
Dr.Jitendra Awhad
@Awhadspeaks • 848,543 subscribers
Born Rebel
Shorts
Videos

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा.! अविनाश जाधव आयोजित मनसे दहीहंडी उत्सव, ठाणे येथे उपस्थित राहून गोविंदांचा उत्साह वाढवला. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा हा उत्साहपूर्ण सोहळा अनुभवताना जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. avinash jadhav mns #दहीहंडीउत्सव
Dr.Jitendra Awhad218,256 Aufrufe • vor 21 Tagen

मी आणि मनोज प्रधानांनी ९३-९४ साली दहीहंडीचा उत्सव सुरू केला, तेव्हा हा उत्सव एक दिवस एवढा मोठा आणि भव्य सांस्कृतिक सोहळा बनेल, याची कल्पनाही नव्हती. वर्षानुवर्षे सवंगडी जोडत गेले… गोविंदा पथकं जोडत गेली… आणि दहीहंडी केवळ उत्सव न राहता, हजारो माणसांना एका भावनेने जोडणारा सोहळा बनत गेला. हा प्रवास २०१५ पर्यंत सुरू राहिला. या संपूर्ण प्रवासातील माझ्या मनाजवळचा एक अविस्मरणीय क्षण म्हणजे — ‘जय जय महाराष्ट्र माझा!’ २००५ साली पहिल्यांदा दहीहंडीच्या व्यासपीठावर हे गीत सादर केलं. सगळ्या सवंगड्यांना आणि गोविंदा पथकांना सोबत घेत, हजारो आवाज एकत्र आले आणि महाराष्ट्रगीताचा जयघोष झाला. तो सोशल मीडिया आणि रिल्सपूर्वीचा काळ होता. त्यामुळे तो क्षण फार दूरवर पोहोचला नाही. पण त्या दिवशी मनात निर्माण झालेला महाराष्ट्राभिमान आजही तितकाच जिवंत आहे. आज सोशल मीडियामुळे दहीहंडीतील असे क्षण लाखो लोकांपर्यंत पोहोचत आहेत. अनेकांना हे कदाचित नवीन वाटत असेल; पण माझ्यासाठी हा क्षण केवळ आजचा नाही. ही माझ्या आयुष्याची आठवण आहे. ही माझ्या दहीहंडीच्या प्रवासाची आठवण आहे. आणि ही महाराष्ट्राविषयीच्या अभिमानाची अविभाज्य भावना आहे. दहीहंडी म्हणजे केवळ हंडी फोडणं नाही. एक पडला, तर दुसऱ्याने त्याला सावरायचं… एकाची ताकद कमी पडली, तर दुसऱ्याने खांदा द्यायचा… आणि एकमेकांवर विश्वास ठेवून आकाशाला गवसणी घालायची… हीच मराठी मातीची शिकवण. हीच दहीहंडीची खरी ताकद. जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा! कारण हे केवळ एक गीत नाही… हा प्रत्येक मराठी मनाच्या अभिमानाचा आवाज आहे! 🚩 जय महाराष्ट्र! 🚩
Dr.Jitendra Awhad59,467 Aufrufe • vor 20 Tagen

काल मध्यरात्री मुंब्र्याहून भिवंडीला जाणाऱ्या भिवंडीतील एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणपती ट्रॉलीचा टायर पंक्चर झाल्यामुळे कलंडला. तो पडण्याच्या अवस्थेत आला असतानाच तेथील तरुणांनी त्या गणपतीची मूर्ती धरून ठेवली. क्रेन बोलावून गणपतीची मूर्ती सरळ केली अन् पुन्हा दुसऱ्या ट्रॉलीवर चढवली. हे सगळं करायला चार ते पाच तास लागले. त्यानंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते आपली मूर्ती घेऊन भिवंडीला रवाना झाले. हीच भारताची... हीच महाराष्ट्राची ओळख आहे. इथे जाती-धर्म कधीही आड येत नाही. आड येतात ते फक्त द्वेष पसरवणारे राजकारणी ! त्यांना हा धडा आहे की, मुंब्रा हा नेहमी सामाजिक एकतेसाठीच ओळखला जातो आणि यापुढेही ओळखला जाईल. मी ज्या तरूणांनी हा गणपती परत आपल्या जागी प्रतिष्ठापना करण्यासाठी जाणार होता, त्या जागी सुखरूप पोहोचवला, त्याबद्दल त्यांचे आभार !!
Dr.Jitendra Awhad81,005 Aufrufe • vor 28 Tagen

