
Dr.Jitendra Awhad
@Awhadspeaks • 848,691 subscribers
Born Rebel
Shorts
Videos

आमचा SIR प्रक्रियेला विरोध का आहे,यासाठी हा व्हिडीओ बघाच.हे आमच्या ठाण्याचे नामांकित माळी डॉक्टर आहेत.1982 पासून ते मतदान करत आले आहेत.आता त्यांचं नाव SIR प्रक्रियेत मतदान यादीतून वगळण्यात आले आहे. एखाद्या नामांकीत डॉक्टरांची ही परिस्थिती असेल तर सामान्य नागरिकांची व्यथा काय सांगावी..!
Dr.Jitendra Awhad73,830 次观看 • 4 天前

हे भ्याड सरकार आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलनास बसलेल्या सोनम वांगचुक यांना केंद्र सरकारने दिल्ली पोलिसांच्या मदतीने हटवले.यासोबतच आंदोलनकर्त्यांवर देखील पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला केला. गेल्या 20 दिवसापासून सोनम हे आंदोलनाला बसले होते.पण या गेंड्याच्या कातडीच्या सरकारने त्यांच्याशी साधी चर्चा करण्याचा देखील शिष्टाचार दाखवला नाही. हा सत्तेचा माज आहे,जो कायम चालणार नाही हे इथल्या उन्मत्त सत्ताधाऱ्यांनी लक्षात घ्यावे..!
Dr.Jitendra Awhad30,475 次观看 • 4 天前

येऊरच्या मध्यभागी वनखात्याकडून एक भिंत बांधली जात आहे. सर्व अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता, एकाही अधिकाऱ्याने व्यवस्थित माहिती देऊ शकला नाही. उजवीकडे, डावीकडे किंवा त्या भिंतीच्या शेवटी कोणाची जमीन आहे, याचे कोणतेही उत्तर त्यांच्याकडे नाही. आमच्या नावावर जमीन आहे. पण, इतर हक्कांमध्ये इतरांची नावे आहेत. इतर हक्कांमध्ये इतरांची नावे असलेल्या जमिनींमध्ये इतरांची नावे सुरक्षित करण्यासाठी भिंत बांधण्यात येत आहे का?, असा प्रश्न उपस्थित होतो. जंगलामध्ये सीसी बाऊंड्री... पूर्ण सिमेंटचे बांधकाम ही जरा धक्कादायक बाब आहे. येऊरमध्ये जमिनींचा वाटप कार्यक्रम वनखात्याने सुरू केला आहे की काय? सोबत एक व्हिडिओदेखील पाठवत आहे अन् एक मोठे झाड स्वतः वनखात्यानेच भिंत बांधताना तोडले आहे. वाह रे... वा! मजेशीर आहे, सगळं! गणेश नाईक साहेब, काय चालू आहे हे.
Dr.Jitendra Awhad31,134 次观看 • 25 天前

In #Manipur women broke the #EVM after they saw that after pressing any button they could see only lotus being printed A call for immediate intervention of #SupremeCourt Y does not it happen that #BJP workers get angry seeing some other party symbol being printed Election Commission of India
Dr.Jitendra Awhad567,533 次观看 • 2 年前

इंदिरा गांधी यांना आणीबाणी वरून लक्ष्य करणे,हे सत्ताधारी नेत्यांचा आजकालचा नवा छंद आहे.पण 1942 च्या स्वातंत्र्याच्या आंदोलनात,"भारताला स्वातंत्र्य मिळता कामा नये,ब्रिटिशांचा अमल राहिला पाहिजे," अशी मागणी करणाऱ्या देशविरोधी लोकांच्या बाबतीत या सत्ताधाऱ्यांच काय मत आहे..?
Dr.Jitendra Awhad21,669 次观看 • 26 天前

ठाण्यातील मुंब्रा परिसरातील खाडी किनाऱ्यावर एका व्यावसायिकाकडून पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असा प्रकार सुरू असल्याचे समोर आले. अनधिकृतपणे तेथील मौल्यवान कांदळवन नष्ट करून संबंधित जागेवर भरणी करण्यात येत होती आणि त्या जागेवर बेकायदेशीररित्या मालकी हक्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जात होता. कांदळवन हे किनारपट्टीच्या संरक्षणासाठी तसेच पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याने या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली. या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस नताशा आव्हाड आणि नगरसेविका मनीषा भगत यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेले सर्व बेकायदेशीर प्रकार त्वरित थांबवण्याची सक्त ताकीद संबंधितांना दिली. तसेच पर्यावरणाची हानी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी,अशी आग्रही आणि स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. यावेळी मुंब्रा परिसरातील स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिसरातील नैसर्गिक संपत्ती आणि जनतेच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.
Dr.Jitendra Awhad57,784 次观看 • 2 个月前
1:23
Sensitive content
This media may contain sensitive content.
6:14
Sensitive content
This media may contain sensitive content.

