Harshwardhan Sapkal's banner
Harshwardhan Sapkal's profile picture

Harshwardhan Sapkal

@INCHarshsapkal13,485 subscribers

President Maharashtra Pradesh Congress Committee. Ex President, Rajiv Gandhi Panchayt raj sanghthan (RGPRS), New Delhi. Ex MLA, Maharashtra Assembly.

Shorts

उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या आवारात अधिकारी कर्मचारी दिवसाढवळ्या भ्रष्टाचाराच्या पैशातून दारू पार्ट्या करत आहेत. सत्ताधा-यांच्या आशिर्वादाने ठाण्यात भ्रष्टाचार आणि अनैतिकतेचा नंगानाच सुरु आहे. नागरिकांना पाणी स्वच्छता रस्ते शिक्षण या सुविधा पुरवण्याची जबाबदारी असणारे अधिकारी कर्मचारी नशेत काम करत आहेत त्यामुळे भ्रष्टाचार सुसाट आणि प्रशासन सैराट अशी ठाणे शहराची अवस्था झाली आहे. CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde

29,317 Aufrufe

हाच अहंकार होता कौरवांचा, हाच अहंकार होता रावणाचा, आणि हो हाच अहंकार होता औरंगजेबाचा! आज महाराष्ट्र त्या अहंकाराविरोधात उभा आहे, हे सत्याचं, न्यायाचं आणि स्वाभिमानाचं युद्ध आहे. आणि विजय अखेरीस महाराष्ट्राचाच होणार, कारण… सत्यमेव जयते!

62,814 Aufrufe

"एवढा अहंकार रावणालाही नव्हता!" मुख्यमंत्री महोदय, तुम्ही मला ओळखता का नाही — त्याने काहीही फरक पडणार नाही ! पण शेतकऱ्यांच्या वेदना तरी ओळखा! राजकारणाची गणितं थोडी बाजूला ठेवा आणि आधी सरसकट हेक्टरी 50हजार रुपये मदतीचा निर्णय घ्या. ओबीसी रस्त्यावर आलेत, आदिवासी आलेत, धनगर-बंजारा सुद्धा उठलेत, आणि मराठा तर सुरुवातीपासूनच रस्त्यावर आहेत. या सगळ्यांमध्ये तुम्हीच भांडणं पेटवलीत — आणि आता ज्यांच्यावर आरोप केले त्यांनाच अंगाखांद्यावर घेत फिरता! ही तुमची “राजकीय ओळख” आता महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोचली आहे. मी मातीशी जोडलेला आणि परत याच मातीत जाणारा आडवळणाच्या गावचा सामान्य माणूस — “बायोलॉजिकल” म्हणूनच नव्हे, तर विचारांनी आणि निष्ठेनेचा आणि हाडामासाचा माणूस आहे. सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्याची माझी परंपरा नाही. तुम्ही मला ओळखलंत नाही तरी चालेल, पण ओला-दुष्काळ पहीले करा! शेतकऱ्याला हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान द्या! आणि हो — हे माझं स्टेटमेंट नाही, तर शेतकऱ्याच्या जखमांमधून निघालेला आवाज आहे आणि त्याचे हे उत्तर नाही. कृपया चिडू नका मुख्यमंत्री महोदय, फक्त एकच गोष्ट आठवा — आपण दिलेल्या संपूर्ण कर्जमाफीच्या वचनाचे तेवढे पहा!

31,828 Aufrufe

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारे, आणि बहुजन समाजासाठी झटणाऱ्या शिवश्री प्रविणदादा गायकवाडांवर भाजपच्या गुंडांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध. मुख्यमंत्री फडणवीस “महाराष्ट्र आता थांबणार नाही”म्हणाला होतात, आता महाराष्ट्राचा बिहार करूनच थांबणार आहात का? या हल्लेखोरांवर कारवाई झाली नाही तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या झुंडीवर जनसुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करणेची काही तरतूद आहे का? असेल तर त्याअंतर्गत कारवाई करून आदर्श घालून द्या! महाराष्ट्र पाहतोय.

38,339 Aufrufe

Videos

INCHarshsapkal's profile picture

राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होणे ही केवळ एक घटना नसून, महाराष्ट्राच्या राजकारणातील नैतिक अध:पतनाचे ज्वलंत उदाहरण आहे. एक जबाबदार लोकप्रतिनिधी, ज्याच्यावर जनतेचा विश्वास आणि करदात्यांच्या पैशांची जबाबदारी आहे, त्याच्याकडून अशा प्रकारचे अश्लील आणि अनैतिक वर्तन होणे अत्यंत संतापजनक आणि निषेधार्ह आहे. हा प्रकार केवळ व्यक्तीगत मर्यादांचा भंग नाही, तर सार्वजनिक जीवनातील नैतिकतेलाच काळिमा फासणारा आहे. जनतेच्या विश्वासावर निवडून आलेल्या मंत्र्याने किमान नैतिकतेची चौकट तरी पाळावी, ही साधी अपेक्षा असते. मात्र, हा व्हिडिओ पाहता त्या अपेक्षांचा पूर्णपणे भंग झाल्याचे स्पष्ट होते. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्र्यांनी कोणतीही विलंब न लावता नरहरी झिरवाळ यांची मंत्रीपदावरून तात्काळ हकालपट्टी करावी. #नरहरीझिरवाळ_राजीनामा_द्या #NarhariZirwalResign #महाराष्ट्र_नैतिकता_वाचवा #ResignNarhariZirwal

