
Akhil Chitre अखिल चित्रे
@akhil1485 • 11,597 subscribers
Page is about the political and social views of Shivsena (original) , & Individual views of Akhil Chitre for the welfare of Maharashtra and society.
Shorts
Videos

बिनपदाचे 'सुपर महापौर'! मुंबईत एक नवीन पद निर्माण झालंय - 'बिनपदाचे सुपर महापौर' - नाव: किरीट सोमय्या! ना निवडणूक लढवली ना जनतेने निवडलं ना कोणतं अधिकृत पद ; तरीही महापौर आणि उपमहापौरांच्या बैठकीत ठाण मांडून बसतात आणि सूचना देतात! काम काय? तर,महापौरांच्या खुर्चीशेजारी बसणं, बैठकीत सगळ्यात जास्त बोलणं,पडद्यामागून सूत्र हलवणं आणि जेव्हा मीडियाने जाब विचारला त्याची जागा दाखवली तेव्हा 'सुपर महापौर' साहेबांनी काय केलं? चक्क उठून निघून गेले! वाघ बनून बसलेले ... कोल्ह्यासारखे पळाले!
Akhil Chitre अखिल चित्रे110,108 görüntüleme • 2 ay önce

भाजपच्या कार्यकर्त्यांनी हे मुंबईत काय नवीन सुरु केलं आहे? सोसायटीची परवानगी न घेता श्यामाप्रसाद मुखर्जींची जयंती साजरी केली जातेय. भाजपची निरंकुश सत्ता आहे म्हणून तुमचे भाजपाई नेते लोकांवर का थोपता ? जी गोष्ट भाजपा कार्यकर्त्यांनी आपापल्या पक्ष कार्यालयात करायची ती कुठेही फोटो लावून करता इतका उद्दामपणा येतो कुठून? शिवसैनिक अशा गोष्टींबाबत सजग आहेतच पण आमचं मुंबईतल्या मराठी माणसांना आवाहन आहे... भाजपची असली थिअरं आता सुरूच राहतील, जागते रहा. जय महाराष्ट्र !
Akhil Chitre अखिल चित्रे63,215 görüntüleme • 1 ay önce

शेवटी पोटातलं ओठांवर आलंच... भाजपाला आम्ही शेवटचं सांगतोय, निवडणुका गेल्या तेल लावत पण मुद्दामहून असल्या बांडगुळांना आणून मराठी माणसाला चिथावू नका... पुन्हा तुमचा कुणी भाजपावाला मुंबादेवीच्या मुंबईला बॉम्बे म्हणाला आणि बलिदान देऊन मिळवलेल्या मुंबईवरून मराठी माणसालाच हिणवलं तर तुमची मराठी माणसाशी गाठ आहे, हे लक्षात असू द्या... K.Annamalai BJP शहरांची नावे फक्त शब्द नसतात तर भाषा, संघर्ष, अभिमान आणि स्वाभिमान दर्शवतात. मुंबई म्हणजे मुंबईच! बॉम्बे नाही! आणि मुंबई महाराष्ट्राचीच ! जय महाराष्ट्र!
Akhil Chitre अखिल चित्रे67,515 görüntüleme • 7 ay önce

एअरटेल प्रशासनाने नोंद घेऊन कर्मचाऱ्यांना मराठी भाषेचं महत्त्व समजावून सांगावं. महाराष्ट्रात एअरटेल चे असंख्य मराठी ग्राहक आहेत ते कायम ठेवायचे असतील तर योग्य पाउलं उचला नाहीतर मुंबईत एअरटेल ची गॅलरी दिसणार नाही. इतर भाषेचा विरोध नाही पण मराठी भाषिक ८०% कर्मचारी असायलाच हवे. #मराठी
Akhil Chitre अखिल चित्रे83,830 görüntüleme • 1 yıl önce

महाराष्ट्रातील किल्ल्यांवर हे काय सुरु आहे? पोर्तुगीजांनी बांधलेल्या व नंतर ब्रिटिश आणि मराठा अशा साम्राज्यांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या हेरिटेज वास्तू असलेल्या वांद्रे किल्ल्यावर दारूची पार्टी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारचं राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि माझी Mumbai, आपली BMC माझी Mumbai, आपली BMCWardHW परवानगी देतंच कसं? आणि किल्ल्यावरील ह्या दारू पार्टीसाठी संयोजक कोण तर 'महाराष्ट्र पर्यटन' विभाग ? नक्की काय सुरु आहे ? कुठे आहेत स्थानिक आमदार आणि महाराष्ट्राचे so called 'सांस्कृतिक मंत्री' आशिष कुरेशी? सुरुवात राजधानी मुंबईतील उपेक्षित किल्ल्यांपासून करायची आणि बोभाटा झाला नाही तर ह्याच दारू पार्ट्यांचे उपद्व्याप महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांवर करायचे... हेच भाजपा महाराष्ट्र भाजपा आणि त्यांच्या नोकरपक्षांचं ढोंगी हिंदुत्व अन् लबाड संस्कृती ! #Daruparty #BandraFort (व्हिडिओ स्थानिक रहिवाशांनी, रविवारी रात्री उशिरा, १६ नोव्हेंबरच्या मध्यरात्री काढलेला आहे.)
Akhil Chitre अखिल चित्रे39,290 görüntüleme • 9 ay önce

