
मुंबई पोलीस Mumbai Police
@MumbaiPolice • 4,735,268 subscribers
मुंबई पोलीसांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा. Official account of Mumbai Police. For any emergency, Dial 100/112.
Shorts
Videos

🔸 Today, at a special pipping ceremony, 52 officials and staff from across Mumbai Police were promoted to higher ranks in the presence of senior officers along with the families of the promoted personnel. A proud celebration of their service, commitment and achievement. 🔸 आज विशेष पिपिंग समारंभात मुंबई पोलीस दलातील विविध प्रादेशिक विभागांमधील ५२ अधिकारी व अंमलदारांना उच्च पदावर पदोन्नती देण्यात आली. वरिष्ठ अधिकारी तसेच पदोन्नती मिळालेल्या अधिकारी व अंमलदारांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत हा अभिमानाचा सोहळा पार पडला. त्यांच्या कर्तव्यनिष्ठा, समर्पण आणि उल्लेखनीय कामगिरीचा सन्मान करणारा हा क्षण! #PippingCeremony #MumbaiPolice
मुंबई पोलीस Mumbai Police43,052 views • 7 days ago

🔸Samta Nagar Police bust milk adulteration racket; accused arrested red-handed! The Detection Squad of समतानगर पोलीस ठाणे -SamtaNagar PS Mumbai raided a residence in Kandivali East and caught a 48-year-old man red-handed while adulterating branded milk with impure water for sale. During the raid, 74 litres of adulterated milk bearing Amul and Gokul labels, along with adulteration material and counterfeit empty pouches, were seized. A case has been registered under the BNS and the Food Safety and Standards Act, and the accused has been arrested. Mumbai Police remains committed to protecting citizens from those who endanger public health. 🔸समतानगर पोलिसांकडून दुधात भेसळ करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; एका आरोपीला रंगेहात अटक! नामांकित कंपन्यांच्या दुधाच्या पिशव्यांमध्ये अशुद्ध पाण्याची भेसळ करून विक्री करणाऱ्या एका ४८ वर्षीय इसमाला समतानगर पोलीस ठाणे -SamtaNagar PS Mumbai च्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने छापा मारून रंगेहात पकडले. कांदिवली (पूर्व) येथील राहत्या घरावर टाकलेल्या छाप्यात आरोपीकडून अमूल व गोकुळ कंपनीचे ७४ लिटर भेसळयुक्त दूध, भेसळ करण्यासाठी लागणारे साहित्य आणि दोन्ही कंपन्यांच्या बनावट रिकाम्या पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि अन्न सुरक्षा कायदा मानके कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी मुंबई पोलीस कटिबद्ध आहेत! #MumbaiPolice4All
मुंबई पोलीस Mumbai Police126,316 views • 26 days ago

🔸Woman’s life saved through timely intervention! During his morning walk, Assistant Sub-Inspector Pansare of Powai Police Station noticed a 65-year-old woman attempting to jump from the fifth floor of a building within the jurisdiction of विक्रोळी पोलीस ठाणे - Vikhroli PS Mumbai. Acting swiftly, he alerted the Control Room and, with the coordinated efforts of Police Inspector Gadade, Police Personnel Sudham Binnar and MSF Jawan Rathod, ensured her timely rescue. The woman was safely rescued, counselled and provided with the necessary guidance. In case of an emergency or if you require police assistance #Dial112 🔸सतर्कतेमुळे महिलेचे प्राण वाचविण्यात यश! विक्रोळी पोलीस ठाणे - Vikhroli PS Mumbai परिसरात एक ६५ वर्षीय महिला इमारतीच्या ५ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करत आहे, असे मॉर्निंग वॉकला जात असलेले पवई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पानसरे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला आणि विक्रोळी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गडदे तसेच अंमलदार सुधाम बिन्नर, एमएसएफ जवान राठोड यांची मदत घेऊन आवश्यक कार्यवाही केली. पोलिसांच्या तत्परता व समन्वयपूर्ण प्रयत्नांमुळे महिलेचे प्राण वाचविण्यात यश आले. त्यानंतर तिची समजूत काढून तिला आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. मुंबई पोलिसांची सतर्कता, तत्परता आणि संवेदनशीलता नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव कटिबद्ध आहे. तरीही कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी ११२ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करा. #MumbaiPolice4All
मुंबई पोलीस Mumbai Police72,954 views • 16 days ago

