Loading video...

Video Failed to Load

Go Home

हे ऐकून पण तुम्ही महाराष्ट्र द्रोही पक्षाला मतं देत असाल तर तुमच्या पेक्षा हा गुजराती माणूस खरा महाराष्ट्र प्रेमी .......

21,522 views • 2 years ago •via X (Twitter)

8 Comments

अमरदास भल्ला's profile picture
अमरदास भल्ला2 years ago

Kaka rocks

🇮🇳Believer in good,exposer of false🇮🇳BJPfamily's profile picture
🇮🇳Believer in good,exposer of false🇮🇳BJPfamily2 years ago

कॉंग्रेस के झुटे मक्कार दोगले लोग देश बरबाद किया कर रहे है और करते रहेंगे

भारत (Parody Account)'s profile picture
भारत (Parody Account)2 years ago

दक्षिण राज्यांत असं काही झालं असतं तर?

Rajendra's profile picture
Rajendra2 years ago

मराठी माणूस कधी जागा होईल, हे शिवरायच सांगु शकतील.

Vinayak Mumbai's profile picture
Vinayak Mumbai2 years ago

@RajThackeray बिनशर्त गुलामी साजरी करतायत

उपहासात्मक व्यंग ( अश्लीलता आणि शिवीगाळ विरहित)'s profile picture
उपहासात्मक व्यंग ( अश्लीलता आणि शिवीगाळ विरहित)2 years ago

हे महाराष्ट्र द्रोही काय आहे?

Mitesh Deshmukh's profile picture
Mitesh Deshmukh2 years ago

🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

Hashtag India's profile picture
Hashtag India2 years ago

सुरतवाला गुजराती नाहीये. अनेक पिढ्यांनी, जन्माने सुद्धा पुणेकर आहेत. पुण्याचे महापौर सुद्धा होते ते.

Related Videos

“... मुलांवर हिंदी भाषा लादण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, जो हाणून पाडला पाहिजे. यांत एकतर मुलांचं नुकसान आहेच पण मराठी भाषेचं नुकसान आहे. सरकार काय वरून जे सांगतील त्याच्या मागे घरंगळत जायला तयार आहे, पण तुम्ही बळी पडू नका. तशी गरजच नाही. आणि तुम्हाला सरकारकडून जबरदस्ती झाली तर आम्ही आहोत. मुळात त्यांना उत्तम सुशिक्षित नागरिक होऊन देशाचं तसंच महाराष्ट्राचं नाव मोठं करण्यासाठी राज्य भाषा आणि एक जागतिक भाषा शिकली म्हणजे झालं , अजून भाषांची आत्ता खरतर काय गरज ? पण हे चाललेलं राजकारण आपण समजून घेतले पाहिजे ! उत्तरेतल्या लोकांना सुसंकृत महाराष्ट्र काबीज करायचा आहे आणि त्यासाठीचा सोपा मार्ग म्हणजे थेट किंवा आडवळणाने त्यांची भाषा माथी मारायची. त्या राजकारणाला तुम्ही बळी पडू नका. उद्या ती मुले मोठी झाल्यावर त्यांच्या गरजेनुसार त्यांना हवी ती भाषा ते शिकू शकतात पण आत्ता पासूनच हे ओझे त्यांच्यावर कशाला ? तुम्ही ठाम राहिलात आणि सरकारचे मनसुबे उधळून लावलेत तर आम्ही तुमच्या पाठीशी पहाडासारखे उभे राहू. पण तुम्ही स्वेच्छेने सरकारच्या छुप्या हेतूंना मदत करून, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर भाषेचं ओझं लादणार असाल आणि अशी भाषा लादणार असाल, जी शिकली काय नाही शिकली काय, फरक पडत नाही, तर मात्र माझे महाराष्ट्र सैनिक तुमच्याकडे (चर्चेला ) येतील.... राज ठाकरे ।

