Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

७ विद्यापीठं, १८२ शिक्षण संस्था... सर्वात मोठा शिक्षण सम्राट हरपला!

12,086 görüntüleme • 2 ay önce •via X (Twitter)

0 Yorum

Yorum bulunmuyor

Orijinal gönderinin yorumları burada görünecek

Benzer Videolar

राज्यातील सर्वात प्रतिष्ठित रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालयातला 'नाच' कर्मवीर भाऊराव पाटील यांनी गरिबांच्या पोरांना शिक्षण मिळावे म्हणून चालू केलेली ही शिक्षण संस्था आहे! राजकीय दलालांनी ही शिक्षण संस्था अक्षरशः हडप केली आहे, आता त्याठिकाणी असे कार्यक्रम केल्यावर, त्यातून पुढे घडणारे विद्यार्थि जनते बरोबर काय करतील? रयत शिक्षण संस्थेमध्ये 13 हजार कर्मचारी आहेत, तर 4.5 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी शिकत आहेत. शिक्षण आणि सहकार पिळून, पिळून खाणे यावरच या दलालांचे राजकरण आहे! तुमच्या पिढ्या न पिढ्या अशाच बरबाद करणे यातच हित यांचे आहे! Courtesy- @जागरुकहोऊयात

Saurabh Koratkar

84,717 görüntüleme • 1 yıl önce

तुम्ही जर शेअर बाजारातूगुंतवणूक करत असाल तर फिनइन्फ्लुएंसर अवधूत साठे हे नाव तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. शेअर बाजाराची नियामक संस्था असलेल्या 'सेबी'ने अवधूत साठे यांच्यावर आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. सेबीने साठे आणि त्यांच्या कुटुंबियांना सिक्युरिटीज मार्केटमधून पूर्णपणे निलंबित केले असून, सुमारे ५४६ कोटी रुपयांची कथित अनलॉफुल गेन जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.सेबीचा मुख्य आरोप आहे की, साठे यांच्याकडे कोणताही नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार किंवा रिसर्च ॲनलिस्ट परवाना नसतानाही, शिक्षण अभ्यासक्रमांच्या नावाखाली स्टॉक मार्केट कॉल्स दिले आणि भ्रामक दावे करून गुंतवणूकदारांची दिशाभूल केली.

Shekhar

26,239 görüntüleme • 10 ay önce

अभिमानास्पद क्षण! महाराष्ट्राच्या शिक्षकांचा राष्ट्रीय गौरव... महामहिम राष्ट्रपती मा. श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांच्या हस्ते आज राष्ट्रीय शिक्षक दिनी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे आयोजित सोहळ्यात महाराष्ट्रातील 9 प्रतिभावान शिक्षकांचा 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026' देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम, गुणवत्तापूर्ण अध्यापन, संशोधन आणि कौशल्याधारित शिक्षणाच्या माध्यमातून केलेल्या कार्याचा गौरव करणे हा राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचा मुख्य हेतू आहे. आपल्या कर्तृत्वाने महाराष्ट्राची मान उंचावल्याबद्दल सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे मन:पूर्वक अभिनंदन..! महाराष्ट्रातील पुरस्कार प्राप्त शिक्षक - शालेय शिक्षण 🏆डॉ. कविता गिट्टे – साने गुरुजी निवासी माध्यमिक विद्यालय, बीड 🏆कुंदा बच्छाव – महापालिका शाळा, नाशिक 🏆वैभव कुलकर्णी – जवाहर नवोदय विद्यालय, लातूर 🏆शिवप्रसाद टिंगरे – सैनिक स्कूल, सातारा उच्च शिक्षण 🏆डॉ. विक्रम विशाल – भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई 🏆डॉ. अमर ताकसांडे – जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालय, दत्ता मेघे संस्था, वर्धा 🏆डॉ. संदीपान नरोटे – शासकीय तंत्रनिकेतन, सोलापूर कौशल्य विकास व उद्योजकता 🏆किरण झारकर – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धाराशिव 🏆अर्चना जाधव – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, त्र्यंबकेश्वर, नाशिक President of India #Maharashtra #NationalTeachersAward2026

