
Chandrakant Patil
@ChDadaPatil • 350,735 subscribers
Minister of Higher & Technical Education, Parliamentary Affairs - Govt Of Maharashtra | MLA Kothrud | BJP | RSS | Former President @bjp4maharastra
Shorts
Videos

नवीन शैक्षणिक धोरण आणि प्राध्यापक भरतीच्या निकषांबाबत विधानपरिषदेत भूमिका मांडली. सध्याची प्राध्यापक संख्या शासन निर्णयानुसारच निश्चित करण्यात आली असून, यामध्ये काही त्रुटी आढळल्यास त्या तात्काळ सुधारल्या जातील, असे सभागृहात नमूद केले. 📍विधानभवन,मुंबई | २ जुलै २०२६ #MonsoonSession2026 #पावसाळी_अधिवेशन२०२६ #प्राध्यापकभरती #शैक्षणिकधोरण CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar भाजपा महाराष्ट्र
Chandrakant Patil158,251 views • 4 months ago

गुरुजनांचा सन्मान, उज्ज्वल भविष्याची उभारणी! आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे आयोजित सोहळ्यात राज्यातील ४२ गुणवंत शिक्षकांना 'डॉ. जे. पी. नाईक राज्य शिक्षक पुरस्काराने' गौरविताना मनस्वी आनंद झाला. या पुरस्कार सोहळ्यातील क्षणचित्रे... 📍 ५ सप्टेंबर २०२६, पुणे #DrJPNaikAward #HigherEducation #PuneUniversity #EducationalExcellence #TeacherAwards #शिक्षक_पुरस्कार #उच्च_आणि_तंत्रशिक्षण #पुणे CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar भाजपा महाराष्ट्र
Chandrakant Patil18,051 views • 2 months ago

संकल्प निसर्ग संवर्धनाचा, निर्धार हरित महाराष्ट्राचा!🌱 आज सांगली येथे ‘हरित महाराष्ट्र ३०० कोटी वृक्ष लागवड अभियान’ अंतर्गत मिरज रेल्वे स्टेशन परिसरात वृक्षारोपण करून अभियानाचा शुभारंभ केला. वृक्षारोपण प्रसंगीची क्षणचित्रे! #HaritMaharashtra #३००कोटीवृक्षलागवड #वृक्षलागवड #हरितमहाराष्ट्रअभियान #Environment #GoGreen #Sangli #सांगली CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar भाजपा महाराष्ट्र
Chandrakant Patil19,950 views • 3 months ago

डॉ. जे.पी. नाईक आदर्श शिक्षक पुरस्कारांची निवड ही कोणत्याही शिफारशीविना, केवळ गुणवत्ता आणि पारदर्शकतेच्या आधारेच करण्यात आली आहे. 'चौकट वाढवेन पण ती मोडणार नाही' या भूमिकेवर ठाम राहत, शिक्षकांच्या सन्मानाची ही समृद्ध परंपरा आम्ही जपली आहे. (५ सप्टेंबर २०२६ | डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य पुरस्कार सोहळा, पुणे) #आदर्शशिक्षकपुरस्कार #शिक्षकसन्मान #गुणवत्ता_आणि_पारदर्शकता #डॉजेपीनाईक #EducationFirst #Pune CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar भाजपा महाराष्ट्र
Chandrakant Patil14,603 views • 2 months ago

"अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग..!" आज आषाढी एकादशीच्या या अत्यंत पावन मुहूर्तावर पुण्याच्या कर्वेनगर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विठूरायाचे दर्शन घेतले आणि भाविकांसाठी प्रसाद वाटपाची सेवा केली. विठूमाऊलीची कृपा तुम्हा-आम्हा सर्वांवर अशीच राहो, अशी प्रार्थना केली. या प्रसंगीची क्षणचित्रे... 📍 २५ जुलै २०२६, पुणे #आषाढीएकादशी #विठूमाऊली #विठ्ठलरुक्मिणी #कर्वेनगर #कोथरूड #Pune #AshadhiEkadashi #Karvenagar CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar भाजपा महाराष्ट्र
Chandrakant Patil20,249 views • 3 months ago

