正在加载视频...

视频加载失败

सरपंच-उपसरपंच, पोलीस पाटील, कोतवाल, अंगणवाडी सेविका व आशासेविका आदी सर्वांचं मानधन दुप्पट केलं... हे सरकार कामाचं आहे.. हे सरकार तुमचं आहे..! #जनसन्मान_यात्रा #JanSanmanYatra

24,281 次观看 • 2 年前 •via X (Twitter)

9 条评论

Dr.Ishwar Mhaslekar 的头像
Dr.Ishwar Mhaslekar2 年前

दादा पात्रता धारक मागील 10 वर्षापासून प्राध्यापक भरतीची वाट बघत आहे....

जीवन 的头像
जीवन2 年前

आम्ही तुम्हाला लाभ आणि बळ देऊ अजित दादा पवार

Karishma 的头像
Karishma2 年前

रोखठोक बोलणारा नेता अजित दादा पवार

samadhan kamble 的头像
samadhan kamble2 年前

गोर गरीबांचे कैवारी अजित दादा पवार

शेतकरी 🙏🚩 的头像
शेतकरी 🙏🚩2 年前

निवडणूक आली ना हे होणारच पण ज्वलंत प्रश्न मराठा आंदोलन आहे पाटलांची तब्बेत खालवली आहे यावर लवकर निर्णय घ्या,,

Anjana Sangar 的头像
Anjana Sangar2 年前

नव्या पिढीसाठी मजबूत पायाभूत सुविधा निर्माण करणारा विकासपुरुष 🔥

🇮🇳एन. जे. गाडेकर🇮🇳 的头像
🇮🇳एन. जे. गाडेकर🇮🇳2 年前

दादाचा वादा ✌️

Karke Govind Pralhad 的头像
Karke Govind Pralhad2 年前

संगणक परिचालकांचा निर्णय घ्या दादा...... #संगणकपरिचालक #ठाणे

prasad 的头像
prasad2 年前

सर कोतवालांना न्याय द्या, गुजरात आणि त्रिपुराप्रमाणे चतुर्थ श्रेणीची मागणी असताना शासनाने फक्त दहा टक्के म्हणजेच पंधराशे रुपये अशी तुटपुंजी मानधन वाढ केलेली आहे..

相关视频

सध्या देशात देशभक्त व देशद्रोही,हिंदू-मुसलमान यावर सरसकट व्यक्त होणे व त्यावर आपली राजकीय पोळी भाजण्याचे प्रकार सुरू आहेत , परिणामी आपला देश सामाजिक दृष्ट्या पोकळ होत चालला आहे याची पुर्णतः जाणीव या अतिरेक्यांना झालेली आहे. हिंदू राष्ट्र निर्माण करण्याच्या नादात आपल्याच देशातला सामाजिक सौहार्द संपवून अजून एक पाकिस्तानी विचार या देशात आपण निर्माण करत आहोत का ? यावरही आपण विचार करणे आवश्यक आहे.ज्याअर्थी ते नराधम निष्पाप जीवांचे बळी घेताना धार्मिक शेरेबाजी करत आहेत व आपल्या भावना भडकविण्याचे काम करत आहेत त्याअर्थी त्यांना हे पक्के माहित आहे की जे काम हजारो गोळ्या करू शकत नाहीत तेच काम तुमच्या आमच्या भावना भडकावून व धर्माचे विष कालवून ते सहज करू शकतात, कारण सध्याच्या राजकारणाने धर्माच्या नावाची अफूची गोळी ‘सर्वांनाच’ दिली आहे. व यामुळेच जातीय दंगे भडकतील व हजारो निष्पाप जीव जातील अशी परिस्थिती सध्या आपल्या देशात आहे हे शत्रू जाणून आहे, आणि म्हणूनच ते हरामखोर हे सर्व करत आहेत. आता आपण विचार करायचे आहे की ही परिस्थिती का आली ? आता आपण ठरवायचे आहे की जे त्या नराधमांना पाहिजे ते करायचे की आपापल्या सद्सदविवेक बुद्धीचा वापर करून या फुटीरतावाद्यांचे मनसुबे मोडून काढायचे ? येणारा काळ कठीण असेल व अशावेळी देशात सर्व समाजात देशभक्तीची भावना व सलोखा कसा राहील हे पाहणे सरकारचे व सर्वच राजकीय पक्षांचे काम आहे. जे घडले त्याबद्दल अनेकांचे अनेक प्रश्न आहेत. लोकांनी हिंदू म्हणूनच हे सरकार निवडून दिले आहे ना ? मग देशातला हिंदू हा केवळ हिंदू आहे म्हणून मारला जातोय याची जबाबदारी कोण घेणार ? सुरक्षा यंत्रणांकडून खूप गंभीर चूक झाली आहे असं का बरं वाटत नाही आपल्याला ? जेव्हा हे घडल तेव्हा सुरक्षा यंत्रणा कुठे होत्या ? सर्जिकल स्ट्राईक मोदी नी केली म्हणून सर्वांना सांगितला मग हा हल्ला कोणाच्या चुकीमुळे झाला ? ह्याचं उत्तर कोण देणार ? सरकार व सत्ताधारी पक्ष धर्मद्वेश पसरवून आपली जबाबदारी झटकू शकत नाही, लोकांच्या प्रश्नांची उत्तरं सरकारला कधीतरी द्यावीच लागतील.

Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )

13,155 次观看 • 1 年前

महाराष्ट्राच्या सणाचे वाटोळं केलं जातंय, राजकारण्यांनी आणि काही परप्रांतीयांनी मराठी सणात असा थिल्लरपणा वाढवून अश्लीलपणा वाढवून सणांना गालबोट लावले जातेय. हे वेळीच थांबवा शासनाने आणि पोलिसांनी याकडे गांभीर्यानी पाहावे आणि धार्मिक व सांस्कृतिक भावना दुखावल्याबद्दल अशा सर्व आयोजकांवर गुन्हे नोंदवावे. व्हिडीओ पुरावे ग्राह्य धरले जावेत. राजकारण्यांनो हा संतांचा, थोर महापुरुषांचा महाराष्ट्र आहे तुमच्या राजकीय पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्राचे वाटोळं करायला घेतलं आहे . महाराष्ट्राला युपी बिहार करणे सुरू आहे, आवरा यांना. पोलीसांना व सांस्कृतिक विभागाला, प्रशासनाला हे दिसत नसेल का? पुढच्या वर्षी परवानग्या नाकारल्या जाव्यात Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police #सांस्कृतिकअतिक्रमण #marathi #maharashtra #महाराष्ट्र #मराठीएकीकरणसमिती

मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti

14,567 次观看 • 27 天前

अवघ्या सहा महिन्यांपूर्वी जेव्हा हरियाणाच्या नूंह जिल्ह्याच्या मेवातमध्ये जातीय हिंसाचार उसळला होता तेव्हा तिथल्या पोलीस यंत्रणेने बघ्याची भूमिका घेत मेवातमध्ये हिंसेचं लोण पसरू दिलं. कारण भाजपला त्याचा राजकीय फायदा होणार होता. आजमितीला शेतकरी जेव्हा आपल्या हक्कांसाठी लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा प्रयत्न करत आहेत, तेव्हा तिथलं सरकार जनरल डायरप्रमाणे दमनशाही करतंय. आपल्याच अन्नदात्यावर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या जातायत, त्यांच्या वाटेवर खिळे पेरले आहेत, अडवण्यासाठी भिंती उभारल्यात... हे सर्व देशाचं 'पोलिस स्टेट' मध्ये रूपांतर झाल्याची पोचपावती आहे. देशात अघोषित आणीबाणी लागू झाल्याचं हे चित्र आहे. या दोन्ही घटनांवरून हे स्पष्टपणे दिसून येतं की भाजपचं राजकारण आणि धोरणं हे शेतकरी, कामगार आणि आणि गरीबांच्या विरोधातील आहे. लवकरच देशात हुकूमशाही लागू होणार... ही 'मोदी सरकाची गॅरन्टी' आहे. #farmerprotests2024 #Istandwithfarmers

Dr.Jitendra Awhad

41,185 次观看 • 2 年前

पुणे शहर आणि जिल्ह्यात गुन्हेगारांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. शहरातील आंबेगाव पठार भागात कोयता गॅंगने धिंगाणा घालत दहशत माजविली. या टोळक्याने गाड्यांच्या काचा फोडून लोकांचे नुकसान केले. तर राजगड तालुक्यातील कोदवडी फाट्यावर टोळक्याने गोळीबार करुन एका हॉटेलची तोडफोड केले. याप्रसंगी एक कामगार गंभीर जखमी झाला आहे. या घटना गृहखात्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. गृहखात्याची निष्क्रियता जनतेच्या जीवावर उठत असून जनता भीतीच्या छायेखाली जगत आहे. हे सरकार जनतेला सुरक्षित वातावरण देऊ शकत नाही, यावर दिवसेंदिवस शिक्कामोर्तब होत आहे. CMO Maharashtra Devendra Fadnavis पुणे शहर पोलीस पुणे ग्रामीण पोलीस - Pune Rural Police

