Akhil Chitre अखिल चित्रे's banner
Akhil Chitre अखिल चित्रे's profile picture

Akhil Chitre अखिल चित्रे

@akhil148511,597 subscribers

Page is about the political and social views of Shivsena (original) , & Individual views of Akhil Chitre for the welfare of Maharashtra and society.

Shorts

मुंबईच्या बोरीवलीतील एका रंगारंग कार्यक्रमाचा हा व्हिडिओ… व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि स्व. आनंद दिघे यांच्या प्रतिमा… आणि त्यांच्यासमोर अश्लील गाण्यांवर महिलांना नाचवलं जातंय. कार्यक्रमाचा आयोजक कोण? तर शहा सेनेचे रंगेल सुर्वे! हा प्रकार आपल्या आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना आणि महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या कडवट महापुरुषांच्या विचारांना शोभणारा आहे का? आणि अशा रंगेल कार्यक्रमाला उपस्थित राहून एकनाथ शिंदे नेमका कोणता आणि कोणाचा वारसा पुढे नेत आहेत? महाराष्ट्राची संस्कृती, स्वाभिमान आणि अस्मिता संपविण्याचा विडाच शहा सेनेने उचलला आहे. मुंबई-महाराष्ट्रातून थैल्या भरून-भरून दिल्लीत बसलेल्या मालकाला द्यायच्या आणि दररोज महाराष्ट्राच्या संस्कृतीला लांच्छन लागेल असं वागायचं. शहा टोळीच्या या रंगेलपणाला कोण खतपाणी घालतंय, हे महाराष्ट्र पाहतोय. #korakendra #borivali

19,681 views

शिवसेनेला मोठा धक्का’, ‘जोरदार धक्का’, ‘तगडा धक्का’, ‘शिवसेनेत फुट’ अशा मथळ्यांचे कारखाने चालवणाऱ्यांसाठी खास — थोडी हवा नक्कीच वेगाने वाहील, काही सुकलेली पाने गळून पडतील आणि इकडे-तिकडे विखुरली जातील. पण जनतेच्या विश्वासाच्या मुळांवर उभा असलेला भक्कम वृक्ष अशा वाऱ्याच्या झोताने उन्मळून पडत नाही. “वाऱ्यासोबत उडणारी पाने खूप असतात, पण इतिहास मात्र मुळांशी एकनिष्ठ राहिलेल्या वृक्षांचाच घडतो.”

14,881 views

उल्हासनगरच्या भाजपच्या प्रदेशाध्यक्षाने MIM च्या नेत्याचे पाय धरले. खरं तर भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांना, मतदारांना संदेश दिला आहे, “अब MIM के सामने झुकेंगे तोही बचेंगे”... एक स्पष्ट झालं BJP MIM एक है इस्लिए सेफ है|"... भाजपचं ढोंग उघडं पडतंय, आणि महाराष्ट्र त्यांच्या प्रत्येक थेरं नोंदवून ठेवतो. यंदा शांतीत क्रांती होणार आहे. तो येत्या १६ तारखेला महाराष्ट्र प्रेमी माणूस भाजपाला असा काही दणका देईल की त्यांचा सगळा ढोंगीपणा वठणीवर येईल l.