🔸One city. One resolve. Zero tolerance. Under the guidance of Hon. Chief Minister Shri Devendra Fadnavis (CMO Maharashtra) we continue our crackdown against the drug trade, taking action against 1,497 unauthorised pan shops across Mumbai in July 2026. With special focus on areas around schools and colleges, unauthorised pan shops are being removed and regular successful implementation of the 'Drugs Free Mumbai' campaign are being conducted to keep our youth safe. We remain committed to a Drug-Free Mumbai, with zero tolerance towards drug trafficking and sale. 🔸एक शहर. एक संकल्प. शून्य सहनशीलता. मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस CMO Maharashtra यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थांच्या काळ्या बाजाराविरोधात आमची तीव्र कारवाई सुरूच आहे. या मोहिमेअंतर्गत जुलै २०२६ मध्ये मुंबईभरातील १,४९७ अनधिकृत पान टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. शाळा आणि कॉलेजेसच्या परिसरावर विशेष लक्ष केंद्रित करून, अनधिकृत पान टपऱ्या हटवल्या जात आहेत. तसेच, आपल्या तरुण पिढीला सुरक्षित ठेवण्यासाठी 'नशामुक्त मुंबई' अभियानाची नियमित आणि प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. अंमली पदार्थांची तस्करीत आणि विक्रीविरोधात 'शून्य सहनशीलता' बाळगत, 'नशामुक्त मुंबई' घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. #DrugsFreeMumbai #MumbaiPolice4All
मुंबई पोलीस Mumbai Police84,489 views • 27 days ago

🔸 Santacruz Police Successfully Recover Stolen Property Worth ₹76.39 Lakh in Burglary Case! सांताक्रूझ पोलीस ठाणे – Santacruz PS Mumbai arrested a 26-year-old habitual offender from Darbhanga, Bihar, in connection with a burglary case. A Rolex watch and a 200-gram gold biscuit were recovered from the accused, while ₹46.39 lakh linked to the crime has been frozen in a bank account. 🔸 घरफोडीच्या गुन्ह्यात ₹७६.३९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश! सांताक्रूझ पोलीस ठाणे – Santacruz PS Mumbai ने एका घरफोडी च्या गुन्ह्यात एका २६ वर्षीय सराईत गुन्हेगाराला दरभंगा, बिहार येथून अटक केली आहे! त्याच्याकडून रोलेक्स घड्याळ आणि २०० ग्रॅम सोन्याचे बिस्किट हस्तगत करण्यात आले असून, या गुन्ह्याशी संबंधित ₹४६.३९ लाखांची रक्कम बँकेत गोठवण्यात आली आहे. #MumbaiPolice4All
मुंबई पोलीस Mumbai Police86,735 views • 29 days ago

🔸A Crackdown on Adulteration: Crime Branch Mumbai Seizes 558 Litres of Fake Milk. Acting on confidential intelligence, the Crime Branch,uncovered a milk adulteration racket operating from 12 rooms in Kandivali. Investigations revealed that milk packets of two reputed dairy brands were allegedly being tampered with and diluted using contaminated water before being supplied to consumers. During the operation, the team seized 558 litres of adulterated milk, preventing it from reaching Mumbaikars. 🔸दूध भेसळीवर मोठी कारवाई: मुंबई गुन्हे शाखेकडून ५५८ लिटर बनावट दूध जप्त गोपनीय माहितीच्या आधारे मुंबई गुन्हे शाखेने कांदिवली येथील १२ खोल्यांमध्ये सुरू असलेल्या दूध भेसळीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. तपासादरम्यान दोन नामांकित दूध कंपनीच्या दुधाच्या पिशव्यांमध्ये छेडछाड करून त्यात दूषित पाणी मिसळले जात असल्याचे, तसेच ते दूध ग्राहकांना पुरवले जात असल्याचे उघड झाले. या कारवाईत ५५८ लिटर भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आले असून ते मुंबईकरांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच रोखण्यात आले आहे. #MumbaiCaseFiles #MumbaiPolice4All
मुंबई पोलीस Mumbai Police125,582 views • 1 month ago