MNS Adhikrut - मनसे अधिकृत

16,482 views • 1 year ago

प्रार्थनेसाठी भोंगे वापरणे म्हणजे धार्मिकता नव्हे असा स्वच्छ निकाल माननीय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे . याबद्दल माननीय उच्च न्यायालयाचे मनापासून अभिनंदन. मशिदींवरचे कर्णकर्कश्श भोंगे आणि त्यामुळे सर्वसामान्यांना होणारा त्रास याबद्दल राजसाहेब गेली अनेक वर्ष बोलत आहेत. इतकंच काय पण या विरोधात २०२२ साली पक्षातर्फे एक मोठं राज्यव्यापी आंदोलन देखील उभारलं गेलं. पण यात तत्कालीन हिंदुविरोधी महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र सैनिकांनाच अटक केली, त्यांच्यावर केसेस टाकल्या. पण आज आता न्यायालयाने देखील एक प्रकारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या म्हणण्याला दुजोरा दिला आहे. राजसाहेब नेहमी म्हणतात तुमचा धर्म तुमच्या घरात ठेवा, कोणालाच आक्षेप नसेल पण तुम्ही तो रस्त्यावर आणून लोकांना त्रास देणार असाल तर मात्र हे आम्ही खपवून घेणार नाही. आता राज्यसरकारने न्यायालयाच्या आदेशाचं पालन करून या भोंग्यावर कारवाई करावीच. #MNSAdhikrut #भोंगे #loudspeakers #HighCourt

MNS Adhikrut - मनसे अधिकृत

11,463 views • 1 year ago

काल लोकसभेत बिहारमधील लोकजनशक्ती पक्षाच्या एका खासदाराने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर कारवाई करावी अशी मागणी केली. ही मागणी का केली? तर महाराष्ट्रात मराठीचा सन्मान राखला पाहिजे, ती व्यवहारात वापरलीच पाहिजे असं आग्रही आवाहन केल्यानंतर, मूठभर उत्तर भारतीयांनी आम्ही मराठी बोलणार नाही असा आवाज दिला. आता असा आगाऊ आवाज दिला तर त्यांच्या कानाखाली आवाज काढायचा नाही ? आणि इतर पक्षांचं माहित नाही पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्कीच आवाज काढेल. आणि हा काही स्वतःच्या फायद्यासाठी महाराष्ट्र सैनिक संघर्ष करत नाहीयेत तर हा संघर्ष मराठी भाषेसाठी, मराठी माणसासाठी करतोय. मग संसदेत एका उत्तर भारतीय खासदाराने अजब मागणी केल्यावर महाराष्ट्रातील खासदार गप्प का बसले ? संघर्ष जर तुमच्या भाषेसाठी सुरु आहे, तुमच्या भाषेचा अवमान केला जातोय याची मराठी म्हणून खंत का नाही वाटत ? #मराठी #MNSAdhikrut

MNS Adhikrut - मनसे अधिकृत

20,369 views • 1 year ago

मराठी भाषेसाठी महाराष्ट्रातल्या मीरा-भाईंदरमध्ये मोर्चा काढला म्हणून मला पोलिसांनी गृहखात्याच्या दबावात अटक केली, इतकंच नाही जवळपास दीड हजार महाराष्ट्र सैनिकांना देखील अटक झाली. इतकं सगळं होऊन देखील मोर्चा झालाच. कारण हा मोर्चा मराठी माणसांनी हातात घेतला. त्यामुळे स्थानिक आमदार जो मराठी द्वेष्टा आहे त्याला चांगलाच धडा शिकवला गेला. पोलीस मराठी द्वेष्टया अमराठी व्यापाऱ्यांना मोर्च्याला परवानगी देतात पण मराठी माणसाला देत नाहीत याला काय अर्थ आहे ? त्यांचा जर १० माणसांचा मोर्चा निघाला तर मराठी माणसांचा १०० माणसांचा मोर्चा निघेल हे लक्षात घ्या. पोलिसांनी महाराष्ट्र सैनिकांना अटक करताना कोणतेही संकेत पाळले नाहीत. महिला महाराष्ट्र सैनिकांना शब्दशः रिक्षात कोंबून नेलं गेलं. कुठे गेला आता महिलांचा सन्मान? लाडकी बहीण म्हणवता आणि बहिणींना असं वागवता ? राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री काहीही सांगू देत, पण मोर्चा होऊ देऊ नका असा पोलिसांवर दबाव होता आणि हा दबाव होता हे मला अधिकाऱ्यांनीच सांगितलं. मीरा-भाईंदरमधल्या मराठी द्वेष्टया आमदाराने आणि एकूणच मराठी द्वेष्ट्या सरकारने लक्षात ठेवावं की आता मराठीच आंदोलन हे मराठी माणसांनी हातात घेतलं आहे आणि हे आंदोलन चिरडायचा प्रयत्न कराल तर राज्यभर मराठी माणूस पेटून उठेल... पक्षाचे नेते श्री. अविनाश जाधव यांची जवळपास ११ तासांनी सुटका केल्यानंतर माध्यमांशी त्यांनी साधलेल्या संवादाचा सारांश... #मराठी #मीरा_भाईंदर #MNSAdhikrut

MNS Adhikrut - मनसे अधिकृत

15,313 views • 1 year ago