Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

शर्यत अजून संपलेली नाही सर्व व्यवस्थेला तुडवत चालला वाघ😑

61,785 Aufrufe • vor 2 Jahren •via X (Twitter)

10 Kommentare

Profilbild von Manoj Gamre (Bamnolkar)
Manoj Gamre (Bamnolkar)vor 2 Jahren

नेमकं दोषी कोण..? भारत सरकार महाराष्ट्र राज्य सरकार महाराष्ट्र सत्ताधारी महाराष्ट्र विरोधी पक्षनेते की संबंधित प्रशासकीय अधिकारी..? साने गुरुजींची प्रार्थंना दुर्दैवाने कागदावरच राहिली..😞 खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे

Profilbild von कवट्या महाकाळ💀
कवट्या महाकाळ💀vor 2 Jahren

लाज वाटते या व्यवस्थेची! आणि काही दिवसात स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहोत!

Profilbild von shine mathew
shine mathewvor 2 Jahren

मला एक कळत नाही. या घटनेचे चित्रीकरण करणाऱ्याने कुठल्या हेतूने तो चित्रीत केला असेल ? चित्रीकरण करण्यापेक्षा, त्याची मदत करता आली नसता का ? मला माहितीये, या जर-तर च्या प्रश्नांना, घटना होऊन गेल्यानंतर, काहीही अर्थ उरत नाही पण, व्यवस्था जितकी उदासीन आहे त्यापेक्षा अधिक आपण आहोत.

Profilbild von DJAY
DJAYvor 2 Jahren

सलाम आहे याला 🫡

Profilbild von गanesh
गaneshvor 2 Jahren

कित्येक वर्ष चे गोर गरीबाच्या प्रश्नावर आज पाघरून घालण्यासाठी,कोणी धर्मच राजकारण आपली भक्ति करून घेत असेल.तर त्याला वठणीवर आणण्याचा आवाज उठवला तर त्याला राजकारण म्हणत नाही. ह्या धर्म व्यवस्था कडे निर्लज्ज काना डोळा करून आपल्या ला काय करायचं राजकरण बोलणाऱ्या ची सवेदांशिलता मेली.

Profilbild von धडाकेबाज
धडाकेबाजvor 2 Jahren

वाहकाची काही कर्त्यव्य आहेत की नाही? अपंग व्यक्तीला बस मधून चढण्यास व उतरण्यास वाहक मदत करेल, हे काय timepass साठी लिहून ठेवलेले असते का??

Profilbild von Imtiyaz Ahmed
Imtiyaz Ahmedvor 2 Jahren

शब्द च नाही.. काय कंमेंट करावे कळत नाही. हे सर्वं बधून मन फार दुःखी होत आहे की अपंग व्यति काय अवस्था आहे. आपण कोणतीच मदत करू शकत नाही.

Profilbild von Amol Z
Amol Zvor 2 Jahren

दादा, मला कृपया याचा पत्ता मिळेल का...हे कुठे घडले आहे...कुठे हा दादा राहतो...जरूर मदत करतो...प्लिज

Profilbild von vigilGuy...
vigilGuy...vor 2 Jahren

🤔😎 @narendramodi हा व्हिडिओ अमेरिका ह्या देशातील आहे. @CMOMaharashtra आख्खा महाराष्ट्रातील रस्त्यावर खड्डे पडले आहेतच पण तरीही मिंधे फेकु म्हणणार की All is well ? @BJP4Maharashtra हा चिखलात रांगणारा कदाचित बांगलादेशी किंवा पाकिस्तानी पत्रकार असेल का ? ना खाऊंगा ना खिलाऊंग‌‌‌.

Profilbild von राकेश
राकेशvor 2 Jahren

नावडता भाऊ का नावडता भाचा ?

Ähnliche Videos

१९८५ नगरसेवक, १९९० ते २०१४ सलग सहा वेळा आमदार (१ पोटनिवडणूक), २०१४ ते २०२४ विधानपरिषद १ वेळा, राज्यसभा १ वेळा आणि २०२४ आज लोकसभा खासदार. ही सगळी पदं सहज आली नाही, त्या साठी तुम्ही किती संघर्ष केला ते बघणाऱ्यांपैकी मी पण एक आहे. तुमचा खरा प्रवास आणि तुमच्यातला खरा माणूस अजून अनेकांना कळलाच नाही. तुम्हीच कधी कधी बोलता मी कसा इथपर्यंत आलो मलाच कळलं नाही पण तुम्हाला जरी नाही कळलं तरी ते आम्हाला दिसलं. इतकी लोकं इतके वर्ष जोडून ठेवणं सोप्प नाही. जीवनात सरळ काहीच मिळत नाही हे आम्हाला समजलं. तुम्ही कधीच कार्यकर्त्यांना बोलला नाही निलेश नितेशला सांभाळा कारण तुम्ही दाखवलेल्या मार्गावर जो चालला त्याला सांभाळायची गरज नाही. कोकणाने आणि खास करून सिंधुदुर्गाने आपल्याला भरभरून प्रेम देले आणि म्हणून ही तुमची खासदारकीची पाच वर्ष जीव तोडून आम्ही सगळे कोकणासाठी काम करणार. तुम्ही आहात म्हणून हे सगळं शक्य आहे 🙏🏻