मुंबई,चर्चगेट येथे एका कामानिमित्त गेलो असता आलेला अनुभव संतापजनक होता. एका अनधिकृत Pay & Park चालवणाऱ्याशी किरकोळ वाद झाला, पण त्या वादादरम्यान त्या हुज्जत घालणाऱ्या परप्रांतीयाने टोळीला मारहाण करण्यास बोलावलं. ते सर्व अनधिकृत पणे शहरात वास्तव्यास असणारे मंडळी होती.त्या परप्रांतीय टोळीला जो दणका द्यायचा तो मी त्याक्षणीच दिलाच, पुढे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आणि कारवाईही झाली. पण मी नडतो तसा प्रत्येक सामान्य मुंबईकर मराठी माणूस नडू शकत नाही पण त्यांच्यावरही ह्या टोळ्या अशीच दादागिरी करत असल्याच्या तक्रारी अनेकांनी सांगितल्या. भाजपाची सत्ता आल्यापासून परप्रांतियांची मुजोरी पुन्हा वाढू लागली आहे, एकंच सांगतो आमच्या मराठी माणसांवर पुन्हा दादागिरी केली गेली तरी गाठ शिवसेनेशी आहे हे याद राखा !
Akhil Chitre अखिल चित्रे62,083 görüntüleme • 1 yıl önce

हा व्हिडिओ पाहून तुम्हाला किळस वाटेल,पण पाहायलाच हवा. कारण याच घाणेरड्या, अस्वच्छ जागेतून आपण अन्न मागवता. Oye Kidaan सारख्या घाण, अस्वच्छ, कोणतीही अन्न सुरक्षा नसलेल्या #CloudKitchens इथले अन्न zomato Swiggy सारख्या अॅप्सवर विकले जातात तेही आकर्षक डिस्काउंट आणि बनावट फोटो लावून! FSSAI FDA, Maharashtra ही थेट ग्राहकांची फसवणूक आहे. आम्ही जेव्हा Swiggy आणि त्यांच्या या चुकीच्या कार्यपद्धतीवर आवाज उठवला, तेव्हा गुन्हा आमच्यावर दाखल केला गेला! का? कारण आम्ही लोकांच्या आरोग्यासाठी ह्या छुप्या फूड माफियाच्या विरोधात लढतोय. हे अन्न विकणारे आणि त्यांना पाठीशी घालणारे दोघंही जनतेच्या जीवाशी खेळत आहेत.जोवर अशा फसवणूक करणाऱ्या किचन्सवर व ॲप्सवर बंदी येत नाही, तोवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शिव संचार सेना - Shiv Sanchar Sena लढत राहणार!
Akhil Chitre अखिल चित्रे38,394 görüntüleme • 1 yıl önce

माझ्या एका राजकीय उपहासात्मक बॅनरबद्दल माझ्यावर १४ फेब्रुवारीला गुन्हा दाखल केला... कोणत्या कायद्याखाली तर म्हणे 'महाराष्ट्र विद्रुपीकरण कायद्यान्वये' मग माझी Mumbai, आपली BMC हे जे शहरभर मोदी-फडणवीसांचे बॅनर लागलेत ते आपल्या शहराचं सौंदर्य वाढवत आहेत का? आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर ह्याच कलमाखाली गुन्हा दाखल होणार का ? मुंबई पोलीस Mumbai Police माझी Mumbai, आपली BMCWardHW असली अघोरी बॅनरबाजी मुंबईला विद्रुप करत नाही का? सत्ताधाऱ्यांनी काहीही केलं, कितीही उन्माद घातला तरी माफ आणि विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांनी केलेली साधी टीकाही सहन होत नाही तर आपण एकपक्षीय 'हुकूमशाही'कडे वेगाने चाललोय इतकं निश्चित !
Akhil Chitre अखिल चित्रे21,566 görüntüleme • 6 ay önce