Harshwardhan Sapkal

57,082 Aufrufe • vor 3 Monaten

INCHarshsapkal's profile picture

‘मुंबई तक’ ने डिलीट केलेला व्हिडिओ… निर्भीड पत्रकार ओंकार वाबळे यांनी मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या ३०० कोटींच्या जमीन घोटाळ्याविषयी केलेला व्हिडिओ, मुंबई तकने अचानक काढून टाकला. ह्यात काय आहे ते पाहा! व्हिडिओ का डिलीट केला हे सांगायची गरज नाही… शेवटी प्रत्येकाला आपले कुटुंब आणि जीव प्रिय आहे. परंतु फडणवीस सरकार दोषींना आधार देत आहे आणि माध्यमांना दडपून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला दाबण्याचा प्रयत्न करत आहे. अशा रीतीने पत्रकारितेची गळचेपी होत असल्यामुळेच भारताचे पत्रकारिता निर्देशांकामधील स्थान घसरत तळाशी पोचले आहे. . . Congress Rahul Gandhi Devendra Fadnavis Murlidhar Mohol #मुंबईतक #CMOMaharashtra #पत्रकारिता

Harshwardhan Sapkal

75,695 Aufrufe • vor 8 Monaten

INCHarshsapkal's profile picture

विकृत बलात्कारी अशोक खरात याच्या मुलीच्या लग्नात करवलीसारखे वावरणारे, रुपाली चाकणकर यांचे (राजकीय) गुरू खासदार श्री. सुनील तटकरे यांना संबंधित प्रकरणावरून पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर त्यांची भंबेरी उडाली, त त प प करत त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. याअगोदरच्या प्रत्येक प्रकरणात रुपाली चाकणकर यांना तुम्हीच वाचवलं असं म्हणतात. आता या भोंदू अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यात तुमचेही हात काळे झाले असतील, त्यामुळेच कदाचित आता तुम्ही चाकणकर बाईंना वाचवू शकणार नाहीत. या प्रकरणात विस्तृत चौकशी होऊन समाज नासवणारे सगळे काळे चेहरे बाहेर यायलाच हवेत. Sunil Tatkare

Harshwardhan Sapkal

22,426 Aufrufe • vor 3 Monaten

INCHarshsapkal's profile picture

महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालायला लावणारी परिस्थिती महायुतीने निर्माण केली आहे. महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था पूर्ण पणे संपली असून राज्यात जंगलराज आणले आहे. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलींची टवाळखोरांनी छेड काढली आणि सुरक्षारक्षकांना धक्काबुक्की केल्याची घटना अत्यंत चिंताजनक असून राज्यात महिला मुली सुरक्षित नाहीत हे दर्शवणारे आहे. खडसे यांच्या मुलीसह इतर मुलींची छेड काढणा-यांना अटक होत नाही म्हणून केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे पोलीस स्टेशनमध्ये बसून आहेत. गुंडांना राजाश्रय असल्याने राज्यात महिला मुलींवरील अत्याचारांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या मुली सुरक्षित नाहीत तिथे सर्वसामान्यांच्या लेकरांची काय अवस्था असेल याचा विचार न केलेला बरा. गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गृहखात्यावर आणि गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही. सुरक्षारक्षक असतानाही मंत्र्यांच्या मुलींची छेड काढली जाते हे कायदा सुव्यस्थेचे धिंडवडे निघाल्याचे निदर्शक आहे. राज्यात माता भगिणी सुरक्षित राहण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रीपदीचा राजीनामा देऊन राज्याला पूर्ण वेळ सक्षम गृहमंत्री द्यावा. CMO Maharashtra

