
Amit Thackeray
@amitrthackeray • 6,666 subscribers
अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना
Shorts
Videos

उत्तर प्रदेशच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून महाराष्ट्रात टॅक्सी-रिक्षाचालकांना मराठी शिकण्यासाठी १ वर्षाची मुदतवाढ देण्याचं हे लाचार राजकारण आहे. मालाडमध्ये मराठीत OTP सांगणाऱ्या मुलाशी टॅक्सीचालकाने केलेली मुजोरी असो, किंवा संपात सहभागी झाले नाहीत म्हणून आमच्या मराठी चालकांना झालेली मारहाण असो... हे असे मराठी माणसाला चॅलेंज करणे अजिबात सहन केले जाणार नाही. जे परप्रांतीय प्रामाणिकपणे मराठी शिकतात त्यांचं स्वागतच आहे, पण "शिकणार नाही, काय उखाडायचं ते उखाडा" अशी मुजोरी केली, तर उत्तर सडेतोडच मिळणार! सरकार भलेही त्यांना हिंदीत बोलण्याची सूट देईल, पण आम्ही मराठीतच बोलणार. दुसरीकडे, राजकीय दडपशाहीचा घाणेरडा खेळ सुरू आहे. खारघरमध्ये 'SIR' चे सरकारी फॉर्म्स थेट सत्ताधाऱ्यांच्या कार्यकर्त्यांकडे सापडतातच कसे? १५-१५ वर्षे सत्ता भोगणाऱ्या या सत्ताधाऱ्यांना आता लोकांनीच रस्त्यावर उतरून जाब विचारण्याची वेळ आली आहे. माझ्या वाढदिवशी वात्सल्य या विशेष मुलांच्या संस्थेत गेलो होतो, तेव्हा या मुलींनी हक्काने राखी बांधायला बोलावलं होतं. आज रक्षाबंधनानिमित्त पुन्हा त्या प्रेमाच्या नात्याने त्यांची भेट घेतली. लालबागच्या राजाच्या दर्शनाची त्यांची इच्छा आहे, ती नक्कीच पूर्ण करणार! महाराष्ट्राची संस्कृती, अस्मिता आणि हक्क यासाठीचा हा लढा असाच सुरू राहील!
Amit Thackeray15,790 次观看 • 1 个月前

तरुणांचा आवाज आणि ताकद आज थेट दिल्लीपर्यंत पोहोचली आहे! विद्यार्थ्यांचा हा ऐतिहासिक लढा बघून आम्ही सगळे त्यांचे फॉलोअर्स झालो आहोत. या हुकूमशाही सरकारला बॅकफूटवर ढकलण्याची ताकद फक्त आपल्या देशातील तरुणाईमध्ये आहे, आणि याचा मला सार्थ अभिमान आहे! आम्ही इथे फक्त विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहायला आलो आहोत. या आंदोलनात विद्यार्थ्यांना कोणी हात लावणार नाही आणि कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, हा आमचा शब्द आहे. हा लढा तुमचा आहे आणि ही ताकदही तुमचीच आहे! या संपूर्ण आंदोलनात मुंबई पोलिसांनी दिलेल्या उत्तम सहकार्याबद्दल त्यांचे विशेष आभार! येणाऱ्या २६ जुलैच्या 'तिरंगा मार्च'मध्ये असाच अभूतपूर्व प्रतिसाद द्या... २६ जुलैला भेटूया! विद्यार्थ्यांच्या हक्कांचा हा लढा असाच सुरू राहील!
Amit Thackeray10,990 次观看 • 2 个月前
没有更多内容可加载