
Baliram Doley - बळीराम डोळे
@BaliramDoleyINC • 11,603 subscribers
सचिव- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, माजी अध्यक्ष- पुणे शहर व जिल्हा इंटक, माजी अध्यक्ष-हडपसर विधानसभा काँग्रेस कमिटी
Shorts
Videos

हा काय प्रकार आहे? यावर 90,000 पेक्षा जास्त combine pre चे hallticket upload होत आहेत.इतका data leak कुठून झाला?का झाला?आणि तुम्हांला online mains घ्यायच्या आहेत..?? Maharashtra Public Service Commission CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳
Baliram Doley - बळीराम डोळे38,559 次观看 • 3 年前

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) आज टायपिंग स्किल टेस्ट घेणार होते, ज्यासाठी राज्यभरातून विद्यार्थी मुंबईला आले होते. पहिलीच बॅच 12:30 वाजेपर्यंत पूर्ण करता आली नाही आणि गोंधळ झाल्यानंतर आज आणि उद्या होणारी चाचणी रद्द करण्यात आली आहे. पुढील चाचणी 1 ऑगस्ट नंतर घेण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. पारदर्शकपणे परीक्षा घेण्याची आपली जबाबदारी असताना तांत्रिक अडचणींच्या कारणाने आपण ती TCS कंपनीच्या माथ्यावर मारून आपली नैतिक जबाबदारी नाकारत आहात का? जर प्रत्येक परीक्षा घेण्यात TCS अपयशी ठरत असेल, तर TCS कंपनीचे कॉन्ट्रॅक्ट तातडीने रद्द करावे. तसेच, दिलेले कोणतेही वेळापत्रक पाळण्यात अपयशी ठरलेल्या MPSC सचिवांनी राजीनामा द्यावा. निदान एवढी तरी नैतिकता दाखवून जबाबदारी स्वीकारावी. Maharashtra Public Service Commission Eknath Shinde - एकनाथ शिंदे Nana Patole Devendra Fadnavis Dr Suvarna S Kharat
Baliram Doley - बळीराम डोळे25,009 次观看 • 2 年前

#MPSC आंदोलन तिसरा दिवस मित्रांनो... 👉गेल्या काही दिवसापासून अविरत सुरु असलेला लढा अंतिम टप्प्यावर पोहोचला आहे. हजारो योद्धे गेल्या दोन दिवसापासून आंदोलनस्थळी तळ ठोकून आहेत.खूप दुदैव आहे महाराष्ट्रासारख्याराज्यात अभ्यास सोडून विद्यार्थ्यांना असे रस्त्यावर आंदोलन करत आहेत. 👉मा. Eknath Shinde - एकनाथ शिंदे साहेब या लाखो उमेदवारांतर्फे परत एकदा नम्र विनंती करतोय, यांच्या आर्त हाका ऐका. त्यांचा आक्रोश,तीव्र संताप आपल्यापर्यंत पोहोचला आहेच. करोडो रुपये,निधी किंवा लाभाचे काहीही मागत नाहीत.फक्त त्यांचा परीक्षा देण्याचा हक्क व त्या जागा /ती पदे त्यांना हवी आहेत. सरकारचे ते कर्तव्य व सोबत जबाबदारी देखील आहे. कल्याणकारी राज्यात हक्कच मिळत नसतील तर त्याचा उपयोग काय???? 👉प्रमुख मागण्या 1.#MPSC & IBPS exam dates Overlapping issue 25th August 2.#MPSC कृषी 2024 258 जागा नियोजित महाराष्ट्र नागरी सेवा परीक्षा 2024 मध्येच समाविष्ट करण्यात याव्या 3.#MPSC राज्यसेवा 2024 जुन्या पॅटर्ननुसार होणाऱ्या शेवटच्या राज्यसेवा जाहिरातीत उपजिल्हाधिकारी,तहसीलदार, पोलीस उपाधीक्षक, मुख्याधिकारी,शिक्षण अधिकारी सह सर्व 35 संवर्गाची किमान 1500 जागा मागणीपत्रक तात्काळ मा.आयोगाकडे पाठवण्यात यावे. गेल्या 9 महिन्यापासून याची सातत्याने मागणी हे उमेदवार करत आहेत हे आपण जाणताच. 4.#MPSC संयुक्त अराजपत्रित गट ब व गट क जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करावी. 7 महिने शासनाकडून उशीर झाला आहे. याची गंभीर दखल घेण्यात यावी Governor of Maharashtra CMO Maharashtra Devendra Fadnavis Ajit Pawar Maharashtra Public Service Commission Dr Suvarna S Kharat Nana Patole Sujata Saunik
Baliram Doley - बळीराम डोळे23,645 次观看 • 1 年前