Nilesh N Rane

65,837 Aufrufe • vor 2 Jahren

.Devendra Fadnavis साहेब उध्दव ठाकरे यांच्या काळात झालेली पेपर फूट कोणी बाहेर काढली होती हे पण पहा. ते सर्व घोटाळे आम्हीच बाहेर काढले होते पण अजून एक सांगतो त्या घोटाळ्यांचा तपास पहा आणि तुमच्या काळात झालेल्या पेपरफुटी चा तपास पहा यात स्पष्ट समजते की गृहमंत्री पद तुम्हाला झेपलेले नाहीये आपण एक निष्क्रिय गृहमंत्री आहात कारण सर्व पुरावे देऊन सुद्धा पोलीस काहीच कारवाई करत नाही. कसलाच तपास झाला नाही. Office of Uddhav Thackeray साहेब मुख्यमंत्री असताना एक सचिव, जिल्हाधिकारी, 2 आयुक्त आणि इतर असे मोठ मोठे मासे पेपरफुटी मध्ये पकडुन त्यांना अटक झाली होती,फुटलेले पेपर रद्द केले होते. पण तुम्ही काय केले काहीच नाही न तपास केला न फुटलेले पेपर रद्द केले फक्त गोरगरिबांच्या पोरांच्या आयुष्याची बरबादी केली. फडणवीस साहेब तुमच्या कडे जे खाते आहे त्यांचे पेपर सुद्धा फुटले ते सुद्धा आम्हीच पुरावे सकट बाहेर काढले पण तुम्हाला साधा तपास करता आला नाही. अजून हि mahagenco चे बोगस मुले बाहेर काढले नाहीत. मुंबई पोलीस भरती मध्ये आरोपी पकडले गेले नाहीत. कित्येक बोगस पोर आज पोलीस शिपाई म्हणून मुंबई मध्ये काम करताय हे तुम्हाला नाही दिसणार. महाराष्ट्र मधील सर्व गोरगरीब विद्यार्थ्यांना माहित आहे स्पर्धा परीक्षांचे वाटोळे कोणी केले ते याची परतफेड आम्ही नक्की करू. CMO Maharashtra Aaditya Thackeray Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Dr.Jitendra Awhad Rohit Pawar MAHARASHTRA DGIPR ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Shivsena UBT Communication Nana Patole Vijay Wadettiwar Shivaani Wadettiwar 🇮🇳 Mohasin @Dhananjay_AAP LoksattaLive ABP माझा TV9 Marathi SakalMedia Sanjay Raut Satyajeet Tambe Devesh Gondane Lokmat

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य

59,176 Aufrufe • vor 2 Jahren

आज एक रूग्णवाहिका डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांच्या अतिक्रमणात अडकल्याचा व्हिडिओ पाहिला.हे सर्व बघून प्रचंड चीड निर्माण होत आहे.हे सर्व अजून किती दिवस चालणार ? लोकप्रतिनिधी “डॅाक्टर” असला म्हणून सर्व काही चांगले आहे व त्यांनाच सर्व कळते असे नाही. त्या लोकप्रतिनिधीला लोकांच्या ‘समस्यांची नाडी’ पण पकडता आली पाहिजे, त्यांच्या समस्या पण समजल्या पाहिजेत. रेल्वे स्थानकाच्या १५० मीटर पर्यंत फेरीवाल्यांना मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुद्धा मनाई आहे, प्रश्न आहे फक्त इच्छाशक्तीचा ! या मुजोर व अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करणे सहज शक्य आहे.बरं त्या नगरविकास खात्यावर पण यांच्याच बापजाद्यांची जहागीरदारी आहे,मग आयुक्तांना आदेश द्यायला काय अडचण आहे ? काहीजण तर या फेरीवाल्यांकडून हप्ते गोळा करता करता त्याच पैश्यातून #वोटचोरी करून आमदार ही झाले….अरे आता तरी बस्स करा की ! तुमच्या नाकर्तेपणाचा सामान्यांना होणारा त्रास आता तरी तुम्हाला दिसणार आहे का ? #मिंधे #भ्रष्ट #आमदार #खाजदार #KDयमC #डोंबिवलीकर

Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )

