Loading video...

Video Failed to Load

Go Home

' शरद पवार पेक्षाही 10 पटीने जास्त महाराष्ट्र पेटवण्याचा हातखंडा Rohit Pawar चा आहे. विद्यार्थ्यांच्या अडून महाराष्ट्रात राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न रोहित पवार करत आहे.

139,460 views • 2 years ago •via X (Twitter)

10 Comments

Archana Pawar 🇮🇳's profile picture
Archana Pawar 🇮🇳2 years ago

या संभाषणात काय चूक आहे ते तुम्ही कृपया समजावून सांगाल का? सरळ भाषणाला हिंसक गोष्टीकडे वळवण्याचा प्रयत्न करताना तुम्हाला लाज नाही वाटत का? विद्यार्थ्यांसाठी किंवा सर्वसामान्यांसाठी काम करणे हे लोकप्रतिनिधीचे काम असतं, आणि त्यांचे प्रश्न असेच proactively मांडत रहा असे सांगितले तर त्यात चूक काय? शांततापूर्ण आंदोलन करने म्हणजे दंगल घडविणे असं कधीपासून झाले? किती घृणास्पद वागण आहे तुमचं...!

Sandeep Udmale's profile picture
Sandeep Udmale2 years ago

तुला तो महापुरुषांचा अवमान करणारा भिडे उर्फ भाxx चालतो परंतू चांगले विचार समाजात रुजवणारे आ. रोहित दादांचे विचार तुला समजणार नाहीत तुझी लायकी तितकीच आहे.. तूझ्या अंगी तूझ्या मालकाचा गुणधर्म कुटून कुटून भरलाय ते देखील रात्रीचे वेषांतर करून बायली चाळे करुन गुपचूप लोकांची संभाषणे ऐकून राजकरणात कड्या कुड्या करण्याची कुरघोडी करण्यासाठी प्रयत्नशिल आहेतच व तू आपला पोटापाण्याचा प्रश्न विसरून तेच कित्ते गिरवत आहेस... थोडी तरी बाळगा रे... यात काय चुकीचे बोलले आहेत रोहित दादा याचे उत्तर दे अन्याया विरुद्ध आवाज उठवला तर तो गुन्हा अन लायकी नसताना तू विनाकारण भूकुंन शिव्या घालतो ते चालते का...❓ हे तूझ्या मालकाला विचारून उत्तर दे..

🚩 सोनाली 🚩🇮🇳's profile picture
🚩 सोनाली 🚩🇮🇳2 years ago

@RRPSpeaks @Dev_Fadnavis Divide and Rule तोडा फोडा आणि राज्य करा.. चांगलं शिकले आहेत रोहित पवार.

Samadhan Kate 📈's profile picture
Samadhan Kate 📈2 years ago

@RRPSpeaks @Dev_Fadnavis तुम्हाला स्वप्नात पण आदित्य ठाकरे आणि रोहित पवार दिसतात. व्हेरी गुड 😎

AParajit Bharat 🇮🇳's profile picture
AParajit Bharat 🇮🇳2 years ago

@RRPSpeaks @Dev_Fadnavis Number mute nhavta karaycha Amhala hi milayla hawa hota 😁

Selfish Indian's profile picture
Selfish Indian2 years ago

@RRPSpeaks @Dev_Fadnavis याला तर आता घरीच बसवायचा , पिल्लू लईच माज करताय

प्राजक्ता गोरे (Prajaktta Gore) मोदी का परिवार's profile picture
प्राजक्ता गोरे (Prajaktta Gore) मोदी का परिवार2 years ago

@RRPSpeaks @Dev_Fadnavis आजून एक आहे तो पण पोरांना फिटवत होता... मी स्पेस वर ऐकले आहे

shailesh gaikwad's profile picture
shailesh gaikwad2 years ago

@RRPSpeaks @Dev_Fadnavis जेव्हा आघाडी सरकार होतं तेव्हा तो #हिंदुस्थानी_भाऊ दहावीतल्या मुलांची माथी भडकत होता.. तेव्हा तर तुला लय गुदगुल्या होत होत्या... आता काय होतय?? आणि हो,,, आंदोलन जर आघाडी सरकार विरोधात झालं तर ते खर आंदोलन आणि युती सरकारच्या विरोधात झालं तर राजकीय पोळी भाजण्याचा डाव..

