
Jayant Patil- जयंत पाटील
@Jayant_R_Patil • 681,695 subscribers
Leader of Legislative Party, @NCPspeaks Maharashtra|8th Term MLA,Islampur |Ex Minister-Home, Finance,Rural Development & Water Resources,Maharashtra
Shorts
Videos

प्रतीक पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या "राजा शिवाजी" या चित्रपटाचा मोफत शो वाळवा तालुक्यातील पक्षाचे पदाधिकारी आणि नागरिकांसमवेत पाहताना अंगावर शहारे आले, डोळे पाणावले. स्व. विलासराव देशमुख यांची मुले Riteish Deshmukh - Dhiraj V Deshmukh, सून Genelia Deshmukh आणि नातवंड या सर्वांना चित्रपटात पाहून अभिमान वाटला. स्व. विलासरावांच्या संस्काराची पेरणी त्यांच्या कुटुंबात अतिशय सक्षमपणे झाली आहे, याचा प्रत्यय आला. हा इतिहास केवळ चित्रपट म्हणून नाही, तर प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयातील अभिमान म्हणून त्यांनी जिवंत केला आहे. आपल्या मातीची ओळख, रक्तातील स्वाभिमान आणि महाराष्ट्राच्या पराक्रमाची जाज्वल्य गाथा प्रत्येकाने पाहावी. आपल्या मराठमोळ्या चित्रपटाने १०० कोटींचा टप्पा पार तर केलाच आहे, मात्र जगभरातील प्रेक्षकांच्या मनात छत्रपतींची एक अनोखी छाप सोडली आहे, याचा आनंद मोठा आहे. संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! 🚩 Amit V. Deshmukh Prateek Patil
Jayant Patil- जयंत पाटील70,948 görüntüleme • 4 ay önce

मित्रा, पुन्हा भेट होईपर्यंत, मनात आणि हृदयात ❤️
Jayant Patil- जयंत पाटील65,318 görüntüleme • 7 ay önce

मागील अधिवेशनात आम्ही ड्रग्स माफिया आणि पोलिस यंत्रणेतील संभाव्य संगनमताचा मुद्दा उपस्थित केला होता. आज एका पोलीस कर्मचाऱ्याने आंदोलनातील विद्यार्थ्यांना "ड्रग्सचं पाकीट खिशात टाकून आत टाकू" अशी धमकी दिल्याचा प्रकार अत्यंत गंभीर आहे. जर असे वक्तव्य झाले असेल, तर त्यामागील सत्य समोर आलेच पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी. शांततेने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना धमकावणे लोकशाहीला शोभणारे नाही.
Jayant Patil- जयंत पाटील20,795 görüntüleme • 2 ay önce

अजितदादांची आणि माझी मैत्री १९८५ पासून होती. आम्ही जवळपास एकाच वेळी सार्वजनिक जीवनात आलो आणि ३५ हून अधिक वर्षे एकत्र काम केले. सुख, दुःख, यश, अपयश या सर्व भावना एकत्र अनुभवल्या. आमचे अनेक बाबतीत एकमत सुद्धा असे आणि काही बाबतीत वेगवेगळे मत देखील असे पण चर्चा करून आम्ही एकमतावर यायचो. दादांच्या वाढदिवसाला न चुकता शुभेच्छा देण्याचा दर वर्षीचा रिवाज या वर्षी मोडला. ३५ वर्षांची मैत्री तोडून दादा लवकर गेले, हा माझा त्यांच्याशी वाद कायम राहील. ' जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ' असे म्हणण्याची इच्छा होत नाही. वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा, दादा...
Jayant Patil- जयंत पाटील19,861 görüntüleme • 2 ay önce

किती हा विरोधाभास! आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांनी ६० वर्षांत शेतकर्यांसाठी काहीही केले नाही असे म्हणणाऱ्या पंतप्रधानांनीच पूर्वीच्या भाषणात पवार साहेबांच्या कार्याबद्दल वस्तुस्थिती मांडली होती. Sharad Pawar Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
Jayant Patil- जयंत पाटील168,027 görüntüleme • 2 yıl önce

