Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

सगळतर समोरच आहे राव! कोणीतरी मोठ्या माणसांनी मध्यस्थी करावी ❤️

37,998 görüntüleme • 8 ay önce •via X (Twitter)

0 Yorum

Yorum bulunmuyor

Orijinal gönderinin yorumları burada görünecek

Benzer Videolar

" कल्याणमध्ये मराठी माणसाला जी अर्वाच्च शिवीगाळ करत, परप्रांतीय माणसाकडूनजी मारहाण झाली, त्याच्यावर वेळेत सरकारने कारवाई करावी अन्यथा मग महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने कारवाई केली तर मग म्हणू नका की मनसेने कायदा हातात घेतला. आणि विधानसभेचं अधिवेशन सुरु असताना, या घटनेनंतर इतक्या मोठ्या संख्येने जे मराठी आमदार विधिमंडळात निवडून गेलेत ते काही आवाज उठवणार आहेत का ? का ते पण मराठी भय्ये झालेत आणि त्यांना या घटनेवर मूग गिळून बसायचं आहे ?.... सरकारने कायद्याचा धाक काय आहे हे एकदा दाखवून द्यावंच... " अविनाश जाधव, नेते महाराष्ट्र नवनिर्माण सेना #कल्याण #MNSAdhikrut

MNS Adhikrut - मनसे अधिकृत

20,462 görüntüleme • 1 yıl önce

आज साबळेवाडी ता. भूम येथील अतिवृष्टी मुळे फुटलेल्या तलावाची पाहणी केली व अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देऊन शेतकऱ्यांच्या शेती पिकांची पाहणी केली. सलग झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर उभ्या पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. या पाहणीदरम्यान प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या की • शेती पिकांचे नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे तात्काळ करून घ्यावेत. • शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळावी यासाठी त्वरीत कारवाई करावी. • शासनाने ज्या निकषांनुसार मदत देणे अपेक्षित आहे ते निकष शिथिल करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. #farmer #शेतकरी #नुकसान #पाहणी #ओमराजे_निंबाळकर #Omrajenimbalkar

Omprakash Rajenimbalkar

24,947 görüntüleme • 1 yıl önce

छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना आज स्थानिक पत्रकारांशी विविध मुद्द्यांवर संवाद साधला. राज्यात संगमनेर व कोल्हापूर येथे पुन्हा सामाजिक तणावाच्या घटना घडल्या. कोल्हापूर येथील आंदोलनाची बातमी टिव्हीवर पाहिली. कोणीतरी मोबाईलवर मेसेज पाठवतो. त्यावरुन लगेच रस्त्यावर उतरुन अशा घटनेला धार्मिक स्वरुप देणे योग्य नाही. सत्ताधाऱ्यांनी अशा गोष्टीला प्रोत्साहित करणे योग्य नाही. राज्यात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणे ही राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे. पण जर राज्य सरकारच या प्रकरणात लोकांना उचकवू लागले आणि दोन समाजात, दोन जातींमध्ये कटुता निर्माण करू लागले तर हे काही चांगले लक्षण नाही. गेल्या काही दिवसांत दंगलीसदृश्य घटना घडल्या. मात्र, या घटना त्या-त्या परिसरातच मर्यादित राहिल्या. ही चांगली गोष्ट आहे. मात्र, हे जाणूनबुजून घडवले जात आहे. उदाहरणच घ्यायचे तर छ. संभाजीनगरमध्ये कोणी तरी औरंगजेबाचा फोटो दाखवला. तर, त्यावरून पुण्यात आंदोलन करायचे काय कारण आहे? ओडिशा आणि काही राज्यात चर्चवर हल्ले केले जात आहेत. ख्रिश्चन समाज हा शांतताप्रिय आहे. कोणाची काही चूक असेल तर सरकारने पोलिस कारवाई करावी. मात्र तसे न करता चर्चवर हल्ले केले जात आहेत. हे एकट्या-दुकट्याचे काम नाही. ही एक विशिष्ट विचारसरणी आहे. ही विचारधारा समाजाच्या हिताची नाही. #pressconference