16,609 Aufrufe • vor 11 Monaten

या पेपरफुटी मध्ये पूर्ण सेंटर सहभागी आहे यात Tata Consultancy Services चे कर्मचारी पासून ते सेंटर मालक सहभागी आहेत. प्रत्येकाने जागा वाटून घेतलेल्या असतात. असले सेंटर प्रत्येक जिल्ह्यात आहेत. कारण जलसंपदा विभागाच्या परीक्षा मध्ये वाशिम मध्ये सुध्दा असाच प्रकार घडला होता पण कोणतीही चौकशी झाली नाही की पुढे कोण आरोपी होते हे समजले नाही. तसेच लातूर येथे पण असाच प्रकार झाला होता तिथे tcs च्या कर्मचारी वर गुन्हा नोंद झाला पण खरे आरोपी पकडले गेले नाही. यात सेंटर मालक सुद्धा सहभागी असतात. या तिन्ही ठिकाणी उत्तरे पुरवली गेली होती. म्हणजे पेपर आधीच बाहेर आला होता. यात कोण कोण सहभागी आहेत हे कोणालाच समजत नाही. यात आपले लाडके गृहमंत्री सहभागी आहेत की अजून कोण की त्यामुळे पोलीस अर्थपूर्ण शांत बसलेत का अशी शंका सर्व मुलांना आहे. कारण पुढे काहीच होत नाही होतात ते फक्त पेपरफुटी. 2016 पासून ते आता पर्यंत सरळसेवाचा एकही पेपर व्यवस्थित झाला नाही. प्रत्येक पेपर फुटत आहेत, गुन्हे नोंद पण होतात पण पुढे काहीच नाही. आरोपी खोट चरित्र प्रमाणपत्र काढतो आणि परत घोटाळा करून नोकरीस लागतो. हेच सुरू आहे महाराष्ट्र मध्ये. याला जबाबदार फक्त हे सरकार आहे आणि निष्क्रिय गृहमंत्री. यांना फक्त फोडाफोडीच जमते बाकी इकडे काही झाला तरी काही फरक पडत नाही. Tata Consultancy Services ला काळ्या यादीत टाका Devendra Fadnavis @OfficeOfDevendra CMO Maharashtra Vijay Wadettiwar Rohit Pawar Sharad Pawar Dr.Jitendra Awhad महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police लातूर पोलीस-Latur police AAP महाराष्ट्र ABP माझा @Dhananjay_AAP Ambadas Danve Kunal Raut LoksattaLive Nana Patole Kailas Patil ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Shivaani Wadettiwar 🇮🇳 TV9 Marathi Aaditya Thackeray Conquer

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य

26,839 Aufrufe • vor 2 Jahren

हे २३ एप्रिल २०१३ चं भाषण. जी तळमळ विरोधी बाकांवर बसताना असते तीच तळमळ सत्तेत आल्यावर कुठे जाते? मणिपूरमधील महिलांवर अत्याचार होतात आणि ज्या केंद्र सरकारकडे माहिती मिळविण्याची सर्व संसाधनं असतात तरीही त्यांना ६०-६५ दिवसांनंतर व्हिडीओ व्हायरल झाल्यावर प्रतिक्रिया द्यावीशी वाटते हे किती खेदजनक आहे. अशा घटना घडत आहेत हे केंद्र सरकारला माहित नव्हतं ? त्यावर केंद्र सरकारने काय उपाय योजना केल्या ? मणिपूर अजून शांत का होत नाही ? हा निष्काळजीपणा देशाच्या विभाजनकारी विचारांना खतपाणी घालणारा नाही का? एकीकडे भारतमातेचा जयजयकार करायचा आणि दुसरीकडे भारतीय महिलेवर अनन्वित अत्याचार होत असताना भारतीयांनी निमूठपणे सहन करायचे का ? हि एक घटना समोर आली अशा किती घटना होत असतील? देशाचा इतका ज्वलंत प्रश्न जर भारत सरकारतर्फे सुटत नसेल तर सर्वपक्षीय किंवा अनुभवी, ज्येष्ठ नेत्यांच्या सूचना का ऐकल्या जात नाहीत? प्रश्न अनेक आहेत पण उत्तरं का मिळत नाहीत? #मणिपुर #ManipurViolence #ManipurCrisis

