
Harshwardhan Sapkal
@INCHarshsapkal • 14,362 subscribers
President, Maharashtra Pradesh Congress Committee. A patriot with the stern resolve: Never leave the field until victory is secured.
Shorts
Videos

महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेतील भ्रष्टाचारावर प्रश्न विचारताच ‘ढोंगी लोहपुरुष’ थेट पत्रकार परिषदेतून फरार! महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेतील हजारो कोटींच्या भ्रष्टाचारावर पत्रकाराने थेट प्रश्न विचारताच सहकार मंत्री अमित शहांना घाम फुटला! उत्तरे द्यायची ताकद उरली नाही, म्हणून थेट पत्रकार परिषद गुंडाळून पळ काढला! स्वतःच्याच खात्यात चाललेल्या सहकार क्षेत्रातील दरोड्यावर बोलायला तोंडाला कुलूप आणि ज्यांचे पाय थरथरतात ते कसले 'लोहपुरुष'? #ढोंगी_लोहपुरुष #फरार
Harshwardhan Sapkal40,842 views • 12 days ago

नातू झाला, नातवाला गावरान गाईचे दूध मिळावे म्हणून खरेदी केलेली गाय घेवून जातांना विजय शेळके आणि वाहनचालक महेश जाधव यांना श्रीगोंद्यातील टाकळी लोणार ते पिसोरे खांड रस्त्यावर गोरक्षकांनी बेदम मारहाण केली, कपडे काढून अपमान केला, लघवी पाजली आणि २१ हजार रुपये लुटले. ही केवळ एक घटना म्हणजे गोरक्षणाच्या नावाखाली राज्यभर सुरू असलेल्या दहशतीचे भयावह चित्र आहे. गोरक्षणाच्या नावाखाली लोकांना लुटणाऱ्या, हप्ते वसुली आणि 'गुंडगिरी'चे दुकान उघडणाऱ्यांना राजकीय अभय कोणाचे? पोलिसांच्या नाकाखाली १५-२० गुंड एका निष्पाप नागरिकाला नरकयातना देतात आणि पोलीस अजूनही हात हलवत बसलेत? गृहखातं झोपलंय का? अशा गुन्हेगारांवर 'मोक्का' लावा आणि कायदा हातात घेणाऱ्या या तथाकथित गोरक्षकांचा बंदोबस्त करा...
Harshwardhan Sapkal40,082 views • 15 days ago

मंत्री मुरलीधर मोहोळांच्या ताफ्याला ओव्हरटेक केलं म्हणून ३२ वर्षीय तरुणावर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला; पण २-३ किमी आधीच पार्किंग करायला लावून पायी दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या गर्दीत आपल्या VIP गाड्यांचा ताफा घेऊन दर्शनाला जाणारे मंत्री महोदय मोहोळ यांच्यावर नियमभंग झाला म्हणून कारवाई होईल का? पांडू हवालदाराच्या राज्यात सामान्य नागरिकांसाठी नियम कठोर आणि सत्ताधाऱ्यांसाठी VIP नियम वेगळे?
Harshwardhan Sapkal24,591 views • 9 days ago

राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होणे ही केवळ एक घटना नसून, महाराष्ट्राच्या राजकारणातील नैतिक अध:पतनाचे ज्वलंत उदाहरण आहे. एक जबाबदार लोकप्रतिनिधी, ज्याच्यावर जनतेचा विश्वास आणि करदात्यांच्या पैशांची जबाबदारी आहे, त्याच्याकडून अशा प्रकारचे अश्लील आणि अनैतिक वर्तन होणे अत्यंत संतापजनक आणि निषेधार्ह आहे. हा प्रकार केवळ व्यक्तीगत मर्यादांचा भंग नाही, तर सार्वजनिक जीवनातील नैतिकतेलाच काळिमा फासणारा आहे. जनतेच्या विश्वासावर निवडून आलेल्या मंत्र्याने किमान नैतिकतेची चौकट तरी पाळावी, ही साधी अपेक्षा असते. मात्र, हा व्हिडिओ पाहता त्या अपेक्षांचा पूर्णपणे भंग झाल्याचे स्पष्ट होते. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्र्यांनी कोणतीही विलंब न लावता नरहरी झिरवाळ यांची मंत्रीपदावरून तात्काळ हकालपट्टी करावी. #नरहरीझिरवाळ_राजीनामा_द्या #NarhariZirwalResign #महाराष्ट्र_नैतिकता_वाचवा #ResignNarhariZirwal
Harshwardhan Sapkal57,082 views • 6 months ago