153 Dahisar Assembly MNS candidate Rajesh Yerunkar is saying that MNS got only 2 votes in the part where I am the is not possible that even my mother, wife, daughter did not vote for me. EVM battery was 99% full. Form no. 17C and EVM serial number do not match. This is murder of democracy
Dr.Jitendra Awhad217,210 次观看 • 1 年前

एल्विश यादव सारख्या कृप्रसिद्ध युट्युबर आणि सो कॉल्ड सोशल मीडिया इन्फ्ल्यून्सर ला या राज्याचे मुख्यमंत्री आपल्या शासकीय निवासस्थानी,गणेश आरतीसाठी बोलवत असतील,तर तो या पुरोगामी महाराष्ट्राचा अपमान आहे. महिलांच्या बाबतीत अतिशय खालच्या स्तरावर जाऊन या माणसाने अनेक स्टेटमेंट दिले आहेत.याच्या मते,स्त्रियांना मेंदू कमी असतो,बाई ही फक्त चूल आणि मुलं सांभाळण्यासाठीच असते.तिने तेवढंच करावं. हा प्रकार म्हणजे सरळ सरळ फुले दाम्पत्य,शाहू महाराज,आंबेडकर साहेब यांच्यासारख्या महान विभूतींनी स्त्रियांच्या उद्धराच जे कार्य केलं आहे त्याचा अपमान आहे.पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणारी ही घटना आहे.
Dr.Jitendra Awhad318,394 次观看 • 2 年前

हा व्हिडिओ पाहिला आणि तळपायाची आग मस्तकात गेलीय... कोणताही माणूस असू द्या क्षणात विचार करेल अरे सुरू काय आहे महाराष्ट्रात..... आवरा ह्यांना .....एखाद दिवशी यंत्रणेलाच आव्हान देतील हे ... सावध व्हा आणि कारवाई करा चांगले पी.पी द्या कोर्टात उगाच नावाला कारवाई करू नका लातूर पोलीस-Latur police
Dr.Jitendra Awhad168,845 次观看 • 1 年前

मा महाराष्ट्र राज्याचे ना मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब ह्यांच्यावर आक्षेपार्य पोस्ट करणारा काँग्रेस ठाणे प्रवक्ता गिरीश कोळी ह्याला शिवसेना कोपरी उपविभाग प्रमुख बंटी बाडकर व त्यांचे सहकारी शिवसैनिक ह्यांनी चोप दिला तसेच ती आक्षेपार्य पोस्ट डिलीट करण्यात आली व माफी मागितली…. हे इतर कुठल्या पक्षाच्या नेत्या साठी कार्यकर्त्यांनी केले तर ते गुंड .. मग पोलिस छळणार .. स्वता मुख्यमंत्री त्यात हस्तक्षेप करणार … जेल मध्ये सडवणार हे सगळे मी गेले तीन वर्ष अनुभवतो आहे .. आणि मागचे ३५ दिवस तर सगळ्या मर्यादा पार ..
Dr.Jitendra Awhad282,625 次观看 • 3 年前

राम मुंगासे या नवोदित कलाकाराने एक गाणं म्हटलं म्हणून त्याच्या घरातून संभाजीनगर पोलीसांनी त्याला अटक केली व ते त्याला अंबरनाथ पोलीसांच्या हाती देतील. पण, त्याचा गुन्हा काय ? त्याने तर कोणाचे नाव देखिल घेतले नव्हते. 50 खोके हे कोणाचे नाव आहे का हे आधी पोलीसांनी स्पष्ट करावं. 50 खोके या वक्तव्याने जातीय तणाव किंवा धार्मिक तणाव निर्माण होतो कसा हे पोलीसांनी सिद्ध करावं. म्हणजे संविधान पायदळी तुडवण्याचाच निर्णय झाला आहे असे दिसतं. आम्ही सगळे राम मुंगासे याच्या पाठिशी आहोत. संपूर्ण महाराष्ट्र त्याच्या पाठिशी उभा राहील. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा गोठू शकत नाही. हे पोलीसी राज नाही.
Dr.Jitendra Awhad274,135 次观看 • 3 年前

संतोष देशमुख यांच्या हत्येने क्रौर्याची परिसीमा गाठल्याचे सबंध महाराष्ट्राने पाहिलेले असतानाच आता लातूरच्या जानेफळ गावात महाशिवरात्रीच्या दिवशी कैलास बोऱ्हाडे या तरूणाची कातडी सोलल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लोखंडाच्या तप्त सळईने त्याच्या शरीरावर डागण्या देण्यात आल्या; कारण काय तर तो मंदिरात गेला ! गेल्या महिनाभरापूर्वी लातूरमध्येच माऊली सोट यालाही अशाच पद्धतीने संपविण्यात आले होते. शिव, फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून आपण स्वतःची पाठ थोपटून घेत असताना एका गोरगरीब मागासवर्गीय समाजातील तरुणाची केवळ मंदिरात प्रवेश केला म्हणून गरम सळईचे चटके देऊन पाठ सोलली जात असेल अन् त्याची कातडी सोलली जात असेल तर आपणाला खरंच शिव, फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घेण्याचा अधिकार आहे का? कालच मी संतोष देशमुखचे फोटो आधीच सरकारकडे असल्याचे नमूद करून सरकारचा उल्लेख "निर्दयी" असा केला होता. आता महाशिवरात्रीच्या दिवशी घडलेल्या घटनेची साधी वाच्यताही केली जात नसेल तर मी उल्लेख केलेला निर्दयी हा शब्द किती योग्य आहे, याची प्रचिती येते. केवळ मंदिरात प्रवेश केला म्हणून जर असे हालहाल करून मारले जात असेल तर या गोरगरीब, दलित समाजातील तरूणांनी कायदा हातात घेतला तर त्यास फक्त हे सरकार जबाबदार असेल !
Dr.Jitendra Awhad130,241 次观看 • 1 年前