MNS Adhikrut - मनसे अधिकृत

60,901 Aufrufe • vor 3 Jahren

🔶मा. Eknath Shinde - एकनाथ शिंदे साहेब पुण्यात तीन दिवस झालेले #MPSC उमेदवारांचे अफाट,तुफान गर्दीचे आंदोलन संपले असे सरकारला वाटत असेल तर सांगतो... आमच्या चार पैकी "दोन " मागण्यांवर सरकारतर्फे official statement अद्याप आले नाही. त्यामुळे मा. Devendra Fadnavis साहेब "आम्ही खालील दोन मागण्यांसाठी पुन्हा येणार,पुन्हा येणार" आता मागण्या मान्य करायच्या की आम्हाला पुन्हा रस्त्यावरची लढाई लढण्यास भाग पाडायचे हे आपण ठरवा. एव्हाना हे लक्षात आले असेलच...विनंत्या, विनवण्या,आर्जवं असे सर्व मार्ग अवलंबल्यानंतरच मी "शेवटचा पर्याय" म्हणून शांततेच्या मार्गाने ,संविधानिक हक्काने रस्त्यावरची लढाई सुरु करतो. 🔶 माझ्या एका tweet द्वारे केलेल्या विनंतीवरूनअन्यायग्रस्त,गोरगरीब, बेरोजगार #MPSC उमेदवार "हजारोंच्या " संख्येने एकत्र जमले व लढले. ह्या उमेदवारांना साथ द्यायला माझे सर्व सहकारी व 'न्याय मिळायलाच हवा ' याची जाणीव असलेला प्रत्येकजण प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे आंदोलनात तीन दिवस बसून आमच्या सोबत लढत राहिला. उर्वरित दोन मागण्या ( चारपैकी) 👉 1. राज्यसेवा जाहिरात 2024 सर्व 35 संवर्ग किमान 1500 जागा. जुन्या पॅटर्ननुसार होणाऱ्या शेवटची राज्यसेवा परीक्षा जाहिरात "सर्वसमावेशक" असावी यासाठी ऑक्टोबर 2023 पासून आपल्याकडे प्रत्येक मार्गाने पाठपुरावा करत आहे. ऑगस्ट 2024 संपला अद्याप आपण या उमेदवारांना न्याय दिलेला नाही. आम्ही रस्त्यावर उतरायचे नाही तर काय करायचे मग?????? 🔶 उपसंचालक/उपायुक्त ( आदिवासी विभाग ) , उपजिल्हाधिकारी मुख्याधिकारी गट-अ व ब, पोलीस उपाधीक्षक, तहसीलदार ,ना.तहसीलदार शिक्षणाधिकारी,उपशिक्षणाधिकारी सह सर्व 35 संवर्ग किमान 1500 जागा सह जाहिरात सुधारीत करणे. 👉पुन्हा एकदा नम्रपणे आठवण करून देत आहे काँग्रेस सरकारच्या काळातील 2012, 2013,2014 च्या जाहिरातीत उपजिल्हाधिकारी :- 42 ,44 पोलीस उपाधीक्षक :- 40, 24 तहसीलदार :- 38,35 ना.तहसीलदार :- 227 सहायक गट विकास अधिकारी:-100 असे आकडे एक दशकापूर्वी होते. आता हे सर्व आकडे या जाहिरातीत चक्क शून्य /ZERO असे फक्त "भोपळे"आहेत. काँग्रेस सरकारने काढलेल्या राज्यसेवा जाहिरातीतील आकडे एक दशकानंतर किमान दुप्पटीने वाढायला हवे. ते तर दूरदूरपर्यंत दिसत नाही. पण आपण तर "शून्यावर" नेऊन ठेवला महाराष्ट्र. 👉2. महाराष्ट्र अराजपत्रित संयुक्त गट-ब व गट -क जाहिरात 15000 जागांसहित तात्काळ प्रसिद्ध करणे बाबत मा. Maharashtra Public Service Commission ने नोव्हेंबर 2023 मध्ये जाहीर केल्याप्रमाणे ही जाहिरात फेब्रुवारी 2024 मध्ये प्रसिद्ध होणार होती व परीक्षा 16जुनला नियोजित होती. 7 महिने उलटून गेले अद्याप जाहिरातीचा पत्ता नाही. जवळपास 5 लाख उमेदवार यामुळे प्रचंड तणावात आहेत. अजून सरकारकडून मागणीपत्रक तयार नाही.विनंत्या,विनवण्या ,पाठपुरावा करून झाल्यावर 7 महिन्यानंतर उमेदवार रस्त्यावर उतरले.काय चुकलं त्यांचं ??? 🔶किती अन्याय होणार आहे अजून? किती अंत बघणार? परीक्षा देण्याचा त्यांचा हक्क,नौकरीची संधी या मूलभूत गोष्टीसाठी आंदोलन करण्याची वेळ येते यातच सरकारचे व मा.Dr Suvarna S Kharat आपले अपयश आहे 🔶 वरील दोन मागण्या तात्काळ मान्य नाही झाल्यास.....आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरूनच लढणार आहोत याची कृपया नोंद घ्यावी. Governor of Maharashtra CMO Maharashtra Devendra Fadnavis Nana Patole Ajit Pawar Maharashtra Public Service Commission Dr Suvarna S Kharat Mallikarjun Kharge Rahul Gandhi Ramesh Chennithala TV9 Marathi ABP माझा ZEE २४ तास SaamTV News @News18lokmat SakalMedia LoksattaLive Lokmat Maharashtra Times ashish jadhao nikhil wagle Prashant Kadam AajTak Mumbai Tak Pudhari News Lokshahi Marathi Adv. Yashomati Thakur Vijay Wadettiwar Maharashtra Congress Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳 ravish ndtv Varun Choudhary K C Venugopal Satej (Bunty) D. Patil Vishal Prakashbapu Patil Dr. Vishwajeet Kadam Praniti Shinde Amit V. Deshmukh MAHARASHTRA DGIPR Alankar Sawai | अलंकार सवाई