'हुतात्मा' हि वेबसीरीज का हटवली, आम्हाला उत्तरं मिळालीच पाहिजेत... ▪️ 'हुतात्मा' ही मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या लढाईवर आधारित असलेली वेबसिरीज ओटीटीवरुन का काढण्यात आली? ▪️ कोणताही राजकीय, वैचारिक किंवा बाह्य दबाव होता का? ▪️ मराठी माणसाने मुंबईसाठी दिलेली झुंज, बलिदान आणि त्यामागचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचू नये, असा कुणाचा तरी प्रयत्न तर नाही ना? ▪️ तेव्हाच्या नरराक्षस मोरारजी देसाईंचा आणि आजच्या आधुनिक मोरारजी देसाईचा महाराष्ट्रद्वेष नव्या पिढीपर्यंत पोहोचणं काहींना अस्वस्थ करतं का? ▪️ कि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत भाजपा किंवा तेव्हाचा जनसंघ कुठेच नव्हता म्हणून ? आणि हो, ZEE5Official वेबसीरीजला व्यावसायिक प्रतिसाद नव्हता असली थुकरट उत्तरं नको कारण अनेक दर्जाहीन वेबसीरीज व्यवसाय असो वा नसो ओटीटीवर पडून असतात. त्यामुळे खरं कारण कळावं किंवा तातडीने ही वेबसीरीज सार्वजनिक करण्यात यावी, मराठी माणसाला त्यांच्या पूर्वजांचा इतिहास कळलाच पाहिजे, मुंबई महाराष्ट्राला लढवून मिळवली आहे आणि ती लढवून टिकवायची आहे हेही कळायला हवं.
Akhil Chitre अखिल चित्रे13,483 görüntüleme • 8 ay önce

मतदान केंद्रावर निवडणूक अधिकारी मतदारांची नावे शोधण्यासाठी भाजपचे अॅप वापरत असल्याचा दिसून येत आहे. निष्पक्ष निवडणुकीत पक्षीय अॅपचा वापर म्हणजे थेट आचारसंहिता उल्लंघन! Election Commission of India आता कारवाई करा ..राज्य निवडणूक आयोग आता करणार का कारवाई??
Akhil Chitre अखिल चित्रे10,486 görüntüleme • 7 ay önce

'बेस्ट' पतपेढीच्या निवडणुकीच्या चर्चेत रंगलेल्यांना सांगू इच्छितो 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' २ दिवसांपूर्वी 'मुंबई पोर्ट ट्रस्टच्या कर्मचारी पतपेढी'ची निवडणुकीत ११ विरुद्ध ४ इतक्या फरकाने दणदणीत विजय मिळविला आहे... आता आम्ही म्हणू का... सर्वसत्ताधीश मोदींचा हा पराभव आहे. मला तर वाटतं, 'ठाकरे' नावाचा भाजपानं इतका धसका घेतला आहे कि, भाजपचं आणि भाजपसोबतच्या मिंधेचं मानसिक संतुलन पुरतं बिघडलंय !
Akhil Chitre अखिल चित्रे14,311 görüntüleme • 1 yıl önce

हा व्हिडीओ पहा, तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल. कारण भाजपा मुंबईत प्रचारसभांमध्ये महिलांना नाचवून गर्दी जमवत आहे. आणि हे करताना BJP Mumbai Ameet Satam Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार भाजपाच्या महाभागांना ह्याचंही भान नाही कि मागे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज व देशाला संविधान देणाऱ्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा आहे... आमच्या महापुरुषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला आहे आमचा महाराष्ट्र? बरं, ह्या कार्यक्रमाच्या आयोजक कोण? तर भाजपाच्या स्थानिक उमेदवार, संयोजक कोण तर सिद्धिविनायक ट्रस्टवर भाजपाने कोषाध्यक्ष नेमलेला पवन त्रिपाठी. ही असली माणसं आमच्या पवित्र मंदिरावर नेमताना लाज कशी वाटली नाही भाजपाला ? मुंबईकरांनो आपल्या महापुरुषांचा असा अपमान सहन करायचा नाही, ह्यांच्या डोक्यात चढलेली सत्तेची मस्ती उतरविण्याची संधी वारंवार येत नसते... ह्यांना एकदाचा शिवटोला देऊयाच ! 🔥🔥🔥 ❗❗❗
Akhil Chitre अखिल चित्रे10,377 görüntüleme • 8 ay önce

आज एक नवं पर्व सुरू झालं आहे... मराठी मुलांच्या रोजगारासाठी, मराठी भाषेच्या डिजिटल ठशासाठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी... कारण ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray शिवसेना दाखल झाली आहे कम्युनिकेशन क्षेत्रात... नव्या संघटनेसह.... शिव संचार सेना !
Akhil Chitre अखिल चित्रे13,303 görüntüleme • 1 yıl önce