Devendra Fadnavis

26,841 görüntüleme • 1 ay önce

🔷PARTICIPATE MUMBAI प्रकल्पाचे लोकार्पण आणि बृहन्मुंबई महानगरपालिका-समग्र संस्था यांच्यात सर्वसमावेशक करार मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय, महानगरपालिका सभागृह येथे आज करण्यात आला. 🔷यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा सह पालकमंत्री श्री. मंगल प्रभात लोढा, मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे, उप महापौर श्री. संजय घाडी, महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे उपस्थित होते. 🔷'Participate Mumbai' या प्रकल्पाचा मुख्य उद्देश महानगरपालिकेच्या नागरी गरजा आणि उद्योग, CSR संस्था, सामाजिक संघटना तसेच नागरिकांमधील उपलब्ध क्षमता यांच्यामध्ये एक सुसूत्र आणि परिणामकारक दुवा निर्माण करणे आहे. त्यासोबतच शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, उद्याने, स्वच्छता, सार्वजनिक सुविधा, तंत्रज्ञान आणि इतर नागरी क्षेत्रामध्ये अनेक विकासात्मक गरजा आहेत. उद्योग क्षेत्राकडे कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व तसेच सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून योगदान देण्याची मोठी क्षमता उपलब्ध आहे. 🔷समग्र मुंबईतील १.३ कोटींहून अधिक नागरिकांना नागरी सेवा पुरविणारी बृहन्मुंबई महानगरपालिका सेवा वितरण अधिक जलद, सुलभ, पारदर्शक आणि परिणामकारक करण्यासाठी व्यापक सुधारणा राबवत आहे. त्या अनुषंगाने शासन व्यवस्थापन आणि सार्वजनिक सेवा सुधारणा क्षेत्रात कार्यरत Samagra या संस्थेसोबत महानगरपालिकेकडून सामंजस्य करार करण्यात आला. #MyBMCUpdates CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी

माझी Mumbai, आपली BMC

16,414 görüntüleme • 3 gün önce

मुख्यमंत्री सम्राट चौधरी की पत्नी कौन से संवैधानिक पद पर हैं? किस नियम से उन्हें प्रोटोकॉल मिल रहा है? क्यों उनके साथ इतनी गाड़ियों का काफिला चल रहा है? SP उनके काफिले में चल रहे हैं? इतने सारे पुलिसकर्मी साथ चल रहे हैं? क्यों राज्य के खर्चे पर उन्हें इतने पुलिसकर्मियों की इस श्रेणी की सुरक्षा दी जा रही है? सम्राट चौधरी की पत्नी किस अधिकार से शिक्षण संस्थानों का निरीक्षण कर रही हैं? पूरे राज्य के गवर्नेंस और अपने कार्यभार को सम्राट चौधरी ने अपने परिजनों को आउटसोर्स कर दिया है? घर वालों का अलग से किचन कैबिनेट चल रहा है? सम्राट चौधरी के पूरे खानदान को प्रोटोकॉल चाहिए? विपक्ष के नेताओं की सुरक्षा को घटाकर सम्राट चौधरी ने सारी सुरक्षा अपनी धर्मपत्नी और परिवार वालों के सुपुर्द कर दी है? बिहार की नतमस्तक मीडिया को भी देखिए! मुँह ही नहीं खुल रहा! Tejashwi Yadav #RJD #Bihar

