正在加载视频...

视频加载失败

यामध्ये एकही शब्द नाही पण हे ऐकल्यावर तुमच्या मुखातून प्रत्येक शब्द निघेलच... 👌👌🙏🙏 अवश्य ऐका !

31,236 次观看 • 7 个月前 •via X (Twitter)

0 条评论

暂无评论

原始帖子的评论将显示在这里

相关视频

'आकाशी झेप घेरे पाखरा' - एका अजरामर गाण्याची गाथा काही गाणी अशी असतात जी नुसती ऐकल्यावर मनात घर करून राहतात, आणि 'आकाशी झेप घेरे पाखरा' हे त्यापैकीच एक आहे. मराठी मनाच्या अगदी खोलवर रुजलेलं हे गाणं, नुसतं एक गीत नसून ते एक स्फूर्तिगीत आहे; प्रत्येक अडचणीवर मात करून पुढे जाण्याची, स्वप्नांना गवसणी घालण्याची प्रेरणा देणारं एक अमृतवाक्य आहे. जेव्हा कधी मन खचलेलं असतं, दिशाहीन वाटतं, तेव्हा हे गाणं आठवतं. 'घाबरू नकोस, पंख पसर आणि घे भरारी!' असा धीर देणारं हे गाणं, आपल्याला आपल्याच मर्यादा ओलांडायला शिकवतं. ते सांगतं, की आयुष्य म्हणजे केवळ जगणं नाही, तर प्रत्येक क्षणाला भरारी मारणं आहे. आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवून, न घाबरता ध्येयाकडे वाटचाल करण्याची उमेद हे गाणं आपल्याला देतं. या गाण्याचे शब्द, संगीत आणि गायकी यांचा त्रिवेणी संगम आपल्याला एक वेगळ्याच विश्वात घेऊन जातो. आजही हे गाणं ऐकताना अंगावर शहारे येतात आणि एक अनामिक ऊर्जा मनात संचारते. हे फक्त एक गाणं नाही, तर प्रत्येक मराठी माणसाच्या मनात घर करून राहिलेलं एक शाश्वत सत्य आहे – 'आकाशी झेप घेरे पाखरा!'

बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ

11,877 次观看 • 1 年前

नेहमी पाठीशी राहीन म्हणालात... आणि एका क्षणात आम्हाला पोरके करून गेलात दादा..! आपण ज्येष्ठ आहात म्हणून मी कधीच आपल्यावर रुसले नाही... पण आज मी आपल्यावर रुसले दादा...! ही जाण्याची वेळ नव्हती.. सदैव महाराष्ट्राच्या पाठीशी आपण आधार बनून उभे राहिलात, हा आधार यापुढे महाराष्ट्राच्या पाठीशी नसणार, आपल्या नावापुढे "स्वर्गीय" शब्द लिहावा लागणार हा विचारच अंगावर काटा आणणारा, वेदनादायक आहे. आपण आम्हाला सोडून गेलात ही बाब अजूनही महाराष्ट्राच्या पचनी पडणारी नाही. आज महाराष्ट्रातील प्रत्येक गावात आपल्या आठवणींनी अश्रू वाहत आहेत. आपण महाराष्ट्राला जे प्रेम दिलं ते प्रत्येकाच्या डोळ्यात आज दिसतंय. आपलं केवळ असणं हे माझ्यासह प्रत्येक कार्यकर्त्याला बळ देणारं होतं. कठोर शासक, कार्यतत्पर प्रशासक, झुंजार नेतृत्व हे आपल्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू सबंध महाराष्ट्राने अनुभवले. पण, आपल्या या कठोर व्यक्तिमत्वाचा हळवा कोपरा अनुभवण्याचं भाग्य मला लाभलं. अगदी पोटच्या मुलीप्रमाणे आपण मला भरभरुन प्रेम दिलं. आपण आमच्यातून गेलात हे मानण्यास मी तयार नाही, आपल्या उत्तुंग कार्यातून, असंख्य आठवणींतून आपण आमच्या मनात चिरायू आहात ! #दादा #AjitPawar 💔💔

Aditi S Tatkare

19,526 次观看 • 8 个月前