नाशिक जिल्ह्यातील देवरगाव येथील शेतकरी कुटुंबातील सुपुत्र सर्वेश कुशारे याने कॉमनवेल्थ स्पर्धेत उंच उडी या प्रकारात रौप्यपदक पटकावत देशासह महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे. कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर मिळवलेले हे यश प्रत्येक ग्रामीण युवकासाठी प्रेरणादायी आहे. शेतकरी कुटुंबातील मुलांमध्ये असलेली अमर्याद क्षमता सर्वेशने आपल्या कामगिरीतून पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल सर्वेश कुशारे याचे मनःपूर्वक अभिनंदन! भविष्यातही तुझ्या यशाने भारताचा तिरंगा जागतिक स्तरावर फडकत राहो, हीच सदिच्छा! 🇮🇳🥈 #commonwealthgames2026 #silvermedal #sarveshkushare
Jayant Patil- जयंत पाटील10,560 görüntüleme • 1 ay önce

काल जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीहल्ल्यात जखमी झालेल्यांची उपजिल्हा रुग्णालय अंबड येथे आदरणीय श्री. शरदचंद्र पवार साहेब यांच्यासह जाऊन भेट घेतली. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करून आधार दिला. Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Sharad Pawar
Jayant Patil- जयंत पाटील95,742 görüntüleme • 3 yıl önce

'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेतून छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास घराघरात पोहोचवणारे खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडून आता आणखी एक थोर प्रयत्न होत आहे तो म्हणजे ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही मालिका. ही मालिका केवळ कथानक नसून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या असामान्य कार्याचा, समाजजागृतीच्या ज्वालामुखीचा आणि परिवर्तनशील विचारांचा गौरव करणारा भव्य प्रयत्न आहे. फुले दांपत्यांनी दिलेला पुरोगामी विचार प्रत्येक घरात पोहोचेल, याबद्दल पूर्ण विश्वास आहे. अमोल कोल्हे जी, तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीमला हार्दिक शुभेच्छा! ही मालिका पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. Dr.Amol Kolhe #MiSavitribaiJotiraoPhule
Jayant Patil- जयंत पाटील32,475 görüntüleme • 10 ay önce

मराठी नाट्यसृष्टीचे प्रश्न दहा सेकंदात सोडवणारे पवारसाहेब! बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते आणि भाजपचे माजी खासदार परेश रावल यांची लल्लनटॉप या सुप्रसिद्ध युट्यूब चॅनेल वरील एक मुलाखत नुकतीच पाहण्यात आली. नाटकांच्या वरील जीएसटीचा प्रश्न बरेच दिवस सुटत नव्हता. परेश रावल यांनी पवारसाहेबांना विनंती केली आणि अवघ्या दहा सेकंदात तो प्रश्न सुटला ! आज संपूर्ण देशातील नाट्यसृष्टी पवारसाहेबांच्या एका शब्दामुळे जीएसटीतून मुक्त आहे. Sharad Pawar Paresh Rawal
Jayant Patil- जयंत पाटील47,294 görüntüleme • 1 yıl önce

तरुण पिढीच्या स्वप्नांना वास्तवात उतरवण्यासाठी एक नवा प्रवास सुरू करत आहोत — "जयंत उडान" ( आजची तरुणाई तडफदार आहे, मेहनती आहे, उमेदीने भरलेली आहे. पण त्यांना हवी आहे योग्य दिशा आणि विश्वासार्ह मार्गदर्शन. म्हणूनच आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आम्ही आणत आहोत एक अद्वितीय व्यासपीठ — • क्षणार्धात तयार होणारा आकर्षक CV • करिअर मार्गदर्शन आणि योग्य सल्ला • अचूक उत्तरे, प्रेरणादायी दिशा आणि वैयक्तिक विकासाचा मार्ग "जयंत उडान" ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील तरुणांसाठी संधींचं दार उघडेल. प्रत्येक तरुणाची क्षमता, त्यांची स्वप्नं आणि त्यांचा आत्मविश्वास यांना योग्य उंची मिळवून देणं हेच आमचं ध्येय. चला, तरुणाईच्या स्वप्नांना देऊया नवी उडान — जयंत उडान! #JayantUdaan
Jayant Patil- जयंत पाटील31,079 görüntüleme • 11 ay önce