🔶मा. Eknath Shinde - एकनाथ शिंदे साहेब पुण्यात तीन दिवस झालेले #MPSC उमेदवारांचे अफाट,तुफान गर्दीचे आंदोलन संपले असे सरकारला वाटत असेल तर सांगतो... आमच्या चार पैकी "दोन " मागण्यांवर सरकारतर्फे official statement अद्याप आले नाही. त्यामुळे मा. Devendra Fadnavis साहेब "आम्ही खालील दोन मागण्यांसाठी पुन्हा येणार,पुन्हा येणार" आता मागण्या मान्य करायच्या की आम्हाला पुन्हा रस्त्यावरची लढाई लढण्यास भाग पाडायचे हे आपण ठरवा. एव्हाना हे लक्षात आले असेलच...विनंत्या, विनवण्या,आर्जवं असे सर्व मार्ग अवलंबल्यानंतरच मी "शेवटचा पर्याय" म्हणून शांततेच्या मार्गाने ,संविधानिक हक्काने रस्त्यावरची लढाई सुरु करतो. 🔶 माझ्या एका tweet द्वारे केलेल्या विनंतीवरूनअन्यायग्रस्त,गोरगरीब, बेरोजगार #MPSC उमेदवार "हजारोंच्या " संख्येने एकत्र जमले व लढले. ह्या उमेदवारांना साथ द्यायला माझे सर्व सहकारी व 'न्याय मिळायलाच हवा ' याची जाणीव असलेला प्रत्येकजण प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे आंदोलनात तीन दिवस बसून आमच्या सोबत लढत राहिला. उर्वरित दोन मागण्या ( चारपैकी) 👉 1. राज्यसेवा जाहिरात 2024 सर्व 35 संवर्ग किमान 1500 जागा. जुन्या पॅटर्ननुसार होणाऱ्या शेवटची राज्यसेवा परीक्षा जाहिरात "सर्वसमावेशक" असावी यासाठी ऑक्टोबर 2023 पासून आपल्याकडे प्रत्येक मार्गाने पाठपुरावा करत आहे. ऑगस्ट 2024 संपला अद्याप आपण या उमेदवारांना न्याय दिलेला नाही. आम्ही रस्त्यावर उतरायचे नाही तर काय करायचे मग?????? 🔶 उपसंचालक/उपायुक्त ( आदिवासी विभाग ) , उपजिल्हाधिकारी मुख्याधिकारी गट-अ व ब, पोलीस उपाधीक्षक, तहसीलदार ,ना.तहसीलदार शिक्षणाधिकारी,उपशिक्षणाधिकारी सह सर्व 35 संवर्ग किमान 1500 जागा सह जाहिरात सुधारीत करणे. 👉पुन्हा एकदा नम्रपणे आठवण करून देत आहे काँग्रेस सरकारच्या काळातील 2012, 2013,2014 च्या जाहिरातीत उपजिल्हाधिकारी :- 42 ,44 पोलीस उपाधीक्षक :- 40, 24 तहसीलदार :- 38,35 ना.तहसीलदार :- 227 सहायक गट विकास अधिकारी:-100 असे आकडे एक दशकापूर्वी होते. आता हे सर्व आकडे या जाहिरातीत चक्क शून्य /ZERO असे फक्त "भोपळे"आहेत. काँग्रेस सरकारने काढलेल्या राज्यसेवा जाहिरातीतील आकडे एक दशकानंतर किमान दुप्पटीने वाढायला हवे. ते तर दूरदूरपर्यंत दिसत नाही. पण आपण तर "शून्यावर" नेऊन ठेवला महाराष्ट्र. 👉2. महाराष्ट्र अराजपत्रित संयुक्त गट-ब व गट -क जाहिरात 15000 जागांसहित तात्काळ प्रसिद्ध करणे बाबत मा. Maharashtra Public Service Commission ने नोव्हेंबर 2023 मध्ये जाहीर केल्याप्रमाणे ही जाहिरात फेब्रुवारी 2024 मध्ये प्रसिद्ध होणार होती व परीक्षा 16जुनला नियोजित होती. 7 महिने उलटून गेले अद्याप जाहिरातीचा पत्ता नाही. जवळपास 5 लाख उमेदवार यामुळे प्रचंड तणावात आहेत. अजून सरकारकडून मागणीपत्रक तयार नाही.विनंत्या,विनवण्या ,पाठपुरावा करून झाल्यावर 7 महिन्यानंतर उमेदवार रस्त्यावर उतरले.काय चुकलं त्यांचं ??? 🔶किती अन्याय होणार आहे अजून? किती अंत बघणार? परीक्षा देण्याचा त्यांचा हक्क,नौकरीची संधी या मूलभूत गोष्टीसाठी आंदोलन करण्याची वेळ येते यातच सरकारचे व मा.Dr Suvarna S Kharat आपले अपयश आहे 🔶 वरील दोन मागण्या तात्काळ मान्य नाही झाल्यास.....आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरूनच लढणार आहोत याची कृपया नोंद घ्यावी. Governor of Maharashtra CMO Maharashtra Devendra Fadnavis Nana Patole Ajit Pawar Maharashtra Public Service Commission Dr Suvarna S Kharat Mallikarjun Kharge Rahul Gandhi Ramesh Chennithala TV9 Marathi ABP माझा ZEE २४ तास SaamTV News @News18lokmat SakalMedia LoksattaLive Lokmat Maharashtra Times ashish jadhao nikhil wagle Prashant Kadam AajTak Mumbai Tak Pudhari News Lokshahi Marathi Adv. Yashomati Thakur Vijay Wadettiwar Maharashtra Congress Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳 ravish ndtv Varun Choudhary K C Venugopal Satej (Bunty) D. Patil Vishal Prakashbapu Patil Dr. Vishwajeet Kadam Praniti Shinde Amit V. Deshmukh MAHARASHTRA DGIPR Alankar Sawai | अलंकार सवाई
Baliram Doley - बळीराम डोळे23,048 次观看 • 1 年前

