
मुंबई पोलीस Mumbai Police
@MumbaiPolice • 4,731,254 subscribers
मुंबई पोलीसांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा. Official account of Mumbai Police. For any emergency, Dial 100/112.
Shorts
Videos

🔸Samta Nagar Police bust milk adulteration racket; accused arrested red-handed! The Detection Squad of समतानगर पोलीस ठाणे -SamtaNagar PS Mumbai raided a residence in Kandivali East and caught a 48-year-old man red-handed while adulterating branded milk with impure water for sale. During the raid, 74 litres of adulterated milk bearing Amul and Gokul labels, along with adulteration material and counterfeit empty pouches, were seized. A case has been registered under the BNS and the Food Safety and Standards Act, and the accused has been arrested. Mumbai Police remains committed to protecting citizens from those who endanger public health. 🔸समतानगर पोलिसांकडून दुधात भेसळ करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; एका आरोपीला रंगेहात अटक! नामांकित कंपन्यांच्या दुधाच्या पिशव्यांमध्ये अशुद्ध पाण्याची भेसळ करून विक्री करणाऱ्या एका ४८ वर्षीय इसमाला समतानगर पोलीस ठाणे -SamtaNagar PS Mumbai च्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने छापा मारून रंगेहात पकडले. कांदिवली (पूर्व) येथील राहत्या घरावर टाकलेल्या छाप्यात आरोपीकडून अमूल व गोकुळ कंपनीचे ७४ लिटर भेसळयुक्त दूध, भेसळ करण्यासाठी लागणारे साहित्य आणि दोन्ही कंपन्यांच्या बनावट रिकाम्या पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि अन्न सुरक्षा कायदा मानके कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी मुंबई पोलीस कटिबद्ध आहेत! #MumbaiPolice4All
मुंबई पोलीस Mumbai Police126,814 görüntüleme • 2 ay önce

🔸Prompt Action by Dahisar Police: Man Rescued from Drain, Reunited with Family Upon receiving information from the Control Room about a man who had entered a drain and sustained injuries, a team from दहिसर पोलीस ठाणे - Dahisar PS Mumbai immediately rushed to the spot. The individual was found trapped near a fast-flowing section of the drain. Displaying a swift response and presence of mind, the team cut through an iron mesh and safely rescued him. He was provided with immediate medical attention, after which his relatives were traced and he was safely reunited with his family. 🔸दहिसर पोलिसांची तत्परता: नाल्यात अडकलेल्या व्यक्तीची सुखरूप सुटका आणि कुटुंबियांशी भेट! एक इसम नाल्यात उतरून स्वतःला दुखापत करून घेत असल्याची माहिती नियंत्रण कक्षाकडून प्राप्त झाली. सदर माहिती मिळताच दहिसर पोलीस ठाणे - Dahisar PS Mumbai चे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. तो इसम नाल्याच्या वेगवान प्रवाहाजवळ अडकल्याचे निदर्शनास येताच, पथकाने लोखंडी जाळी कापून त्याला सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यानंतर त्याच्या जखमांवर प्रथमोपचार करून व त्याच्या नातेवाईकांचा शोध घेऊन त्याला सुखरूप कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. #MumbaiPolice4All
मुंबई पोलीस Mumbai Police151,262 görüntüleme • 4 ay önce
Sensitive content
This media may contain sensitive content.