Rashtriya Janata Dal

134,169 görüntüleme • 2 ay önce

समाजाला जागं करणारा प्रश्न - “आपण कोणावर विश्वास ठेवतोय?” वादग्रस्त ज्योतिष **कॅप्टन अशोक खरात** यांच्या संदर्भात समोर येत असलेल्या घडामोडींनी एक गंभीर आणि अस्वस्थ करणारा प्रश्न समाजासमोर उभा केला आहे. आज सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये काही लोक त्यांचे स्वागत करताना, फुलांची उधळण करताना दिसतात. पण दुसऱ्या बाजूला गंभीर आरोप, पोलिसांची कारवाई आणि संशयास्पद बाबीही समोर येत आहेत. मग प्रश्न असा - 👉 जर एखाद्या व्यक्तीकडे इतका पैसा, प्रभाव आणि मोठा पाठिंबा असेल, तर तो खरोखर “सच्चा” आहे का? 👉 की हा सर्व फक्त लोकांच्या अंधविश्वासावर उभा असलेला दिखावा आहे? ❗ समाजासमोर उभे राहिलेले महत्त्वाचे प्रश्न 👉 आपण कोणावर आणि कशाच्या आधारावर विश्वास ठेवतो? 👉 फक्त गोड बोलणे, भविष्य सांगणे किंवा प्रसिद्धी - हेच विश्वासाचं मापदंड आहे का? 👉 गंभीर आरोप असूनही लोक अशा व्यक्तींच्या पायावर का पडतात? 👉 समाजात शिक्षण आणि माहिती असूनही अंधश्रद्धा का टिकून आहे? ⚠️ अंधविश्वास की वास्तव? अशा प्रकरणांमध्ये अनेकदा लोक भावनिक, आर्थिक किंवा वैयक्तिक अडचणींमुळे “कोणीतरी मदत करेल” या आशेने अशा व्यक्तींवर विश्वास ठेवतात. पण याच विश्वासाचा गैरफायदा घेत अनेक भोंदू लोक स्वतःचं साम्राज्य उभं करतात. 👉 मोठे दावे 👉 राजकीय किंवा सामाजिक संपर्क 👉 दिखाऊ जीवनशैली हे सगळं “विश्वासार्हता” निर्माण करण्यासाठी वापरलं जातं - पण ते खरं असतंच असं नाही. 🚨 समाजासाठी महत्त्वाचा संदेश 👉 कोणत्याही व्यक्तीवर आंधळा विश्वास ठेवू नका 👉 संशयास्पद गोष्टी दिसल्यास दुर्लक्ष करू नका 👉 स्वतः जागरूक व्हा आणि इतरांनाही जागरूक करा 👉 आणि सर्वात महत्त्वाचं - जर अशा प्रकारचा त्रास, फसवणूक किंवा गैरप्रकार तुमच्या किंवा तुमच्या ओळखीतील कोणासोबत होत असेल, तर त्वरित **नाशिक पोलीस** किंवा संबंधित प्रशासनाकडे तक्रार करा. 🧠 निष्कर्ष हा विषय फक्त एका व्यक्तीपुरता मर्यादित नाही - हा आपल्या समाजाच्या विचारसरणीचा आरसा आहे. 👉 आपण प्रश्न विचारायला सुरुवात केली, तरच बदल होईल 👉 जागरूक समाजच सुरक्षित समाज असतो

Shekhar

17,829 görüntüleme • 6 ay önce

Maha-Sadhana Saptah 2026: Building a Future-Ready Governance Ecosystem Maha-Sadhana Saptah 2026, under Mission Karmayogi, stands as a first-of-its-kind and one of India’s largest Tech Learning Weeks, emphasising continuous learning, reflection, and the application of knowledge in day-to-day governance. Scheduled from 2nd to 8th April, the initiative will engage over 8.8 lakh government employees across 32 departments, targeting 35.2 lakh learning hours, an average of four hours per employee on iGOT, through 50 carefully curated courses. Through this initiative, government employees are encouraged to participate in courses, thematic webinars and other learning activities, contributing towards building an efficient, responsive and future-ready civil service. महा-साधना सप्ताह 2026 : भविष्याभिमुख सुशासनासाठी सक्षम प्रशासनिक तंत्र महा-साधना सप्ताह 2026 हा मिशन कर्मयोगी अंतर्गत आयोजित देशातील सर्वात मोठ्या टेक-लर्निंग आठवड्यापैकी एक असून, शिक्षण, आत्मचिंतन व दैनंदिन शासकीय कामकाजात ज्ञानाच्या प्रभावी वापरावर भर देतो. 2 ते 8 एप्रिल दरम्यान, या उपक्रमात 32 विभागांमधील 8.8 लाखाहून अधिक सरकारी कर्मचारी सहभागी होणार असून, 50 निवडक अभ्यासक्रमांच्या माध्यमातून iGOT द्वारे प्रत्येकी 4 तासांचे मिळून सर्वांना सरासरी 35.2 लाख तास शिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून शासकीय कर्मचाऱ्यांना अभ्यासक्रम, थीमॅटिक वेबिनार आणि इतर शिक्षणात्मक उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत असून, त्यामुळे कार्यक्षम, प्रतिसादक्षम आणि भविष्यासाठी सज्ज अशा नागरी सेवाव्यवस्थेच्या उभारणीत योगदान दिले जात आहे. Narendra Modi Devendra Fadnavis Karmayogi Bharat #Maharashtra #DevendraFadnavis #KarmayogiSadhanaSaptah