That Anonymous dude (Modi's family)'s profile picture
That Anonymous dude (Modi's family)2 years ago

@Dev_Fadnavis औरंग्या काकानी अख्खी मीडिया हाताशी धरलीये! त्यामुळेच यांचे धंदे कधी उघडकीस आले नाहीत आता नातूने सोशल मीडिया हाताशी धरलीये ! खोट्या प्रचाराची आणि भडकावणाऱ्या व्हिडियो क्लिप्सची विवरशीप कोटींमध्ये आहे भाजपा ने यासाठी काय केला आहे? नुसत "याला घरी बसवा" अस म्हणल्याने काय होणार आहे?

पाकीट तज्ञ's profile picture
पाकीट तज्ञ2 years ago

@RRPSpeaks @Dev_Fadnavis

Related Videos

सोलापूरच्या करमाळा येथे महिला आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा या अवैध उत्खननाविरुद्ध कारवाईसाठी पोहोचल्या असता गुंडांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावून कारवाई थांबवण्याचा प्रयत्न केला, पण सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अजित पवार यांनी स्वतः व्हिडिओ कॉल करून कायद्याने काम करणाऱ्या महिला अधिकाऱ्याला धमकी दिली की कारवाई थांबवा, अन्यथा तुमच्यावर ॲक्शन घेण्यात येईल. गुन्हेगारांवर कारवाई करण्याऐवजी स्वतः उपमुख्यमंत्रीच जर अवैध उत्खनन करणाऱ्या गुन्हेगारांना प्रोत्साहन देत असतील आणि कायद्याचे पालन करणाऱ्या अधिकाऱ्याला धमकावलं जात असेल तर हे, राज्यासाठी अतिशय लाजिरवाणी बाब आहे. अंजली कृष्णा यांनी दाखवलेले धैर्य आणि प्रामाणिकपणा कौतुकास्पद आहे, पण अजित पवार यांचे हे वर्तन राज्यासाठी खरंच दुर्दैवी आहे. सरकारच्या आशीर्वादानेच भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर बाबींना प्रोत्साहन मिळत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र हे पाहत आहे. Ajit Pawar #अवैधउत्खनन #अजितपवार #महिला_अधिकारी #Maharashtra

Adv. Yashomati Thakur

45,686 views • 11 months ago

रोहित पवार व इतर 4 युट्युबर यांच्याबर तोतीयेगिरी बद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. - जाहीररित्या बनावट कागदपत्रांच्या आधारे खोटे आधार कार्ड बनवले तसेच या बेकायदेशीर कृत्याला अधिक प्रसिद्धी दिली. - दुसऱ्या देशातील राष्ट्रपतींच्या नावे भारतीय कागदपत्रे (आधार कार्ड) बनवून ते माध्यमांना दाखवून त्याचा गैरवापर केला. - एक स्वायत्त संविधानिक संस्थेवर खोटे आरोप करत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण केले. - बेकायदेशीर कृती जाहीररित्या प्रसिद्ध केले यामुळे दोन गटांमध्ये देखील मतभेद निर्माण करून चिथावणी देत सार्वजनिक प्रशांतता बाधीत होईल असे कृत्य केले आहे. - या साईटचा वापर करत दुसऱ्या देशातील राष्ट्रप्रमुखांचे खोटे आधार कार्ड बनवले Rohit Pawar