"Drugs Free Mumbai" Campaign! Anti-Narcotics Cell, Worli with Smita Patil Street Theater created public awareness through Street Play at Dadar Railway Stn, Worli Naka & Lalbagh area to spread awareness about effects of drug consumption and to bring drug addicts in mainstream.
मुंबई पोलीस Mumbai Police1,195,104 görüntüleme • 3 yıl önce

🔸A Crackdown on Adulteration: Crime Branch Mumbai Seizes 558 Litres of Fake Milk. Acting on confidential intelligence, the Crime Branch,uncovered a milk adulteration racket operating from 12 rooms in Kandivali. Investigations revealed that milk packets of two reputed dairy brands were allegedly being tampered with and diluted using contaminated water before being supplied to consumers. During the operation, the team seized 558 litres of adulterated milk, preventing it from reaching Mumbaikars. 🔸दूध भेसळीवर मोठी कारवाई: मुंबई गुन्हे शाखेकडून ५५८ लिटर बनावट दूध जप्त गोपनीय माहितीच्या आधारे मुंबई गुन्हे शाखेने कांदिवली येथील १२ खोल्यांमध्ये सुरू असलेल्या दूध भेसळीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. तपासादरम्यान दोन नामांकित दूध कंपनीच्या दुधाच्या पिशव्यांमध्ये छेडछाड करून त्यात दूषित पाणी मिसळले जात असल्याचे, तसेच ते दूध ग्राहकांना पुरवले जात असल्याचे उघड झाले. या कारवाईत ५५८ लिटर भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आले असून ते मुंबईकरांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच रोखण्यात आले आहे. #MumbaiCaseFiles #MumbaiPolice4All
मुंबई पोलीस Mumbai Police125,681 görüntüleme • 3 ay önce

🔸In view of the #AnantChaturdashi celebrations on 25 September 2026 across Mumbai City and its suburbs, extensive police bandobast has been deployed to maintain law and order and ensure public safety. Mumbaikars are requested to cooperate with police personnel, remain alert in crowded areas, report any unattended or unidentified objects to the authorities, and contact 100, 112 or 103 in case of an emergency. 🔸२५ सप्टेंबर रोजी मुंबई शहर व उपनगरात साजऱ्या होणाऱ्या अनंत चतुर्दशी या उत्सवासाठी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई पोलिसांकडून चोख बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. उत्सवाच्या काळात नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी सावध राहावे, पोलीस यंत्रणेला सहकार्य करावे आणि बेवारस अथवा संशयास्पद वस्तू आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी. तसेच आपत्कालीन मदतीसाठी १००, ११२ किंवा १०३ वर संपर्क साधावा. #Ganeshotsav2026
मुंबई पोलीस Mumbai Police52,288 görüntüleme • 1 ay önce

🔸 Santacruz Police Successfully Recover Stolen Property Worth ₹76.39 Lakh in Burglary Case! सांताक्रूझ पोलीस ठाणे – Santacruz PS Mumbai arrested a 26-year-old habitual offender from Darbhanga, Bihar, in connection with a burglary case. A Rolex watch and a 200-gram gold biscuit were recovered from the accused, while ₹46.39 lakh linked to the crime has been frozen in a bank account. 🔸 घरफोडीच्या गुन्ह्यात ₹७६.३९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश! सांताक्रूझ पोलीस ठाणे – Santacruz PS Mumbai ने एका घरफोडी च्या गुन्ह्यात एका २६ वर्षीय सराईत गुन्हेगाराला दरभंगा, बिहार येथून अटक केली आहे! त्याच्याकडून रोलेक्स घड्याळ आणि २०० ग्रॅम सोन्याचे बिस्किट हस्तगत करण्यात आले असून, या गुन्ह्याशी संबंधित ₹४६.३९ लाखांची रक्कम बँकेत गोठवण्यात आली आहे. #MumbaiPolice4All
मुंबई पोलीस Mumbai Police86,874 görüntüleme • 3 ay önce

