
Harshwardhan Sapkal
@INCHarshsapkal • 13,485 subscribers
President Maharashtra Pradesh Congress Committee. Ex President, Rajiv Gandhi Panchayt raj sanghthan (RGPRS), New Delhi. Ex MLA, Maharashtra Assembly.
Shorts
Videos

राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होणे ही केवळ एक घटना नसून, महाराष्ट्राच्या राजकारणातील नैतिक अध:पतनाचे ज्वलंत उदाहरण आहे. एक जबाबदार लोकप्रतिनिधी, ज्याच्यावर जनतेचा विश्वास आणि करदात्यांच्या पैशांची जबाबदारी आहे, त्याच्याकडून अशा प्रकारचे अश्लील आणि अनैतिक वर्तन होणे अत्यंत संतापजनक आणि निषेधार्ह आहे. हा प्रकार केवळ व्यक्तीगत मर्यादांचा भंग नाही, तर सार्वजनिक जीवनातील नैतिकतेलाच काळिमा फासणारा आहे. जनतेच्या विश्वासावर निवडून आलेल्या मंत्र्याने किमान नैतिकतेची चौकट तरी पाळावी, ही साधी अपेक्षा असते. मात्र, हा व्हिडिओ पाहता त्या अपेक्षांचा पूर्णपणे भंग झाल्याचे स्पष्ट होते. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्र्यांनी कोणतीही विलंब न लावता नरहरी झिरवाळ यांची मंत्रीपदावरून तात्काळ हकालपट्टी करावी. #नरहरीझिरवाळ_राजीनामा_द्या #NarhariZirwalResign #महाराष्ट्र_नैतिकता_वाचवा #ResignNarhariZirwal
Harshwardhan Sapkal57,082 görüntüleme • 3 ay önce

"उद्याचा महाराष्ट्र" म्हणजे प्रश्न विचारणारा, हक्कांसाठी उभा राहणारा तरुण. नोकऱ्या, पेपर लीक, शिक्षण आणि संधी यांवर उत्तरं हवीत — शिक्के नाहीत. लोकशाहीत आवाज दाबला जात नाही, तो अधिक बुलंद होतो. तुमच्या मते आजच्या तरुणांचा सर्वात मोठा संघर्ष कोणता? #IndianPolitics #Maharashtra #INCMaharshtra #HarshvardhanSapkal #Congress #YouthVoice #cocrochjantaparty #abhijeetdipke Cockroach Janta Party Abhijeet Dipke
Harshwardhan Sapkal10,772 görüntüleme • 20 gün önce

‘मुंबई तक’ ने डिलीट केलेला व्हिडिओ… निर्भीड पत्रकार ओंकार वाबळे यांनी मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या ३०० कोटींच्या जमीन घोटाळ्याविषयी केलेला व्हिडिओ, मुंबई तकने अचानक काढून टाकला. ह्यात काय आहे ते पाहा! व्हिडिओ का डिलीट केला हे सांगायची गरज नाही… शेवटी प्रत्येकाला आपले कुटुंब आणि जीव प्रिय आहे. परंतु फडणवीस सरकार दोषींना आधार देत आहे आणि माध्यमांना दडपून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला दाबण्याचा प्रयत्न करत आहे. अशा रीतीने पत्रकारितेची गळचेपी होत असल्यामुळेच भारताचे पत्रकारिता निर्देशांकामधील स्थान घसरत तळाशी पोचले आहे. . . Congress Rahul Gandhi Devendra Fadnavis Murlidhar Mohol #मुंबईतक #CMOMaharashtra #पत्रकारिता
Harshwardhan Sapkal75,695 görüntüleme • 8 ay önce

महाराष्ट्राचा गृहविभाग "पांडू हवालदार" चालवत आहे. #Maharashtra #HomeMinister #PanduHawaldar
Harshwardhan Sapkal10,664 görüntüleme • 25 gün önce