Prakash Gade

12,169 views • 9 months ago

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा फॉर्म आज अ‍ॅडव्होकेट आकाश मोरे काँग्रेसच्या वतीने भरणार आहेत, पण त्या संदर्भात बरीच खलबतं सुरू आहेत, टीकाटिप्पणी सुरू आहेत की काँग्रेसने ही निवडणूक बिनविरोध होऊ द्यावी अशी परंपरा राहिलेली आहे. मग नांदेडच्या वसंतराव चव्हाणांच्या मृत्यूनंतर निवडणूक झाली नाही का? मंगळवेढ्याला भालकेंच्या मृत्यूनंतर निवडणूक झाली नाही का? अशी अनेक उदाहरणं जी आहे ती देता येईल, भाजपने सोईने आपलं राजकारण केलेलं आहे. दुर्दैवानं ज्या पद्धतीनं अजितदादांचा मृत्यू झाला, त्याच्यानंतर घरच्या लोकांना वाटतं की त्याची एन्क्वायरी झाली पाहिजे म्हणून स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी सीबीआयची एन्क्वायरी मागितली. रिमाइंडर दिलं काय झालं त्याचं? रोहित पवार पिलर टू पोस्ट एफआयआर करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये प्रयत्न करत होते शेवटी कर्नाटक मध्ये त्यांचा प्रयत्न सफल झाला. ही तुमची संवेदनशीलता आहे का? आजही आमच्या उमेदवाराचं आणि काँग्रेस पक्षाचं हे म्हणणं आहे की तुम्ही एफआयआर दाखल करा महाराष्ट्रामध्ये, बारामतीमध्ये. मग त्याचा विचार करता येईल, मग लक्षात येईल की खरी तुमची भूमिका काय आहे. मा.श्री अतुल लोंढे वरिष्ठ प्रवक्ते - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳

Harshwardhan Sapkal

21,434 views • 4 months ago

हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ आहे! (सोलापूर - पंढपूर - माळशिरस - अकलूज - पुणे ) एकदम सुसाटपोटातील पाणी सुद्धा हलत नाही. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या कार्यकाळात हा राष्ट्रीय महामार्ग झाला आहे. वाईट ह्या गोष्टीचं वाटत हा हायवे सोलापूर आणि माढा या मतदारसंघातून जातो. आणि या दोन्ही मतदारसंघात भाजपचे खासदार नाहीत. सोलापूर मध्ये युजलेस काँग्रेस कडून प्रणिती शिंदे तर माढा मधून शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील आहेत. २०१४ पूर्वी दुहेरी खड्डेयुक्त रस्ता होता...! पक्षाने केलेली कामे जनतेला सांगा...शेकडो हजारो कार्यकर्ते आपण रस्त्याने प्रवास करतात पण, समोर दिसलेल्या गोष्टीचे राजकीय भांडवल करत नाहीत. मोदीजी त्यांचं काम करत आहेत. आपण त्यांच्या कामाला जनतेपर्यंत घेऊन जाण गरजेच आहे.

Prakash Gade

23,854 views • 4 months ago

मा. शरद पवार यांनी उल्लेख केलेलं मा. अमितजी शाह यांच्या विरोधातील प्रकरण व्यापक राजकीय षड्‍यंत्राचा भाग होतं. मा. अमितभाईंच्या निर्दोषत्वावर शिक्कामोर्तब करून सुप्रीम कोर्टाने ‘दूध का दूध, पानी का पानी’ केलंच. त्यामुळे मा. अमितभाईंविरोधात रचलेल्या या खोट्या राजकीय षड्‍यंत्राचा पवारसाहेबांनी उल्लेख करायचं काही कारण नव्हतं. केंद्रीय गृहमंत्र्यांवर बोलण्याऐवजी राज्यात त्यांनीच केलेल्या मविआ काळातील गृहमंत्र्यांनी काय केलं होतं? याचा विचार करून बोलायला हवं होतं. त्यांचेच गृहमंत्री जेलवारी करून आलेत. १०० कोटींच्या खंडणीवसुलीसारखा गंभीर आरोप तुमच्या गृहमंत्र्यांवर आहे, याचं विस्मरण बहुतेक पवार साहेबांना पडलेला दिसतोय. Amit Shah Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule भाजपा महाराष्ट्र

Murlidhar Mohol

78,326 views • 2 years ago

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार (Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar) चे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर म्हातोबाची आळंदी ते पुणे दरम्यानच्या प्रवासात हल्ला करण्यात आला. हा हल्ला करणाऱ्या गुंडांकडे हत्यारे देखील होती. या हल्ल्यात विकास लवांडे यांना सुदैवाने दुखापत झाली नाही. परंतु ही घटना अतिशय गंभीर असून लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार नोंदविण्यात येत आहे. भररस्त्यात एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यास अडवून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याचे धाडस करणाऱ्यांना कुणाचा वरदहस्त लाभलेला आहे हे उघड आहे. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने देखील ही अतिशय गंभीर आणि तितकीच निराशाजनक बाब आहे. राज्याच्या गृहमंत्री महोदयांनी या घटनेची गांभीर्याने नोंद घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश द्यावे. CMO Maharashtra Devendra Fadnavis पुणे शहर पोलीस

