正在加载视频...

视频加载失败

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाले आहे, राज्यात दुखावटा असताना फटाके फोडणे, फुले उधळणे हे योग्य नाही, मी हे स्वीकारणार नाही. फुले उधळणे, फटाके लावणे हे आपल्या फुले-शाहू-आंबेडकरवादी चळवळीत बसत नाही. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यक्रमामध्ये जर कुठेही हारतुरे, फुलांची उधळण, फटाके हे वापरले तर तेथील सभा ही...

28,592 次观看 • 7 个月前 •via X (Twitter)

0 条评论

暂无评论

原始帖子的评论将显示在这里

相关视频

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्यामुळे राज्यात दुखावटा असताना कोणत्याही सभा-कार्यक्रमात फटाके फोडणे किंवा फुले उधळणे हे योग्य नाही, आणि मी त्याचा स्वीकारही करणार नाही. फुले उधळणे व फटाके फोडणे हे आपल्या फुले-शाहू-आंबेडकरवादी चळवळीशी सुसंगत नाही. यापुढे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यावे की, वंचित बहुजन आघाडीच्या कोणत्याही कार्यक्रमात हारतुरे, फुलांची उधळण किंवा फटाके वापरले गेल्यास संबंधित सभा तात्काळ रद्द करण्यात येईल. वंचित बहुजन आघाडीने यासंदर्भात अधिकृत पत्रकाद्वारे सूचना दिलेल्या आहेत. पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन करून जर कुठेही हारतुरे, फुलांची उधळण किंवा फटाके वापरले गेले, तर त्या ठिकाणची सभा पक्षाच्या आदेशानुसार रद्द करण्यात येईल. #एक_संधी_वंचितला #VoteForVBA #VBAForIndia

Sujat Ambedkar

11,735 次观看 • 7 个月前

गेल्या पंधरा दिवसांपासून रहेजा बिल्डर विरुद्ध राहुल जाधव असा संघर्ष सुरू आहे. जर मनसे पदाधिकारी आणि नेते 'मराठी माणूस, मराठी माणूस' म्हणतात त्यांना सांगायचे आहे की, वंचित बहुजन महिला आघाडीच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष स्नेहल सोहनी आणि युवा आघाडीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सागर गवई हे रहेजा बिल्डरच्या ऑफिसमध्ये मराठी माणसासाठीच गेले होते. मनसेला बौद्ध राहुल जाधव हे मराठी आहेत हे दिसत नाही का? मनसेचे लोकं गरिब लोकांना मारत असतात ते श्रीमंत बिल्डरच्या विरोधात आवाज उठवणार का? याविरोधात आवाज उठवण्याचे काम वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल असताना सुद्धा पोलिस रहेजा बिल्डरला अटक का करत नाही? हा प्रश्न आम्ही उपस्थित केला. यानंतर पोलिसांकडून स्नेहल सोहनी आणि सागर गवई यांना बेकायदेशीररित्या अटक केले तेव्हा कोर्टाने आम्हाला न्याय दिला. मनसे मराठी माणूस म्हणते, तेव्हा त्यांना हे मराठी माणसाचे प्रश्न दिसत नाही का? बौद्ध समाजाचे राहुल जाधव हे मराठी व्यक्ती दिसत नाही का? मनसे फक्त गरीब अमराठींना विरोध करणार का? जेव्हा-जेव्हा मुंबईकरांवर अत्याचार होईल, तेव्हा तेव्हा वंचित बहुजन आघाडी आपल्या स्टाईलने उत्तर देईल. : चेतन अहिरे मुंबई प्रदेशाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी #Mumbai #मुंबई #VBAForMumbai

Vanchit Bahujan Aaghadi

16,090 次观看 • 7 个月前

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडी विरुद्ध भाजप अशी थेट लढत! संतोष चोळके हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत. त्यांना मतदारसंघात लोकांचा पाठिंबा ही मिळत आहे. गरीब मराठा समाजाचाही पाठिंबा त्यांना मिळतोय, हे चित्र महत्त्वाचे आहे. राहुरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राजक्त तनपुरे हे उमेदवार असते, तर आम्ही आमचा उमेदवार देण्याचा विचार केला असता. राज्यसभा निवडणुकीत भाजपने आठवा उमेदवार देऊ नये, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने भाजपसोबत समझोता केला होता. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (शरद पवार गट) भाजपमधील उमेदवार आपल्या पक्षाच्या चिन्हावर उभा केला आहे. इथे वंचित बहुजन आघाडी विरुध्द भाजप अशीच थेट लढत होत आहे. जनतेने वंचित बहुजन आघाडीच्या सोबत उभे राहावे. #राहुरी #निवडणूक

Prakash Ambedkar

10,585 次观看 • 5 个月前

शिवसेना उबाठाचे सहा खासदार फुटून शिंदे सेनेसोबत "महाविकास आघाडीचे खासदार निवडून आले तर ते भाजपसोबत जाणार नाहीत, असे लिहून द्या," अशी अट वंचित बहुजन आघाडीने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत टाकली होती. पण असे लिहून देण्यास महाविकास आघाडीने नकार दिला. कारण की हे कोणीच भाजप विरोधात लढू शकतात नाही हे स्पष्ट आहे. भाजपविरोधात लढायचे नाटक करायचे, निवडून यायचे आणि पुन्हा भाजपसोबत जायचे; मग हे खरोखर भाजपविरोधी आहेत का? महायुती = महाविकास आघाडी हे एकच आहे आणि भाजपची ए टीम महाविकास आघाडी आहे. हे आता महाराष्ट्राच्या जनतेने ओळखले आहे. भाजप विरोधात लढणारा एकमेव पक्ष वंचित बहुजन आघाडी आहे. #BJP_A_Team_MVA