32,618 views

Videos

akhil1485's profile picture

महाराष्ट्रातील किल्ल्यांवर हे काय सुरु आहे? पोर्तुगीजांनी बांधलेल्या व नंतर ब्रिटिश आणि मराठा अशा साम्राज्यांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या हेरिटेज वास्तू असलेल्या वांद्रे किल्ल्यावर दारूची पार्टी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारचं राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि माझी Mumbai, आपली BMC माझी Mumbai, आपली BMCWardHW परवानगी देतंच कसं? आणि किल्ल्यावरील ह्या दारू पार्टीसाठी संयोजक कोण तर 'महाराष्ट्र पर्यटन' विभाग ? नक्की काय सुरु आहे ? कुठे आहेत स्थानिक आमदार आणि महाराष्ट्राचे so called 'सांस्कृतिक मंत्री' आशिष कुरेशी? सुरुवात राजधानी मुंबईतील उपेक्षित किल्ल्यांपासून करायची आणि बोभाटा झाला नाही तर ह्याच दारू पार्ट्यांचे उपद्व्याप महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांवर करायचे... हेच भाजपा महाराष्ट्र भाजपा आणि त्यांच्या नोकरपक्षांचं ढोंगी हिंदुत्व अन् लबाड संस्कृती ! #Daruparty #BandraFort (व्हिडिओ स्थानिक रहिवाशांनी, रविवारी रात्री उशिरा, १६ नोव्हेंबरच्या मध्यरात्री काढलेला आहे.)

Akhil Chitre अखिल चित्रे

39,290 views • 9 months ago

akhil1485's profile picture

मुंबई,चर्चगेट येथे एका कामानिमित्त गेलो असता आलेला अनुभव संतापजनक होता. एका अनधिकृत Pay & Park चालवणाऱ्याशी किरकोळ वाद झाला, पण त्या वादादरम्यान त्या हुज्जत घालणाऱ्या परप्रांतीयाने टोळीला मारहाण करण्यास बोलावलं. ते सर्व अनधिकृत पणे शहरात वास्तव्यास असणारे मंडळी होती.त्या परप्रांतीय टोळीला जो दणका द्यायचा तो मी त्याक्षणीच दिलाच, पुढे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आणि कारवाईही झाली. पण मी नडतो तसा प्रत्येक सामान्य मुंबईकर मराठी माणूस नडू शकत नाही पण त्यांच्यावरही ह्या टोळ्या अशीच दादागिरी करत असल्याच्या तक्रारी अनेकांनी सांगितल्या. भाजपाची सत्ता आल्यापासून परप्रांतियांची मुजोरी पुन्हा वाढू लागली आहे, एकंच सांगतो आमच्या मराठी माणसांवर पुन्हा दादागिरी केली गेली तरी गाठ शिवसेनेशी आहे हे याद राखा !

Akhil Chitre अखिल चित्रे

62,083 views • 1 year ago

akhil1485's profile picture

हा व्हिडिओ पाहून तुम्हाला किळस वाटेल,पण पाहायलाच हवा. कारण याच घाणेरड्या, अस्वच्छ जागेतून आपण अन्न मागवता. Oye Kidaan सारख्या घाण, अस्वच्छ, कोणतीही अन्न सुरक्षा नसलेल्या #CloudKitchens इथले अन्न zomato Swiggy सारख्या अ‍ॅप्सवर विकले जातात तेही आकर्षक डिस्काउंट आणि बनावट फोटो लावून! FSSAI FDA, Maharashtra ही थेट ग्राहकांची फसवणूक आहे. आम्ही जेव्हा Swiggy आणि त्यांच्या या चुकीच्या कार्यपद्धतीवर आवाज उठवला, तेव्हा गुन्हा आमच्यावर दाखल केला गेला! का? कारण आम्ही लोकांच्या आरोग्यासाठी ह्या छुप्या फूड माफियाच्या विरोधात लढतोय. हे अन्न विकणारे आणि त्यांना पाठीशी घालणारे दोघंही जनतेच्या जीवाशी खेळत आहेत.जोवर अशा फसवणूक करणाऱ्या किचन्सवर व ॲप्सवर बंदी येत नाही, तोवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शिव संचार सेना - Shiv Sanchar Sena लढत राहणार!