CMO Maharashtra

14,067 görüntüleme • 6 ay önce

६ आणि ७ ऑगस्ट २०२६ रोजी नाशिकच्या दौऱ्यात पदाधिकारी आणि नाशिकमधील माझ्या सहकाऱ्यांच्या सोबत बैठका घेतल्या. आणि आज ७ ऑगस्ट २०२६ रोजी नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधला. १) राष्ट्रकुल स्पर्धेतील विजेते खेळाडू काल मला नाशिकमध्ये भेटायला आले, माझी आणि त्यांची भेट झाली नाही अशा बातम्या मी पाहिल्या. मुळात श्री. गावित हे मला भेटायला आलेत हेच मला माहित नव्हतं, मला कोणी सांगितलं नाही. त्यामुळे भेट झाली नाही. बाकी ते जर भेटायला आलेत असं कळलं असतं तर भेट नक्की झाली असती. मी का भेटणार नाही ? पण त्यांचा काहीतरी गैरसमज झाला. पण या सगळ्या प्रकाराबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. सध्या ते दिल्लीला गेलेत असं कळलं, ते तिकडून आले की मी निश्चितपणे त्यांची भेट घेईन. २) मी २००३ आणि २०१५ असे दोन कुंभमेळे पाहिले. २०१५ च्या कुंभमेळ्याबद्दल बोलूया. २०१५ च्या कुंभमेळ्याची तयारी म्हणून जी कामं झाली, त्याचं जे नियोजन झालं ते इतकं सहज आणि सोप्या पद्धतीने झालं, उत्तम कामं झाली, उत्तम रस्ते झाले, सगळं नियोजन झालं. हे का झालं ? तर यातून काही अर्थकारण व्हावं असला उद्देश नव्हता. उत्तम काम व्हावं ही इच्छा होती म्हणून ते शक्य झालं. पण आत्ता जे दिसतंय, जे ऐकायला येतंय त्यातून सध्याच्या या सत्ताधाऱ्यांना यातून फक्त कमिशन कमवायचं आहे. यातले बरेचसे काँट्रॅक्टर्स गुजरातमधले आहेत. थोडक्यात वरून जसे आदेश येईल तसं वागायचं इतकंच ठरलं आहे. बाकी रस्त्यांची चाळण झाली आहे, खड्ड्यात पडून अपघात होत आहेत, माणसं मरत आहेत याचं या सरकारला काही घेणंदेणं नाही. ३) मला वाईट वाटतंय की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सत्ताकाळात आम्ही नाशिक शहर इतकं सुंदर केलं, इतके चांगले रस्ते बांधले, त्या सगळ्याची पार वाट लागली आहे. बोटॅनिकल गार्डन असेल की माननीय बाळासाहेबांच्या नावाने उभारलेलं स्मारक असेल सगळ्याची पार वाट लावून टाकली आहे. दुसऱ्यांनी केलं मग ते का टिकवायचं, ही कुठली वृत्ती ? नाशिकमध्ये झाडं तोडली गेली, लोकांनी आंदोलनं केली, प्रशासन ढिम्म राहिलं, तरीही नाशिककर जर त्याच लोकांना निवडून देणार असतील तर काय बोलायचं ? ४) दिल्लीत जंतरमंतरला जे आंदोलन झालं, तिथे विद्यार्थी, तरुण-तरुणी जमले ते काही फक्त NEET परीक्षेतील घोटाळ्यांमुळे त्रस्त झालेले विद्यार्थी नव्हते. ते आसपासच्या एकूणच परिस्थितीने त्रस्त