विद्याधर बापट यांच्या डीजे विरोधातील तर्कशुद्ध आणि वास्तविक मांडणीला आपल्या छटाकभर मेंदूने खोडून काढता येत नसल्याने भ्रमित झालेल्या काही तरुणांनी मारहाण केल्याची बातमी समोर येत आहे.खरतर या सरकारच्या काळात अश्या बातम्या अगदी सर्रास झाल्या आहेत. धर्माची ढाल बनवून लढणाऱ्या या सरकारला बाप्पा सुबुद्धी देवो हीच प्रार्थना.
Dr.Jitendra Awhad32,465 Aufrufe • vor 24 Tagen

आमचा SIR प्रक्रियेला विरोध का आहे,यासाठी हा व्हिडीओ बघाच.हे आमच्या ठाण्याचे नामांकित माळी डॉक्टर आहेत.1982 पासून ते मतदान करत आले आहेत.आता त्यांचं नाव SIR प्रक्रियेत मतदान यादीतून वगळण्यात आले आहे. एखाद्या नामांकीत डॉक्टरांची ही परिस्थिती असेल तर सामान्य नागरिकांची व्यथा काय सांगावी..!
Dr.Jitendra Awhad75,841 Aufrufe • vor 2 Monaten

आंबेडकर AMBEDKAR आंबेडकर AMBEDKAR आंबेडकर AMBEDKAR आंबेडकर AMBEDKAR आंबेडकर #AMBEDKAR
Dr.Jitendra Awhad452,185 Aufrufe • vor 1 Jahr

This generation is just amazing telling … hold constitution in hand … kudos #sarthak #salam
Dr.Jitendra Awhad53,886 Aufrufe • vor 1 Monat

In #Manipur women broke the #EVM after they saw that after pressing any button they could see only lotus being printed A call for immediate intervention of #SupremeCourt Y does not it happen that #BJP workers get angry seeing some other party symbol being printed Election Commission of India
Dr.Jitendra Awhad568,627 Aufrufe • vor 2 Jahren

मुंब्रावालो के साथ..ईद-ए-मिलाद-उन-नबी के इस मुबारक मौके पर..! #eidemiladunnabi
Dr.Jitendra Awhad30,259 Aufrufe • vor 1 Monat

हे खारघर सेक्टर 19 येथील व्हिडिओ आहेत. येथे भाजपच्या एका पदाधिकाऱ्याकडे चक्क SIR चे फॉर्म सापडले आहेत.खरतर या फॉर्मची कस्टडी केवळ BLO / संबंधित सरकारी अधिकाऱ्याकडेच असणे आवश्यक असताना भाजपच्या एका पदाधिकाऱ्याकडे हे फॉर्म येतातच कसे? कुठल्या तोंडाने Election Commission of India महाराष्ट्रात राबवल्या जाणाऱ्या SIR प्रक्रियेला पारदर्शक आणि निष्पक्ष म्हणणार आहे..? यावर ChiefElectoralOffice काय कारवाई करणार..? करणार आहे की नाही..?
Dr.Jitendra Awhad28,765 Aufrufe • vor 1 Monat
1:23
Sensitive content
This media may contain sensitive content.
6:14
Sensitive content
This media may contain sensitive content.

153 Dahisar Assembly MNS candidate Rajesh Yerunkar is saying that MNS got only 2 votes in the part where I am the is not possible that even my mother, wife, daughter did not vote for me. EVM battery was 99% full. Form no. 17C and EVM serial number do not match. This is murder of democracy
Dr.Jitendra Awhad217,210 Aufrufe • vor 1 Jahr