Sharad Pawar

80,246 görüntüleme • 3 yıl önce

बारामती येथे होणाऱ्या विभागास्तरीय नमो महारोजगार मेळाव्यासंदर्भात आढावा बैठक झाली. महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार, स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कार्यक्रमांचं काटेकोर नियोजन करावं, असे निर्देश संबंधितांना बैठकीत दिले. इतर विभागस्तरीय मेळाव्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता बारामतीत २ आणि ३ मार्च असे दोन दिवस नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मेळाव्याबरोबरच बऱ्हाणपूर येथील पोलीस उपमुख्यालयाचं उद्घाटन, पोलिसांसाठीच्या घरांचं लोकार्पण, पोलीस विभागाला देण्यात येणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांचं लोकार्पण, सीसीटीव्ही प्रकल्पाचा शुभारंभ, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालयाचं उद्घाटन, बारामती बसस्थानकाचं लोकार्पण आदी कार्यक्रम होणार आहेत. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे वढू बुद्रुक आणि तुळापूर येथील स्मारक, आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाच्या ठिकाणीही कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे. मेळाव्यात नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. मेळाव्याकरिता बंदिस्त दालन, विविध स्टॉल्स, पिण्याचे पाणी, कार्यक्रम स्थळी स्वच्छतेच्या सुविधा, वाहनतळ, अल्पोपहार, बैठक व्यवस्था, सीसीटीव्ही, एलईडी डिस्प्ले, जनरेटर आदी सुविधांची उत्तम व्यवस्था करावी. या मेळाव्यामध्ये रोजगार इच्छुक असणाऱ्या दहावी, बारावी, आय.टी.आय., पदविका, पदवीधर, पदव्युत्तर पदवी प्राप्त उमेदवारांच्या मुलाखती घेऊन तिथेच त्यांना रोजगाराच्या संधी दिल्या जाणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त उमेदवारांनी मेळाव्यासाठी नाव नोंदणी करून रोजगार संधींचा लाभ घ्यावा, असं आवाहन आहे. ह्या मेळाव्यात युवक व युवतींनी सहभागी होण्यासाठी या संकेतस्थळावर नोंदणी करावी आणि नियुक्तांसाठी (For Employer registration) हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

Ajit Pawar

24,582 görüntüleme • 2 yıl önce

बावधन बुद्रुक येथील श्री. दिलीप दगडे यांच्या निवासस्थानाशेजारी तसेच रायन आंतरराष्ट्रीय शाळेच्या परिसरालगत एका बांधकाम व्यावसायिकाने निसर्ग पाम सोसायटी या बंगलो प्रकल्पाचे प्लॉटिंग व बांधकाम केले आहे. या बांधकामादरम्यान परिसरातील पारंपरिक नैसर्गिक पाण्याचा प्रवाह असलेला केतकीचा ओढा पूर्णपणे बुजविण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच, सध्या पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक निचरा होणारा मार्गही अडविण्यात आल्याचे निसर्ग पाम सोसायटीचे सदस्य व स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे पावसाचे पाणी थेट सोसायटीलगतच्या नागरिकांच्या घरांमध्ये शिरत असून, घरातील फर्निचर, महत्त्वाची कागदपत्रे तसेच इतर मौल्यवान वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याशिवाय, निसर्ग पाम सोसायटीला मुख्य रस्त्याशी जोडणारा संपर्करस्ता पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याखाली जात असल्याने नागरिकांना ये-जा करणे अत्यंत कठीण होते. अनेकदा या पाण्यात दुचाकी अर्ध्यापर्यंत बुडत असल्याने मुख्य रस्त्यावर पोहोचण्यासाठी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येचा फटका केवळ सोसायटीतील रहिवाशांनाच नव्हे, तर सर्व्हिस रोडलगत असलेल्या व्यावसायिकांनाही बसत असून त्यांच्या व्यवसायाचेही मोठे नुकसान होत आहे. या संदर्भात स्थानिक प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस अथवा कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही, ही अत्यंत खेदाची बाब आहे. त्यामुळे माझी जिल्हा प्रशासनास नम्र विनंती आहे की, संबंधित विभागाने तात्काळ घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थितीची पडताळणी करावी. पाहणीत नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडविल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे आढळल्यास, तो प्रवाह तात्काळ पूर्ववत करून पावसाच्या पाण्याचा सुरळीत निचरा होईल, अशी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात नागरिकांना अशा प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. PMC Care PMRDA NHAI collectorpune Maharashtra Pollution Control Board Maha Forest Official

