Jayant Patil- जयंत पाटील's banner
Jayant Patil- जयंत पाटील's profile picture

Jayant Patil- जयंत पाटील

@Jayant_R_Patil681,695 subscribers

Leader of Legislative Party, @NCPspeaks Maharashtra|8th Term MLA,Islampur |Ex Minister-Home, Finance,Rural Development & Water Resources,Maharashtra

Shorts

Congratulations on the New Leak…

Congratulations on the New Leak…

64,748 Aufrufe

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान यांचे मुखिया आदरणीय पवार साहेबांना 'भटकती आत्मा' म्हणाले होते. आता त्यांचे आमदार असलीच भाषा वापरत आहेत. या आमदारांच्या वक्तव्यातून त्यांच्या पक्षाची विकृत मानसिकता दिसते. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती गेल्या दशकात बिघडवण्याचं काम अशा लोकांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीत या विकृतीला महाराष्ट्राने नाकारले होते आणि आगामी विधानसभा निवडणुकीतही महाराष्ट्र धर्म रक्षणासाठी या विकृतीला नाकारेल.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान यांचे मुखिया आदरणीय पवार साहेबांना 'भटकती आत्मा' म्हणाले होते. आता त्यांचे आमदार असलीच भाषा वापरत आहेत. या आमदारांच्या वक्तव्यातून त्यांच्या पक्षाची विकृत मानसिकता दिसते. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती गेल्या दशकात बिघडवण्याचं काम अशा लोकांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीत या विकृतीला महाराष्ट्राने नाकारले होते आणि आगामी विधानसभा निवडणुकीतही महाराष्ट्र धर्म रक्षणासाठी या विकृतीला नाकारेल.

45,450 Aufrufe

Videos

Jayant_R_Patil's profile picture

प्रतीक पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या "राजा शिवाजी" या चित्रपटाचा मोफत शो वाळवा तालुक्यातील पक्षाचे पदाधिकारी आणि नागरिकांसमवेत पाहताना अंगावर शहारे आले, डोळे पाणावले. स्व. विलासराव देशमुख यांची मुले Riteish Deshmukh - Dhiraj V Deshmukh, सून Genelia Deshmukh आणि नातवंड या सर्वांना चित्रपटात पाहून अभिमान वाटला. स्व. विलासरावांच्या संस्काराची पेरणी त्यांच्या कुटुंबात अतिशय सक्षमपणे झाली आहे, याचा प्रत्यय आला. हा इतिहास केवळ चित्रपट म्हणून नाही, तर प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयातील अभिमान म्हणून त्यांनी जिवंत केला आहे. आपल्या मातीची ओळख, रक्तातील स्वाभिमान आणि महाराष्ट्राच्या पराक्रमाची जाज्वल्य गाथा प्रत्येकाने पाहावी. आपल्या मराठमोळ्या चित्रपटाने १०० कोटींचा टप्पा पार तर केलाच आहे, मात्र जगभरातील प्रेक्षकांच्या मनात छत्रपतींची एक अनोखी छाप सोडली आहे, याचा आनंद मोठा आहे. संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! 🚩 Amit V. Deshmukh Prateek Patil

Jayant Patil- जयंत पाटील

70,948 Aufrufe • vor 4 Monaten

Jayant_R_Patil's profile picture

नाशिक जिल्ह्यातील देवरगाव येथील शेतकरी कुटुंबातील सुपुत्र सर्वेश कुशारे याने कॉमनवेल्थ स्पर्धेत उंच उडी या प्रकारात रौप्यपदक पटकावत देशासह महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे. कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर मिळवलेले हे यश प्रत्येक ग्रामीण युवकासाठी प्रेरणादायी आहे. शेतकरी कुटुंबातील मुलांमध्ये असलेली अमर्याद क्षमता सर्वेशने आपल्या कामगिरीतून पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल सर्वेश कुशारे याचे मनःपूर्वक अभिनंदन! भविष्यातही तुझ्या यशाने भारताचा तिरंगा जागतिक स्तरावर फडकत राहो, हीच सदिच्छा! 🇮🇳🥈 #commonwealthgames2026 #silvermedal #sarveshkushare

Jayant Patil- जयंत पाटील

10,560 Aufrufe • vor 1 Monat

Jayant_R_Patil's profile picture

'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेतून छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास घराघरात पोहोचवणारे खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडून आता आणखी एक थोर प्रयत्न होत आहे तो म्हणजे ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही मालिका. ही मालिका केवळ कथानक नसून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या असामान्य कार्याचा, समाजजागृतीच्या ज्वालामुखीचा आणि परिवर्तनशील विचारांचा गौरव करणारा भव्य प्रयत्न आहे. फुले दांपत्यांनी दिलेला पुरोगामी विचार प्रत्येक घरात पोहोचेल, याबद्दल पूर्ण विश्वास आहे. अमोल कोल्हे जी, तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीमला हार्दिक शुभेच्छा! ही मालिका पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. Dr.Amol Kolhe #MiSavitribaiJotiraoPhule

Jayant Patil- जयंत पाटील

32,475 Aufrufe • vor 10 Monaten

Jayant_R_Patil's profile picture

तरुण पिढीच्या स्वप्नांना वास्तवात उतरवण्यासाठी एक नवा प्रवास सुरू करत आहोत — "जयंत उडान" ( आजची तरुणाई तडफदार आहे, मेहनती आहे, उमेदीने भरलेली आहे. पण त्यांना हवी आहे योग्य दिशा आणि विश्वासार्ह मार्गदर्शन. म्हणूनच आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आम्ही आणत आहोत एक अद्वितीय व्यासपीठ — • क्षणार्धात तयार होणारा आकर्षक CV • करिअर मार्गदर्शन आणि योग्य सल्ला • अचूक उत्तरे, प्रेरणादायी दिशा आणि वैयक्तिक विकासाचा मार्ग "जयंत उडान" ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील तरुणांसाठी संधींचं दार उघडेल. प्रत्येक तरुणाची क्षमता, त्यांची स्वप्नं आणि त्यांचा आत्मविश्वास यांना योग्य उंची मिळवून देणं हेच आमचं ध्येय. चला, तरुणाईच्या स्वप्नांना देऊया नवी उडान — जयंत उडान! #JayantUdaan

Jayant Patil- जयंत पाटील

31,079 Aufrufe • vor 11 Monaten

Jayant_R_Patil's profile picture

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून सात वर्षाचा प्रवास समृद्ध करणारा होता. शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांनी महाराष्ट्र प्रेरित व्हावा यासाठी आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गावोगाव पिंजून काढले. जिवाभावाची माणसं जोडत गेलो. निष्ठावान सहकारी कमावले. पक्षाचा वैचारिक पाया भक्कम करण्यासाठी संरचनात्मक बदल केले. कार्यकर्त्यांशी संवादाचा समांतर सेतू बांधला. जे काही चांगले घडले असेल त्याचे श्रेय हे आपल्या सगळ्यांचे आहे आणि काही वाईट घडले असेल त्याची जबाबदारी माझी आहे. तुम्ही मला भरभरून प्रेम दिले आहे. त्यासाठी तुम्हा सगळ्यांचा कायम ऋणी राहील🙏🏼 Sharad Pawar Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar nicholas brown

Jayant Patil- जयंत पाटील

17,990 Aufrufe • vor 1 Jahr