एल्विश यादव सारख्या कृप्रसिद्ध युट्युबर आणि सो कॉल्ड सोशल मीडिया इन्फ्ल्यून्सर ला या राज्याचे मुख्यमंत्री आपल्या शासकीय निवासस्थानी,गणेश आरतीसाठी बोलवत असतील,तर तो या पुरोगामी महाराष्ट्राचा अपमान आहे. महिलांच्या बाबतीत अतिशय खालच्या स्तरावर जाऊन या माणसाने अनेक स्टेटमेंट दिले आहेत.याच्या मते,स्त्रियांना मेंदू कमी असतो,बाई ही फक्त चूल आणि मुलं सांभाळण्यासाठीच असते.तिने तेवढंच करावं. हा प्रकार म्हणजे सरळ सरळ फुले दाम्पत्य,शाहू महाराज,आंबेडकर साहेब यांच्यासारख्या महान विभूतींनी स्त्रियांच्या उद्धराच जे कार्य केलं आहे त्याचा अपमान आहे.पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणारी ही घटना आहे.
Dr.Jitendra Awhad318,423 Aufrufe • vor 3 Jahren

हे भ्याड सरकार आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलनास बसलेल्या सोनम वांगचुक यांना केंद्र सरकारने दिल्ली पोलिसांच्या मदतीने हटवले.यासोबतच आंदोलनकर्त्यांवर देखील पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला केला. गेल्या 20 दिवसापासून सोनम हे आंदोलनाला बसले होते.पण या गेंड्याच्या कातडीच्या सरकारने त्यांच्याशी साधी चर्चा करण्याचा देखील शिष्टाचार दाखवला नाही. हा सत्तेचा माज आहे,जो कायम चालणार नाही हे इथल्या उन्मत्त सत्ताधाऱ्यांनी लक्षात घ्यावे..!
Dr.Jitendra Awhad31,088 Aufrufe • vor 2 Monaten

हा देश गांधींचाच आहे ,हे ठळकपणे सांगणारी या देशाची तरुणाई!!
Dr.Jitendra Awhad29,665 Aufrufe • vor 2 Monaten

ठाण्यातील मुंब्रा परिसरातील खाडी किनाऱ्यावर एका व्यावसायिकाकडून पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असा प्रकार सुरू असल्याचे समोर आले. अनधिकृतपणे तेथील मौल्यवान कांदळवन नष्ट करून संबंधित जागेवर भरणी करण्यात येत होती आणि त्या जागेवर बेकायदेशीररित्या मालकी हक्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जात होता. कांदळवन हे किनारपट्टीच्या संरक्षणासाठी तसेच पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याने या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली. या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस नताशा आव्हाड आणि नगरसेविका मनीषा भगत यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेले सर्व बेकायदेशीर प्रकार त्वरित थांबवण्याची सक्त ताकीद संबंधितांना दिली. तसेच पर्यावरणाची हानी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी,अशी आग्रही आणि स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. यावेळी मुंब्रा परिसरातील स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिसरातील नैसर्गिक संपत्ती आणि जनतेच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.
Dr.Jitendra Awhad57,796 Aufrufe • vor 5 Monaten

हा व्हिडिओ पाहिला आणि तळपायाची आग मस्तकात गेलीय... कोणताही माणूस असू द्या क्षणात विचार करेल अरे सुरू काय आहे महाराष्ट्रात..... आवरा ह्यांना .....एखाद दिवशी यंत्रणेलाच आव्हान देतील हे ... सावध व्हा आणि कारवाई करा चांगले पी.पी द्या कोर्टात उगाच नावाला कारवाई करू नका लातूर पोलीस-Latur police
Dr.Jitendra Awhad168,857 Aufrufe • vor 1 Jahr

मा महाराष्ट्र राज्याचे ना मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब ह्यांच्यावर आक्षेपार्य पोस्ट करणारा काँग्रेस ठाणे प्रवक्ता गिरीश कोळी ह्याला शिवसेना कोपरी उपविभाग प्रमुख बंटी बाडकर व त्यांचे सहकारी शिवसैनिक ह्यांनी चोप दिला तसेच ती आक्षेपार्य पोस्ट डिलीट करण्यात आली व माफी मागितली…. हे इतर कुठल्या पक्षाच्या नेत्या साठी कार्यकर्त्यांनी केले तर ते गुंड .. मग पोलिस छळणार .. स्वता मुख्यमंत्री त्यात हस्तक्षेप करणार … जेल मध्ये सडवणार हे सगळे मी गेले तीन वर्ष अनुभवतो आहे .. आणि मागचे ३५ दिवस तर सगळ्या मर्यादा पार ..
Dr.Jitendra Awhad282,633 Aufrufe • vor 3 Jahren