Chandrashekhar Bawankule's banner
Chandrashekhar Bawankule's profile picture

Chandrashekhar Bawankule

@cbawankule112,914 subscribers

Revenue Minister Govt. of Maharashtra | Guardian Minister Nagpur & Amravati District.

Videos

cbawankule's profile picture

ही तर खोटारडेपणाची हद्द झाली ! पुराव्यानिशी खोटेपणा बघा!! व्हिडिओ डिसेंबर 2023चा 'मिचौंग' चक्रीवादळामधील चेन्नई एअरपोर्टचा. दाखवला आज, मुंबई एअरपोर्टचा आहे म्हणून! आम्ही प्रसारमाध्यमाचा कायमच संपूर्ण आदर करतो. पण, स्पर्धेच्या लालसेपोटी जनतेला वेठीस का धरता? हा यक्षप्रश्न आहे. गेल्या 24 तासांत मुंबईत मुसळधारेने जनजीवन अस्तव्यस्त केले आहे. प्रशासन जनतेच्या मदतीसाठी संपूर्ण क्षमतेने उभे आहे. सरकार शक्य ते सर्व प्रयत्न जनतेच्या भल्यासाठी करत आहे. दिलासा देत आहे, मदत करत आहे. अफवांच्या बाजाराला थोपवत आहे. पण, टीआरपीचा धंदा काही थांबत नाही. या पावसानं मुंबईचा एअरपोर्ट भरला, धावपट्टी पाण्यात बुडाली. किती भीषण स्थिती निर्माण झाली याचे रसरसून वर्णन केले जात आहे. टीव्हीवरून विमानतळावरील भयंकर व्हिडिओ टीव्हीवरून दाखविले जात आहेत. साहजिकच, प्रवाशी व जनतेत भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. पण प्रत्यक्षात हा प्रकार महाप्रचंड चीड आणणारा, किळसवाणा, उद्वेकजनक आहे. मुंबई विमानतळाचा आजचा म्हणून जो व्हिडिओ Exclusive म्हणून दाखविण्यात येत आहे , तो प्रत्यक्षात चेन्नई विमानतळावरचा आहे. दीड वर्षांपूर्वीचा. डिसेंबर 2023 मधील !! 'मिचौंग' चक्रीवादळामुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे धावपट्टी आणि विमानतळाच्या परिसरामध्ये पाणी भरले होते. तो व्हिडिओ आज मुंबई एअरपोर्टचा म्हणून दाखवण्यात आला. माध्यमांनी जनतेला जागे करण्यासाठी व प्रशासनाच्या चुकांवर बोट ठेवण्यासाठी काम जरूर करावे. मात्र असा खोटारडेपणा करून जनतेला अधिक त्रासात नेणे कितपत योग्य आहे? यातून काय साध्य झाले? कोणाला वेठीस धराल? ही तर खोटारडेपणाची हद्द झाली ! PMO India CMO Maharashtra Devendra Fadnavis जी Murlidhar Mohol जी MoCA_GoI Ram Mohan Naidu Kinjarapu जी Ministry of Information and Broadcasting SaamTV News MAHARASHTRA DGIPR PIB India Chennai (MAA) Airport Mumbai Airport SakalMedia #Maharashtra #Mumbai #RevenueMinister #ChandrashekharBawankule

Chandrashekhar Bawankule

84,874 Aufrufe • vor 10 Monaten

cbawankule's profile picture

आई आई, तू गेल्यानंतर खूप गमावून बसलो.. नेमके काय हरवले..काय गमावले ती समज नाही मला आणि,शब्दही नाहीत ते सांगायला.. मी अपूर्ण आहे, तुझ्याविना..! आभाळाकडे पाहिले, ढग फिरत होते... कल्लोळ करत होते.. आसमंत भरून आला होता.. एक क्षण वाटले.. तू थेंब बनून परतशील.. आई,तू कायमची सोडून गेलीस.. तू सोबत असेपर्यंत, मी लहान होतो.. खरंच सांगतो, आता क्षणार्धात मोठा झालो... एक सांगू, मुलगा हा आयुष्यभर लहानच असावा.. त्याला आईची सोबत असावी.. तू अनंत हालअपेष्टा भोगल्या आम्हाला घडवले, घराला सावरले, संसार उभा केला.... ईश्वरेच्छेने तू आज अनंतात विलीन झालीस पण, ते काहीही असले, तरी तू कायम माझ्यासोबत आहेस... आजूबाजूला.. मायेची ऊब देत.. तुला देवाज्ञा नव्हे, आई, तूच देव झालीस..!! • चंद्रशेखर 🙏