पुण्यात आंबेगाव येथे अपुऱ्या कागदपत्रांमुळे दस्त नोंदणी करण्यास नकार दिल्याच्या रागातून सह दुय्यम निबंधकाला बेदम मारहाण करण्यात आली. हा प्रकार केवळ एका अधिकाऱ्यावरचा हल्ला नसून, कायद्याच्या राज्यालाच दिलेले थेट आव्हान आहे. सरकारी अधिकाऱ्यावर हात उचलणाऱ्याला जर राजकीय संरक्षण मिळत असेल, तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. अशा आरोपींवर कोणताही दबाव न स्वीकारता कठोरातील कठोर कारवाई झाली पाहिजे. अन्यथा उद्या प्रत्येक गुंडाला कायदा हातात घेण्याचे बळ मिळेल. राजकीय ओळख मोठी की कायदा, याचे उत्तर आता सरकारने कृतीतून द्यावे.
Harshwardhan Sapkal22,648 views • 2 months ago

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपचा अंतर्गत कलह आणि जातीय मानसिकता महाराष्ट्रासमोर उघडी पडली! यूपीएससी-एमपीएससीच्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्यात विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची चर्चा होण्याऐवजी भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी आणि आमदार अभिमन्यू पवार यांच्यात पहिल्या रांगेतील खुर्चीवरून वाद झाला. त्यानंतर "हा मराठा समाजाचा कार्यक्रम आहे" असा आरोप-प्रत्यारोप झाल्याने कार्यक्रमाचे गांभीर्यच संपले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा सर्व प्रकार घडत असताना त्यांनी यावर कोणतीही स्पष्ट भूमिका घेतली नाही. हा भाजपचा "सबका साथ, सबका विकास" आहे की "खुर्चीसाठी भांडा आणि जातीत समाजाला विभागा" हा नवा मंत्र? यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्याऐवजी भाजपच्या नेत्यांनी स्वतःच्या अहंकाराचा आणि अंतर्गत गटबाजीचा देखावा केला. महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेला हे शोभणारे नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर मौन सोडून महाराष्ट्राला उत्तर द्यावे. भाजपमध्ये खुर्ची मोठी की संविधान आणि समानतेची मूल्ये?
Harshwardhan Sapkal28,317 views • 3 months ago

‘मुंबई तक’ ने डिलीट केलेला व्हिडिओ… निर्भीड पत्रकार ओंकार वाबळे यांनी मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या ३०० कोटींच्या जमीन घोटाळ्याविषयी केलेला व्हिडिओ, मुंबई तकने अचानक काढून टाकला. ह्यात काय आहे ते पाहा! व्हिडिओ का डिलीट केला हे सांगायची गरज नाही… शेवटी प्रत्येकाला आपले कुटुंब आणि जीव प्रिय आहे. परंतु फडणवीस सरकार दोषींना आधार देत आहे आणि माध्यमांना दडपून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला दाबण्याचा प्रयत्न करत आहे. अशा रीतीने पत्रकारितेची गळचेपी होत असल्यामुळेच भारताचे पत्रकारिता निर्देशांकामधील स्थान घसरत तळाशी पोचले आहे. . . Congress Rahul Gandhi Devendra Fadnavis Murlidhar Mohol #मुंबईतक #CMOMaharashtra #पत्रकारिता
Harshwardhan Sapkal75,877 views • 11 months ago

