Loading video...

Video Failed to Load

Go Home

शाही पुसून दुबार मतदान चालू आहे बाहेर बॉटल घेऊनच उभारले आहेत ... हे फार वाईट आणि खिन्न करणार आहे

42,050 views • 8 months ago •via X (Twitter)

0 Comments

No comments available

Comments from the original post will appear here

Related Videos

म्हाडाची जवळपास १० एकर जागा मंत्री आशिष शेलार यांनी ढापली जी जागा लीलावती हॉस्पिटल वांद्रे पश्चिम येथील प्राइम लोकेशन वर आहे ही जागा स्पोर्ट्स सेंटर च्या नावाने घेतली आहे आणि ही जागा आशिष शेलार यांनी आमदार निधीतून सुसज्ज बांधून घेतली आहे या स्पोर्ट्स केंद्रात येणाऱ्या मुलांकडून आणि नागरिकांकडून भरमसाठ पैसे आकारले जात आहेत या धावणाऱ्या ट्रॅक वापरण्याच एका तासाच भाड हे जवळपास ३०० रुपये प्रति व्यक्ती आहे आणि क्रिकेट आणि फुटबॉल च्या कोचिंग फी बद्दल न बोललेल बर आहे हा सगळा सरकार पुरस्कृत भ्रष्टाचार आहे आणि या सगळ्या गोष्टीला खतपाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घालत आहेत

गजाभाऊ

96,865 views • 1 month ago

मुंबईत आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आणि हक्कांसाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांवर पोलीस बळाचा वापर केला जात आहे. लाठीहल्ल्यानंतर आता या विद्यार्थ्यांना थेट खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. सोशल मीडियावर समोर आलेल्या एका अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक व्हिडिओमध्ये, "तुमच्या खिशात ड्रग्जच्या पुड्या ठेवून तुरुंगात टाकेन," अशी उघड धमकी मुंबई पोलीस दलातील एक कर्मचारी आंदोलक तरुणांना देताना दिसत आहे. हे कृत्य अतिशय विकृत, तितकेच निषेधार्ह आणि खाकी वर्दीला काळीमा फासणारे आहे. ज्या मुंबई पोलिसांवर अंमली पदार्थांचा व्यापार मुळापासून उखडण्याची नैतिक व कायदेशीर जबाबदारी आहे, तेच पोलीस विद्यार्थ्यांना धमकावण्यासाठी ड्रग्जचा वापर करण्याची भाषा करत असतील, तर हे अत्यंत गंभीर आहे. या घटनेमुळे काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. १. पोलीस कर्मचाऱ्यांकडे ड्रग्ज येतात कुठून? जर पोलीस खुलेआम विद्यार्थ्यांच्या खिशात ड्रग्ज ठेवण्याची धमकी देत असतील, तर त्यांना ड्रग्जचा स्त्रोत ठाऊक आहे. जर हा स्त्रोत माहिती आहे, तर मुंबईतील ड्रग्ज माफियांवर कारवाई का केली जात नाही? २. राज्य सरकारला ही गुंडगिरी मान्य आहे का? मुंबई पोलीस दल हे थेट राज्याच्या गृह मंत्रालयाखाली येते. राज्याच्या राजधानीत आणि सरकारच्या नाकाखाली सुरू असलेला हा प्रकार गृह खात्याला मान्य आहे का? आंदोलक मुलांना अशा प्रकारे बनावट पुराव्यांची आणि ड्रग्जची धमकी देणे हा भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र पोलीस कायदा आणि मानवाधिकार कायद्यांनुसार अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. खोटे पुरावे तयार करणे किंवा कोणालातरी खोट्या व गंभीर गुन्ह्यात अडकवण्यासाठी पुरावे रचणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. अंमली पदार्थ बाळगणे, त्याचा व्यापार करणे किंवा कोणाला तरी अडकविण्यासाठी त्याचा गैरवापर करणे हा देखील गुन्हा आहे. हा प्रकार मानवाधिकाराचेही उल्लंघन आहे. मानवी हक्क संरक्षण कायदा, १९९३ अंतर्गत नागरिकांना भयमुक्त वातावरणात जगण्याचा आणि आपली मते मांडण्याचा घटनात्मक अधिकार आहे. पोलिसांचे हे कृत्य राष्ट्रीय व राज्य मानवाधिकार आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उघड उल्लंघन आहे. आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या या देशाच्या तरुण पिढीला गुन्हेगार ठरवण्याचा आणि त्यांच्या खिशात ड्रग्ज टाकून त्यांचे आयुष्य व करिअर उद्ध्वस्त करण्याची धमकी देण्याचा हा प्रकार अत्यंत भयावह आहे. संबंधित व्हिडिओतील पोलीस कर्मचाऱ्यावर आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. तसेच, राज्याच्या गृह मंत्र्यांनी यावर मौन न बाळगता महाराष्ट्रातील जनतेला आणि त्या आंदोलक विद्यार्थ्यांच्या पालकांना उत्तर द्यायलाच पाहिजे. Devendra Fadnavis मुंबई पोलीस Mumbai Police