महाराष्ट्राच्या सुपुत्रांनी घडवला सुवर्ण इतिहास! 🇮🇳 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पुरुष पॅरा १०० मीटर T47 प्रकारात ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून नवा विक्रम प्रस्थापित करणारे महाराष्ट्राचे सुपुत्र दिलीप गावीत तसेच रौप्यपदक पटकावणारे मोहम्मद बासिल यांचे मनःपूर्वक अभिनंदन! राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात पॅरा ॲथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणारे पहिले भारतीय पुरुष खेळाडू होण्याचा मान दिलीप गावीत यांनी मिळवला, ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. दोन्ही खेळाडूंची ही दैदिप्यमान कामगिरी देशातील असंख्य युवा खेळाडूंना नवी प्रेरणा देणारी ठरेल. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! #CommonwealthGames2026 #TeamIndia #MaharashtraPride #ParaAthletics #DilipGavit BJP Narendra Modi Nitin Nabin Amit Shah B L Santhosh CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar भाजपा महाराष्ट्र
Chandrakant Patil18,545 views • 3 months ago

कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी पेलणाऱ्या एकल माता आणि त्यांच्या पाल्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी 'एकल' विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास आणि त्यांच्या आयुष्यातील संघर्षाला योग्य आधार देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. (५ सप्टेंबर २०२६ | डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य पुरस्कार सोहळा, पुणे) #एकलमाता #एकलविद्यार्थी #EkalStudents #SingleMother #StudentSurvey #EducationSupport #WomenEmpowerment CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar भाजपा महाराष्ट्र
Chandrakant Patil11,901 views • 2 months ago

आपल्या आयुष्यातील प्रत्येक परंपरेमागे एक सखोल अर्थ आणि विज्ञान असते. केवळ अंधानुकरण न करता, त्यामागील मूळ उद्देश व तर्क समजून घेऊन, त्यांना विवेकाने आचरणात आणणे हीच खऱ्या शिक्षणाची दिशा आहे. (५ सप्टेंबर २०२६ | डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य पुरस्कार सोहळा, पुणे) #IndianTradition #TraditionAndScience #वैज्ञानिकदृष्टिकोन #विवेकवादीविचार CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar भाजपा महाराष्ट्र
Chandrakant Patil11,039 views • 2 months ago

अमली पदार्थांचा वाढता वापर सर्वांसाठीच चिंतेचा विषय आहे. अमली पदार्थ विरोधी लढा अधिकाधिक तीव्र करण्यासाठी आपण सर्वांनीच कटिबद्ध झाले पाहिजे. कोथरुड हे माझं घर असल्याने माझं घर स्वच्छ ठेवण्यासाठी मी आणि नागरिकांनी एकत्र येऊन "अमली पदार्थमुक्त कोथरुडचा" संकल्प केला. यावेळची काही क्षणचित्रे... #pune #kothrud #drug #socialwork BJP Narendra Modi Jagat Prakash Nadda Amit Shah B L Santhosh CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar भाजपा महाराष्ट्र
Chandrakant Patil49,846 views • 1 year ago

ऑनलाइन परीक्षा प्रणालीतील गैरप्रकार अत्यंत गंभीर असून, केवळ विद्यापीठ पातळीवर चौकशी न ठेवता या प्रकरणात सलगर या व्यक्तीच्या नावासहित संपूर्ण प्रकरणाची CID चौकशी करण्याची सूचना आज शासनातर्फे विधानपरिषदेत दिली. 📍विधानभवन,मुंबई | २५ जुन २०२६ #MonsoonSession2026 #पावसाळी_अधिवेशन२०२६ #सार्वजनिक_विद्यापीठ #UniversityExam #CIDInquiry #ExamSecurity CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar भाजपा महाराष्ट्र
Chandrakant Patil14,967 views • 4 months ago

विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षा प्रणालीत फेरफार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ३ कर्मचाऱ्यांवर FIR सह ८ विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले आहे. डिजिटल मार्किंगमुळे आरोपी तात्काळ पकडले गेले असून, भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी आवश्यक गोष्टींची काळजी घेण्यासंदर्भात समिती गठीत केली असल्याची माहिती आज विधानपरिषदेत दिली. 📍विधानभवन,मुंबई | २५ जुन २०२६ #MonsoonSession2026 #पावसाळी_अधिवेशन२०२६ #सार्वजनिक_विद्यापीठ #UniversityExam #PaperLeak #ActionTaken CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar भाजपा महाराष्ट्र
Chandrakant Patil14,194 views • 4 months ago