Supriya Sule

24,887 views • 3 months ago

आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री राहिले असून, देशातील अत्यंत कठीण काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी पार पाडलेली आहे. त्यामुळे देशासमोरील खरे शत्रू कोण आहेत, हे त्यांना नेमकेपणाने ज्ञात आहे. राज्यात तसेच देशात धार्मिक तणाव निर्माण होऊ नये, यासाठी त्यांनी नेहमीच सजगपणे पावले उचललेली आहेत. विशेषतः महाराष्ट्रातील बॉम्बस्फोटांनंतर त्यांनी परिस्थितीला ज्या संवेदनशीलतेने आणि दक्षतेने हाताळले, त्याचे स्मरण आजही प्रत्येक सुजाण नागरिकाच्या मनात आहे. त्यामुळे शरद पवार काय व्यक्तिमत्त्व आहे, हे केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला माहिती आहे. सध्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेली वक्तव्यं ही देश विघातक शक्तींना बळ न देता, सामाजिक सलोखा अबाधित राहावा, यासाठीच आहे. ज्या नागरिकांना पवार साहेबांच्या विचारांची जाण आहे, त्यांना त्यांची भूमिका पूर्णपणे समजलेली आहे. त्यांची संपूर्ण पत्रकार परिषद नीट ऐकली तर लक्षात येते की त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे.. "धार्मिक तेढ निर्माण होईल, असे कोणतेही कृत्य कोणीही करू नये." आणि अशीच समतोल भूमिकेबद्दल काही जण चुकीचा प्रचार करत आहेत. हे दुःखद असून त्यामागील हेतू जाणून घेण्याची गरज आहे. पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय पर्यटकांनी अनुभवलेली भीती जितकी तीव्र होती, तितकेच माणुसकीची जाणीव तिथल्या अनेक काश्मिरी नागरिकांनी दाखवली. संकटाच्या त्या काळात मदतीला धावून गेलेली माणसे कोणत्या धर्माची होती, हे न सांगता, केवळ एकाच पद्धतीची मांडणी केली जात असेल, तर तो कुणाच्यातरी राजकीय प्रोपोगंडाचा भाग वाटतो. या घटनेनंतर उभी राहिलेली माणुसकीची ज्योत ती आपण सगळ्यांनी तेवत ठेवायला हवी. ४–६ दहशतवाद्यांच्या सैतानी कृत्यांमुळे आपण आपल्या देशात फूट पडू देता कामा नये. अशा तणावपूर्ण स्थितीत आपण भारतीयांनी एकसंघ राहून, विवेकाने आणि बांधिलकीने माणुसकीचा हा लढा लढणं आवश्यक आहे.