🔸Prompt Action by Dahisar Police: Man Rescued from Drain, Reunited with Family Upon receiving information from the Control Room about a man who had entered a drain and sustained injuries, a team from दहिसर पोलीस ठाणे - Dahisar PS Mumbai immediately rushed to the spot. The individual was found trapped near a fast-flowing section of the drain. Displaying a swift response and presence of mind, the team cut through an iron mesh and safely rescued him. He was provided with immediate medical attention, after which his relatives were traced and he was safely reunited with his family. 🔸दहिसर पोलिसांची तत्परता: नाल्यात अडकलेल्या व्यक्तीची सुखरूप सुटका आणि कुटुंबियांशी भेट! एक इसम नाल्यात उतरून स्वतःला दुखापत करून घेत असल्याची माहिती नियंत्रण कक्षाकडून प्राप्त झाली. सदर माहिती मिळताच दहिसर पोलीस ठाणे - Dahisar PS Mumbai चे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. तो इसम नाल्याच्या वेगवान प्रवाहाजवळ अडकल्याचे निदर्शनास येताच, पथकाने लोखंडी जाळी कापून त्याला सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यानंतर त्याच्या जखमांवर प्रथमोपचार करून व त्याच्या नातेवाईकांचा शोध घेऊन त्याला सुखरूप कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. #MumbaiPolice4All
मुंबई पोलीस Mumbai Police151,124 views • 2 months ago

🔸 Amid today’s heavy rainfall, your safety remains our highest priority. Step outdoors only if absolutely necessary. In case of any emergency, dial 112/100 for assistance. 🔸 मुसळधार पावसामुळे नागरिकांनी स्वतःची सुरक्षितता लक्षात घेऊन शक्यतो घराबाहेर पडणे टाळा. अत्यावश्यक कारण असल्यासच बाहेर पडा. कोणत्याही आपत्कालीन मदतीसाठी ११२/१०० या क्रमांकावर संपर्क साधा. #RainAlert #SafetyFirst #MumbaiRains
मुंबई पोलीस Mumbai Police103,775 views • 2 months ago

🔸When milk turns into malpractice: Crime Branch cracks down on milk adulteration. Crime Branch Unit-12, busted a factory in Vasai East manufacturing fake milk pouches and passing them off under the names of reputed brands. Machinery worth ₹10 lakh was seized and 470 litres of adulterated milk were destroyed, while 13,000 fake 1-litre pouches had also been seized earlier. Further investigation revealed that since 2021, the accused had supplied around 18 lakh fake pouches across Mumbai and its suburbs, at approximately 30,000 pouches every month. 🔸दुधाच्या नावाखाली भेसळीचा धंदा; गुन्हे शाखेची धडक कारवाई. वसई पूर्व परिसरात नामांकित कंपनीच्या नावाने बनावट दुधाच्या पिशव्या तयार करून त्यांची विक्री करणाऱ्या कारखान्यावर गुन्हे शाखेच्या युनिट-१२ ने कारवाई केली. या कारवाईत सुमारे ₹१० लाखांची यंत्रसामग्री जप्त करण्यात आली असून, ४७० लिटर भेसळयुक्त दूध नष्ट करण्यात आले. यापूर्वी १ लिटरच्या १३ हजार बनावट दुधाच्या पिशव्याही जप्त करण्यात आल्या होत्या. सदर तपासादरम्यान २०२१ पासून आरोपींकडून मुंबई आणि उपनगरात दरमहा सुमारे ३० हजार, म्हणजेच तब्बल १८ लाख बनावट दुधाच्या पिशव्या वितरित करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. #MumbaiCaseFiles
मुंबई पोलीस Mumbai Police46,031 views • 29 days ago

26th July 2005. The waters tested Mumbai. The people defined it. Courage wasn’t found in one place. It was everywhere. In every helping hand, every act of kindness, and every Mumbaikar who stood shoulder to shoulder with the police personnel, this day defined the spirit of the city. #26thJulyRains #MumbaiRemembers
मुंबई पोलीस Mumbai Police64,131 views • 1 month ago

