Loading video...

Video Failed to Load

Go Home

सोमवार, ७ जुलै २०२५ | सकाळी १० ते संध्या ६ वा | आझाद मैदान, मुंबई #मराठीकारण

24,862 views • 1 year ago •via X (Twitter)

0 Comments

No comments available

Comments from the original post will appear here

Related Videos

“पहिलीपासून हिंदीसक्ती होऊ देणार नाही, त्याविरोधात येत्या ६ जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्या मोर्चात कोणताही झेंडा नसेल. तो संपूर्ण मोर्चा हा मराठी माणसाचा असेल. मराठी हाच अजेंडा असेल. त्या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करेल.. सरकारला एकदा कळू दे, महाराष्ट्राच्या मनात काय आहेत ते. महाराष्ट्राची संपूर्ण ताकद ६ जुलै रोजी सकाळी १० वाजता गिरगाव चौपाटीवर दिसेल. अशावेळी मला हेही बघायचं आहे, या मोर्चात कोण सामील होतंय आणि कोण येणार नाहीत, हे देखील मला बघायचं आहे.. शिक्षणतज्ज्ञ, भाषातज्ज्ञांशी आम्ही बोलणार आहोत. सर्व विद्यार्थी, पालकांना आम्ही मोर्चाला आमंत्रण देणार आहोत. सरकारला एकदा कळू दे, महाराष्ट्राच्या मनात काय आहेत ते.. हिंदीविरोधी मोर्चात सर्वजण सहभागी होतील. आम्ही महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांशी बोलणार आहोत. कोणताही वाद आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, हे तुम्हाला ६ जुलैला कळेल…” राज ठाकरे ।

Raj Thackeray

108,464 views • 1 year ago

धक्कादायक! मुंबई, नागपूरच्या नामांकित हॉटेल्समध्ये उंदरांचा सुळसुळाट, अन्न व औषध प्रशासनाकडून परवाना रद्द! 🚨 कारवाईचा सविस्तर तपशील: 1️⃣मेसर्स के. रुस्तम अँड कंपनी, चर्चगेट (मुंबई): प्रसिद्ध आईस्क्रीम पार्लरमध्ये जिवंत उंदीर, माश्या, कोल्ड चेनमध्ये बिघाड आणि मुदत संपलेली उत्पादने आढळल्याने परवाना तत्काळ निलंबित. 2️⃣मे. श्री हिरा स्वीट्स, पांचपावली (नागपूर): तपासणीत मेलेला उंदीर आढळला. मृत उंदराच्या बाजूलाच अन्न पदार्थांचे उत्पादन सुरू असल्याने परवाना निलंबित. 3️⃣ हॉटेल पाटीलवाडा (धुळे): विना परवाना बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्यामुळे ७ जुलै रोजी परवाना निलंबित. इतर मोठ्या कारवाया (७ जुलै २०२६): राज्यभरात १६ हॉटेल्स/धाब्यांची तपासणी, १० आस्थापनांना सुधारणा नोटीस. नाशिक आणि नागपूर विभागात प्रत्येकी १ अन्न व्यवसायिकाचा परवाना निलंबित. ६ ठिकाणी धाडी टाकून तब्बल ₹९,६०,४१६ किमतीचा प्रतिबंधित पानमसाला व गुटखा जप्त. गुटखा विक्री व वाहतूक प्रकरणी १ एफआयआर (FIR) दाखल करून एका व्यक्तीला अटक. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा FDA प्रशासनाने दिला आहे. #FDAMaharashtra #FoodSafety #Mumbai #Nagpur #Dhule 📷 📹- अन्न व औषध प्रशासन

नेत्वा धुरी NETWA DHURI

67,392 views • 3 months ago

💐🪷बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे 'मुंबई पुष्पोत्सवाचे' अर्थात 'वार्षिक उद्यानविद्या प्रदर्शनाचे' आयोजन करण्यात आले आहे. मुंबईकरांनी दररोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडा वेळ काढून या रंगीबेरंगी फुलांच्या सुंदर दुनियेचा आनंद घ्यावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी केले आहे. 🌺🌼 🗓️३१ जानेवारी २०२५ ते २ फेब्रुवारी २०२५ दरम्यान होणाऱ्या या पुष्पोत्सवाला नक्की भेट द्या. 🌷🥀 📍वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय, भायखळा (पूर्व) 🕗सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत #MyBMCUpdates CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha @mybmcGardens

माझी Mumbai, आपली BMC

73,239 views • 1 year ago

🔹युद्धजन्य परिस्थितीदरम्यान विविध यंत्रणांची सज्जता, आपत्कालीन स्थितीविषयी जनजागृती या अनुषंगाने भारत सरकारच्या निर्देशानुसार ‘अभ्यास’ या अभिरुप सरावाचे (मॉक ड्रील) काल दिनांक ७ मे २०२५ रोजी आयोजन करण्यात आले. 🔹नागरी संरक्षण संचालनालय (मुंबई) यांच्या विद्यमाने आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने मेट्रो चित्रपटगृह लगत क्रॉस मैदान येथे हा सराव पार पडला. 🔹राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल, मुंबई पोलिस, बृहन्मुंबई महानगरपालिका संचालित मुंबई अग्निशमन दल, राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी यांच्यासह विविध यंत्रणांनी त्यात सक्रिय सहभाग नोंदवला. 🔹हा चित्तवेधक सराव अनुभवण्यासाठी नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अभिरूप सरावाची ही चित्रफीत….📽️ #MyBMCUpdates #MockDrill PMO India CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha रक्षा मंत्री कार्यालय/ RMO India NDRF India I राष्ट्रीय आपदा मोचन बल 🇮🇳 मुंबई पोलीस Mumbai Police

माझी Mumbai, आपली BMC

10,818 views • 1 year ago

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बाई य. ल. नायर धर्मादाय रूग्णालयाच्या माध्यमातून 'विशेष मुलांसाठी प्रारंभिक उपचार आणि पुनर्वसन केंद्र' साकारण्यात आले आहे. मुंबई सेंट्रल येथील नागपाडा परिसरात पाच मजली इमारतीत साकारलेल्या या केंद्राचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे तसेच कुमारी बुशरा रईस शेख यांच्या संयुक्त हस्ते आज झाले. राज्याचे शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री श्री. दीपक केसरकर; कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री श्री. मंगल प्रभात लोढा, आमदार श्रीमती यामिनी यशवंत जाधव, आमदार श्री. रईस शेख, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष श्री. यशवंत जाधव, सहआयुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) श्री. चंद्रशेखर चोरे, उप आयुक्त (परिमंडळ २) श्री. रमाकांत बिरादार, उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) श्री. संजय कुऱ्हाडे, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. (श्रीमती) नीलम अंद्राडे, नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर आदी मान्यवर उपस्थित होते. नागपाडा येथे बेलासिस मार्गावर ओझोन बिझ सेंटर, बी व सी विंग या पाच मजली इमारतीत स्थित हे केंद्र सोमवार ते शुक्रवार सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत तर शनिवार सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत नियमितपणे सुरू राहणार आहे. #BMC #BMCUpdates CMO Maharashtra Devendra Fadnavis Ajit Pawar Deepak Kesarkar Mangal Prabhat Lodha Rais Shaikh Yamini Yashwant Jadhav Yashwant Jadhav - यशवंत जाधव Iqbal Singh Chahal Dr Sudhakar Shinde

माझी Mumbai, आपली BMC

10,568 views • 2 years ago