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

16,892 views • 1 year ago

ओऽऽऽऽऽ12मतीच्या मोठ्या ताई Supriya Sule तुमच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी शरद पवार गटाने महिलांच्या सुरक्षेसाठी मोठमोठ्या बाता मारल्या पण आज राज्यातील महिलांसमोर एक महत्त्वाचा प्रश्न उभा ठाकला आहे. तुमचे नेते हाड हाड यांच्यावर एका बलात्कार प्रकरणात आरोपीला वाचवण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे. या संदर्भात एक आडिओ क्लिप देखील समोर आली आहे, ज्यात हे स्पष्टपणे ऐकायला येतंय की आव्हाड आरोपीला मदत करत होते.. तुमच्याकडून महाराष्ट्रातील जनता आता उत्तराची अपेक्षा करते. या प्रकरणात पीडित महिलेची बाजू घेण्यासाठी तुम्ही पुढे येणार आहात का..? आजपर्यंत महिलांच्या सुरक्षेसाठी लढण्याचा दावा करणाऱ्या आणि महिलांच्या सुरक्षेसाठी आपली सुरक्षा परत करण्याची घोषणा करणाऱ्या सुप्रियाताई, आता आपल्या नेत्याचा, जो एका बलात्काराच्या आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, त्याचं सुरक्षा कवच काढून घेणार आहात का..? तुमच्या पक्षाच्या धोरणांत महिलांच्या सुरक्षेसाठी आश्वासन दिलं जात असताना, तुम्ही अश्रू ढाळले होते. पण आता या गंभीर प्रकरणावर तुम्ही पक्षांतर्गत तरी कारवाई करणार आहात का..? किंवा हे प्रकरण अडीच वर्षांपूर्वीच आहे म्हणून तुम्ही त्यावर पांघरूण घालणार आहात..? प्रकरण जुनं असले तरी आता ते समोर आलं आहे, त्यामुळे तुम्ही यातून पळ काढू शकत नाहीत. हे लक्षात घ्या की गुन्हा करणारा जितका दोषी असतो, तितकाच त्याला वाचवणारा दोषी असतो. महाराष्ट्रातील जनतेला कळू द्या, तुमच्या लाडक्या आव्हाडांवर तुम्ही काय कारवाई करणार आहात..? सुप्रियाताई, आज तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे. महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा केवळ भाषणांपुरता, आंदोलनापुरता मर्यादित ठेवणार आहात की खरंच आव्हाडांवर कारवाई करून महिलांना न्याय देणार आहात..? Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

Chitra Kishor Wagh

22,093 views • 2 years ago

भाजप आणि संघाच्या यंत्रणेला धक्का पोहोचू लागला की सत्तेच्या माध्यमातून त्यांचे हस्तक बनलेल्या प्रशासनाकरवी अभिव्यक्ति स्वातंत्र्याची गळचेपी करून बोलणाऱ्यांचा आवाज ते दाबू पाहतात. आपल्या या महाराष्ट्राच्या मातीला लढाऊ बाणा वारसा हक्काने लाभलाय. याच स्वाभिमानी महाराष्ट्राच्या भूमीतील स्वतंत्र पत्रकार म्हणून जबाबदारी पार पाडणाऱ्या मुक्ता कदम व मराठी भाषा केंद्राचे अध्यक्ष व मराठी भाषा चळवळीतील कार्यकर्ते डॉ. दीपक पवार यांना शासकीय यंत्रणेमार्फत दिला जाणारा त्रास हा व्यक्तीस्वातंत्र्याचा वारसा जपणाऱ्या आपल्या पुरोगामी महाराष्ट्रावर डाग असल्यासारखाच आहे. महानगरपालिका निवडणुक काळात मुक्ता कदम यांनी आपल्या स्वतंत्र पत्रकारितेच्या माध्यमातून नांदेडचे सत्ताधारी म्हणवून घेणाऱ्या अशोक चव्हाण यांच्या अपयशाचा पाढा वाचला. यामुळेच त्यांना आता नांदेड जिल्ह्यातील पोलिसांनी आचारसंहिता भंगाच्या गुन्ह्यांत चूकीच्या पद्धतीने गोवण्याचा प्रयत्न केला आहे. “नांदेडचा राजमहाल हलला” हे खरोखरच यावरून दिसते. तसेच महाराष्ट्राच्या व्यासपीठावर आपल्या परखड वाणीने मराठी भाषेचा जागर करून मराठी भाषा चळवळ मजबूत करू पाहणाऱ्या प्रा. डॉ. दीपक पवार यांना मुंबई विद्यापीठाच्या सिनेटमध्ये “शहरी नक्षलवादी” असे संबोधून मराठी भाषेच्या चळवळीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला. मराठी भाषा द्वेषी सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावरच या गोष्टी घडवल्या जात आहेत, यात कोणालाही शंका नसावी. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात लाचारांची फौज उभी करायची असेल तर त्यांनी नक्कीच प्रयत्न करून बघावेत. पण प्रत्येक व्यक्ति त्यांच्या सत्तेसमोर झूकून त्यांचे, त्यांच्या दिल्लीतील महाशक्तीचे कौतूक नक्कीच करणार नाही किंवा त्यांना आवडेल अशा भूमिकाही घेणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा सांगणाऱ्या आपल्या महाराष्ट्रात आपला स्वाभिमान व वैचारिक बाणा जपणाऱ्या व्यक्तिंची कधीही कमी असणार नाही. वर उल्लेख केलेल्या दोन्ही घटना अत्यंत गंभीर असून महाराष्ट्राच्या वैचारिक आणि सांस्कृतिक परंपरेला धक्का देणाऱ्या आहेत, हे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणविसांनी लक्षात घ्यावे. कॉंग्रेस पक्ष याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवत असून मुक्ता कदम व डॉ. दीपक पवार Dr. Deepak Pawar दीपक पवार यांच्या पाठिशी आम्ही ठामपणे उभे आहोत. CMO Maharashtra Devendra Fadnavis