झालेले विद्यार्थी होते. जंतरमंतरवरचं आंदोलन ही सुरुवात आहे. हे आंदोलन घराघरात शिरलं. जेंव्हा आंदोलकांना मारलं तेंव्हा प्रत्येकाला वाटलं की माझ्या मुलाला मारलं. ५) सध्या एक विचित्र ट्रेंड सुरु आहे. दहावीची परीक्षा झाली की मुलं आधी क्लास लावणार आणि मग क्लास मुलांना सांगणार कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्या ते. ही मुलं ८,८ तास क्लासला जाऊन बसणार असतील, तर मग कॉलेज काय करत आहे ? कोचिंग क्लासेसकडूनच NEET चा पेपर फुटला. आता नंदन निलेकणीना आणलं आहे, त्यांनी क्लासेसवर पहिलं लक्ष आणावं. कॉलेजची फी २० हजार आणि क्लासेसची फी १ लाख ४० हजार रुपये, हे काय आहे ? क्लासला ८ तास बसल्यावर कॉलेजला अटेंडंन्स कशी लागते ? म्हणजे क्लास आणि कॉलेजमध्ये काही अर्थकारण आहे का ? आणि या सगळ्याने त्रस्त झाल्यावर विद्यार्थी चिडले, त्यांनी आंदोलन केलं तर त्यांचं चुकलं काय ? ६) काल नाशिकमध्ये विद्यार्थी भेटले ते म्हणाले, सर परत पेपर नाही ना फुटणार ? मला ऐकूनच वाईट वाटलं. काल नाशिकमध्ये मला NEET परीक्षेतील गोंधळाने नैराश्य येऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे (यश गोसावी ) आई वडील भेटले. ज्या २१ मुलांनी आत्महत्या केली त्यात त्याचं नाव नाहीये. आपल्या जिल्ह्यातील मुलगा व्यथित होऊन आत्महत्या करतो, याबद्दल पालकमंत्र्यांना सहानुभूती नाही वाटत ? ७) सध्या भाजपमध्ये अंतर्गत सत्तासंघर्ष सुरु आहे. तुम्ही जेंव्हा बाहेरचे शत्रू संपवता तेंव्हा तुमच्या आत शत्रू तयार होतात हा इतिहास आहे आणि हेच भाजपमध्ये सुरु आहे. ८) क्लासेसचा जो काही धंदेवाईक अप्रोच आहे आणि कॉलेजेसची काही भूमिकाच नाहीये या सगळ्यावर सरकारने आता स्पष्ट भूमिका घ्यावी. वर्तमानपत्रांत पानपानभर क्लासेसच्या जाहिराती येतात की हा पहिला आणि तो पहिला आला. कसा आला ? जेंव्हा पहिल्यांदा NEET चा पेपर फुटला तेंव्हा त्याचा रेट २५ लाख होता असं ऐकायला आलं आणि आता तो दीड कोटी होता असं ऐकायला आलं. डॉलरचा रेट का वाढला हे कळलं आता. ९) आज देशातील तरुण-तरुणी त्यांच्या मोबाईलवर बाहेरचे जग बघतात आणि जेंव्हा आसपासची परिस्थिती बघतात तेंव्हा त्यांना नैराश्य नाही का येणार ? त्यांना का रहावसं वाटेल इथे ? या सरकारमधल्या मंत्र्यांची मुलं परदेशात शिकतात, ज्यांचा राजीनामा झाला त्या धर्मेंद्र प्रधानांची मुलगी परदेशात शिकत आहे. जर तिचाच या देशातील शिक्षण व्यवस्थेवर विश्वास नाही तर बाकीच्यांचं काय घेऊन बसलो आहोत आपण ?