Supriya Sule

62,924 görüntüleme • 2 ay önce

गोमातेच्या संवर्धनासाठी राज्य सरकारचे 2 महत्त्वाचे निर्णय! गोमातेला राज्यमातेचा दर्जा, गोशाळांना चाऱ्याकरिता अनुदान! श्रीक्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान,कणेरी मठ,कोल्हापूर येथे धर्मचिंतनाकरिता 'संत समावेश कार्यक्रमा'त सहभागी झालो. यावेळी उपस्थित साधू-संत, महंत आणि धर्माचार्यांशी संवाद साधला. देशात सांस्कृतिक पुनरुत्थानाचे काम मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी करत असताना आज राज्यात गोमातेच्या संवर्धनाच्या दृष्टीने दोन महत्वाचे निर्णय घेतले. देशी गोमातेला 'राज्यमाता' असे घोषित केले असून गोशाळांमध्ये चाऱ्याकरिता प्रतिदिन ₹50 अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीनंतर हिंदू समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती झाली आणि संत एकत्रित होण्यास सुरुवात झाली. मंदिरात जाणार नाही म्हणणारे देखील आता मंदिरात जात आहेत. 50 वर्षांच्या राजकारणानंतर शरद पवारांना आध्यात्मिक आघाडी सुरु करावी लागली ही सांस्कृतिक पुनरुत्थानाची ताकद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी देव,देश आणि धर्माकरिता लढण्याचा मंत्र दिला होता. देशामध्ये पुन्हा एकदा संत संस्कृतीचे महिमामंडन सुरु झाले आहे. देव,देश आणि धर्माकरिता सामान्य माणसांमध्ये प्राण फुंकण्याचे काम धर्माचार्यांनी केले. जे हिंदुत्व प्रखरतेने मांडतात अशा लोकांच्या पाठीशी समाज उभा राहतो म्हणून या समाजात भेदाभेद निर्माण करण्याचे षडयंत्र सध्या पाहायला मिळत आहे. लव्ह जिहाद, धर्म परिवर्तनासोबत निवडणुकीमध्ये व्होट जिहादचा प्रकार पाहायला मिळाला. आम्ही सहिष्णू आहोत, कुठल्याही धर्मावर अन्याय करत नाही मात्र आता हिंदुत्व जागृत करण्याची वेळ आली आहे. आपली संस्कृती हजारो वर्ष जुनी आहे, ती टिकवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. यावेळी भाजपा आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले, शंकराचार्य विद्या नृसिंह भारतीजी, योगी निरंजननाथ महाराज तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून सर्व संप्रदायाचे प्रमुख, साधू-संत, महंत, वारकरी, प्रवचनकार, आध्यात्मिक प्रमुख आणि इतर मान्यवर उपस्थित होते. Acharya Tushar Bhosale #Maharashtra #Kolhapur #KaneriMath

Devendra Fadnavis

211,206 görüntüleme • 2 yıl önce

🚨 EXCLUSIVE | संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात धार्मिक कार्यक्रम; उद्यान प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह! काल, २८ ऑगस्ट २०२६ रोजी, मुंबईतील बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (SGNP) परिसरात धार्मिक कार्यक्रम झाल्याचे समोर आले आहे. हे धार्मिक कार्य सरकारी कार्यालयासमोरील नदीपात्रात पार पडले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे दुर्मिळ वन्यजीवांचे अधिवास असलेले संवेदनशील वनक्षेत्र आहे. मानवी हस्तक्षेपामुळे नदीपात्र आणि परिसराच्या स्वच्छतेवर तसेच पर्यावरणावर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे उद्यान परिसरात सर्वसामान्यांना नदीपात्रात उतरण्यास मज्जाव केला जात असल्याची माहिती आहे. मग कालची घटना नेमकी कोणत्या नियमांतर्गत किंवा कोणत्या परवानगीने पार पडली? जर नियम सर्वांसाठी समान असतील, तर या घटनेला अपवाद का? 👉 संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाचे अधिकृत स्पष्टीकरण द्यावे. महत्त्वाचे म्हणजे, मी गेल्या वर्षी अशाच दोन घटना उघडकीस आणल्या होत्या. त्यापैकी कावड यात्रेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. त्यानंतरही अशा घटनांची पुनरावृत्ती होत असेल, तर वन्यजीव संरक्षण आणि उद्यानातील नियमांच्या अंमलबजावणीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होतात. या प्रकरणी राज्य सरकारनेही स्पष्ट भूमिका मांडावी. 📌 मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस 📌 उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे 📌 उपमुख्यमंत्री श्री. सुनेत्रा पवार 📌 वनमंत्री श्री. गणेश नाईक यांनी या घटनेबाबत आपली अधिकृत भूमिका आणि नियमांनुसार करण्यात आलेली कार्यवाही जनतेसमोर स्पष्ट करावी. 📹 व्हिडिओ श्रेय: Reliable Source #SGNP #SanjayGandhiNationalPark #Mumbai #BreakingNews #Wildlife