🔸One city. One resolve. Zero tolerance. Under the guidance of Hon. Chief Minister Shri Devendra Fadnavis (CMO Maharashtra) we continue our crackdown against the drug trade, taking action against 1,497 unauthorised pan shops across Mumbai in July 2026. With special focus on areas around schools and colleges, unauthorised pan shops are being removed and regular successful implementation of the 'Drugs Free Mumbai' campaign are being conducted to keep our youth safe. We remain committed to a Drug-Free Mumbai, with zero tolerance towards drug trafficking and sale. 🔸एक शहर. एक संकल्प. शून्य सहनशीलता. मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस CMO Maharashtra यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थांच्या काळ्या बाजाराविरोधात आमची तीव्र कारवाई सुरूच आहे. या मोहिमेअंतर्गत जुलै २०२६ मध्ये मुंबईभरातील १,४९७ अनधिकृत पान टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. शाळा आणि कॉलेजेसच्या परिसरावर विशेष लक्ष केंद्रित करून, अनधिकृत पान टपऱ्या हटवल्या जात आहेत. तसेच, आपल्या तरुण पिढीला सुरक्षित ठेवण्यासाठी 'नशामुक्त मुंबई' अभियानाची नियमित आणि प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. अंमली पदार्थांची तस्करीत आणि विक्रीविरोधात 'शून्य सहनशीलता' बाळगत, 'नशामुक्त मुंबई' घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. #DrugsFreeMumbai #MumbaiPolice4All
मुंबई पोलीस Mumbai Police84,683 görüntüleme • 2 ay önce

🔸Woman’s life saved through timely intervention! During his morning walk, Assistant Sub-Inspector Pansare of Powai Police Station noticed a 65-year-old woman attempting to jump from the fifth floor of a building within the jurisdiction of विक्रोळी पोलीस ठाणे - Vikhroli PS Mumbai. Acting swiftly, he alerted the Control Room and, with the coordinated efforts of Police Inspector Gadade, Police Personnel Sudham Binnar and MSF Jawan Rathod, ensured her timely rescue. The woman was safely rescued, counselled and provided with the necessary guidance. In case of an emergency or if you require police assistance #Dial112 🔸सतर्कतेमुळे महिलेचे प्राण वाचविण्यात यश! विक्रोळी पोलीस ठाणे - Vikhroli PS Mumbai परिसरात एक ६५ वर्षीय महिला इमारतीच्या ५ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करत आहे, असे मॉर्निंग वॉकला जात असलेले पवई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पानसरे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला आणि विक्रोळी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गडदे तसेच अंमलदार सुधाम बिन्नर, एमएसएफ जवान राठोड यांची मदत घेऊन आवश्यक कार्यवाही केली. पोलिसांच्या तत्परता व समन्वयपूर्ण प्रयत्नांमुळे महिलेचे प्राण वाचविण्यात यश आले. त्यानंतर तिची समजूत काढून तिला आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. मुंबई पोलिसांची सतर्कता, तत्परता आणि संवेदनशीलता नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव कटिबद्ध आहे. तरीही कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी ११२ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करा. #MumbaiPolice4All
मुंबई पोलीस Mumbai Police73,599 görüntüleme • 2 ay önce

🔸 Amid today’s heavy rainfall, your safety remains our highest priority. Step outdoors only if absolutely necessary. In case of any emergency, dial 112/100 for assistance. 🔸 मुसळधार पावसामुळे नागरिकांनी स्वतःची सुरक्षितता लक्षात घेऊन शक्यतो घराबाहेर पडणे टाळा. अत्यावश्यक कारण असल्यासच बाहेर पडा. कोणत्याही आपत्कालीन मदतीसाठी ११२/१०० या क्रमांकावर संपर्क साधा. #RainAlert #SafetyFirst #MumbaiRains
मुंबई पोलीस Mumbai Police103,865 görüntüleme • 4 ay önce

🔸A loyal Woof that will echo forever. Today, we bid a heartfelt farewell to Leo, our brave and loyal tracker from the Mumbai Police Dog Squad. With an extraordinary sense of instinct and unwavering devotion to duty, he served with quiet courage and earned a place in our hearts. 🔸कर्तव्यनिष्ठेचा एक बुलंद आवाज सदैव गुंजत राहील! आज आम्ही मुंबई पोलीस श्वान पथकातील आमचा शूर आणि अत्यंत विश्वासू ट्रॅकर 'लिओ ' याला भावपूर्ण निरोप दिला. आपल्या विशेष कौशल्याने आणि अढळ कर्तव्यनिष्ठेने त्याने अनेक वर्षे देशसेवा केली आणि प्रत्येकाच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. त्याच्या अमूल्य सेवेला आणि समर्पणाला मुंबई पोलिसांचा सलाम! #RestInPeaceLeo #MumbaiPoliceDogSquad
मुंबई पोलीस Mumbai Police33,805 görüntüleme • 1 ay önce