Raj Thackeray

66,290 görüntüleme • 2 ay önce

मुंबई तक या डिजिटल वाहिनीचे संपादक श्री. साहिल जोशी यांनी आज माझी मुलाखत घेतली. त्या मुलाखतीची चित्रफीत आणि त्यातील महत्वाचे मुद्दे.. १) आज जे सत्तेतील असोत की याच्या आधीचे सत्ताधारी असू देत, हे सगळे गेली कित्येक वर्ष तेच तेच बोलत आहेत. जे करणं शक्य नाही किंवा त्यांना करायची इच्छा नाही अशा गोष्टीच ते पुन्हा पुन्हा सांगत आहेत. त्यांचे जाहीरनामे काढून बघा वर्षानुवर्षं त्याच गोष्टी आहेत. पण त्यातल्या कुठल्या गोष्टी झाल्यात ? हे फुकट ते फुकट हे सोपं आहे, पण ते टिकणार आहे का? लाडकी बहीण योजनेतून जर महिलांना १५०० रुपये मिळणार असतील तर मला आनंदच आहे, पण ही योजना टिकणार आहे का ? नितीन गडकरींनी पण हाच मुद्दा उपस्थित केला होता ना ? २) २०१४ ला आम्ही महाराष्ट्राचा विकास आराखडा मांडला, ज्यात आम्ही महाराष्ट्रपुढचे प्रश्न काय आहेत आणि त्याची उत्तरं काय आहेत हे आम्ही मांडलं होतं. हेच आम्ही आमच्या जाहीरनाम्यात मांडणार आहोत. जे शक्य आहे तेच आम्ही मांडणार आहोत. ३) काहीही योजना घोषित केल्या पण पुढे नाही चालवता आल्या तरी लोकांना राग येत नाही ही खरी समस्या आहे. ४) मराठा आरक्षणाबद्दल माझा मुद्दा इतकाच आहे की तुम्ही मराठा समाजाला आरक्षण कसं देणार आहात? २० वर्षांपूर्वी कॉग्रेस सत्तेत होती तेंव्हा मराठा समाजाचा आरक्षणासाठीचा पहिला मोर्चा आला होता, त्यावेळेस का नाही सत्ताधाऱ्यांनी आरक्षण दिलं ? २०१६ साली पण मोर्चे निघाले पण तेंव्हाही आरक्षण नाही मिळालं. पुढे एकनाथ शिंदेनी आरक्षण दिलं असं घोषित केलं, गुलाल उधळला तरी पण आरक्षणाची मागणी करणाऱ्यांना का उपोषणाला बसावं लागतंय ? आरक्षणातील तांत्रिक अडचणी मोठ्या आहेत. त्याबद्दल कोणी बोलत नाहीये. आरक्षणाचा मुद्दा हा आर्थिक आहे हे आपण कधी समजून घेणार ? जर महाराष्ट्रातील तरुण-तरुणींना उत्तम शिक्षण आणि नोकऱ्या देऊ शकलो तर ते का आरक्षण मागतील ? महाराष्ट्रात इतका रोजगार तयार होतो पण तो महाराष्ट्रातील मुला-मुलींना न मिळता बाहेरच्या राज्यातील लोकांना मिळणार असेल तर कसं होणार ? ५) महाराष्ट्र राज्य हे औद्योगिकदृष्ट्या महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं राज्य आहे. एखादा उद्योग महाराष्ट्रातून गेला तर फरक पडत नाही. पण जे उद्योग इथे आहेत तिथे मराठी मुला-मुलींना रोजगार कधी मिळणार ? ६) जर पर्यटनावर केरळ आणि गोवा ही राज्य उभी राहतात मग कोकण का उभा राहू शकत नाही ? आज गेली १७ वर्ष मुंबई-गोवा महामार्ग तयार होत नाही. आणि तरीही कोकणी माणसाला राग येत नाही. ७) अनिल काकोडकरांचा रिपोर्ट होता की १ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर देशातील रेल्वेचं पुनर्निर्माण होऊ शकतं, पण आपण ते १ लाख कोटी रुपये मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनवर खर्च का करत आहोत ? बुलेट ट्रेनची गरज नाही असं माझं म्हणणं नाही, पण ती मुंबई-दिल्ली किंवा मुंबई-चेन्नई किंवा दिल्ली-कन्याकुमारी अशी लांबची अंतर जोडणारी बुलेट ट्रेन आणली असती तर मी स्वागतच केलं असतं. मुंबई-अहमदाबादच का ? ८) २०२४ च्या लोकसभेच्या निकालांकडे पाहताना मला जाणवलं