नेत्वा धुरी NETWA DHURI

35,185 görüntüleme • 1 ay önce

आज २५ जुलै २०२४ रोजी, मुंबईतील रंगशारदा सभागृहात, मी आगामी विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यातील काही महत्वाचे मुद्दे... १) मध्यंतरी २०,२५ दिवस मी अमेरिकेत होतो, तिथे बृहन महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात माझी मुलाखत होती. या निमित्ताने तिथे स्थायिक झालेल्या असंख्य मराठी बांधव-भगिनींशी भेट झाली. त्याच दरम्यान एकदा एक मराठी तरुण शिवलकर आडनावाचा मला भेटायला आला, म्हणाला की मी तुमची लहानपणापासून भाषणं ऐकत आलो. आणि त्यातून प्रेरणा घेऊन इथे मी स्वतःच रेस्टोरंट सुरु केलं आहे. त्याच्या रेस्टोरंटला मी कसंही करून भेट द्यावी अशी त्याची इच्छा होती, म्हणून त्याच्या रेस्टोरंटला गेलो. आतमध्ये जवळपास १०० आणि बाहेर ५० लोकं बसतील अशा क्षमतेचं ते रेस्टोरंट होतं, जे मी गेलो तेंव्हा पूर्ण भरलेलं होतं. आणि मला कळलं की तिकडे टेबल मिळायला कमीत कमी दीड तासांची प्रतीक्षा असते. भारतीय आणि अभारतीय लोकं मोठ्या प्रमाणावर आपलं जेवण जेवायला येतात हे पाहून मला खूप आनंद झाला. एकूणच आपल्या मराठी लोकांनी अमेरिकेत व्यवसाय उद्योगात मोठं यश मिळवलं आहे हे पाहून खूप छान वाटलं. २) अमेरिका, कॅनडा या दोन देशांमध्ये अनेक मोठे तलाव आहेत, पण त्यातले ५ मोठे तलाव आहेत ते इतके मोठे आहेत की ते जर तुम्ही गुगल अर्थ किंवा इतर एखाद्या माध्यमावर जाऊन बघायला गेलात तर तुम्हाला त्याचा अतिप्रचंड आकार दिसेल. हे तलाव इतके मोठे आहेत की अवकाशातून पण हे तलाव दिसतात. या तलावांच्यातला एक छोटा ठिपका म्हणजे जगप्रसिद्द नायगारा धबधबा. इतकं अतिप्रचंड पाणी, जंगलं असलेला हा प्रदेश आहे. इथे फिरताना मला नेहमी एक जाणवत रहायचं की हे सगळं असताना पण इथे पाणी वाचवणं, जंगल वाचवणं याचा किती विचार करतात. ३) पण आपल्याकडे हा विचार होताना दिसत नाही. दरवर्षी मे महिना आला की, पाऊस पडेल का? पडला तर पुरेसा पडेल का? दुष्काळ तर नाही ना पडणार? अशा चिंतांनी महाराष्ट्र ग्रासलेला असतो. पण म्हणून जे पाणी पावसाच्या रूपाने येतं त्याचं नियोजन आपण करत नाही. आपण आपली जंगलं पण वाचवत नाही. कुठलंही सरकार असू दे त्याला या गोष्टीशी काही घेणंदेणं नाही. आपल्याकडे अंतिमकर्म करायला दहन करायला लाकडं वापरतात, पण माझं म्हणणं आहे की काय हरकत आहे आपण विद्युतदाहिनीचा वापर केला तर? किती लाकूडतोड थांबेल याचा आपण विचार करतोय का? सरकारने मग