🔹Congratulations to all the awardees for their exemplary dedication, commitment, and outstanding service. At the Monthly Crime Review Conference held on July 11th, 2026, Mumbai Police personnel were felicitated with Certificates of Appreciation for their excellence in crime detection, securing convictions, recovery of stolen property, and exceptional performance in the line of duty. 🔹सर्व पुरस्कार विजेत्यांचे त्यांच्या उत्कृष्ट समर्पण, कर्तव्यनिष्ठा आणि उल्लेखनीय सेवेबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! ११ जुलै २०२६ रोजी आयोजित 'मासिक गुन्हे आढावा परिषदेत' मुंबई पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांना गुन्हे प्रकटीकरण, आरोपींना शिक्षा मिळवून देणे, चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करणे आणि कर्तव्य बजावताना दाखवलेली उत्कृष्ट कामगिरी याबद्दल 'प्रशस्तीपत्र' देऊन सन्मानित करण्यात आले. #ExcellenceInPolicing
मुंबई पोलीस Mumbai Police53,591 views • 1 month ago

🔸Recognising excellence in policing! At the Monthly Crime Review Conference held today, Mumbai Police personnel were felicitated with Certificates of Appreciation for their exceptional work in crime detection, securing convictions, recovery of stolen property, and outstanding performance in the line of duty. Heartiest congratulations to all the awardees for their exemplary dedication, commitment, and service to Mumbai. 🔸पोलीस सेवेतील उत्कृष्टतेचा गौरव! आज आयोजित करण्यात आलेल्या 'मासिक गुन्हे आढावा परिषदेत' गुन्ह्यांचा शोध घेणे, आरोपींना शिक्षा मिळवून देणे, चोरीचा मुद्देमाल हस्तगत करणे आणि कर्तव्य बजावताना दाखवलेली उल्लेखनीय कामगिरी याबद्दल मुंबई पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. मुंबई शहराप्रती दाखवलेली अतुलनीय निष्ठा, कटिबद्धता आणि उत्कृष्ट सेवेबद्दल सर्व पुरस्कार विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! #ExcellenceInPolicing
मुंबई पोलीस Mumbai Police29,310 views • 1 month ago

🔸Excellent achievement by Borivali Police, reflecting technical expertise, dedicated efforts, and a citizen-centric approach to policing! Leveraging technical analysis, बोरीवली पोलीस ठाणे - Borivali PS Mumbai has accomplished the impressive feat of tracing and returning a total of 450 lost and stolen mobile phones to their rightful owners between 2019 and 2025. Since January 1 this year, the team has successfully recovered 225 mobile phones. These recovered devices are being returned to the respective complainants every Saturday as part of the ‘Grievance Redressal Day’ initiative. On August 5, 2026, another 50 mobile phones were handed over to their rightful owners. 🔸तांत्रिक कौशल्य आणि तत्पर सेवाभावाचे उत्कृष्ट उदाहरण; बोरिवली पोलीस ठाण्याची उल्लेखनीय कामगिरी! तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने बोरीवली पोलीस ठाणे - Borivali PS Mumbai यांनी सन २०१९ ते २०२५ या कालावधीत हरवलेले व चोरीस गेलेले तब्बल ४५० मोबाईल शोधून त्यांच्या मूळ मालकांना परत करण्याचे उल्लेखनीय कार्य केले आहे. यावर्षी १ जानेवारीपासून आजपर्यंत २२५ मोबाईल हस्तगत करण्यात यश आले असून, तक्रार निवारण दिनानिमित्त दर शनिवारी हस्तगत करण्यात आलेले मोबाईल संबंधित तक्रारदारांना परत केले जात आहेत. दि. ०५ ऑगस्ट २०२६ रोजी आणखी ५० मोबाईल त्यांच्या मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आले. #MumbaiPolice4All
मुंबई पोलीस Mumbai Police29,062 views • 1 month ago

