेला नाही तो पुन्हा तुमच्या रुपात मुख्यमंत्री झालाय सका पाटील फक्त बोलला आपण तर प्रत्यक्ष करून दाखवले. Devendra Fadnavis #निषेध ! #निषेध ! तात्काळ अंमलबाजानी झालीच पाहिजे १ वर्ष स्थगिती महाराष्ट्राच्या नागरिकांना मान्य नाही

मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti

10,888 просмотров • 1 месяц назад

शिवसेना उबाठाचे सहा खासदार फुटून शिंदे सेनेसोबत "महाविकास आघाडीचे खासदार निवडून आले तर ते भाजपसोबत जाणार नाहीत, असे लिहून द्या," अशी अट वंचित बहुजन आघाडीने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत टाकली होती. पण असे लिहून देण्यास महाविकास आघाडीने नकार दिला. कारण की हे कोणीच भाजप विरोधात लढू शकतात नाही हे स्पष्ट आहे. भाजपविरोधात लढायचे नाटक करायचे, निवडून यायचे आणि पुन्हा भाजपसोबत जायचे; मग हे खरोखर भाजपविरोधी आहेत का? महायुती = महाविकास आघाडी हे एकच आहे आणि भाजपची ए टीम महाविकास आघाडी आहे. हे आता महाराष्ट्राच्या जनतेने ओळखले आहे. भाजप विरोधात लढणारा एकमेव पक्ष वंचित बहुजन आघाडी आहे. #BJP_A_Team_MVA

Vanchit Bahujan Aaghadi

16,827 просмотров • 3 месяцев назад

आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी माफी मागितली, त्याचवेळी त्यांच्या चेहऱ्यावर मग्रुरी होती, असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले ही फार मोठी शोकांतिका आहे.. स्वातंत्रवीर सावरकर यांचा वारंवार अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्यावर अजून काय होणार..? झालेल्या घटनेबद्दल माफी मागतानाच, सोबत वीर सावरकरांचे नाव घेणे ही जर उद्धव ठाकरेंना मग्रुरी वाटत असेल, तर ते अतिशय दुर्दैवी आहे. ज्या वीर सावरकरांनी शिवरायांवर सुंदर अशी आरती लिहिली, त्यांचे नाव घेणे तुम्हाला मग्रुरी वाटते..? तुमच्या मनातील सावरकर द्वेष आज पुढे आला आणि आपण हिंदुत्व सोडले यावर पुन्हा एकदा आज शिक्कामोर्तब झाले..! लक्षात ठेवा ज्यांनी हिंदुत्व सोडले त्यांना आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेण्याचा सुद्धा अधिकार नाही.. जय जिजाऊ जय शिवराय ! Uddhav Thackeray ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray

Chitra Kishor Wagh

37,407 просмотров • 2 лет назад

तुम्ही गुन्हे करायचे… 100 कोटी लोकांकडून लुबाडायचे… त्याच्या चौकशीसाठी आयोग स्थापन करायचा… आयोगाचा अहवाल मात्र तुमच्याच खिशात दाबून ठेवायचा आणि पुन्हा चोराच्या उलट्या बोंबा मारायच्या… हा महाविकास आघाडीचा खेळ उघड झाला आहे. अनिल बाबू ….अनिल देशमुख ANIL DESHMUKH कांगावा करत होते की त्यांना चांदिवाल आयोगाची क्लीनचिट मिळाली मात्र त्यांचं हे खोटं देखील आज खुद्द चांदिवाल यांनीच जगाला सांगितलं… खरंतर या निर्लज्ज महाभकास आघाडीने केलेत्या भ्रष्टकारभाराचं पाप, त्यांना आमच्या देवाभाऊंच्या माथी मारायचं होतं. अनिल देशमुख यांनी देवेंद्रजींवर खोटे आरोप करत त्यांना गोवण्याचा केलेला प्रयत्न मा. जस्टीस चांदिवाल यांनी धुडकावून लावला… हे सत्य देखील आज जगासमोर आलं आहे. .. निवडणुका आल्या की भोंगा वाजवायचा आणि स्वतःच्या लालसेपाई महाराष्ट्राच्या जनतेचं आणि जनतेच्या प्रामाणिक नेत्यांचं आयुष्य पणाला लावायचं हे आता महाराष्ट्र खपवून घेणार नाही… धन्यवाद चांदिवाल साहेब.. तुम्ही या भ्रष्टभकास आघाडीचा खेळ महाराष्ट्राच्या जनतेसमोर उघड केला. आता जनताच या महाभकास आघाडीचा खेळ खंडोबा करणार हे लक्षात घ्या… Maharashtra Congress Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar Chandrashekhar Bawankule Bhupender Yadav Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार

Chitra Kishor Wagh

12,016 просмотров • 1 год назад

ज्यांनी केला विरोध, त्यांनीच मुख्यमंत्री साहेबांवर दाखवला विश्वास ! राज्यातील मराठा बांधवांच्या आरक्षणासाठी कटिबध्द असलेल्या मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेबांवरचा मराठा समाजाचा दृढ विश्वास आज परभणीतील पाथरी येथे पुन्हा एकदा दिसून आला. शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या भव्य नोकरी महोत्सवाच्या निमित्ताने आज पाथरी येथे उपस्थित होतो. यावेळी तरुणांना संबोधित करत असताना माझ्या मराठा बांधवांनी काळे झेंडे दाखवत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तात्काळ त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी त्यांना मंचावर चर्चेसाठी आमंत्रित केले. माझे सहकारी त्यांना मंचावर घेऊन आले. यावेळी मराठा समाजाच्या या तरुण बांधवांशी चर्चा केली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही त्यांची शुद्ध मागणी होती. राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब करत असलेल्या उपाययोजनांबाबत त्यांना माहिती दिली. राज्यभरात मराठा बांधवांना कुणबी दाखले देण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न त्यांना यावेळी सांगितले. मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची त्यांनाही माहिती होती. त्यामुळे माझ्या या मराठा बांधवांनी आपल्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांवर विश्वास असल्याचे प्रांजळपणे कबूल केले. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हेच मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतात, असा विश्वास याच मराठा बांधवांनी यावेळी मंचावरील जाहीरपणे बोलून दाखवला. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न सर्व शुद्ध आहेत. मराठा समाजाच्या बांधवांनीही वेळोवेळी याची कबुली दिली आहे. आम्हाला निषेध करायचा नव्हता तर लक्ष वेधायचे होते असेही या बांधवांनी कबूल केले. त्यामुळे आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिंदे साहेबांचा मराठा समाजाचा विश्वास किती दृढ आहे हे दिसून आले. #DrShrikantEknathShinde #Shivsena

Dr Shrikant Lata Eknath Shinde

64,972 просмотров • 2 лет назад