Vikas Lawande's banner
Vikas Lawande's profile picture

Vikas Lawande

@VikasLawande1 • 25,497 subscribers

राम कृष्ण हरी | समाजकारणासाठी राजकारण | समन्वयक भागवत वारकरी महासंघ |

Videos

VikasLawande1's profile picture

डॉक्टर, तुमचं विचारधन... हे आहेत डॉ. कबीर. लंडनला असतात. डॉ. कुमार सप्तर्षी यांचा एकुलता एक मुलगा. आपल्या वडिलांच्या अस्थी त्यांनी त्यांच्या शाळेवर, म्हणजे नगर जिल्ह्यातील खेड येथील लोकनायक जयप्रकाश नारायण प्रशालेच्या ग्राऊंडवर विसर्जित करून वृक्षारोपण केले. या प्रसंगी आपल्या भाषणात मांडलेले त्यांचे विचार आपल्याला अंगीकारता आले पाहिजेत आणि संस्काररूपाने पुढील पिढीला देता आले पाहिजेत. पहिल्यांदाच असे विचार ऐकणाऱ्याला कदाचित ते जड जाऊ शकतात. पण विचारांची खरी ताकद ही माणसाला प्रश्न विचारायला, विवेकाने जगायला आणि समाजासाठी जगण्याची प्रेरणा द्यायला शिकवते. डॉक्टर, तुम्ही शरीराने नसाल, पण तुमचं विचारधन अशाच कृतीतून आणि अशाच पिढ्यांतून जिवंत राहील. #डॉ_कुमार_सप्तर्षी #विचारधन

Vikas Lawande

12,661 görüntüleme • 2 ay önce

VikasLawande1's profile picture

हा घ्या आणखी एक पुरावा. हे आहेत देगलूरकर फडाचे शब्दप्रभू चैतन्य देगलूरकर आणि त्यांचे 2024 मधील पंढरपुरातील कीर्तनकारांच्या मेळाव्यातील भाषण. #वारकरी संप्रदाय आणि संत साहित्य सर्व काही संपणार आहे म्हणून #भाजप शिवाय कुणीच आपल्याला वाचवणार नाही. अशी काल्पनिक भीती दाखवून निवडणुकीत प्रचार कसा करावा, जनतेचा बुद्धिभेद कसा करावा याचे आपल्या रसाळ वाणीने प्रशिक्षण देत आहेत. त्यानंतर राज्यात अनेक #कीर्तनकार आपल्या कीर्तनातून भाजपाचा उघड खरा नव्हे खोटा प्रचार करत होते. सामान्य जनतेचा बुद्धिभेद करत होते. भागवत #वारकरी संप्रदायातील संतांच्या कोणत्या ग्रंथात आहेत ? राम कृष्ण हरी हा मूलमंत्र पुसून जय श्रीराम हा राजकीय नवा मंत्र रुजवणाऱ्या सन्माननीय देगलूरकर यांना वारकरी संप्रदायातील #घुसखोर नाही म्हणायचे तर काय मग म्हणायचे ? त्यांच्या समर्थकांनी सांगावे. बाकी त्यांच्या #देगलूरकर फडाचा पूर्व इतिहास, ते वर्णवर्चस्ववादी आहेत की नाही, त्यांची घराची परंपरा याच्याशी मला आत्ता काहीच बोलायचे नाही बोललो नाही. राम कृष्ण हरी! #warkari

Vikas Lawande

13,677 görüntüleme • 5 ay önce

Daha fazla içerik yok.