Harshwardhan Sapkal

11,129 views • 5 months ago

आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीत पार पडलेल्या येवला येथील 'संवाद' सभेला उपस्थित राहिले. यावेळी उपस्थितांशी संवाद साधला. येवल्याला आल्यानंतर दोन गोष्टी जिव्हाळ्याच्या वाटतात एक म्हणजे कांद्याचा सुगंध आणि दुसरी म्हणजे पैठणी साडी... येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे यावेळी मोठे नुकसान झाले याला केवळ भाजपाचे आयात निर्यात विषयीचे धोरण कारणीभूत असल्याची भूमिका मांडली. कोणत्याही शेतीमालाला आज योग्य भाव नाही. शहरात टोमॅटो महाग विकला जात आहे. पण शेतकऱ्यांना त्याचा फायदा होताना दिसत नाही. मग मधला पैसा जातोय कुठे असा सवाल उपस्थित केला. मध्यंतरी केंद्र सरकारने परदेशातून दूध आयात करण्याचा निर्णय घेतला होता पण पवार साहेबांनी केंद्र सरकारला पत्र लिहून सांगितले की जोपर्यंत मी आहे तोपर्यंत परदेशातून एक लिटरही दूध भारतात येऊ देणार नाही. त्यानंतर हा निर्णय मागे घेत सरकारने त्याची जबाबदारी राज्यांवर टाकली. एकीकडे कांदा आयात निर्यातीचे धरसोडीचे धोरण आणि दुसरीकडे दूध आयातीचा निर्णय अशी विचित्र भूमिका केंद्र सरकार घेत असल्याचा आरोप केला. तुमच्यासाठी इथले स्थानिक का लढले नाही हे माहित नाही. पण ही तुमची भगिनी, तुमची ताई ही हक्काची ताई आहे. तुम्ही म्हणाल ते काम करून न्याय मिळवून देईन, असा शब्द यावेळी दिला. आपल्यातील काहीजण भाजपाकडे गेले आहेत. त्यांच्याबद्दल माझी काही तक्रार नाही. पण आज महागाई वाढत आहे. बेरोजगारी वाढत आहे. युपीएचे सरकार असताना गॅस सिलिंडरचा दर ३५० रु होता. तो आज ११५० रुपये झाला आहे. हे बघता पुढच्या निवडणूकीत कोणाला मतदान करणार असा सवाल उपस्थित केला. मागील १५ वर्षात येवल्यात एकही मोठा प्रकल्प आला नाही. पण जर येवलेकरांनी छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा आणि पवार साहेबांवर ठाम विश्वास असणारा उमेदवार निवडून दिला तर तुमच्या कांद्याला चांगला भाव मिळू शकेल. या भागात उद्योग येऊन रोजगार उपलब्ध होतील असे आश्वासन दिले. येथे येत असताना रस्त्यावर असंख्य प्रेम करणारे नागरिक भेटत होते. प्रत्येकजण म्हणत होता, ताई तु घाबरू नकोस लढ, त्यांचे हे प्रेमच आमच्यासाठी ताकत