Akhil Chitre अखिल चित्रे

38,394 views • 1 year ago

akhil1485's profile picture

माझ्या एका राजकीय उपहासात्मक बॅनरबद्दल माझ्यावर १४ फेब्रुवारीला गुन्हा दाखल केला... कोणत्या कायद्याखाली तर म्हणे 'महाराष्ट्र विद्रुपीकरण कायद्यान्वये' मग माझी Mumbai, आपली BMC हे जे शहरभर मोदी-फडणवीसांचे बॅनर लागलेत ते आपल्या शहराचं सौंदर्य वाढवत आहेत का? आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर ह्याच कलमाखाली गुन्हा दाखल होणार का ? मुंबई पोलीस Mumbai Police माझी Mumbai, आपली BMCWardHW असली अघोरी बॅनरबाजी मुंबईला विद्रुप करत नाही का? सत्ताधाऱ्यांनी काहीही केलं, कितीही उन्माद घातला तरी माफ आणि विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांनी केलेली साधी टीकाही सहन होत नाही तर आपण एकपक्षीय 'हुकूमशाही'कडे वेगाने चाललोय इतकं निश्चित !

Akhil Chitre अखिल चित्रे

21,566 views • 6 months ago

akhil1485's profile picture

'हुतात्मा' हि वेबसीरीज का हटवली, आम्हाला उत्तरं मिळालीच पाहिजेत... ▪️ 'हुतात्मा' ही मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या लढाईवर आधारित असलेली वेबसिरीज ओटीटीवरुन का काढण्यात आली? ▪️ कोणताही राजकीय, वैचारिक किंवा बाह्य दबाव होता का? ▪️ मराठी माणसाने मुंबईसाठी दिलेली झुंज, बलिदान आणि त्यामागचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचू नये, असा कुणाचा तरी प्रयत्न तर नाही ना? ▪️ तेव्हाच्या नरराक्षस मोरारजी देसाईंचा आणि आजच्या आधुनिक मोरारजी देसाईचा महाराष्ट्रद्वेष नव्या पिढीपर्यंत पोहोचणं काहींना अस्वस्थ करतं का? ▪️ कि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत भाजपा किंवा तेव्हाचा जनसंघ कुठेच नव्हता म्हणून ? आणि हो, ZEE5Official वेबसीरीजला व्यावसायिक प्रतिसाद नव्हता असली थुकरट उत्तरं नको कारण अनेक दर्जाहीन वेबसीरीज व्यवसाय असो वा नसो ओटीटीवर पडून असतात. त्यामुळे खरं कारण कळावं किंवा तातडीने ही वेबसीरीज सार्वजनिक करण्यात यावी, मराठी माणसाला त्यांच्या पूर्वजांचा इतिहास कळलाच पाहिजे, मुंबई महाराष्ट्राला लढवून मिळवली आहे आणि ती लढवून टिकवायची आहे हेही कळायला हवं.

Akhil Chitre अखिल चित्रे

13,483 views • 8 months ago

akhil1485's profile picture

हा व्हिडीओ पहा, तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल. कारण भाजपा मुंबईत प्रचारसभांमध्ये महिलांना नाचवून गर्दी जमवत आहे. आणि हे करताना BJP Mumbai Ameet Satam Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार भाजपाच्या महाभागांना ह्याचंही भान नाही कि मागे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज व देशाला संविधान देणाऱ्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा आहे... आमच्या महापुरुषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला आहे आमचा महाराष्ट्र? बरं, ह्या कार्यक्रमाच्या आयोजक कोण? तर भाजपाच्या स्थानिक उमेदवार, संयोजक कोण तर सिद्धिविनायक ट्रस्टवर भाजपाने कोषाध्यक्ष नेमलेला पवन त्रिपाठी. ही असली माणसं आमच्या पवित्र मंदिरावर नेमताना लाज कशी वाटली नाही भाजपाला ? मुंबईकरांनो आपल्या महापुरुषांचा असा अपमान सहन करायचा नाही, ह्यांच्या डोक्यात चढलेली सत्तेची मस्ती उतरविण्याची संधी वारंवार येत नसते... ह्यांना एकदाचा शिवटोला देऊयाच ! 🔥🔥🔥 ❗❗❗

Akhil Chitre अखिल चित्रे

10,377 views • 8 months ago