🔸Today, special pipping ceremonies were held across Mumbai to honour police officers & personnel promoted to higher ranks. During the ceremonies, the newly promoted personnel were adorned with their new rank insignia in the presence of senior officers and their proud family members. 🔸आज मुंबई येथे आयोजित विशेष पिपिंग सोहळ्यादरम्यान मुंबईतील विविध पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना उच्च पदावर पदोन्नती देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमांतर्गत वरिष्ठ अधिकारी तसेच कुटुंबियांच्या उपस्थितीत पदोन्नती प्राप्त अधिकाऱ्यांना नव्या पदाचे बोधचिन्ह प्रदान करण्यात आले. #BadgesOfHonour #PippingCeremony
मुंबई पोलीस Mumbai Police33,221 görüntüleme • 1 ay önce

🔸A Musical Goodbye to Bappa! The Mumbai Police Band marks Bappa’s Visarjan with a melody of devotion, celebrating His journey and eagerly awaiting His return next year. 🔸बाप्पाला संगीतमय निरोप! मुंबई पोलीस बँडच्या सुरेल वादनातून बाप्पाला विसर्जनानिमित्त भक्तिमय निरोप दिला. बाप्पाचा प्रवास मंगलमय व्हावा यासाठी भक्तिभावाने दिलेला हा सुरेल निरोप! #GanpatiBappaMorya #GanpatiVisarjan2026
मुंबई पोलीस Mumbai Police32,753 görüntüleme • 1 ay önce

🔸 Today, at a special pipping ceremony, 52 officials and staff from across Mumbai Police were promoted to higher ranks in the presence of senior officers along with the families of the promoted personnel. A proud celebration of their service, commitment and achievement. 🔸 आज विशेष पिपिंग समारंभात मुंबई पोलीस दलातील विविध प्रादेशिक विभागांमधील ५२ अधिकारी व अंमलदारांना उच्च पदावर पदोन्नती देण्यात आली. वरिष्ठ अधिकारी तसेच पदोन्नती मिळालेल्या अधिकारी व अंमलदारांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत हा अभिमानाचा सोहळा पार पडला. त्यांच्या कर्तव्यनिष्ठा, समर्पण आणि उल्लेखनीय कामगिरीचा सन्मान करणारा हा क्षण! #PippingCeremony #MumbaiPolice
मुंबई पोलीस Mumbai Police45,679 görüntüleme • 2 ay önce

🔸Recognising excellence in policing! At the Monthly Crime Review Conference held today, Mumbai Police personnel were felicitated with Certificates of Appreciation for their exceptional work in crime detection, securing convictions, recovery of stolen property, and outstanding performance in the line of duty. Heartiest congratulations to all the awardees for their exemplary dedication, commitment, and service to Mumbai. 🔸पोलीस सेवेतील उत्कृष्टतेचा गौरव! आज आयोजित करण्यात आलेल्या 'मासिक गुन्हे आढावा परिषदेत' गुन्ह्यांचा शोध घेणे, आरोपींना शिक्षा मिळवून देणे, चोरीचा मुद्देमाल हस्तगत करणे आणि कर्तव्य बजावताना दाखवलेली उल्लेखनीय कामगिरी याबद्दल मुंबई पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. मुंबई शहराप्रती दाखवलेली अतुलनीय निष्ठा, कटिबद्धता आणि उत्कृष्ट सेवेबद्दल सर्व पुरस्कार विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! #ExcellenceInPolicing
मुंबई पोलीस Mumbai Police20,399 görüntüleme • 26 gün önce

