
Jayant Patil- जयंत पाटील
@Jayant_R_Patil • 682,444 subscribers
Leader of Legislative Party, @NCPspeaks Maharashtra|8th Term MLA,Islampur |Ex Minister-Home, Finance,Rural Development & Water Resources,Maharashtra
Shorts
Videos

गोवा राज्यातील मोपा येथील विमानतळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग परिसरातील जमिनींना सोन्याचा भाव आला आहे. मात्र याचा फायदा स्थानिक शेतकऱ्यांना न होता परप्रांतीय घेत आहेत. स्थानिकांच्या जमिनी बेकायदेशीर मार्गाने परप्रांतीय हडप करत असल्याच्या अनेक तक्रारी स्थानिक नागरिकांनी माझ्याकडे मांडल्या होत्या. यातीलच सासोली तालुका दोडामार्ग येथील परप्रांतीयांनी बनावट कागदपत्रे/दाखल्यांच्या आधारे स्थानिकांच्या जमिनी बळकावल्याचा मुद्दा मागील पावसाळी अधिवेशनात विधानसभेत मी उपस्थित केला होता. त्यानुषंगाने मा. महसूल मंत्री यांनी विभागिय आयुक्त, कोकण यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची स्थापना केली असून चौकशी अहवाल आगामी अधिवेशनात सादर होणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर काल सासोली गावाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. स्थानिक नागरिकांच्या परप्रांतीच्या विरुद्धच्या व पर्यावरण रक्षणाच्या लढ्याला माझा नेहमीच पाठिंबा राहिला असून आगामी काळात देखील सहकार्य राहील. जमीन बळकावण्याचा तसेच पर्यावरणाला हानी पोहचवणाऱ्या सर्व प्रकरणांची न्यायालयीन चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि स्थानिक नागरिकांना न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे. #कोकण_वाचवा #निसर्ग_वाचवा
Jayant Patil- जयंत पाटील23,202 просмотров • 9 дней назад

प्रतीक पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या "राजा शिवाजी" या चित्रपटाचा मोफत शो वाळवा तालुक्यातील पक्षाचे पदाधिकारी आणि नागरिकांसमवेत पाहताना अंगावर शहारे आले, डोळे पाणावले. स्व. विलासराव देशमुख यांची मुले Riteish Deshmukh - Dhiraj V Deshmukh, सून Genelia Deshmukh आणि नातवंड या सर्वांना चित्रपटात पाहून अभिमान वाटला. स्व. विलासरावांच्या संस्काराची पेरणी त्यांच्या कुटुंबात अतिशय सक्षमपणे झाली आहे, याचा प्रत्यय आला. हा इतिहास केवळ चित्रपट म्हणून नाही, तर प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयातील अभिमान म्हणून त्यांनी जिवंत केला आहे. आपल्या मातीची ओळख, रक्तातील स्वाभिमान आणि महाराष्ट्राच्या पराक्रमाची जाज्वल्य गाथा प्रत्येकाने पाहावी. आपल्या मराठमोळ्या चित्रपटाने १०० कोटींचा टप्पा पार तर केलाच आहे, मात्र जगभरातील प्रेक्षकांच्या मनात छत्रपतींची एक अनोखी छाप सोडली आहे, याचा आनंद मोठा आहे. संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! 🚩 Amit V. Deshmukh Prateek Patil
Jayant Patil- जयंत पाटील72,462 просмотров • 6 месяцев назад

मित्रा, पुन्हा भेट होईपर्यंत, मनात आणि हृदयात ❤️
Jayant Patil- जयंत पाटील65,365 просмотров • 8 месяцев назад

किती हा विरोधाभास! आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांनी ६० वर्षांत शेतकर्यांसाठी काहीही केले नाही असे म्हणणाऱ्या पंतप्रधानांनीच पूर्वीच्या भाषणात पवार साहेबांच्या कार्याबद्दल वस्तुस्थिती मांडली होती. Sharad Pawar Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
Jayant Patil- जयंत पाटील168,037 просмотров • 3 лет назад

मागील अधिवेशनात आम्ही ड्रग्स माफिया आणि पोलिस यंत्रणेतील संभाव्य संगनमताचा मुद्दा उपस्थित केला होता. आज एका पोलीस कर्मचाऱ्याने आंदोलनातील विद्यार्थ्यांना "ड्रग्सचं पाकीट खिशात टाकून आत टाकू" अशी धमकी दिल्याचा प्रकार अत्यंत गंभीर आहे. जर असे वक्तव्य झाले असेल, तर त्यामागील सत्य समोर आलेच पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी. शांततेने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना धमकावणे लोकशाहीला शोभणारे नाही.
Jayant Patil- जयंत पाटील20,795 просмотров • 3 месяцев назад