विकृत बलात्कारी अशोक खरात याच्या मुलीच्या लग्नात करवलीसारखे वावरणारे, रुपाली चाकणकर यांचे (राजकीय) गुरू खासदार श्री. सुनील तटकरे यांना संबंधित प्रकरणावरून पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर त्यांची भंबेरी उडाली, त त प प करत त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. याअगोदरच्या प्रत्येक प्रकरणात रुपाली चाकणकर यांना तुम्हीच वाचवलं असं म्हणतात. आता या भोंदू अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यात तुमचेही हात काळे झाले असतील, त्यामुळेच कदाचित आता तुम्ही चाकणकर बाईंना वाचवू शकणार नाहीत. या प्रकरणात विस्तृत चौकशी होऊन समाज नासवणारे सगळे काळे चेहरे बाहेर यायलाच हवेत. Sunil Tatkare
Harshwardhan Sapkal22,426 görüntüleme • 3 ay önce

महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालायला लावणारी परिस्थिती महायुतीने निर्माण केली आहे. महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था पूर्ण पणे संपली असून राज्यात जंगलराज आणले आहे. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलींची टवाळखोरांनी छेड काढली आणि सुरक्षारक्षकांना धक्काबुक्की केल्याची घटना अत्यंत चिंताजनक असून राज्यात महिला मुली सुरक्षित नाहीत हे दर्शवणारे आहे. खडसे यांच्या मुलीसह इतर मुलींची छेड काढणा-यांना अटक होत नाही म्हणून केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे पोलीस स्टेशनमध्ये बसून आहेत. गुंडांना राजाश्रय असल्याने राज्यात महिला मुलींवरील अत्याचारांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या मुली सुरक्षित नाहीत तिथे सर्वसामान्यांच्या लेकरांची काय अवस्था असेल याचा विचार न केलेला बरा. गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गृहखात्यावर आणि गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही. सुरक्षारक्षक असतानाही मंत्र्यांच्या मुलींची छेड काढली जाते हे कायदा सुव्यस्थेचे धिंडवडे निघाल्याचे निदर्शक आहे. राज्यात माता भगिणी सुरक्षित राहण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रीपदीचा राजीनामा देऊन राज्याला पूर्ण वेळ सक्षम गृहमंत्री द्यावा. CMO Maharashtra
Harshwardhan Sapkal73,595 görüntüleme • 1 yıl önce

मुंबई मेट्रो-३च्या स्थानकांना लोंबार्ड सिद्धिविनायक, कोटक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, एचडीएफसी लाईफ महालक्ष्मी आणि निप्पॉन इंडिया एम.एफ. आचार्य अत्रे चौक अशी नामकरणं करणे हे भाजपचं दांभिक हिंदुत्व आहे. -सचिन सावंत, वरिष्ठ प्रवक्ते, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
Harshwardhan Sapkal39,848 görüntüleme • 8 ay önce

राहुल गांधी ‘अॅक्सेसेबल’ नाहीत असं खोटं नरेटिव्ह पसरवण्यांनी हे जरूर पाहावं. फलटणमधील आत्महत्या केलेल्या डॉ. संपदा मुंडे यांच्या कुटुंबीयांशी राहुल गांधी यांनी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि SIT स्थापन करण्यासाठी सरकारवर दबाव आणण्याचं आश्वासन दिलं. राहुल गांधी हेच खरे जननायक आहेत! तुम्ही कितीही बदनामी करा. . . Congress Rahul Gandhi #INCMaharashtra #IndianNationalCongress #Congress #MaharashtraPolitics #phaltan #JusticeForSampada
Harshwardhan Sapkal37,504 görüntüleme • 7 ay önce

सुप्रिया सुळे यांनी आपले विधान मागे घ्यावे. समाज जाणता झाला पाहिजे ही भूमिका घेऊन शहीद झालेले नरेंद्र दाभोळकर आणि कुठे महाराष्ट्राला अंधश्रद्धेच्या खाईत ढकलणारे, भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालणारे, मोठे फिक्सर Vote Chor देवेंद्र फडणवीस या दोघांचा मार्ग एक असुच शकत नाही.
Harshwardhan Sapkal16,515 görüntüleme • 3 ay önce

सकाळी मुलगा अन दुपारी पीए ! नगराध्यक्ष पद तर दुरच, प्रभाग क्रमांक 6 मध्येही मुलगा नगरसेवक पदी निवडून येत नाही ! हे समजल्यावर आता निराशा स्पष्ट दिसून येत आहे. बोगस मतदान पकडल्यावर PAने हतबलतेने काढता पाय घेतला, तर बोगस मतदाराने धनुष्यबाणाला मतदान केले सांगितल्यावर उपस्थितांनी चोप दिला. पोलीस कठोर कार्यवाही ऐवजी भांडण सोडवत आहेत तर नागरिक गुंडागर्दीला चीरडून काढत आहेत. आरंभ हे प्रचंड हे!
Harshwardhan Sapkal27,984 görüntüleme • 6 ay önce

बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेने औरंगजेबाच्या कबरी बाबत जी भूमिका घेतली तशीच भूमिका इंग्रजांच्या हस्तक असणाऱ्या, पेंशन घेणाऱ्या, देशाला स्वातंत्र्य मिळू नये म्हणून काम करणाऱ्यांच्या, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणा-यांच्या बाबतीत घ्यावी. त्यांचे पुतळे स्मारके राज्यात आहेत, त्याबाबत सरकारने भूमिका जाहीर करावी.
Harshwardhan Sapkal33,919 görüntüleme • 1 yıl önce

काल पत्रकारांनी मला विचारलेला प्रश्न ! "महापुरुषांच्या नावावर राजकारण सुरू आहे समाजात द्वेष पसरायला जात आहे या पार्श्वभूमीवर सर्व महामानवांचे फोटो कार्यालयात सोबत लावावेत का ? आणि विशेष छत्रपती शिवाजी महाराज व टिपू सुलतान यांचे फोटो आजूबाजूला असावेत या मागणीकडे आपण कसे बघता ?" या प्रश्नाचे उत्तर देत दिले होते - "ध" चा "मा" करण्याची जुनी खोड फडणवीसांची जागी झाली आहे.
Harshwardhan Sapkal13,326 görüntüleme • 4 ay önce

भाजप आणि संघाच्या यंत्रणेला धक्का पोहोचू लागला की सत्तेच्या माध्यमातून त्यांचे हस्तक बनलेल्या प्रशासनाकरवी अभिव्यक्ति स्वातंत्र्याची गळचेपी करून बोलणाऱ्यांचा आवाज ते दाबू पाहतात. आपल्या या महाराष्ट्राच्या मातीला लढाऊ बाणा वारसा हक्काने लाभलाय. याच स्वाभिमानी महाराष्ट्राच्या भूमीतील स्वतंत्र पत्रकार म्हणून जबाबदारी पार पाडणाऱ्या मुक्ता कदम व मराठी भाषा केंद्राचे अध्यक्ष व मराठी भाषा चळवळीतील कार्यकर्ते डॉ. दीपक पवार यांना शासकीय यंत्रणेमार्फत दिला जाणारा त्रास हा व्यक्तीस्वातंत्र्याचा वारसा जपणाऱ्या आपल्या पुरोगामी महाराष्ट्रावर डाग असल्यासारखाच आहे. महानगरपालिका निवडणुक काळात मुक्ता कदम यांनी आपल्या स्वतंत्र पत्रकारितेच्या माध्यमातून नांदेडचे सत्ताधारी म्हणवून घेणाऱ्या अशोक चव्हाण यांच्या अपयशाचा पाढा वाचला. यामुळेच त्यांना आता नांदेड जिल्ह्यातील पोलिसांनी आचारसंहिता भंगाच्या गुन्ह्यांत चूकीच्या पद्धतीने गोवण्याचा प्रयत्न केला आहे. “नांदेडचा राजमहाल हलला” हे खरोखरच यावरून दिसते. तसेच महाराष्ट्राच्या व्यासपीठावर आपल्या परखड वाणीने मराठी भाषेचा जागर करून मराठी भाषा चळवळ मजबूत करू पाहणाऱ्या प्रा. डॉ. दीपक पवार यांना मुंबई विद्यापीठाच्या सिनेटमध्ये “शहरी नक्षलवादी” असे संबोधून मराठी भाषेच्या चळवळीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला. मराठी भाषा द्वेषी सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावरच या गोष्टी घडवल्या जात आहेत, यात कोणालाही शंका नसावी. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात लाचारांची फौज उभी करायची असेल तर त्यांनी नक्कीच प्रयत्न करून बघावेत. पण प्रत्येक व्यक्ति त्यांच्या सत्तेसमोर झूकून त्यांचे, त्यांच्या दिल्लीतील महाशक्तीचे कौतूक नक्कीच करणार नाही किंवा त्यांना आवडेल अशा भूमिकाही घेणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा सांगणाऱ्या आपल्या महाराष्ट्रात आपला स्वाभिमान व वैचारिक बाणा जपणाऱ्या व्यक्तिंची कधीही कमी असणार नाही. वर उल्लेख केलेल्या दोन्ही घटना अत्यंत गंभीर असून महाराष्ट्राच्या वैचारिक आणि सांस्कृतिक परंपरेला धक्का देणाऱ्या आहेत, हे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणविसांनी लक्षात घ्यावे. कॉंग्रेस पक्ष याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवत असून मुक्ता कदम व डॉ. दीपक पवार Dr. Deepak Pawar दीपक पवार यांच्या पाठिशी आम्ही ठामपणे उभे आहोत. CMO Maharashtra Devendra Fadnavis
Harshwardhan Sapkal11,129 görüntüleme • 3 ay önce