🔶🔶🔶🔶 निवडणुकीच्या अतिव्यस्त schedule मधून अमूल्य वेळ काढून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा.नानाभाऊ Nana Patole यांनी स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या समस्या व अडचणी जाणून घेण्यासाठी 24 ऑक्टोबर रोजी पुण्यात महासंवाद साधला व अनेक वेगवेगळ्या विषयावर चर्चा केली. त्यानंतर मा.नानाभाऊनी या सर्वांना न्याय देण्यासाठी खालील महत्वपूर्ण घोषणा केल्या ज्याद्वारे लाखो स्पर्धा परीक्षा उमेदवारांना नक्कीच सुगीचे दिवस येऊन उज्ज्वल भविष्याची दारे खुली होतील यात शंका नाहीच. 1. 🔶🔶 #MPSC उमेदवारांसाठी 👉 केरळच्या धर्तीवर #MPSC चे सक्षमीकरण करण्यात येईल. 👉 राज्यसेवा मुख्य 2024 जाहिरात आतापर्यंतची रेकॉर्डब्रेक पदांची जाहिरात असेल. 👉 संयुक्त अराजपत्रित मुख्य 2024 जाहिरात #PSI :- गेल्या दशकातील सर्वोच्च PSI पदभरती केली जाईल #STI :- गेल्या दशकातील सर्वोच्च STI पदभरती केली जाईल 👉 सरकारच्या नाकर्तेपणामुळे संयुक्त अराजपत्रित 2024 जाहिरात तब्बल 9 महिने उशिरा आली. साहजिकच हजारो उमेदवारांना age limit cross केल्यामुळे फॉर्म भरता येत नाही. त्यांच्यासाठी तात्काळ निर्णय घेऊन त्यांना परीक्षेसाठी पात्र करण्याचा योग्य निर्णय घेतला जाईल. 👉 दळवी समितीच्या राज्यसेवा मुख्य साठीच्या #UPSC चा Copy paste syllabus शिफारशी रद्द करण्यात येतील. व नवीन समिती नेमून सध्याच्या objective pattern mains syllabus मध्ये गरज पडल्यास समिती म्हणेल त्याप्रमाणे काही बदल करून objective pattern continue करण्यात येईल. सर्वांना समान न्याय् व संधी मिळेल. 👉 बार्टी,सारथी, अमृत,महाज्योती व आदिवासी बांधवांची TRTI यात सुरु असलेला गैरव्यवहार उघडकीस आणण्यासाठी श्वेतपत्रिका काढण्यात येईल. यात जे कुणी संचालक/ क्लासचालक/मध्यस्थ /दलाल दोषी आढळतील त्या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. 2. 🔶🔶 सरळसेवा उमेदवारांसाठी 👉कंत्राटीकरण पदभरतीचा जी आर फक्त नावाला रद्द करण्यात आला.तरी खुलेआम कंत्राटी पदभरती केली जात आहे. उदा:- आरोग्य विभाग भरती तात्काळ हे सर्व बंद करण्यात येईल. कोणत्याच परिस्थितीत राज्यात कंत्राटी पदभरती केली जाणार नाही 👉 पोलीस भरती :- टप्प्याटप्प्याने रेकॉर्डब्रेक पोलीस भरती करण्यात येईल 👉 जलसंपदा पदभरती केली जाईल 👉 BMC सहित इतर मनपा पदभरती केली जाईल 👉 आदिवासी बांधवांवर होत असलेला अन्याय थांबवून पदभरती करण्यात येईल 👉 रखडलेल्या सरळसेवा पदभरती करण्यात येतील 👉 येणारी प्रत्येक सरळसेवा परीक्षा #MPSC मार्फतच घेण्यात येतील 👉 1000 रुपये परीक्षा शुल्कापासून कायमची मुक्तता मिळेल 👉 कोणत्याच जाहिरातीत उच्च शिक्षण हे अडसर ठरणार नाही ,याची काळजी घेतली जाईल . 👉 जुनाट सेवाप्रवेश नियम बदलून त्यात काळानुरूप बदल करण्यात येतील. 👉 आवश्यक त्या विभागाचे नवीन आकृतीबंध तयार करण्यात येतील. 👉 पदभरती जाहिरातीतील अनावश्यक व जाचक अटी वर निर्बध घालण्यात येतील 👉 बोगस दिव्यांग व बोगस खेळाडू प्रमाणपत्रावर आळा घालण्यासाठी कठोर पाऊले उचलली जातील खऱ्याखुऱ्या दिव्यांग व खेळाडूंना न्याय मिळेल 3. 🔶🔶 शिक्षक बांधवासाठी व शिक्षणाच्या हक्कासाठी 👉 शिक्षण-सेवक पद रद्द करण्यात येईल. हजारो शिक्षक बांधवांकडून वारंवार मा.नानाभाऊंकडे ही मागणी करण्यात येत होती. 👉 समूहशाळा व दत्तकशाळा संदर्भातील जाचक जीआर रद्द करण्यात येईल. Maharashtra Public Service Commission
Baliram Doley - बळीराम डोळे18,818 次观看 • 1 年前