की, पहिलं म्हणजे मुसलमानांनी गेली १,२ वर्ष मतदार यादीत स्वतःच नाव नोंदवून घेत, अत्यंत शांतपणे मोठ्या प्रमाणावर काँग्रेस-राष्ट्रवादी कॉग्रेसला मतदान केलं. त्यात भाजपचाच एक उमेदवार पचकला की आमचं सरकार सत्तेत आल्यावर आम्ही संविधान बदलू. हे म्हणजे कसं कुऱ्हाडीवर पाय नाही मारला पण कोपऱ्यातल्या कुऱ्हाडीवर जाऊन स्वतःच पाय त्यावर टाकला. आणि यामुळे भाजपला महाराष्ट्रात फटका बसला. ९) पक्षाचं नाव, चिन्ह घेऊन जाणं हे चूकच आहे. मग ते करणारे कोणीही असू देत ते चुकीचंच आहे. पूर्वी राजकारणात निकोप स्पर्धा असायची आता द्वेषाचं राजकारण सुरु झालं आहे. पक्ष पूर्वीपण फुटायचे पण आता पक्षच घेऊन जातात. आणि या सगळ्या गोष्टींना भारतीय जनता पक्ष पण जबाबदार आहे. १०) भारतीय जनता पक्ष आणि त्यातील नेते अगदी अटलजींपासून, अडवाणीजींपासून, प्रमोद महाजन यांच्यापासून अनेक भाजप नेत्यांशी माझे जुने स्नेहसंबध आहेत, त्यामुळे माझा स्वाभाविक कल भाजपकडे आहे इतकंच. आणि देवेन्द्र फडणवीस यांच्याकडे प्रश्न समजून घ्यायची ती सोडवायची हातोटी आहे. एकनाथ शिंदे हा माणूस दिलदार आहे, सढळ हाताचा आहे. मध्यंतरी पुण्यात सिंहगड रस्त्यावर पूर आला. तिकडे २ युवकांचा मृत्यू झाला, तर या मुलांच्या कुटुंबियांना मदत करा अशी विनंती केली तर शिंदेनी तात्काळ मदत केली होती. अशी माणसं राजकारणात हवीत. ११) अमितचं नाव मी माहीम विधानसभेसाठी नाव जाहीर करताना, तुम्ही उमेदवार घोषित करणार नसेन तर मी अमितला करेन असं आमचं कधीच बोलणं झालं नव्हतं. जेंव्हा अमितने माझ्याकडे उमेदवारीची इच्छा व्यक्त केली तेंव्हा मी त्याला म्हणलं की तू ज्या भागात लहानाचा मोठा झालास त्या भागात उभा रहा. आदित्य ठाकरेंच्या वेळेस वरळीत माझी चाळीस हजार मतं असताना मी स्वतःच्या इच्छेने निर्णय घेतला होता. अमितच्या बाबतीत पण माझं म्हणणं होतं की तुम्हाला वाटत असेल तर करा नाहीतर करू नका. मी कोणाला काही मागणारा माणूस नाही. एकनाथ शिंदे एका मुलाखतीत म्हणाले की त्यांनी आम्हाला भांडुपचा प्रस्ताव दिला होता. अहो शिंदेंची ही पक्ष म्हणून पहिली निवडणूक आहे, ही माझी पहिली निवडणूक आहे. त्यांनी सत्तेत आहेत म्हणून काहीही करू नये. १२) निवडणुकांच्या राजकारणाचा माझा पिंड नाही. आणि मी मनापासून सांगतोय की जसा अमित माझ्यासाठी पक्षाचा एक उमेदवार आहे तसेच आणि तितकेच माझ्या पक्षातील इतर उमेदवार आहेत. १३) मशिदींवरच्या भोंग्यांकडे धर्म म्हणून बघू नका, लोकांना आवाजाचा त्रास होतो याकडे आपण बघू नका. धर्म तुमच्या घरात असला पाहिजे तो घराच्या उंबरठ्यावर बाहेर आणला नाही पाहिजे. बरं या राज्यात निर्बंध फक्त हे गणपती, दहीहंडी या हिंदू सणांवर का ? १४) मी राजकारणात इकडे स्पेस आहे का तिकडे स्पेस आहे का असं बघत नाही, माझ्यासाठी महाराष्ट्रातले प्रश्न आणि त्यावरची प्रामाणिक उत्तरं आणि ते सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न इतकंच मी बघतो आणि यासाठीच मी मतदान मागतोय. १५) आरोग्य, शिक्षण यासारख्या मूलभूत विषयांसाठी जितके पैसे खर्च केले पाहिजेत ते होत नाहीये. १६) येत्या २३ नोव्हेंबरला माझ्या पक्षाला चांगलं यश मिळालेलं दिसेल. साभार - Mumbai Tak