Baliram Doley - बळीराम डोळे

23,075 Aufrufe • vor 2 Jahren

सध्या देशात देशभक्त व देशद्रोही,हिंदू-मुसलमान यावर सरसकट व्यक्त होणे व त्यावर आपली राजकीय पोळी भाजण्याचे प्रकार सुरू आहेत , परिणामी आपला देश सामाजिक दृष्ट्या पोकळ होत चालला आहे याची पुर्णतः जाणीव या अतिरेक्यांना झालेली आहे. हिंदू राष्ट्र निर्माण करण्याच्या नादात आपल्याच देशातला सामाजिक सौहार्द संपवून अजून एक पाकिस्तानी विचार या देशात आपण निर्माण करत आहोत का ? यावरही आपण विचार करणे आवश्यक आहे.ज्याअर्थी ते नराधम निष्पाप जीवांचे बळी घेताना धार्मिक शेरेबाजी करत आहेत व आपल्या भावना भडकविण्याचे काम करत आहेत त्याअर्थी त्यांना हे पक्के माहित आहे की जे काम हजारो गोळ्या करू शकत नाहीत तेच काम तुमच्या आमच्या भावना भडकावून व धर्माचे विष कालवून ते सहज करू शकतात, कारण सध्याच्या राजकारणाने धर्माच्या नावाची अफूची गोळी ‘सर्वांनाच’ दिली आहे. व यामुळेच जातीय दंगे भडकतील व हजारो निष्पाप जीव जातील अशी परिस्थिती सध्या आपल्या देशात आहे हे शत्रू जाणून आहे, आणि म्हणूनच ते हरामखोर हे सर्व करत आहेत. आता आपण विचार करायचे आहे की ही परिस्थिती का आली ? आता आपण ठरवायचे आहे की जे त्या नराधमांना पाहिजे ते करायचे की आपापल्या सद्सदविवेक बुद्धीचा वापर करून या फुटीरतावाद्यांचे मनसुबे मोडून काढायचे ? येणारा काळ कठीण असेल व अशावेळी देशात सर्व समाजात देशभक्तीची भावना व सलोखा कसा राहील हे पाहणे सरकारचे व सर्वच राजकीय पक्षांचे काम आहे. जे घडले त्याबद्दल अनेकांचे अनेक प्रश्न आहेत. लोकांनी हिंदू म्हणूनच हे सरकार निवडून दिले आहे ना ? मग देशातला हिंदू हा केवळ हिंदू आहे म्हणून मारला जातोय याची जबाबदारी कोण घेणार ? सुरक्षा यंत्रणांकडून खूप गंभीर चूक झाली आहे असं का बरं वाटत नाही आपल्याला ? जेव्हा हे घडल तेव्हा सुरक्षा यंत्रणा कुठे होत्या ? सर्जिकल स्ट्राईक मोदी नी केली म्हणून सर्वांना सांगितला मग हा हल्ला कोणाच्या चुकीमुळे झाला ? ह्याचं उत्तर कोण देणार ? सरकार व सत्ताधारी पक्ष धर्मद्वेश पसरवून आपली जबाबदारी झटकू शकत नाही, लोकांच्या प्रश्नांची उत्तरं सरकारला कधीतरी द्यावीच लागतील.

Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )

13,155 Aufrufe • vor 1 Jahr

एपस्टिन फाईल्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आल्यानंतर आम्ही काही दिवसांपूर्वी सर्व राजकिय पक्षांना पत्र लिहिले होते. या प्रकरणामुळे भारत देश हा विकला गेलाय. तो फक्त आर्थिक दृष्टीकोनातून नाही तर देशाचे सार्वभौमत्व सुद्धा विकला गेलाय. आज आमची काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत बैठक झाली. येत्या 23 मार्च रोजी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली आरएसएसच्या मुख्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. एपस्टिन फाईलमध्ये पंतप्रधान मोदीचे नाव आल्यानंतर ते पूर्णपणे अमेरिकेला सरेंडर झाले आहेत. त्यांनी अमेरिकेकडे देशाला गहाण ठेवले आहे. एपस्टिन फाईलमध्ये पंतप्रधान मोदी यांचे अजून काहीतरी दडलेले आहे. त्यामुळेच ते पूर्णपणे सरेंडर झाले आहेत. या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही आरएसएसला प्रश्न करणार आहोत की, अशा व्यक्तीला तुम्ही पंतप्रधान कसं ठेवताय? याचा जाब विचारणार आहोत. जनतेला आमचे आवाहन आहे की, त्यांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. #RSS #epestinefiles #indiausa #tradedeal