Chandrashekhar Bawankule

129,692 Aufrufe • vor 2 Jahren

cbawankule's profile picture

भारत जमीन का टुकडा नहीं, जीता जागता राष्ट्रपुरुष है. इसका कंकर - कंकर शंकर है, इसका बिंदू- बिंदू गंगाजल है... भारतीय मनात राष्ट्रचेतना निर्माण करणारी ही भावना अद्भुत राजकीय प्रतिभा, अद्वितीय राष्ट्रसेवक, असंख्य भारतीयांचे प्रेरणास्रोत, आम्हा सर्वच कार्यकर्त्यांचे प्रिय... भारतरत्न श्रद्धेय अटलजी यांची! याच शब्द सुमनांनी आम्ही घडलो... अटलजी अभिमानाने सांगायचे," माझी कविता युद्धाचे रणशिंग फुंकते तिला पराभवाची प्रस्तावना आवडत नाही. " अटलजींचे वैशिष्ट्य असे की, संयुक्त राष्ट्र संघामध्ये देशाचे प्रतिनिधित्व करताना राष्ट्रभाषा हिंदीतून भाषण देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान. जय जवान, जय किसान, जय विज्ञान...' ही घोषणा म्हणजे भारतीय जाणीवांचे मुर्तरूप आहे. भारतीय तत्त्वविचारांचा गाभा असणारा सहिष्णू, विश्वकल्याणाची आस असणारा राष्ट्रवादाचा समुच्चय म्हणजे अटलजी.. देशासाठी 'राम' आणि 'रोटी' सारख्‍याच महत्त्वाचे आहेत असे भाजप मानतो... असं हृदयात बिंबवणारे श्रद्धेय अटलजी.. सुशासन, सेवा आणि गरीब कल्याणाच्या दिशेने अटलजींनी भारतीयांचे आस्था सूत्र बांधले.. आपली वाटचाल याच दिशेने आहे. अटलजी म्हणतात : मैं अखिल विश्व का गुरू महान, देता विद्या का अमर दान, मैंने दिखलाया मुक्ति मार्ग मैंने सिखलाया ब्रह्म ज्ञान। श्रद्धेय अटलजींना माझी विनम्र आदरांजली.. #AtalBihariVajpayeeJi

Chandrashekhar Bawankule

65,338 Aufrufe • vor 2 Jahren

cbawankule's profile picture

दादा… आज अजितदादांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करताना मन अक्षरशः गदगदून गेलं… हात फुलांनी भरलेले होते, पण मन सुन्न झालं होतं. डोळ्याच्या कडा पाणावल्या. दादा देहरूपी आपल्यात नाहीत, हे दुःखद, कटू सत्य अजूनही मन स्वीकारायला तयार नाही. आताही वाटतं, कधीही अचानक दादांचा फोन येईल… “मी अमुक ठिकाणी आहे… अमुक व्यक्तीचं असं काम आहे… करून टाका!” तो ठाम आवाज, ती कामाची तळमळ, ती आपुलकी… सगळंच अजूनही कानात घुमतंय. दादा प्रत्येक कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून त्याला मोठं करणारे नेते होते. त्यांच्या उपस्थितीने आत्मविश्वास मिळायचा, त्यांच्या शब्दांनी ऊर्जा मिळायची. दादा, तुमची उणीव कधीही भरून निघणार नाही… तुम्ही सदैव आमच्यात आहात... मार्गदर्शक म्हणून… आणि मित्र म्हणून.....

Chandrashekhar Bawankule

15,050 Aufrufe • vor 5 Monaten

cbawankule's profile picture

अभिनंदन देवेंद्रजी! भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ पक्षाच्या व तत्पूर्वी झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत सर्वानुमते महाराष्ट्राचे इन्फ्रामॅन, अष्टपैलू कर्तुत्वाचे धनी, सर्व बंधू भगिनींचे लाडके देवा भाऊ अर्थातच भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय Devendra Fadnavis जी यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात व पंतप्रधान आदरणीय Narendra Modi जी, गृहमंत्री आदरणीय Amit Shah भाई, राष्ट्रीय अध्यक्ष Jagat Prakash Nadda जी, केंद्रीय मंत्री आदरणीय Nitin Gadkari जी यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीने विधानसभा निवडणुका लढवल्या. या विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक बहुमत प्राप्त झाले. उद्याचा शपथविधीचा दिवस म्हणजे आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाचे व राज्यातील लाखो कार्यकर्त्यांच्या कष्टाचे फळ आहे. महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी आजचा हा क्षण अतिशय आनंददायी व हर्षोल्हास साजरा करण्याचा क्षण आहे. Chandrakant Patil दादा व Sudhir Mungantiwar भाऊ यांनी देवेंद्रजींच्या नावाचा प्रस्ताव विधिमंडळ गटनेतेपदासाठी मांडला. या प्रस्तावाला समर्थन देत महाराष्ट्राच्या विकासासाठी दिवसरात्र मेहनत करणाऱ्या व विरोधकांच्या कटकारस्थानांना, खोटारडेपणाला पुरून उरणाऱ्या आदरणीय देवेंद्रजींसारख्या उत्तम नेतृत्व, वक्तृत्व, कर्तुत्व व चारित्र्य असलेल्या व्यक्तिमत्त्वाची निवड भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ गटनेतेपदी करताना आम्हा सर्वांना अभिमान आहे. यावेळी केंद्रीय निरीक्षक केंद्रीय अर्थमंत्री Nirmala Sitharaman जी, गुजरातचे माजी मुख्यमंत्री Vijay Rupani Memorial जी, भाजपाचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री Shivprakash जी, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस Vinod Tawde जी, मुंबई भाजपा अध्यक्ष Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार जी यांच्यासह महाराष्ट्र भाजपाचे सर्व नेते, कोअर कमिटी सदस्य, विधिमंडळ सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते. #BJP #Maharashtra #DevendraFadnavis #ChandrashekharBawankule