Raj Thackeray

52,761 görüntüleme • 1 yıl önce

खडकवासला विधानसभेचे उमेदवार श्री. मयुरेश वांजळे यांच्या प्रचारार्थ खडकवासला येथे जाहीर सभा घेतली, त्यातील महत्वाचे मुद्दे १) माझा मित्र, सहकारी रमेश वांजळेंचा मुलगा मयुरेश याचा प्रचार करायला मी इकडे आलो आहे. मला तो दिवस अजून आठवतोय. रमेश शेवटचा कोणाशी बोलला असेल तो माझ्याशी बोलला, त्याने मला फोन केला आणि म्हणाला मी एमआरआय काढायला आलोय, तो झाला की फोन करतो. आणि थोड्यावेळाने मला फोन आला की तो गेला. मला काय बोलायचं ते कळेना. मला अनेक जणं सोडून गेले पण आज माझा रमेश असता तर मला सोडून गेला नसता. मयुरेश मला रमेशची आठवण करून देतो. आकाराने पण तसाच आहे आणि सोन्याने मढलेला पण तसाच आहे. त्यामुळे तुम्ही जे मतदान कराल ते मयुरेशला कराल तसंच मतदान तुम्ही रमेशला पण कराल. २) खरंच मनापासून सांगतो की पुण्याचा झालेला सत्यानाश पाहून वाईट वाटतं. पण तुम्हाला त्याचं वाईट वाटत नाही, राग येत नाही हे पाहून मला जास्त वाईट वाटतं. ३) एकदा तुमच्या हातातील फोनमध्ये डोकावून जग कुठे गेलं आहे ते... आपण रस्ते, पाणी, गटारं यातच अडकलो आहोत. पण याचा तुम्हाला राग येत नाही. जगाच्या मागे आपण किती पडलो आहोत याचं आपल्याला काही वाटत नाही हे वाईट आहे. ४) शिवरायांचं निधन झाल्यावर रायगडावर समाधी बांधली गेली आहे. पुढे कोणीतरी समाधीच्या खाली काहीतरी मिळेल या आशेने तिथे उकरून ठेवलं. पुढे महात्मा ज्योतिबा फुले तिकडे गेले, त्यांनी समाधी पुन्हा उभारायचं ठरवलं, त्यानंतर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक गेले आणि त्यांनी ही समाधी चांगली करण्यासाठी पैसे उभे केले. यासाठी अठरापगड जातीतील लोकांनी समाधी उभी करायला पैसे गोळा केले. असा महाराष्ट्र होता आमचा. ५) आम्ही कसं खितपत जगतोय याचं आम्हाला घेणंदेणं नाही, आम्हाला जातीपातीत जास्त स्वारस्य आहे. आज पुण्यात आयसिस, सिमीसारख्या संघटनांचे अतिरेकी सापडत आहेत. पण याकडे कोणाचंच लक्ष नाही. आमदार खासदारांना फक्त टेंडर काढायची आहेत, आणि त्यातून पैसे कमवायचे आहेत, त्यांना इतर गोष्टींशी घेणंदेणं नाही, आणि तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नये म्हणून ते तुम्हाला जातीत गुंतवतात. ६) तुम्ही इतकी वर्ष ज्यांना मतदान केलं त्यांनी तुमचं जगणं हराम करून ठेवलं आहे. आज महाराष्ट्रातील अनेक मुलं हा देश सोडून निघालेत. शिक्षण, नोकऱ्या त्यांना इथे पण मिळू शकतात, पण ते का चाललेत, कारण आजूबाजूचं वातावरण घाणेरडं आहे. मला या सांगा या असल्या महाराष्ट्रासाठी छत्रपती शिवाजी महाराज झटले ? ७) ज्या हिंद प्रांतावर महाराष्ट्राने राज्य केलं, त्या महाराष्ट्राला मला गतवैभव मिळवून द्यायचा आहे. ८) इतर पक्षातील जी लोकं निवडणुकीला उभे आहेत, त्यांच्या डोळ्यात महाराष्ट्राबद्दलची कोणीतीही स्वप्न नाहीत. उद्या सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीरनामा येत आहे. त्यात आपण महाराष्ट्रापुढचे प्रश्न आणि त्याची उत्तरं दिली आहेत. ९) शरद पवारांनी बारामतीत अनेक उद्योग आणले पण त्याच पवार साहेबांनी महाराष्ट्रात उद्योगधंदे का नाही आणले ? मग तुम्हाला महाराष्ट्राचा नेता का म्हणायचं ? स्वतःच्या तालुक्याचा विकास करणाऱ्याला तालुक्याचा नेता का नाही म्हणायचं ? १०) मी तुमच्याकडे महाराष्ट्राची सत्ता मागतोय, मी जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवेन. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की मयुरेश वांजळे, आणि माझे पुरंदरचे उमेदवार उमेश जगताप आणि महाराष्ट्रातील माझ्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा.

Raj Thackeray

99,842 görüntüleme • 1 yıl önce