Supriya Sule

50,966 views • 2 months ago

कल्याणमध्ये गर्दुल्यांसाठी पोलिसांचा सिंघम अवतार पाहायला मिळाला. कल्याणचे डीसीपी झेंडे साहेबांनी काल कल्याण स्थानक आणि सभोवतालच्या परिसरात सार्वजनिक जागी चरस-गांजा ओढणाऱ्या गर्दुल्यांना चांगलाच चोप देत त्यांची भर रस्त्यात धिंड काढली.यातील बहुतांश गर्दुल्ले हे अमराठी आहेत व यातून पोलिस खात्यानेही बोध घेणे गरजेचे आहे. खरंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाला अधिक बळ देणे ही काळाची गरज आहे. आज अनेक ठिकाणी मग त्या झोपडपट्ट्या असोत की उच्चभ्रू वस्त्या, सगळीकडेच अंमली पदार्थांचे सेवन केलेले तरूण झिंगताना दिसत आहेत. डिसीपी साहेबांनी अतिशय उल्लेखनीय काम केलं आहे आणि अशीच कारवाई सातत्याने व्हावी अशी आशा आहे. यामुळे हे समाजकंटक वठणीवर येऊन महिला आणि मुलींसाठी एक सुरक्षित वातावरण निर्माण होण्यास मदत होईल व समाज विघातक कृत्यांना आळा बसेल. Devendra Fadnavis @OfficeOfDevendra ठाणे पोलीस.. Thane Police महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police

Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )

27,798 views • 1 year ago

जंतर - मंतर वरील अश्या प्रकराची 'जेन झी' हवी आहे का पालकांनो ? काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि डाव्यांना अश्या प्रकारची तरूणाई देशातील हवी आहे. हे असे कृत्य विद्यार्थ्यांच्या नावाखाली सार्वजनिक ठिकाणी करत आहेत. एकीकडे आपले मुलं शिकून मोठं व्हावं म्हणून आई वडील मुलांना चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न करत असतात. पण, आई वडिलांकडून थोडं दुर्लक्ष झालं तर काँग्रेस आणि डाव्या पक्षांना हवी असलेली मुलं तयार होतात. हा फक्त संस्काराचा अभाव नाहीतर हा संगतीचा देखील परिणाम आहे. आपले मुलं कुठं जातात? कुणासोबत वेळ घालवतात? कॉलेजमध्ये कोण मित्र परिवार आहे? कोणत्या विचारांच्या मित्र परिवारात राहतो हा सर्वात जास्त मॅटर करतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्यच्या नावाखाली कोणतीही वागणूक कोणतेही कृत्य आपल्या मुलाने केल्यानंतर त्याला पाठीशी घालणारे आपण पालकच आहोत. लोकशाहीत सरकारविरुद्ध आवाज उठवणे, मागण्या मांडणे आणि निदर्शने करणे हा जनतेचा हक्क मानला जातो. परंतु, जंतर - मंतर वरच्या आंदोलनांमध्ये ज्या प्रकारचे पोस्टर, चित्रे, व्हिडिओ आणि मजकूर पाहायला मिळत आहेत, त्यामुळे "विरोधाची पातळी नक्की कुठे चालली आहे?" काँग्रेस आणि डाव्या विचारसरणीचे गट आजच्या तरुणाईला (Gen Z) आपल्या राजकीय फायद्यासाठी एका विशिष्ट दिशेने वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी आधुनिक विषयांचा जसे की व्यक्तिगत स्वातंत्र्य, अधिकार, समलैंगिक संबंध अश्या विचारांचा वापर करून त्यांना मूळ राष्ट्रीय प्रवाहापासून आणि सांस्कृतिक मुळांपासून दूर नेण्याचा प्रयत्न होतो आहे. जंगलातील सशस्त्र संघर्षाची जागा आता शहरांमधील बौद्धिक, शैक्षणिक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून चालणाऱ्या वैचारिक विद्रोहाने घेतली आहे. देशाची एकता, अखंडता आणि विकास हीच सर्वोपरि आहे. विद्रोही विचारांच्या लाटेत तरुणाई वाहून जाऊ नये, यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने सतर्क राहणे काळाची गरज आहेच आहे त्याच बरोबर आई वडील देखील या बाबतीत जागरूक राहणे आवश्यक आहे. नाहीतर काँग्रेस आणि इतर डावे पक्ष तुमच्या मुलांना देशोधडीला लावल्यानंतरच शांत होतील!

Prakash Gade

12,753 views • 2 months ago

लेडी डॉन च्या सांगण्यावरुन पोकलेन मशीन अख्खा सिमेंटचा रस्ता खराब करीत साईटवर पोहचली. तेवढ्यात लेडी डॉनला 25 ची कमिटमेंट झाली. आणि पोहचलेली पोकलेन मशीन लगेचच मागे फिरली. ही आहे प्रशासनाची कमाल. प्रशासनातीलच अधिकारी हे लेडी डॉनला मांडीवर घेऊन बसले आहेत. ते आणि ती मिळून हा हैदोस मुंब्रा, शीळ तसेच आजूबाच्या भागात घालत आहेत. सगळ्यांना सगळं माहित आहे. परंतु ठाणे महानगरपालिकेतील एकही अधिकारी बोलायला तयार नाही. मी स्वत: आपल्याकडे हा पुरावा सादर करीत आहे. अजून आपल्याला काय हवं ते सांगा ठाणे महानगरपालिका आयुक्त @abhijitbangar महोदय. ते सुद्धा आणून देतो. आता एवढा पुरावा दिल्यानंतर तरी कारवाई होणार की नाही. हे तुम्हीच ठरवा. Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका

Dr.Jitendra Awhad

42,494 views • 3 years ago