आनंदी, निरोगी आणि प्रोडक्टिव्ह शहरं घडवायची असतील, तर विकासाची दिशा माणूस, पर्यावरण आणि भविष्यातील पिढ्यांना केंद्रस्थानी ठेवणारी असली पाहिजे. पर्यावरण, शिक्षण, शाश्वत विकास आणि नगररचनेवरील भारतातील ज्येष्ठ नगररचनाकार प्रो. अनिता गोखले बेनिंजर यांच्यासोबतचा हा विचारप्रवर्तक संवाद प्रत्येक जागरूक नागरिकाने नक्की पाहावा. #ProfAnitaGokhaleBeninger #Podcast #UrbanPlanning #INCMaharashtra #Maharashtra Maharashtra Congress #harshwardhansapakal
Harshwardhan Sapkal23,638 views • 2 months ago

महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालायला लावणारी परिस्थिती महायुतीने निर्माण केली आहे. महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था पूर्ण पणे संपली असून राज्यात जंगलराज आणले आहे. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलींची टवाळखोरांनी छेड काढली आणि सुरक्षारक्षकांना धक्काबुक्की केल्याची घटना अत्यंत चिंताजनक असून राज्यात महिला मुली सुरक्षित नाहीत हे दर्शवणारे आहे. खडसे यांच्या मुलीसह इतर मुलींची छेड काढणा-यांना अटक होत नाही म्हणून केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे पोलीस स्टेशनमध्ये बसून आहेत. गुंडांना राजाश्रय असल्याने राज्यात महिला मुलींवरील अत्याचारांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या मुली सुरक्षित नाहीत तिथे सर्वसामान्यांच्या लेकरांची काय अवस्था असेल याचा विचार न केलेला बरा. गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गृहखात्यावर आणि गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही. सुरक्षारक्षक असतानाही मंत्र्यांच्या मुलींची छेड काढली जाते हे कायदा सुव्यस्थेचे धिंडवडे निघाल्याचे निदर्शक आहे. राज्यात माता भगिणी सुरक्षित राहण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रीपदीचा राजीनामा देऊन राज्याला पूर्ण वेळ सक्षम गृहमंत्री द्यावा. CMO Maharashtra
Harshwardhan Sapkal73,613 views • 1 year ago

विरोधकांवर टीका करणं, शेरोशायरी करणं आणि "प्रशासनावर जबरदस्त पकड" असल्याचा PR करणं खरंच सोपं आहे. पण वास्तव इतकं भयानक आहे की, विधानसभा अध्यक्षांनी वारंवार बोलावूनही संबंधित मंत्री आणि अधिकारी सभागृहात फिरकत नाहीत! अध्यक्षांच्या निर्देशांनाही जुमानलं जात नसेल, तर राज्यात प्रशासन चालतंय की बेबंदशाही? इतिहासात पहिल्यांदाच विधानसभा अध्यक्षांनाच सभागृहात याबद्दल नाराजी व्यक्त करावी लागते, यापेक्षा सरकारच्या प्रशासनावरील नियंत्रणाचं मोठं अपयश कोणतं? ज्या मुख्यमंत्र्यांना स्वतःचे मंत्री आणि अधिकारीच जुमानत नाहीत, त्यांनी प्रशासनावरील पकडीच्या गप्पा मारू नयेत. महाराष्ट्राने असा बेफिकीर आणि बेशिस्त कारभार यापूर्वी कधी पाहिला नव्हता. #हतबल_विधानसभा_अध्यक्ष #दलिंदर_सरकार
Harshwardhan Sapkal14,533 views • 2 months ago

||श्रीराम जयराम जयजयराम|| या १३ अक्षरी नामजपामुळे सर्व विघ्नांचा नाश होऊन, अवघ्या आयुष्याचे कल्याण होते अशी आपल्या अध्यात्माची शिकवण आहे. आज आपल्या भारतावरही लुटारूंचे विघ्न आलेले आहे. या चोरांनी सामान्य जनतेलाच काय तर रामप्रभूंच्या दानपेटीलाही सोडले नाही. या विघ्नाचा बंदोबस्त व्हावा आणि सर्व भारतीयांचे कल्याण व्हावे म्हणून १३ चरणांचा हा अभंग मी रामरायाला अर्पण करतो. #JaiShriRam #AyodhyaRamMandir #incmaharashtra Maharashtra Congress #TempleTHeft #SanatanDharma
Harshwardhan Sapkal14,942 views • 2 months ago

