
आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी
@amolmitkari22 • 307,907 subscribers
माजी सदस्य (विधानपरिषद सभागृह) कार्यकर्ता अजित दादांचा
Shorts
Videos

माननीय आमदारश्री Rohit Pawar जी आपण माझ्याबद्दल व्यक्त केलेल्या भावना मी दादांसाठी शेवटच्या दिवसापर्यंत प्रामाणिक पणे लढल्याची पावती आहे.आज दादांना जाऊन तीन महिने झाले.सत्ता येते जाते,संधी येते जाते,आज विधान परिषदेच्या एका जागेसाठी संधी शोधणारे दादांना न्याय मिळावा म्हणुन किती लढले ?हे दादांच्या जिवालाच माहीत.राजकारणात हाजीर तो वजीर असतो.आपला लढा दादांसाठी आयुष्यभर चालू ठेवुया.राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण व्यक्त केलेली भावना नक्कीच माझ्या हतबल मनाला सुखावणारी होती.पुनश्च आभार 🙏
आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी30,260 次观看 • 6 个月前

आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत भावनिक आहे… १२ जून २०२५ रोजी दादा माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याच्या अकोल्यातील घरी आले होते. तो क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात मोठ्या सन्मानांपैकी एक होता. अनेक जण आश्वासने देतात, पण दादांनी दिलेला शब्द पाळला आणि कार्यकर्त्याच्या घराची पायरी चढून नात्यातील विश्वास अधिक दृढ केला. आज त्या अविस्मरणीय भेटीला एक वर्ष पूर्ण झाले. वेळ पुढे सरकली, पण त्या दिवसाच्या आठवणी आजही मनात ताज्याच आहेत. दादांचे प्रेम, आपुलकी, विश्वास आणि पाठीवर ठेवलेला हात आजही ऊर्जा देतो. आज पुन्हा एकदा त्या क्षणांची आठवण येते आणि मन भरून येते. काही आठवणी काळाच्या ओघात जुन्या होत नाहीत, त्या आयुष्यभर प्रेरणा देत राहतात. दादा, तुमची खूप आठवण येते…! #12June2025 #दादांचीआठवण #कार्यकर्त्याचाअभिमान #एकअविस्मरणीयदिवस
आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी12,958 次观看 • 4 个月前

अरे टिल्ल्या तुझ्यात हिम्मत असेल तर सनातन्यांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला का विरोध केला? शिवाजी महाराजांना धर्म शुद्धीचा अधिकार नाही असे सनातन्यांनी का म्हटले? व गागाभट्टाला काशीवरून का बोलावले? या प्रश्नाचे उत्तर तेवढे दे माझाही बाउन्स न होणारा चेक तुला देतो.
आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी46,087 次观看 • 3 年前

मो. युसुफ खान यांनी गोपी चित्रपटात रामभक्त गोपीची भुमिका वठवली. प्रभू श्रीरामावरील या भजनाचे सुंदर स्वर म.रफीक साहेब यांचे आहेत. रामनवमी साजरी करण्याचे कार्यकर्त्यांनाआदेश देऊन स्वतः सहकुटुंब विदेशवारीला गेलेले तथाकथित स्वयंघोषित "हिंदू जननायक" यातून बोध घेओत.#स्वयंघोषीत
आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी39,092 次观看 • 3 年前

पतंजलीचे रामदेव बाबा यांची कपाशी पतंजली रुई बत्ती १ लाख ६० हजार रुपये क्विंटल याप्रमाणे मार्केटला उपलब्ध आहे. 25 ग्राम फुलवातीचे पॅकेट मार्केटला ४० रु.ला मिळते तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या कपाशीला ७५०० रुपये भाव. आज विधान परिषदेत याबाबत उलगडा केला. #हिवाळीअधिवेशन2022
आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी37,496 次观看 • 3 年前