ते केंद्रातील असो की राज्यातील, त्यांनी विद्युतदाहिन्यांवर भर दिला तर प्रचंड जंगलतोड वाचेल. आपण आपल्या धर्माबद्दल अभिमानी असलं पाहिजे, त्यात जे सांगितलं आहे ते पाळायला हरकत नाही फक्त हे करताना काळाच्या ओघात आपण निसर्गाची हानी करत नाही आहोत ना हे देखील बघायला हवं. ४) पण सध्या कोणाचं लक्ष नाहीये. सगळे व्यस्त आहेत 'लाडकी बहीण', 'लाडक्या भावात'. लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडकी बहीण एकत्र आले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते. मुळात अशा योजना राबवायला राज्यसरकारकडे पैसे आहेत का? सरकारकडे रस्त्यांवरचे खड्डे बुजवायला पैसे नाहीत, योजनांना कुठून पैसे येणार ? ५) माझी महाराष्ट्र सैनिकांना विनंती आहे की, आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती आहे. लोकांना मदतीची गरज आहे. त्यामुळे तुम्ही या लोकांकडे जा, त्यांना मदत करा, त्यांना काय हवं नको ते पहा. ६) महाराष्ट्राचे खरे प्रश्न काय आहेत यांकडे कोणाचं लक्ष नाहीये. या प्रश्नांकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, कारण इतर कोणाला काही पडलेली नाही. हेच तुमचं प्रचाराचं कॅम्पेन पाहिजे. ७) आज कुठला आमदार कुठल्या पक्षाचा, कुठल्या गटाचा आहे हे कळत नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांची स्पर्धा कुठवर जाईल हे सांगता येत नाही. मध्ये मला कोणीतरी सांगितलं की आपल्याकडचे एक, दोन लोकं दुसरीकडे जायला निघालेत. मी म्हणलं जरूर जा, हवं तर जाण्यासाठी मीच रेडकार्पेट घालतो. तिथे जे आहेत त्यांचंच काही खरं नाही, यांचं काय होणार आहे. ८) निवडणुका आल्या की सर्व्हे करणाऱ्या एजन्स्या येतात, ते सर्व्हे करतात, ती किती लोकांना भेटतात देव जाणे. पण आपल्याकडे मी मध्यंतरी पदाधिकाऱ्यांच्या टीम्स जिल्ह्या-जिल्ह्यात पाठवल्या होत्या, ते पदाधिकाऱ्यांना न भेटता, तिथल्या स्थानिकांना, पत्रकारांना भेटून त्यांचा अहवाल घेऊन मला भेटले. आता त्या टीम्स पुन्हा मी तुमच्याकडे पाठवणार आहे, त्या आता तुम्हाला भेटणार आहेत. त्यांना तुमच्या मतदारसंघातील परिस्थिती समजवून सांगा. त्यांना प्रामाणिकपणे वस्तुस्थितीची माहिती द्या, तुम्ही जे सांगाल, जी माहिती द्याल ती मी चेक करणार आहे, त्यामुळे जे खरं आहे तेच सांगा. आणि मी आत्ताच सांगतो लढण्याची,जिंकण्याची तयारी असलेल्यानाच तिकीट मिळेल, तिकीट मिळालं आणि मी आता पैसे काढायला मोकळा असल्याना मी तिकीट देणार नाही.