NH-08 वर अडकलेली जनता नियम पाळत रांगेत उभी आणि भाजपचे मंत्री गणेश नाईक मात्र चुकीच्या बाजूने गाडी नेतायत. हीच का “जनतेची सेवा”? की सत्तेचा अहंकार? जे नियम सर्वसामान्यांसाठी, तेच मंत्र्यांसाठी अपवाद का? फडणवीस सरकारसाठी कायदा म्हणजे फक्त दिखावा. भाजप सरकारची ही वृत्ती दर्शवते की फडणवीस आणि त्यांच्या मंत्र्यांसाठी कायदा फक्त कागदावरच आहे. जनतेसोबत होणारी फसवणूक आता जनतेलाही लक्षात येत आहे. या भ्रष्ट आणि निर्लज्ज सरकारला जनता माफ करणार नाही. . . Congress Rahul Gandhi #INCMaharashtra #IndianNationalCongress #Congress #MaharashtraPolitics #fasanvissarkar
Harshwardhan Sapkal19,697 görüntüleme • 8 ay önce

“धर्म नहीं जाती पूछी” - सनातनी मनुवाद्यांचा जातीवाद अजूनही संपलेला नाही. एका दलित विद्यार्थ्याला आलेला हा अनुभव अतिशय दुर्दैवी आहे. परदेशात नोकरी मिळालेला हा तरुण, याची कंपनी, ‘हा विद्यार्थी तुमच्या कॉलेजला होता का अशा पद्धतीची पडताळणीसाठी कॉलेजकडून माहिती मागवते. आणि धक्कादायक म्हणजे कॉलेज प्रशासन जातीवाद डोक्यात ठेवून या दलित तरुणाची खोटी माहिती कंपनीला देतात. या तरुणाची नोकरी जाते. त्यानंतर या तरुणाने धाडसाने कॉलेज प्रशासनाची केलेली पोलखोल सनातनी मनवाद्यांची मनोवृत्ती दाखवते. नोकरीसाठी पडताळणी करताना एखाद्या विद्यार्थ्याची जात विचारणं आणि ती जात समजल्यावर मुद्दाम त्रास देणे हा अतिशय अमानवी प्रकार आहे. ज्या संविधानाने समता, सामाजिक न्याय आणि समान संधींची ग्वाही दिली, त्यालाच या मनुवाद्यांनी तिलांजली दिली. फडणवीस, यावर काही कारवाई करणार की तुमच्या या सनातनी मनुवादी प्रवृत्तीच्या लोकांना पाठीशी घालणार? काँग्रेस पक्षाची ठाम मागणी आहे, महाविद्यालयाने माफी मागून विद्यार्थ्याला नुकसानभरपाई द्यावी आणि संबंधित शिक्षकांवर तात्काळ गुन्हे नोंद करावेत. . . Congress Rahul Gandhi Devendra Fadnavis #CMOMaharashtra #सनातनी #मनुवादी
Harshwardhan Sapkal12,641 görüntüleme • 8 ay önce

मागच्या आठवड्यातील बीड मध्ये पार पडलेल्या सद्भावना पदयात्रेच्या वेळीच मी स्पष्ट केले होते, माझ्या नियुक्ती नंतर माझ्या वक्तव्यांवर भाजप ने विरोध सुरू केला आहे, मला अडकवण्याचा प्रयत्न केला जाईल. फडणवीसांवर केलेली टिप्पणी तंतोतंत खरी असल्याने भाजप वाले आज आकडतांडव करून माझ्यावर बेताल वक्तव्य सुरू केली आहेत.
Harshwardhan Sapkal19,331 görüntüleme • 1 yıl önce