Chandrashekhar Bawankule

32,424 Aufrufe • vor 1 Jahr

cbawankule's profile picture

मनःपूर्वक आभार! मुख्यमंत्री आदरणीय Devendra Fadnavis जी यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात आज राज्याचा मंत्री म्हणून शपथ घेण्याचा मला पुन्हा एकदा बहुमान प्राप्त झाला. हा क्षण माझ्यासाठी अतिशय आनंदाचा व भाग्याचा क्षण आहे. आपल्या सर्वांचे प्रेरणास्त्रोत, युगपुरुष, विश्वगौरव, देशाचे यशस्वी प्रधानमंत्री आदरणीय Narendra Modi जी यांच्या नेतृत्वात विकसित भारताच्या दिशेने देश घौडदौड करीत असताना मला महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून त्यात योगदान देण्याची संधी मिळत आहे, याचा मला सर्वाधिक आनंद आहे. ही अमूल्य संधी देत असल्याबद्दल आदरणीय मोदीजींचे मी मनःपूर्वक आभार मानतो. देशाचे यशस्वी गृहमंत्री, आधुनिक भारताचे पोलादी पुरुष मा. श्री Amit Shah भाई BJP राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय मंत्री मा.Jagat Prakash Nadda जी, भाजपा राष्ट्रीय संघटनमंत्री मा. B L Santhosh जी, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री मा. Shivprakash जी यांचे मला सदैव मार्गदर्शन मिळत आले आहे. केंद्रीय मंत्री आदरणीय Nitin Gadkari जी यांचे मला नेहमी मार्गदर्शन मिळत असते. विधानसभा निवडणूक प्रभारी केंद्रीय मंत्री मा. Bhupender Yadav जी सहप्रभारी केंद्रीय मंत्री मा. Ashwini Vaishnaw जी यांचे देखील मला नेहमी मार्गदर्शन मिळत आले आहे. आज राज्याचा मंत्री म्हणून शपथ घेत असताना मला सदैव काम करण्याची संधी, मार्गदर्शन व प्रोत्साहन दिल्याबद्दल या सर्व मान्यवरांचा मी ऋणी आहे. मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीने या विधानसभा निवडणुका लढल्या. राज्याच्या विकासाला गती देत असताना पायाला भिंगरी लावून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. महायुतीच्या सर्व उमेदवारांचा त्यांनी दिवसरात्र एक करून प्रचार केला. या काळात त्यांनी कायम मला मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले आहे. त्यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळात ते आज मला काम करण्याची संधी देत आहेत. राज्याचा मंत्री म्हणून शपथ घेत असताना यामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या कष्टाचा खूप मोठा वाटा आहे, याची मला जाणीव आहे. या सर्वांसाठी मी आदरणीय श्री.देवेंद्रजींचे मनापासून आभार व्यक्त करतो. ज्यांच्या आशीर्वाद, प्रेम व विश्वासाशिवाय हा चंद्रशेखर बावनकुळे शून्य आहे, असे माझे आई- वडील, आप्त, हितचिंतक, स्नेही, पक्षाचे नेते- कार्यकर्ते व माझी मायबाप जनता आपल्या सर्वांचा मी ऋणी आहे. आपल्या सेवेत मी सदैव तत्पर असेन हा विश्वास याप्रसंगी व्यक्त करतो. आजचा हा क्षण पाहण्यास आई देहरूपी माझ्यासोबत नाही. आईची आज प्रकर्षाने आठवण येते आहे. पण, तिचे आशीर्वाद सदैव माझ्या सोबत असतात. आजचा हा क्षण मी तिला समर्पित करतो. आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार! माझ्या कामठी - मौदा मतदासंघातील जनतेने आजचा हा मौलिक क्षण मला मिळवून दिला, त्यांचे आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. हा चंद्रशेखर बावनकुळे सदैव आपल्या ऋणात आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.. जय शिवराय! #Maharashtra #Nagpur #ChandrashekharBawankule #MaharashtraMinister #Oath #MaharashtraCabinetExpansion #MaharashtraCabinet

Chandrashekhar Bawankule

16,897 Aufrufe • vor 1 Jahr