मुंबई महानगरपालिकेचा कारभार स्वतंत्र असताना देखील मुंबईचे पालकमंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी मनपामध्ये स्वतःचे कार्यालय उभे केले आहे. मीही या मुंबई शहराचा पालकमंत्री राहिलो आहे. अशापद्धतीने मनपामध्ये पालकमंत्र्यांनी कार्यालय स्थापन करणे म्हणजे मनपाच्या अधिकारात हस्तक्षेप करणे झाले, मनपाच्या कारभारात ढवळाढवळ करणे झाले. मनपामध्ये लोकनियुक्त बॉडी नसताना शासनाच्या लोकांनी त्यापासून लांब राहिलेले बरे नाहीतर चुकीची प्रथा सुरू होईल. #MonsoonSession2023 Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
Jayant Patil- जयंत पाटील64,160 görüntüleme • 3 yıl önce

एकीकडे मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी फाईव्ह स्टार हॉटेल्स, ३०० गाड्यांचा ताफा, दीड हजार रुपयांची जेवणाची एक थाळी असा शाही थाट... दुसरीकडे मात्र कांद्याला प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याचे सरकारने जाहीर केलेले असताना, मालेगावच्या शेतकऱ्याच्या खात्यावर ११२ क्विंटल कांद्याचे अवघे २५२ रुपये अनुदान जमा करत क्रूर थट्टा केली आहे. लोकांच्या पैशांवर मजा करणाऱ्यांनाही जागतिक लोकशाही दिनाच्या शुभेच्छा! #DemocracyDay
Jayant Patil- जयंत पाटील59,624 görüntüleme • 3 yıl önce

मतदार यादीत नाव घुसवण्याची यंत्रणा निवडणूक आयोगानेच केली आहे का? शून्यापासून, स्वल्पविरमापर्यंत विविध प्रकारचे घर क्रमांक असलेली मतदार यादी माझ्याकडे उपलब्ध आहे. एकाच घरात १८८ नावं, २०० नावं हा पण एक प्रकार आहे. लोकांना माझे आवाहन आहे की, आपल्या घरात किती लोकांची नावे आहे ते बघा. नाहीतर उद्या ती लोकं सुद्धा तुमच्या घरावर क्लेम करतील. #VoteChori #pressconference Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Sharad Pawar
Jayant Patil- जयंत पाटील18,977 görüntüleme • 1 yıl önce

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून सात वर्षाचा प्रवास समृद्ध करणारा होता. शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांनी महाराष्ट्र प्रेरित व्हावा यासाठी आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गावोगाव पिंजून काढले. जिवाभावाची माणसं जोडत गेलो. निष्ठावान सहकारी कमावले. पक्षाचा वैचारिक पाया भक्कम करण्यासाठी संरचनात्मक बदल केले. कार्यकर्त्यांशी संवादाचा समांतर सेतू बांधला. जे काही चांगले घडले असेल त्याचे श्रेय हे आपल्या सगळ्यांचे आहे आणि काही वाईट घडले असेल त्याची जबाबदारी माझी आहे. तुम्ही मला भरभरून प्रेम दिले आहे. त्यासाठी तुम्हा सगळ्यांचा कायम ऋणी राहील🙏🏼 Sharad Pawar Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar nicholas brown
Jayant Patil- जयंत पाटील17,990 görüntüleme • 1 yıl önce