Prakash Ambedkar

17,178 Aufrufe • vor 7 Monaten

खडकवासला विधानसभेचे उमेदवार श्री. मयुरेश वांजळे यांच्या प्रचारार्थ खडकवासला येथे जाहीर सभा घेतली, त्यातील महत्वाचे मुद्दे १) माझा मित्र, सहकारी रमेश वांजळेंचा मुलगा मयुरेश याचा प्रचार करायला मी इकडे आलो आहे. मला तो दिवस अजून आठवतोय. रमेश शेवटचा कोणाशी बोलला असेल तो माझ्याशी बोलला, त्याने मला फोन केला आणि म्हणाला मी एमआरआय काढायला आलोय, तो झाला की फोन करतो. आणि थोड्यावेळाने मला फोन आला की तो गेला. मला काय बोलायचं ते कळेना. मला अनेक जणं सोडून गेले पण आज माझा रमेश असता तर मला सोडून गेला नसता. मयुरेश मला रमेशची आठवण करून देतो. आकाराने पण तसाच आहे आणि सोन्याने मढलेला पण तसाच आहे. त्यामुळे तुम्ही जे मतदान कराल ते मयुरेशला कराल तसंच मतदान तुम्ही रमेशला पण कराल. २) खरंच मनापासून सांगतो की पुण्याचा झालेला सत्यानाश पाहून वाईट वाटतं. पण तुम्हाला त्याचं वाईट वाटत नाही, राग येत नाही हे पाहून मला जास्त वाईट वाटतं. ३) एकदा तुमच्या हातातील फोनमध्ये डोकावून जग कुठे गेलं आहे ते... आपण रस्ते, पाणी, गटारं यातच अडकलो आहोत. पण याचा तुम्हाला राग येत नाही. जगाच्या मागे आपण किती पडलो आहोत याचं आपल्याला काही वाटत नाही हे वाईट आहे. ४) शिवरायांचं निधन झाल्यावर रायगडावर समाधी बांधली गेली आहे. पुढे कोणीतरी समाधीच्या खाली काहीतरी मिळेल या आशेने तिथे उकरून ठेवलं. पुढे महात्मा ज्योतिबा फुले तिकडे गेले, त्यांनी समाधी पुन्हा उभारायचं ठरवलं, त्यानंतर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक गेले आणि त्यांनी ही समाधी चांगली करण्यासाठी पैसे उभे केले. यासाठी अठरापगड जातीतील लोकांनी समाधी उभी करायला पैसे गोळा केले. असा महाराष्ट्र होता आमचा. ५) आम्ही कसं खितपत जगतोय याचं आम्हाला घेणंदेणं नाही, आम्हाला जातीपातीत जास्त स्वारस्य आहे. आज पुण्यात आयसिस, सिमीसारख्या संघटनांचे अतिरेकी सापडत आहेत. पण याकडे कोणाचंच लक्ष नाही. आमदार खासदारांना फक्त टेंडर काढायची आहेत, आणि त्यातून पैसे कमवायचे आहेत, त्यांना इतर गोष्टींशी घेणंदेणं नाही, आणि तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नये म्हणून ते तुम्हाला जातीत गुंतवतात. ६) तुम्ही इतकी वर्ष ज्यांना मतदान केलं त्यांनी तुमचं जगणं हराम करून ठेवलं आहे. आज महाराष्ट्रातील अनेक मुलं हा देश सोडून निघालेत. शिक्षण, नोकऱ्या त्यांना इथे पण मिळू शकतात, पण ते का चाललेत, कारण आजूबाजूचं वातावरण घाणेरडं आहे. मला या सांगा या असल्या महाराष्ट्रासाठी छत्रपती शिवाजी महाराज झटले ? ७) ज्या हिंद प्रांतावर महाराष्ट्राने राज्य केलं, त्या महाराष्ट्राला मला गतवैभव मिळवून द्यायचा आहे. ८) इतर पक्षातील जी लोकं निवडणुकीला उभे आहेत, त्यांच्या डोळ्यात महाराष्ट्राबद्दलची कोणीतीही स्वप्न नाहीत. उद्या सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीरनामा येत आहे. त्यात आपण महाराष्ट्रापुढचे प्रश्न आणि त्याची उत्तरं दिली आहेत. ९) शरद पवारांनी बारामतीत अनेक उद्योग आणले पण त्याच पवार साहेबांनी महाराष्ट्रात उद्योगधंदे का नाही आणले ? मग तुम्हाला महाराष्ट्राचा नेता का म्हणायचं ? स्वतःच्या तालुक्याचा विकास करणाऱ्याला तालुक्याचा नेता का नाही म्हणायचं ? १०) मी तुमच्याकडे महाराष्ट्राची सत्ता मागतोय, मी जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवेन. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की मयुरेश वांजळे, आणि माझे पुरंदरचे उमेदवार उमेश जगताप आणि महाराष्ट्रातील माझ्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा.