पुणे शहरात संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, भाविक आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी करण्यात आलेल्या वाहतूक नियोजनाबाबत अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी माहिती दिली. कृपया सगळ्यांनी सहकार्य करावे. #पालखी #आषाढीवारी #वारी #TrafficPlan #PunePolice #Palkhi2026 CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar भाजपा महाराष्ट्र BJP Pune City
Chandrakant Patil11,816 views • 4 months ago

आज विधानसभेत राज्यातील प्रत्येक महाविद्यालयात NEP च्या सुरू असलेल्या थेट अंमलबजावणीचा सविस्तर आढावा दिला. यामध्ये मातृभाषेतून उच्च शिक्षण, आवडीचे विषय निवडण्याचे स्वातंत्र्य, 'मल्टीपल एन्ट्री-एक्झिट'मुळे वर्ष वाचण्याची सोय आणि थेट रोजगार देणाऱ्या कौशल्याधारित अभ्यासक्रमांमुळे आपली शिक्षण व्यवस्था जागतिक दर्जाची बनवण्यावर विशेष भर दिला जात असल्याचे नमूद केले. 📍विधानभवन,मुंबई | ९ जुलै २०२६ #MonsoonSession2026 #पावसाळी_अधिवेशन२०२६ #नवीन_शैक्षणिक_धोरण #NEP BJP Narendra Modi Nitin Nabin Amit Shah B L Santhosh CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar भाजपा महाराष्ट्र
Chandrakant Patil11,685 views • 4 months ago

आज पुणे येथे IISER Pune आणि I-HUB QTF आयोजित 'महाराष्ट्र क्वांटम टेक्नॉलॉजी मिशन' फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचा प्रमाणपत्र वितरण सोहळा यशस्वीरित्या संपन्न झाला. या प्रसंगीची क्षणचित्रे..! 📍१७ जुलै २०२६, पुणे #IISERPune #IHUBQTF #QuantumTechnology #MaharashtraQuantumMission #Pune #Research CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar भाजपा महाराष्ट्र
Chandrakant Patil10,795 views • 3 months ago

वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दिशेने आणखी एक ठोस पाऊल! राजाराम पूल ते म्हात्रे पूल डीपी रस्त्यावरील परिस्थितीची संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांसमवेत प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणी प्रसंगीची क्षणचित्रे... #Kothrud #RajaramBridge #TrafficManagement #Pune #कोथरूड #पुणे #राजारामपूल CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar भाजपा महाराष्ट्र
Chandrakant Patil10,539 views • 3 months ago

नशामुक्त भारत अभियानाचे उत्तम परिणाम दिसून येत आहेत. अंमली पदार्थांच्या तस्करांवर कडक कारवाई केली जात असून, तरुणांच्या सुरक्षित भविष्यासाठी ही मोहीम सातत्याने सुरू आहे. -केंद्रीय गृह तथा सहकारमंत्री अमितभाई शाह जी #DrugsFreeBharat BJP Narendra Modi Nitin Nabin Amit Shah B L Santhosh CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar भाजपा महाराष्ट्र
Chandrakant Patil11,489 views • 4 months ago

मनःपूर्वक आभार! आज राज्य मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथ घेतली. महायुतीला राज्यातील जनतेने दिलेला बहुमताचा कौल ही ऐतिहासिक घटना आहे. महायुती मंत्रिमंडळात पुन्हा एकदा सहभागी होण्याचा बहुमान मिळणे ही माझ्या दृष्टीने भाग्याची बाब आहे. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनात तसेच मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात स्थापन झालेले महायुती सरकार विकासाचा संकल्प पूर्ण करून नवीन आयाम प्रस्थापित करेल यात तीळमात्र शंका नाही. आज मंत्रीपदाची शपथ घेताना महाराष्ट्रातील तमाम जनतेचे आभार मानून नव्या विकासपर्वाच्या वाटचालीत समर्पित भावनेने काम करण्याचा संकल्प करतो. महायुती मंत्रिमंडळात मंत्रिपदाची पुन्हा जबाबदारी दिल्याबद्दल पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी, केंद्रीय गृहमंत्री मा. अमित शाहजी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. जे पी नड्डाजी, मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार ! #Maharashtra #Nagpur #ChandrashekharBawankule #MaharashtraMinister #Oath #MaharashtraCabinetExpansion #MaharashtraCabinet BJP Narendra Modi Jagat Prakash Nadda Amit Shah B L Santhosh Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar भाजपा महाराष्ट्र
Chandrakant Patil32,166 views • 1 year ago