मुंबई मेट्रो-३च्या स्थानकांना लोंबार्ड सिद्धिविनायक, कोटक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, एचडीएफसी लाईफ महालक्ष्मी आणि निप्पॉन इंडिया एम.एफ. आचार्य अत्रे चौक अशी नामकरणं करणे हे भाजपचं दांभिक हिंदुत्व आहे. -सचिन सावंत, वरिष्ठ प्रवक्ते, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
Harshwardhan Sapkal39,861 views • 11 months ago

• गाड्यांचा ताफा नाही • फक्त एकच वाहन • स्वतः कार चालवत आहेत • त्यांची खासदार असलेली बहीण त्यांच्यासोबत कारपूल करत आहे. हे भारताचे विरोधी पक्षनेते श्री. राहुल गांधी यांचे खरे मोठेपण (क्लास) दर्शवते, परंतु 'गोदी मीडिया' साहजिकच हे असे काही दाखवणार नाही. जननायक श्री राहुल गांधी 🔥🔥
Harshwardhan Sapkal18,900 views • 4 months ago

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा फॉर्म आज अॅडव्होकेट आकाश मोरे काँग्रेसच्या वतीने भरणार आहेत, पण त्या संदर्भात बरीच खलबतं सुरू आहेत, टीकाटिप्पणी सुरू आहेत की काँग्रेसने ही निवडणूक बिनविरोध होऊ द्यावी अशी परंपरा राहिलेली आहे. मग नांदेडच्या वसंतराव चव्हाणांच्या मृत्यूनंतर निवडणूक झाली नाही का? मंगळवेढ्याला भालकेंच्या मृत्यूनंतर निवडणूक झाली नाही का? अशी अनेक उदाहरणं जी आहे ती देता येईल, भाजपने सोईने आपलं राजकारण केलेलं आहे. दुर्दैवानं ज्या पद्धतीनं अजितदादांचा मृत्यू झाला, त्याच्यानंतर घरच्या लोकांना वाटतं की त्याची एन्क्वायरी झाली पाहिजे म्हणून स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी सीबीआयची एन्क्वायरी मागितली. रिमाइंडर दिलं काय झालं त्याचं? रोहित पवार पिलर टू पोस्ट एफआयआर करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये प्रयत्न करत होते शेवटी कर्नाटक मध्ये त्यांचा प्रयत्न सफल झाला. ही तुमची संवेदनशीलता आहे का? आजही आमच्या उमेदवाराचं आणि काँग्रेस पक्षाचं हे म्हणणं आहे की तुम्ही एफआयआर दाखल करा महाराष्ट्रामध्ये, बारामतीमध्ये. मग त्याचा विचार करता येईल, मग लक्षात येईल की खरी तुमची भूमिका काय आहे. मा.श्री अतुल लोंढे वरिष्ठ प्रवक्ते - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳
Harshwardhan Sapkal21,434 views • 5 months ago

विकृत बलात्कारी अशोक खरात याच्या मुलीच्या लग्नात करवलीसारखे वावरणारे, रुपाली चाकणकर यांचे (राजकीय) गुरू खासदार श्री. सुनील तटकरे यांना संबंधित प्रकरणावरून पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर त्यांची भंबेरी उडाली, त त प प करत त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. याअगोदरच्या प्रत्येक प्रकरणात रुपाली चाकणकर यांना तुम्हीच वाचवलं असं म्हणतात. आता या भोंदू अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यात तुमचेही हात काळे झाले असतील, त्यामुळेच कदाचित आता तुम्ही चाकणकर बाईंना वाचवू शकणार नाहीत. या प्रकरणात विस्तृत चौकशी होऊन समाज नासवणारे सगळे काळे चेहरे बाहेर यायलाच हवेत. Sunil Tatkare
Harshwardhan Sapkal22,426 views • 6 months ago