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा.नाना पटोले साहेबांनी आज महाराष्ट्राचे मा.मुख्यमंत्री व मा.मुख्य सचिव यांना call करून खालील मुद्द्यांवर तातडीने कार्यवाही करण्यास सांगितले 1. कालपासून सुरु झालेल्या पोलीस भरती उमेदवारांचे पावसामुळे प्रचंड हाल होत आहेत.त्यांची राहण्याची व इतर व्यवस्था करावी 2.राज्यसेवा 2024 साठी डेप्युटी कलेक्टर,डीवायएसपी सहित सर्व संवर्गाच्या जागा लवकरात लवकर भरण्यात याव्यात. जुन्या पॅटर्ननुसार होणाऱ्या शेवटच्या परीक्षेत गोरगरीब मुलांना न्याय द्यावा. 3.कर सहायक waiting list मधील मुलांना तातडीने नियुक्ती देण्यात यावी 4. combined exam गृप b व गृप C ची जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात यावी व जास्तीत जास्त पदे याद्वारे भरण्यात यावेत. Nana Patole Eknath Shinde - एकनाथ शिंदे MAHARASHTRA DGIPR Rahul Gandhi Devendra Fadnavis
Baliram Doley - बळीराम डोळे18,908 次观看 • 2 年前

सरकार अन् आयोग वारंवार आम्ही प्रश्न मांडूनही ऐकत नसेल तर आम्हाला पुन्हा एकदा रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही. #ONEEXAMONECUTOFF साठी लवकरच राज्यव्यापी आंदोलन घेण्यात येईल.अन् हे देशातील सर्वात मोठं आंदोलन असेल. Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳 Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Nana Patole
Baliram Doley - बळीराम डोळे11,564 次观看 • 3 年前
没有更多内容可加载