Raj Thackeray

99,842 Aufrufe • vor 1 Jahr

मा.Governor of Maharashtra CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar Maharashtra Public Service Commission 👉 4 ऑक्टोबर 2023 आम्ही महामहीम राज्यपाल महोदयांकडे महाराष्ट्रात सरळसेवा परीक्षेत होत असलेले गैरप्रकार,गैरव्यवहार,पेपर फोडाफोडी ,कॉपीप्रकरण व कुंपणच कसे शेत खात आहे यासंदर्भात चर्चा करून या सर्व परीक्षा फक्त #MPSC मार्फतच व्हाव्यात अशी मागणी केली होती.( सोबतच कडक कॉपीविरोधी कायदा) 👉 #WCD मृदा व जळसंधारण भरतीचा पेपर फुटला याला आज 6 दिवस होत आहेत. राज्यभरातील उमेदवारांनी पेपर फुटल्याचे सर्व पुरावे आपल्याकडे सादर केले,कोणता अधिकारी सामील हे पण पुराव्यानिशी समोर आले आहेच. यंत्रणा कशी भ्रष्ट आहे याचा जगजाहीर तमाशाच या उमेदवारांनी समोर आणला. 👉 अजूनही सरकार यावर एक शब्द बोलायला तयार नाही.याचा अर्थ काय घ्यायचा? ह्या उमेदवारांनी आपला कोणता आदर्श घ्यायचा? अजून कोणते पुरावे हवे आहेत? 👉 त्या उमेदवाराला अटक केली, पोलीस तपासात त्याच्या घरी कोरे चेक सापडले.पण या मागचे सूत्रधार मोकाट फिरत आहेत,पुढील घोटाळ्यासाठी सज्ज.... 👉 आपलेच सरकार असलेल्या सर्वात मोठ्या राज्यात सर्वात मोठी भरती रद्द करून आपल्याला 'घरचा आहेर' दिला आहे.यावर तरी विचार करता की नाही? 👉 का तिकडे जसे उमेदवार रस्त्यावर उतरले होते त्याची वाट बघत आहात? एक सरळसेवा परीक्षा पारदर्शकपणे घेता आली नाही.हे सगळेच उमेदवार एकत्रितपणे रस्त्यावर उतरले तर ते सरकारला झेपणार आहे का???? महाराष्ट्रातील गोरगरीब ,कष्टकरी शेतकऱ्याचे लेकरू 1000 रुपये फीस देते तुम्हाला प्रत्येक परीक्षेसाठी. त्यातून करोड़ोंची लुट केली. निदान त्याचे तरी भान ठेवायचे असते.