असल्याचे आवर्जून सांगितले. पण मी घाबरत नाही मी जर घाबरले असते तर आज तिकडे गेले नसते का? शोले चित्रपटात एक डायलाॅग आहे जो डर गया वो मर गया आणि आज सत्ताधारी विरोधकांना lCE चा धाक दाखवला जात आहे. इन्कम टॅक्स, सीबीआय, आणि ईडी याची भीती दाखवली जाते. कोणी घाबरून तिकडे गेले की वाँशिंग पवाडर वापरून त्याला क्लिन केले जाते. त्यामुळे या प्रवृत्तीविरोधात लढा देण्याची गरज असल्याचे सांगितले. ही लढाई सोपी नाही, पण निष्ठेने आणि एकीने लढलो तर विजय आपलाच होईल. महाराष्ट्राचा सह्याद्री हा दिल्लीपुढे कधीही झुकला नाही आणि झुकणार नाही हे दाखवून देण्याची गरज असल्याचे सांगितले. महिला हळव्या असतात पण जर कोणी तिच्यावर घात केला तर तीच महिला मा जिजाऊ, ताराराणी आणि अहिल्याबाई होते. माझ्यावर पद मागितल्याचा आरोप केला जात आहे. पण एक लोकसभेचे तिकिट सोडले तर मी पक्षाकडे कोणतही पद मागितले नाही. मी मागितल्यावर मला पद मिळाले असते पण माझी विचारावर निष्ठा आहे. पद मिळाले नाही तरी चालेल पण मी माझा विचार कधीही सोडणार नाही असे ठामपणे सांगितले. सत्ता येत जात असते. केंद्रात सत्तर मंत्री आहेत पण देशाला आज कृषी मंत्री कोण आहे हे माहित नाही. येवल्यात आमदार निवडून आल्यास मांजरा पाडा कॅनाॅल, उणेगाव वरतवाडी कॅनाॅलचा विषय पूर्ण करु असे आश्वासन दिले. महाराष्ट्राविरोधात एक षडयंत्र केले जात आहे. बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडला, आज पवार साहेबांचा पक्ष फोडलाय. पण आज दिल्लीत महाराष्ट्राचा आवाज बुलंद करणारे कोण असतील तर ते पवार साहेब आहेत. म्हणून हे षडयंत्र करत महाराष्ट्राचे महत्व कमी केले जात आहे. रोजगार बाहेर जात आहेत. यासाठी एक अदृश्य हात काम करत आहे. पण मला महाराष्ट्राचा सार्थ अभिमान आहे. हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राची आन बान शान टिकवण्यासाठी राष्ट्रवादी कटिबद्ध आहे असे सांगितले. राष्ट्रवादी पक्ष सेवा, सन्मान आणि स्वाभिमान या तत्वावर काम करणारा आहे. त्यामुळे येवल्यातून सुरु झालेल्या लढाईचा शेवट जनताच करेल आणि महाराष्ट्राविरोधात कट कारस्थान करणाऱ्याला सोडणार नाही असे आश्वासन दिले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते. #Live #Nashik #Yeola