Vanchit Bahujan Aaghadi

16,827 次观看 • 3 个月前

सुप्रीम कोर्टाच्या आरक्षणाच्या उप वर्गीकरण करण्याचा निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी भाजप शिंदे सरकारने निर्णय घेतला आहे. या निर्णयाला राहुल गांधींच्या काँग्रेसने, शरद पवारांच्या राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. फुले शाहू आंबेडकरवादी मतदाराला वंचित बहुजन आघाडी पूर्वीच म्हणत होती की, हे तुम्हाला फसवत आहे तर शासनाने काढलेला जीआर हा फसवण्याचा नमुना आहे. यामुळे आता विधानसभेत स्वतंत्र विचारांचे आमदार निवडून आणावे लागतील प्रस्थापित पक्ष आरक्षण संपवायला निघाले आहेत आरक्षण वाचवायच असेल तर एकमेव पर्याय म्हणजे वंचित बहुजन आघाडीला निवडून आणने, असे केले तर एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अबाधित राहील.

Prakash Ambedkar

16,642 次观看 • 1 年前

ही व्यक्ती शिक्षक आहे म्हणे..म्हणजे MPSC विद्यार्थ्यांना हे शिकवतात...हे कोणावर तरी चिडले आहेत..आणि त्यावर बोलताना त्यांनी वाक्य वापरले... आपल्या बापाचा पत्ता नाही, आपल्या बापाचा चेहरा जुळत नाही! हे वाक्य प्रचंड आक्षेपार्ह आहे..ही व्यक्ती ज्याला शिव्या देते त्याच्या आईच्या थेट चारित्र्यावर संशय घेत आहे! प्रश्न MPSC पेपर लीक आहे अशा वेळी टीका करताना थेट एका बाईच्या चारित्र्यावर घसरायचे? हा माणूस शिक्षक असेल तर त्याच्या विद्यार्थ्यांचा खरे नाही! असा माणूस सरकार आणि मुख्यमंत्र्यां बरोबर चर्चा करतो ? सगळं घाण आहे... मला लज्जा वाटली आणि भावना ही दुखावल्या गेल्या आहेत.. पण उपयोग नाही! #घाण #शिक्षकम्हणे

Rashmi Puranik

30,219 次观看 • 16 天前

आज रमाबाई नगर, घाटकोपर, मुंबई येथून #RSS ची रॅली निघाली. आधी ही रॅली रमाबाई कॉलनीमधून निघणार होती. आंबेडकरवादी जनतेने विरोध केल्यानंतर ह्या रॅलीचा मार्ग बदलला. या देशात #RSS ला विरोध फक्त आणि फक्त आंबेडकरवादीच करू शकतात. त्या विरोधात फक्त आंबेडकरवादी लढू शकतात. #RSS विरोधात बोलण्याचे, लढण्याचे नाटकं करणारे सर्व काँग्रेसी, राष्ट्रवादी, शिवसेना, नकली पुरोगामी हे सर्व बोलबच्चन आहेत. येत्या 24 ऑक्टोबर रोजी औरंगाबाद मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने #RSS च्या कार्यालयावर मोर्चा काढला जातोय. मोठ्या संख्येने फुले, शाहू, आंबेडकरवादी जनतेने सहभागी व्हावे! मनुवाद ❌ फुले, शाहू, आंबेडकरवाद ✅ #Ambedkaraite #VBAForIndia #RSS #RssTaliban #RSS100Years #रमाबाई_नगर #mumbai

Jitratn Patait

21,640 次观看 • 11 个月前

बाजार उठल्यावर पत्रकार परिषद घेऊन उदय सामंतांनी सांगितले की "मी मनोज जरांगेनां भेटलो व का भेटलो हे माझं मला माहित आहे!" अरे भाई तुम्ही राज्याचे मंत्री आहात व उद्योजकांसोबत ठरलेली मिटींग रद्द करुन तुम्ही जरांगेला भेटलात व बंद दाराआड तासभर खलबते केली. इतके महत्वाचे काय होते की तुम्हाला बंद दाराआड चर्चा करावी लागली. तुम्ही मंत्री असल्याने तुम्हाला जनतेला सांगायलाच पाहिजे की तुमचे व त्यांचे काय बोलणे झाले. जर लपवण्यासारखे काही नाही तर काय बोलणे झाले हे सांगत का नाही. तुम्ही भेटल्यानंतरच जरांगेनी आंदोलनाची घोषणा का केली? स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी सत्तेत असूनही जरांगे आडून राज्य अस्थिर करुन शिंदे किती कोत्या मनाचे आहेत हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले. जनता आता तुमच्या नाटकांना भुलणार नाही हे लक्षात घ्या शिंदे व सामंत साहेब..

Saffron Monk

10,237 次观看 • 4 个月前