Supriya Sule

16,709 次观看 • 4 个月前

पवार साहेब म्हणाले हे खरे आहे. 1977 मध्ये मी प्राथमिक शाळेतच होतो. परंतु मी काल जे बोललो ते एकतर पवार साहेबांनी ऐकले नाही किंवा ऐकले असेल तर ते त्यांना अस्वस्थ करणारे होते. म्हणून त्यांनी त्याला बगल देण्याचा प्रयत्न केला. मी असे सांगितले की : 1978 साली पवार साहेब वसंतदादा पाटील यांच्यासोबत मंत्री होते. त्यांनी काँग्रेस पक्ष फोडला. त्यातले 40 लोक बाहेर काढले आणि जनसंघासोबत सरकार तयार केले. आता एकनाथराव शिंदे हे तर आमच्याच सोबत निवडून आले होते. ते 50 लोकं घेऊन बाहेर पडले आणि आमच्या सोबत सरकार तयार केले. मग पवार साहेबांनी तयार केलेले सरकार ही मुत्सद्देगिरी आणि शिंदे यांनी तयार केलेले सरकार ही बेईमानी कसे होऊ शकते?मी प्राथमिक शाळेत होतो की जन्माला यायचो होतो; इतिहास बदलत नाही. कोण जन्माला आले, कधी आले याच्यावर इतिहास बदलत नसतो. इतिहासात लिहून ठेवले आहे की पवार साहेबांच्या नेतृत्वात 40 लोकांनी वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडले. ते बाहेर पडले. आणि भाजपसोबत म्हणजे तेव्हाच्या जनसंघासोबत सरकार तयार केले. तेच मी सांगितले.

Devendra Fadnavis

269,975 次观看 • 3 年前

लोकशाहीच्या मंदिराला करतो नमन,जनतेसाठी लढत राहीन हे देतो वचन. आज लोकसभेच्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस. मायबाप जनतेच्या प्रेमाने खासदार म्हणून जेव्हा सदनात पहिल्यांदा प्रवेश केला तेव्हाच मनाशी गाठ बांधली होती की ही खासदारकी धाराशिव मतदार संघाच्या मतदारांनी दिली तिच्यावर पूर्ण हक्क त्यांचाच आहे. या पवित्र सदनात जेव्हा जेव्हा बोलायची संधी मिळाली तेव्हा तेव्हा जनतेशी, शेतकरी बांधवांशी सर्व समाज घटकांशी सबंधित प्रश्न मांडत राहिलो व सरकार बरोबर यथाशक्ती लढा देत राहिलो. आज या लोकशाही च्या मंदिराच्या पायऱ्यांवर नतमस्तक झालो. या पवित्र सदनात प्रामाणिकपणे पोट तिडकीने जनतेचा आवाज हा सरकार पर्यंत पोहचवित राहिलो. हे सदन म्हणजे जनतेच्या प्रश्नांचे निराकरण करण्याचे साधन आहे हे मी जाणून आहे. पैश्याच्या नव्हे तर मायबाप जनतेच्या आशीर्वादाच्या जोरावर पुन्हा लढू, पुन्हा जिंकू आणि पुन्हा या सदनात लोकांच्या भावना ,प्रश्न मांडुन न्याय मिळवु असा निर्धार यावेळी केला…! #parlimentofindia #लोकसभा #अधिवेशन

Omprakash Rajenimbalkar

36,915 次观看 • 2 年前

कुरकर्मा सरकारच्या आदेशाने माझ्या भीमसैनिकांना बेदम मारहाण परभणीत संविधान अवमानना प्रकरणाच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या परभणी बंदमध्ये माझ्या भीम सैनिकांना पोलिसांकडून बेदम मारहाण करण्यात येत आहे. आणि हे सर्व महाराष्ट्रातील कुरकर्मा सरकारच्या आदेशाने करण्यात येत आहे. यावरून सरकारची नीच मानसिकता दिसून आली आहे. पोलिसांकडून जे कोंबिंग ऑपरेशन सुरू आहे, ते त्यांनी तात्काळ थांबवावे, दडपशाही करून निष्पाप लोकांना विनाकारण पकडण्यात येऊ नये, अन्यथा सरकार ला याची किंमत मोजावी लागणार. परभणीतील घडलेल्या घटनेच्या गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हावी हिच आंदोलनकर्त्यांची मागणी आहे व भविष्यात राज्यात अशा घटना घडू नयेत याची काळजी शासनाने घेवून न्याय व सुरक्षा द्यावी अशी मागणी मी करतो. #परभणी #Parbhani #जाहीर_निषेध #MaharashtraGov #Maharashtra #जयभीम_जयसंविधान