Raj Thackeray

43,367 görüntüleme • 2 yıl önce

सिंगापूरातील सुजाण नागरिक आणि वाहतूक व्यवस्था. मागच्या काही दिवसांखाली सिंगापूरला गेलेलो, सिंगापूरच्या चांगी एअरपोर्टवर आम्ही उतरलो आणि उतरल्या क्षणीच हे एअरपोर्ट जगातील सर्वोत्कृष्ट का मानले जाते, याचा अनुभव आला. उतरल्यानंतर आम्हाला आमचे सिंगापूरमधील मित्र भेटले. त्यांनी आमच्यासाठी आधीच काही कार्ड्स घेतली होती – बस-रेल्वेचं कार्ड, क्रेडिट कार्ड इत्यादी. तिथे MRT म्हणजेच पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी एकच कार्ड असतं. ते कार्ड टॅप करूनच तुम्हाला मेट्रो किंवा बसमध्ये प्रवेश मिळतो. आम्ही सिंगापूरमध्ये पहिल्यांदाच मेट्रोने प्रवास केला आणि मित्राच्या घरी पोहोचलो. सिंगापूरची वाहतूक व्यवस्था माझ्यासारख्या भारतीयासाठी अचंबित करणारी होती. संपूर्ण देश तुम्ही फक्त बस आणि मेट्रोने फिरू शकता, इतकं सुसज्ज आणि नीटनेटकं वाहतुकीचं जाळं तिथं पसरलेलं आहे. बसमध्ये बसताना तुम्हाला कुठे जायचं आहे ते गुगल मॅपवर टाका, मग मॅपवर तुम्हाला योग्य बस क्रमांक आणि वेळ कळते. बस स्टॉपवर डिजिटल बोर्ड असतात, ज्यावर वेळेप्रमाणे कोणती बस कधी येईल हे दाखवलं जातं आणि ती अगदी वेळेतच येते! उदा. 10:01 ला बस येणार आहे, तर ती 10:01 ला नक्कीच येईल. बसमध्ये चढताना समोरच्या दरवाजाने चढायचं आणि मागच्या दरवाजाने उतरायचं. चढताना कार्ड टॅप करायचं, उतरताना पुन्हा टॅप करायचं. जर तुम्ही टॅप करायचं विसरलात, तर जिथे $1 लागला असता तिथे $4–5 दंड होतो. एकदा चुकून टॅप करायचं विसरलेलं तरी फाईन लागतो. बसमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, जरी बस माणसांनी भरलेली असली तरी कोणी कोणाशी मोठ्याने बोलत नाही. सगळीकडे शांतता असते. आपल्याकडे बसमध्ये किंवा ट्रेनमध्ये लोक मोठ्याने बोलतात, पण इथे अगदी गर्दी असली तरी लोक शांत असतात आणि एकमेकांमध्ये अंतर ठेवतात. मेट्रोमध्येही हेच शिस्तीचं चित्र दिसतं. मेट्रो किंवा बसमध्ये चढताना, रस्ता ओलांडताना लोक रांगेत उभे राहतात. एस्कलेटरवर डाव्या बाजूला लोक उभं राहतात आणि उजवी बाजू घाई असलेल्यांसाठी मोकळी ठेवतात. वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळले जातात, रस्त्यावर सायकल कोणी चालवत असेल तर त्याला प्राधान्य दिले जाते, तुम्हाला रस्ते प्रचंड स्वच्छ दिसतील. इतकं शिस्तबद्ध वागणं पाहून एक भारतीय म्हणून मी थक्क झालो. रस्त्यांवरून बस जाताना कुठेही भाऊ, दादा, साहेबांचे बॅनर, पोस्टर्स दिसले नाहीत. कुठल्याही चौकात “संकल्पना – अमुक तमुक” असं काही नाही. आपल्याकडे एखाद्या चौकात चित्र रंगवलं किंवा फुलपाखरू उभारलं की त्यावर ‘संकल्पना – अमुक तमुक’ लिहिलेलं असतं, जणू काही त्यानेच त्याचा शोध लावला! सिंगापूर हा पूर्णपणे मानवनिर्मित देश आहे, पण तिथं एकाही राजकारणी व्यक्तीचा फोटो दिसला नाही, अगदी पंतप्रधानांचाही नाही ! आपल्याकडे शौचालयालाही ‘अमुक तमुक यांच्या निधीतून’ असं लिहिलेलं असतं. सिंगापूरमध्ये शौचालय व्यवस्था अतिशय दर्जेदार आहे. अगदी शेवटच्या टोकाला गेलात तरी सरकारी टॉयलेट्स पाचतारांकित हॉटेलसारखी स्वच्छ आणि आधुनिक असतात. मागे मी महाराष्ट्रातल्या एका जिल्ह्याच्या ठिकाणी गेलो होतो, तिथं जिल्हा ठिकाणीही शौचालय व्यवस्था धड नव्हती! कोणी म्हणेल सिंगापूर छोटा देश आहे, लोकसंख्या कमी आहे म्हणून त्यांची प्रगती झाली पण मग आपण एवढ्या मोठ्या भारतात एकही सर्वसुविधायुक्त शहर तयार का करू शकलो नाही ? इथली माध्यमं आपल्याला ‘विश्वगुरू’ म्हणतात, पण परदेशात गेल्यावर आपण कुठं आहोत याची खरी जाणीव होते. खरं तर हे लिहायचं नव्हतं, पण तिथं पाहून बोलावंसं वाटलं. अजून खूप काही सिंगापूरमध्ये अनुभवायला मिळालं आहे… हळूहळू सगळं लिहीनच.

Vaibhav Kokat

22,124 görüntüleme • 1 yıl önce