Supriya Sule

44,909 views • 3 years ago

राज्यातील सर्वात मोठा नोकर भरती घोटाळा : #तलाठी_भरती_घोटाळा #तलाठी_भरती_घोटाळ्यात अख्खे परीक्षा केंद्र मॅनेज करण्यात आले होते. त्याबद्दलची ऑडिओ-व्हिडीओ-फोन रेकॉर्डिंग आणि इतर पुरावे आमच्याकडे उपलब्ध आहेत. तलाठीचे एक पद २०-२५ लाखात विकण्यात आल्याचे पुराव्यातून स्पष्ट झालं आहे. तलाठी भरतीत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने पोलीस तक्रार दाखल केली होती. आमच्या तक्रारी नंतरच #धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांनी FIR दाखल केली आहे. धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांनी महसुलच्या अपर मुख्य सचिवांना पाठविलेला गोपनीय अहवाल अनेक महिन्यांपासून आमच्याकडे आहे. तो अहवाल कधीतरी पब्लिक होईलच पण त्यासोबतच इतर सर्व #पुरावे पब्लिक करण्याबद्दल सुध्दा विचार करण्यात येईल. राज्यातील दहा लाखापेक्षा जास्त उमेदवारांनी तलाठी भरती दिलेली आहे. तलाठी भरती घोटाळा इतका मोठा आहे की तो #विधानसभा निवडणुकीसाठी एक मुख्य मुद्दा ठरू शकतो, आणि आम्ही त्याला मुख्य मुद्दा बनविण्याचा प्रयत्न करू. परंतु राज्याचे #गृह_खाते अत्यंत कर्तव्यदक्ष व्यक्तीच्या हाती आहे. तलाठी भरती घोटाळ्याचा तपास धाराशिव पोलीस करत नाहीयेत किंवा अत्यंत संथ गतीने तपास सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण घोटाळा दाबला गेला असून अनेक भ्रष्टाचाऱ्यांची निवड झाली आहे. #दिल्ली मध्ये बसलेल्या व्यक्तीला रियल टाइम रिमोट ॲक्सेस देऊन भ्रष्ट उमेदवारांचे पेपर सोडविण्यात आले आहेत. यात कोणत्या परीक्षा केंद्राचे मालक सामील आहेत आणि #TCS मधील कोण व्यक्ती सामील आहेत याची नावानिशी माहिती आमच्याकडे आहे. अनेक परीक्षा केंद्र मॅनेज झाल्याचे आमच्या तपासात समोर आलं आहे. परंतु आमच्यातील काही फितूर झाले असतील किंवा सरकारने आमच्यावर जी गुन्हे दाखल केले किंवा काही व्यक्तींनी विविध प्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे याप्रकरणी आम्हाला पूर्ण पाठपुरावा आजवर करता आलेला नाही याची आम्ही आज दिलगिरी व्यक्त करतो. निवड झालेल्या उमेदवारांबद्दल आम्हाला कोणताही आकस नाही,पण ते फक्त स्वतःचे बघत आहेत. पण आम्ही तलाठी भरती घोटाळा कधीतरी पूर्ण बाहेर काढूच मग त्यासाठी येत्या विधानसभेत सत्तांतर गरजेचे असेल तर त्यासाठी सुध्दा आम्ही जोमाने प्रयत्न करू. #महसूल_विभाग किंवा पोलीस विभाग यावर कोणतीही कार्यवाही करत नसल्याचे स्पष्ट झालं आहे, त्यामुळे फडणवीस सरकार कडून तपासाची कोणतीही अपेक्षा आम्हाला नाही. महसूल मंत्री #विखे_पाटील घोटाळा झाला असल्यास संन्यास घेऊ म्हणताय, विखे साहेब नगरच्या जनतेने याआधीच आपल्या पोराला राजकीय बेरोजगार केलं आहे येत्या विधानसभेत आपला पण सुपडा साफ होईल. तलाठी भरतीत घोटाळा झाला आहे, असेल हिम्मत तर करा आमच्यासोबत बैठक,सर्व पुरावे समोर मांडल्या नंतर निर्णय घ्या अन्यथा महसूल मंत्री पदावरून राजीनामा देऊन मोकळे व्हा. राज्यातील विरोधी पक्ष नेत्यांना तलाठी घोटाळ्याचे फक्त राजकारण करायचे नसेल Rohit Pawar Balasaheb Thorat तर त्यांनी मैदानात यावं, आपण #पंधरा दिवसानंतर जनतेच्या दरबारात आंदोलनाला बसू. वेळ आणि ठिकाण आपण सांगाल तिथं आम्ही येऊ. कुणी साथ दिली नाही तरी, योग्य वेळी तलाठी भरती घोटाळ्याचे वादळ आल्याशिवाय राहणार नाही. #सत्यमेव_जयते !! Radhakrishna Vikhe Patil Devendra Fadnavis Revenue Department, Government of Maharashtra Sujata Saunik CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Aaditya Thackeray Vijay Wadettiwar Shivaani Wadettiwar 🇮🇳 Abhimanyu Pawar Niranjan Davkhare Kunal Raut Supriya Sule Kailas Patil Raju Shetti Ravikant Tupkar Prakash Ambedkar Raj Thackeray ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Nana Patole ABP माझा SaamTV News ZEE २४ तास Girish Kuber BBC News Marathi ashish jadhao nikhil wagle Prashant Kadam Satej (Bunty) D. Patil Satyajeet Tambe Maharashtra Youth Congress Maharashtra Congress भाजपा महाराष्ट्र Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Dipali Jagtap Dr Sujay Vikhe Patil Jayant Patil- जयंत पाटील

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य

36,079 views • 2 years ago