Nana Patole

29,512 Aufrufe • vor 2 Jahren

आज २ ऑगस्ट २०२५ रोजी शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापनदिनाच्या मेळाव्यात संवाद साधला. त्यातील महत्वाचे मुद्दे १) गेले २ दिवस तब्येत थोडीशी बरी नव्हती. हल्लीच्या आजारांचं काही कळत नाही, हल्लीचे आजार आणि महाराष्ट्राचं राजकारण यांत खूप साम्य आहे. पूर्वीचे आजार नाव घेऊन ताठ मानेने समोर यायचे. हल्लीचे आजार तसे येत नाहीत ते इकडून व्हायरल होत फिरत राहतात. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या बरेच व्हायरल फिरत आहेत. २) स्वातंत्र्याच्या १२ दिवस अगोदर ज्या पक्षाची स्थापना झाली, तो शेतकरी कामगार पक्ष. महाराष्ट्रातील स्वातंत्र्यपूर्व काळात निर्माण झालेला हा एकमेव पक्ष, जो अजून पण टिकून आहे, हे खरंच आश्चर्य आहे. ३) १९८१ ला शिवसेनेच पहिलं अधिवेशन झालं होतं आणि त्याला प्रमुख पाहुणे म्हणून कम्युनिस्ट पक्षाचे श्रीपाद अमृत डांगे आले होते. खरंतर शिवसेना आणि कम्युनिस्ट पक्ष यांच्यात विस्तवही जात नव्हता. पण राजकारण आणि राजकारणी मोठ्या मनाचे होते, आता मोठं मन संकुचित व्हायला लागलं आहे. श्रीपाद अमृत डांगे शिवसेनेच्या व्यासपीठावर येणं म्हणजे भगव्या व्यासपीठावर लाल ध्वज येण्यासारखं होतं. आज लाल ध्वजाच्या व्यासपीठावरती दोन भगवे ध्वज आले आहेत. जेंव्हा जयंतराव येऊन म्हणाले की तुम्ही येऊन फक्त मराठीवर बोला, मला शेतकरी कामगार पक्षाच्या खूप बोलायचं होतं पण मी आज फक्त मराठीवर बोलेन. आणि मी शेतकरी कामगार पक्षाच्या व्यासपीठावर दुसऱ्यांदा येतोय. ५ वर्षांपूर्वी मी जयंतरावांच्या प्रचाराला आलो होतो, आणि आज आलो. ४) आज महाराष्ट्र आणि रायगड जिल्ह्यापुढचा जो महत्वाचा प्रश्न आहे तो राजकीय पक्ष कोणता आहे हे न बघता सोडवला पाहिजे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातील लहान मुलांना हिंदी कशी शिकवता येईल याचा विचार करतात, पण महाराष्ट्रात बाहेरून कामाधंद्यासाठी येणाऱ्यांना मराठी शिकवावी याविषयी त्यांना काही आस्था नाही. ५) रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी चालले आहेत. जमिनीचे व्यवहार करणारे आपले, कुंपणच शेत खात आहे, शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत, त्यावर उद्योगधंदे येत आहेत आणि त्या उद्योगधंद्यात काम करायला बाहेरच्या राज्यातील माणसं येत आहेत. एका बाजूला शेतकरी बरबाद होतोय आणि दुसऱ्या बाजूला कामगार देशोधडीला लागत आहेत. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जयंत पाटील यांनी रायगड जिल्ह्यातील शेतकरी आणि कामगार हे बरबाद होणार नाहीत हे पाहिलं पाहिजे. ६) उद्योगधंदे महाराष्ट्रात येतात तिथं भूमिपुत्रांना नोकरी मिळावी यासाठी सर्व पक्षांनी एकत्रित काम करणं गरजेचं आहे... ७) जेंव्हा भाषावादावर अमित शाह यांना प्रश्न विचारला तेंव्हा ते म्हणाले की मी हिंदी भाषिक नाही मी गुजराती आहे.... मोदी पंतप्रधान झाल्यानंतर महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला गेले. प्रत्येकाला आपल्या भाषेबद्दल आणि प्रदेशाबद्दल प्रेम असतं तेच आम्ही केलं तर संकुचित कसे होतो ? ८) गुजरातमध्ये हिंदी नाही तर महाराष्ट्रात का ? गुजरात टेनन्सी अँड ऍग्रीकल्चर लँड ऍक्ट या कायद्यानुसार गुजरातमध्ये, जे गुजरातचे रहिवासी नाहीत किंवा अनिवासी भारतीयांना शेतजमीन विकत घेता येत नाही. आणि समजा ती विकत घ्यायची असेल तर फेमा कायद्याच्या अंतर्गत रिझर्व्ह बँकेकडून विशेष परवानगी घ्यावी लागते. जर प्रत्येक जण आपल्या राज्याचा विचार करतोय तर मग आम्ही का नाही करायचा ? ९) रायगडमध्ये जमिनी कोण घेतंय हे कळत नाहीये. उत्तरेतले धनदांडगे इथे कोकणात जमिनी घेत आहेत. माझी तुम्हाला विनंती आहे की तुमच्याकडे कोणी उद्योगधंद्यासाठी जमिनी घ्यायला आले तर त्यांना सांगायचं की आम्ही नुसत्या जमिनी विकणार नाही. त्यांना अट घाला. तुमच्या उद्योगांमध्ये आम्ही पार्टनर असू. १०) महाराष्ट्र जन सुरक्षा कायदा आणून, आता प्रकल्पाना विरोध करणाऱ्यांना अटक करणार म्हणे. तुम्ही अटक करून दाखवाच. या महाराष्ट्रात मराठी माणसाच्या थडग्यावर उद्योग उभे राहणार नाहीत, उद्योग आणायचे असतील तर मराठी माणसाचा मान राखलाच पाहिजे. ११) हा रायगड जिल्हा आहे, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची खणा-नारळाने ओटी भरणाऱ्या शिवछत्रपतींची राजधानी असणाऱ्या रायगडमध्ये डान्स बार सुरूयेत? बरं हे सगळे डान्सबार कोणाचे तर अमराठी माणसांचे... इथून तिथून मराठी माणसाला पिळून काढण्याचे प्रकार सुरु आहेत... १२) ज्यावेळी तुमच्या कृतीतून महाराष्ट्राला नख लागतंय असं समजेल त्यावेळी अंगावरच येऊ १३) कान बंद ठेऊ नका, डोळे बंद ठेऊ नका. आपल्या आजूबाजूला काय सुरू आहे याकडे लक्ष ठेवा नाहीतर कालांतराने पश्चातापाचा हात डोक्यावर मारावा लागेल.. बाहेरच्या राज्यांमध्ये आपली प्रतिमा आहे की ज्यांना सहज विकत घेता येऊ शकतो अशी ही लोकं आहेत... १२५ वर्ष या हिंद प्रांतावर राज्य करणाऱ्या महाराष्ट्रबद्दलची ही प्रतिमा ? मग काय करायचेत फक्त महाराजांचे पुतळे व्यासपीठावर ठेऊन जर आपण काही शिकणारच नसू तर... रोजच्या बोलण्यातले फारसी शब्द जाऊन मराठी शब्द यावेत म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी एक राज्य भाषा व्यवहार कोश करून घेतला होता. आणि इथे आपण ना भाषेबद्दल कडवट आहोत ना संस्कृतीबद्दल... १४) देशाला दिशा देणारा हा महाराष्ट्र आहे त्याची अशी दशा नाही झाली पाहिजे... १५) अल्पेश ठाकूरनं गुजरातमधून २० हजार बिहारी लोकांना हाकलून दिलं तेव्हा भाजपनं त्याचा सत्कार केला, त्याला आमदार केला. मग हेच मी करत असेन तर राज ठाकरे संकुचित कसा?

Raj Thackeray

33,719 Aufrufe • vor 1 Jahr