Dr. Nitin Raut 🇮🇳

77,531 次观看 • 1 年前

भाजपने सर्वांनाच गंडवले आहे! महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला ‘कुणबी’ संबोधण्याचा जीआर काढून मोठा गाजावाजा केला. भाजपने असा आव आणला की, न सुटणारा प्रश्न त्यांनी सोडवला. मात्र हा निर्णय गंडवणारा व फसवणारा आहे. “भाजपने मराठा आरक्षणासाठीची नेमलेली शासकीय उपसमिती, न्या. शिंदे समिती, मराठा समाज, मनोज जरांगे पाटील आणि कुणबी या सर्वांना फसवले आहे.” जगन्नाथ डी. होल विरुद्ध महाराष्ट्र राज्य सरकार या प्रकरणातील मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालात, न्यायालयाने पॅराग्राफ 13 मध्ये म्हटले आहे की, सर्व मराठा समाजाला कुणबी संबोधता येणार नाही. त्याआधीच्या पॅराग्राफमध्ये “कुणबी ही जात नसून व्यवसाय आहे” असे न्यायालयाने स्पष्ट नमूद केले आहे. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयातही टिकला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केलय की, सर्व मराठा हे कुणबी आहेत, असं सरसकट धरता येत नाही. त्यामुळे भाजपने जीआर मार्गे काढलेला निर्णय चुकीचा व दिशाभूल करणारा आहे. “ओबीसींना स्वतःच्या हक्कासाठी आता लढा द्यावा लागेल. आंदोलन, मोर्चे, बैठका घ्याव्या लागतील आणि ओबीसी मंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये दबाव आणणे गरजेचे आहे.” वंचित बहुजन आघाडीची ठाम भूमिका आहे की, मराठा आरक्षणाचे ताट वेगळे आणि ओबीसी आरक्षणाचे ताट वेगळे असले पाहिजे. मराठा समाजाचे ताट वेगळे असले तरच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते. मात्र, शासनाने सर्व मराठे कुणबी समजावेत, असा जीआर काढून भाजपने अजित पवार, एकनाथ शिंदे व उबाठा, मराठा समाज यांनाही गंडवले आहे. #MarathaReservation #Maharashtra

Prakash Ambedkar

11,781 次观看 • 1 年前

संतोष देशमुख हत्याप्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिकी कराड याने १४० शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे. या व्यक्तीचे रोज नवे कारनामे पुढे येत आहेत.खंडणी, अवैध संपत्ती, कलम ३०७ अंतर्गत गुन्हे आणि इतर अनेक अवैध धंदे यामध्ये वाल्मीक कराड या व्यक्तीचा संबंध आहे. ईडीनेही या व्यक्तीला नोटीस पाठविली परंतु तरीही कोणतीच ठोस कारवाई करण्यात आली नाही. देशमुख कुटुंबीय आणि जनतेच्या संयमाची हे सरकार परीक्षा का घेत आहे. यामुळे जनतेमध्ये असंतोष वाढला आहे. या सर्व बाबी अतिशय गंभीर आहेत. शासन आणि तपाससंस्थांनी याबाबत सखोल व सविस्तर चौकशी करुन पिडीतांना न्याय देण्याची गरज आहे. CMO Maharashtra Devendra Fadnavis

Supriya Sule

34,351 次观看 • 1 年前

एकेकाळी कायदा व सुव्यवस्थेसाठी पहिल्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र आता भ्रष्टाचारात आणि बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेत पहिल्या क्रमांकावर गेल्याचं राज्यात वाढणाऱ्या गुन्हेगारी घटनांवरून सिद्ध होतं. जालन्यामध्ये प्रसिद्ध उद्योगपती नरेंद्र मित्तल यांच्या पुतण्यावर ऐन दिवाळीत कसा जीवघेणा हल्ला करण्यात आला याचं हे फुटेज बघा... या गाडीतील महिला जिवाच्या आकांताने ओरडत असताना गुंड मात्र जीवघेणा हल्ला करत होते आणि याला पूर्णतः हे अकार्यक्षम सरकार आणि गृहमंत्रालय जबाबदार आहे. राज्यातील जनतेने आणखी किती दिवस जीव मुठीत धरून जगायचं? Devendra Fadnavis #MaharashtraPolice #LawAndOrder

Rohit Pawar

44,771 次观看 • 11 个月前