Harshwardhan Sapkal

73,595 Aufrufe • vor 1 Jahr

INCHarshsapkal's profile picture

भाजप आणि संघाच्या यंत्रणेला धक्का पोहोचू लागला की सत्तेच्या माध्यमातून त्यांचे हस्तक बनलेल्या प्रशासनाकरवी अभिव्यक्ति स्वातंत्र्याची गळचेपी करून बोलणाऱ्यांचा आवाज ते दाबू पाहतात. आपल्या या महाराष्ट्राच्या मातीला लढाऊ बाणा वारसा हक्काने लाभलाय. याच स्वाभिमानी महाराष्ट्राच्या भूमीतील स्वतंत्र पत्रकार म्हणून जबाबदारी पार पाडणाऱ्या मुक्ता कदम व मराठी भाषा केंद्राचे अध्यक्ष व मराठी भाषा चळवळीतील कार्यकर्ते डॉ. दीपक पवार यांना शासकीय यंत्रणेमार्फत दिला जाणारा त्रास हा व्यक्तीस्वातंत्र्याचा वारसा जपणाऱ्या आपल्या पुरोगामी महाराष्ट्रावर डाग असल्यासारखाच आहे. महानगरपालिका निवडणुक काळात मुक्ता कदम यांनी आपल्या स्वतंत्र पत्रकारितेच्या माध्यमातून नांदेडचे सत्ताधारी म्हणवून घेणाऱ्या अशोक चव्हाण यांच्या अपयशाचा पाढा वाचला. यामुळेच त्यांना आता नांदेड जिल्ह्यातील पोलिसांनी आचारसंहिता भंगाच्या गुन्ह्यांत चूकीच्या पद्धतीने गोवण्याचा प्रयत्न केला आहे. “नांदेडचा राजमहाल हलला” हे खरोखरच यावरून दिसते. तसेच महाराष्ट्राच्या व्यासपीठावर आपल्या परखड वाणीने मराठी भाषेचा जागर करून मराठी भाषा चळवळ मजबूत करू पाहणाऱ्या प्रा. डॉ. दीपक पवार यांना मुंबई विद्यापीठाच्या सिनेटमध्ये “शहरी नक्षलवादी” असे संबोधून मराठी भाषेच्या चळवळीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला. मराठी भाषा द्वेषी सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावरच या गोष्टी घडवल्या जात आहेत, यात कोणालाही शंका नसावी. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात लाचारांची फौज उभी करायची असेल तर त्यांनी नक्कीच प्रयत्न करून बघावेत. पण प्रत्येक व्यक्ति त्यांच्या सत्तेसमोर झूकून त्यांचे, त्यांच्या दिल्लीतील महाशक्तीचे कौतूक नक्कीच करणार नाही किंवा त्यांना आवडेल अशा भूमिकाही घेणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा सांगणाऱ्या आपल्या महाराष्ट्रात आपला स्वाभिमान व वैचारिक बाणा जपणाऱ्या व्यक्तिंची कधीही कमी असणार नाही. वर उल्लेख केलेल्या दोन्ही घटना अत्यंत गंभीर असून महाराष्ट्राच्या वैचारिक आणि सांस्कृतिक परंपरेला धक्का देणाऱ्या आहेत, हे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणविसांनी लक्षात घ्यावे. कॉंग्रेस पक्ष याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवत असून मुक्ता कदम व डॉ. दीपक पवार Dr. Deepak Pawar दीपक पवार यांच्या पाठिशी आम्ही ठामपणे उभे आहोत. CMO Maharashtra Devendra Fadnavis

Harshwardhan Sapkal

11,129 Aufrufe • vor 3 Monaten

INCHarshsapkal's profile picture

“धर्म नहीं जाती पूछी” - सनातनी मनुवाद्यांचा जातीवाद अजूनही संपलेला नाही. एका दलित विद्यार्थ्याला आलेला हा अनुभव अतिशय दुर्दैवी आहे. परदेशात नोकरी मिळालेला हा तरुण, याची कंपनी, ‘हा विद्यार्थी तुमच्या कॉलेजला होता का अशा पद्धतीची पडताळणीसाठी कॉलेजकडून माहिती मागवते. आणि धक्कादायक म्हणजे कॉलेज प्रशासन जातीवाद डोक्यात ठेवून या दलित तरुणाची खोटी माहिती कंपनीला देतात. या तरुणाची नोकरी जाते. त्यानंतर या तरुणाने धाडसाने कॉलेज प्रशासनाची केलेली पोलखोल सनातनी मनवाद्यांची मनोवृत्ती दाखवते. नोकरीसाठी पडताळणी करताना एखाद्या विद्यार्थ्याची जात विचारणं आणि ती जात समजल्यावर मुद्दाम त्रास देणे हा अतिशय अमानवी प्रकार आहे. ज्या संविधानाने समता, सामाजिक न्याय आणि समान संधींची ग्वाही दिली, त्यालाच या मनुवाद्यांनी तिलांजली दिली. फडणवीस, यावर काही कारवाई करणार की तुमच्या या सनातनी मनुवादी प्रवृत्तीच्या लोकांना पाठीशी घालणार? काँग्रेस पक्षाची ठाम मागणी आहे, महाविद्यालयाने माफी मागून विद्यार्थ्याला नुकसानभरपाई द्यावी आणि संबंधित शिक्षकांवर तात्काळ गुन्हे नोंद करावेत. . . Congress Rahul Gandhi Devendra Fadnavis #CMOMaharashtra #सनातनी #मनुवादी

Harshwardhan Sapkal

12,641 Aufrufe • vor 8 Monaten