26th July 2005. The waters tested Mumbai. The people defined it. Courage wasn’t found in one place. It was everywhere. In every helping hand, every act of kindness, and every Mumbaikar who stood shoulder to shoulder with the police personnel, this day defined the spirit of the city. #26thJulyRains #MumbaiRemembers
मुंबई पोलीस Mumbai Police64,576 görüntüleme • 3 ay önce

. Commissioner of Police, Greater Mumbai Deven Bharti visited the Main Control Room to review city-wide security and ongoing developments on the New Year. He also extended New Year greetings to all the officers and staff on duty. #HappyNewYear
मुंबई पोलीस Mumbai Police142,422 görüntüleme • 10 ay önce

🔸When milk turns into malpractice: Crime Branch cracks down on milk adulteration. Crime Branch Unit-12, busted a factory in Vasai East manufacturing fake milk pouches and passing them off under the names of reputed brands. Machinery worth ₹10 lakh was seized and 470 litres of adulterated milk were destroyed, while 13,000 fake 1-litre pouches had also been seized earlier. Further investigation revealed that since 2021, the accused had supplied around 18 lakh fake pouches across Mumbai and its suburbs, at approximately 30,000 pouches every month. 🔸दुधाच्या नावाखाली भेसळीचा धंदा; गुन्हे शाखेची धडक कारवाई. वसई पूर्व परिसरात नामांकित कंपनीच्या नावाने बनावट दुधाच्या पिशव्या तयार करून त्यांची विक्री करणाऱ्या कारखान्यावर गुन्हे शाखेच्या युनिट-१२ ने कारवाई केली. या कारवाईत सुमारे ₹१० लाखांची यंत्रसामग्री जप्त करण्यात आली असून, ४७० लिटर भेसळयुक्त दूध नष्ट करण्यात आले. यापूर्वी १ लिटरच्या १३ हजार बनावट दुधाच्या पिशव्याही जप्त करण्यात आल्या होत्या. सदर तपासादरम्यान २०२१ पासून आरोपींकडून मुंबई आणि उपनगरात दरमहा सुमारे ३० हजार, म्हणजेच तब्बल १८ लाख बनावट दुधाच्या पिशव्या वितरित करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. #MumbaiCaseFiles
मुंबई पोलीस Mumbai Police46,136 görüntüleme • 2 ay önce

🔹Congratulations to all the awardees for their exemplary dedication, commitment, and outstanding service. At the Monthly Crime Review Conference held on July 11th, 2026, Mumbai Police personnel were felicitated with Certificates of Appreciation for their excellence in crime detection, securing convictions, recovery of stolen property, and exceptional performance in the line of duty. 🔹सर्व पुरस्कार विजेत्यांचे त्यांच्या उत्कृष्ट समर्पण, कर्तव्यनिष्ठा आणि उल्लेखनीय सेवेबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! ११ जुलै २०२६ रोजी आयोजित 'मासिक गुन्हे आढावा परिषदेत' मुंबई पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांना गुन्हे प्रकटीकरण, आरोपींना शिक्षा मिळवून देणे, चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करणे आणि कर्तव्य बजावताना दाखवलेली उत्कृष्ट कामगिरी याबद्दल 'प्रशस्तीपत्र' देऊन सन्मानित करण्यात आले. #ExcellenceInPolicing
मुंबई पोलीस Mumbai Police53,654 görüntüleme • 3 ay önce

A Helping Hand for Tiny Hands! माटुंगा पोलीस ठाणे - Matunga PS Mumbai ensured school children reach safety after their bus was stranded in a waterlogged area under the King’s Circle bridge. The team swiftly rescued the children, along with staff members and the bus driver, brought them to the police station, and handed them over to their parents after contacting them. #MumbaiPolice4All
मुंबई पोलीस Mumbai Police155,069 görüntüleme • 1 yıl önce