🔸 Esha Deol steps forward in support of the Drug-Free Mumbai Pledge Initiative. Join us in taking the Anti-Drug Pledge and reaffirm our commitment to building a Drug-Free Mumbai. Say NO to Drugs. Choose a Healthy, Safe Life. 🔸अभिनेत्री Esha Deol यांनी नशामुक्त मुंबई शपथ अभियानाला आपला पाठिंबा दर्शविला आहे. मुंबईकर, चला तुम्हीसुद्धा नशामुक्तीची शपथ घेऊन नशामुक्त मुंबई घडविण्याच्या संकल्पाला बळ द्या. अंमली पदार्थांना नकार द्या आणि निरोगी व सुरक्षित आयुष्याची निवड करा. #NashaMukti #DrugFreeMumbai #SayNoToDrugs
मुंबई पोलीस Mumbai Police31,682 views • 1 month ago

🔸 Celebrating growth in service! In a series of Pipping Ceremonies held today across Mumbai Police units, 59 officers were promoted to higher ranks and ceremonially received their new insignia in the presence of senior officers. Personnel from Traffic Police Branch, Protection & Security Branch, Motor Transport Department, North and West Region, the Intelligence & Special Branch were honoured. Congratulations to all the promoted officers. Wishing them continued success in serving the city with commitment, integrity and pride. 🔸 मुंबई पोलीस दलातील ५९ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या टप्प्याचा आज गौरव करण्यात आला. विविध विभागांमध्ये आयोजित पिपिंग समारंभात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांना नव्या पदाची चिन्हे प्रदान करण्यात आली. यामध्ये वाहतूक शाखा, संरक्षण व सुरक्षा शाखा, मोटार परिवहन शाखा, उत्तर / पश्चिम प्रादेशिक विभाग तसेच गुप्तवार्ता व विशेष शाखा-१ मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदोन्नती देऊन गौरवण्यात आले. सर्व पदोन्नत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! कर्तव्य, शिस्त आणि समर्पणाची ही वाटचाल अशीच यशस्वी राहो, हीच शुभेच्छा. #MumbaiPolice #BadgesOfHonor #PippingCeremony
मुंबई पोलीस Mumbai Police28,037 views • 1 month ago

🔸Always ready to lend a helping hand - through rain or shine! 🔸मुसळधार पावसामुळे रस्त्यात अडकलेल्या रिक्षेला मुंबई पोलीस Mumbai Police नी तत्परतेने मदतीचा हात दिला. संकटाच्या काळात नागरिकांच्या मदतीसाठी आणि सुरक्षिततेसाठी मुंबई पोलीस सदैव तत्पर आहेत. #OnDutyForMumbai #MumbaiPolice4All #MumbaiRains
मुंबई पोलीस Mumbai Police44,416 views • 2 months ago

🔸DCP Zone 02 | Recovering Property. Restoring Trust. Under the guidance of Hon. Commissioner of Police, Greater Mumbai , Shri Deven Bharti, DCP Zone 02 Smt. Ragasudha R. led a special recovery drive in which teams from L.T. Marg, Paydhuni, V.P. Marg, D.B. Marg, Gaondevi and Malabar Hill Police Stations, along with the South Zone 02 Cyber Squad, recovered 317 missing mobile phones from Mumbai, Maharashtra and other states. Additionally, cash, gold and silver seized in various cases were returned to their rightful owners. At a special handover ceremony held today, property worth over ₹73 lakh was restored to their respective owners. 🔸हरवलेली मालमत्ता तक्रारदारांना परत! मा. Commissioner of Police, Greater Mumbai श्री. देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस उपायुक्त परिमंडळ ०२ (दक्षिण विभाग) सौ. रागसुधा आर. यांच्या नेतृत्वात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत एल. टी. मार्ग, पायधुनी, व्ही. पी. मार्ग, डी. बी. मार्ग, गावदेवी, मलबार हिल पोलीस ठाणे आणि दक्षिण विभाग-२ सायबर पथकाने समन्वयाने ३१७ हरवलेले मोबाईल फोन शोधून काढले. तसेच, विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेली रोख रक्कम, सोने-चांदीसह ₹ ७३ लाखांहून अधिक किंमतीची मालमत्ता संबंधित हक्कदारांना परत करण्यात आली. नागरिकांचा विश्वास जपत, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मुंबई पोलीस सदैव कटिबद्ध आहेत. #MumbaiPolice4All
मुंबई पोलीस Mumbai Police36,772 views • 1 month ago