अजितदादांची आणि माझी मैत्री १९८५ पासून होती. आम्ही जवळपास एकाच वेळी सार्वजनिक जीवनात आलो आणि ३५ हून अधिक वर्षे एकत्र काम केले. सुख, दुःख, यश, अपयश या सर्व भावना एकत्र अनुभवल्या. आमचे अनेक बाबतीत एकमत सुद्धा असे आणि काही बाबतीत वेगवेगळे मत देखील असे पण चर्चा करून आम्ही एकमतावर यायचो. दादांच्या वाढदिवसाला न चुकता शुभेच्छा देण्याचा दर वर्षीचा रिवाज या वर्षी मोडला. ३५ वर्षांची मैत्री तोडून दादा लवकर गेले, हा माझा त्यांच्याशी वाद कायम राहील. ' जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ' असे म्हणण्याची इच्छा होत नाही. वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा, दादा...
Jayant Patil- जयंत पाटील19,897 просмотров • 3 месяцев назад

काल जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीहल्ल्यात जखमी झालेल्यांची उपजिल्हा रुग्णालय अंबड येथे आदरणीय श्री. शरदचंद्र पवार साहेब यांच्यासह जाऊन भेट घेतली. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करून आधार दिला. Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Sharad Pawar
Jayant Patil- जयंत पाटील95,755 просмотров • 3 лет назад

मराठी नाट्यसृष्टीचे प्रश्न दहा सेकंदात सोडवणारे पवारसाहेब! बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते आणि भाजपचे माजी खासदार परेश रावल यांची लल्लनटॉप या सुप्रसिद्ध युट्यूब चॅनेल वरील एक मुलाखत नुकतीच पाहण्यात आली. नाटकांच्या वरील जीएसटीचा प्रश्न बरेच दिवस सुटत नव्हता. परेश रावल यांनी पवारसाहेबांना विनंती केली आणि अवघ्या दहा सेकंदात तो प्रश्न सुटला ! आज संपूर्ण देशातील नाट्यसृष्टी पवारसाहेबांच्या एका शब्दामुळे जीएसटीतून मुक्त आहे. Sharad Pawar Paresh Rawal
Jayant Patil- जयंत पाटील47,299 просмотров • 1 год назад

'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेतून छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास घराघरात पोहोचवणारे खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडून आता आणखी एक थोर प्रयत्न होत आहे तो म्हणजे ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही मालिका. ही मालिका केवळ कथानक नसून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या असामान्य कार्याचा, समाजजागृतीच्या ज्वालामुखीचा आणि परिवर्तनशील विचारांचा गौरव करणारा भव्य प्रयत्न आहे. फुले दांपत्यांनी दिलेला पुरोगामी विचार प्रत्येक घरात पोहोचेल, याबद्दल पूर्ण विश्वास आहे. अमोल कोल्हे जी, तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीमला हार्दिक शुभेच्छा! ही मालिका पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. Dr.Amol Kolhe #MiSavitribaiJotiraoPhule
Jayant Patil- जयंत पाटील32,479 просмотров • 1 год назад

तरुण पिढीच्या स्वप्नांना वास्तवात उतरवण्यासाठी एक नवा प्रवास सुरू करत आहोत — "जयंत उडान" ( आजची तरुणाई तडफदार आहे, मेहनती आहे, उमेदीने भरलेली आहे. पण त्यांना हवी आहे योग्य दिशा आणि विश्वासार्ह मार्गदर्शन. म्हणूनच आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आम्ही आणत आहोत एक अद्वितीय व्यासपीठ — • क्षणार्धात तयार होणारा आकर्षक CV • करिअर मार्गदर्शन आणि योग्य सल्ला • अचूक उत्तरे, प्रेरणादायी दिशा आणि वैयक्तिक विकासाचा मार्ग "जयंत उडान" ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील तरुणांसाठी संधींचं दार उघडेल. प्रत्येक तरुणाची क्षमता, त्यांची स्वप्नं आणि त्यांचा आत्मविश्वास यांना योग्य उंची मिळवून देणं हेच आमचं ध्येय. चला, तरुणाईच्या स्वप्नांना देऊया नवी उडान — जयंत उडान! #JayantUdaan
Jayant Patil- जयंत पाटील31,079 просмотров • 1 год назад

मुंबई महानगरपालिकेचा कारभार स्वतंत्र असताना देखील मुंबईचे पालकमंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी मनपामध्ये स्वतःचे कार्यालय उभे केले आहे. मीही या मुंबई शहराचा पालकमंत्री राहिलो आहे. अशापद्धतीने मनपामध्ये पालकमंत्र्यांनी कार्यालय स्थापन करणे म्हणजे मनपाच्या अधिकारात हस्तक्षेप करणे झाले, मनपाच्या कारभारात ढवळाढवळ करणे झाले. मनपामध्ये लोकनियुक्त बॉडी नसताना शासनाच्या लोकांनी त्यापासून लांब राहिलेले बरे नाहीतर चुकीची प्रथा सुरू होईल. #MonsoonSession2023 Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
Jayant Patil- जयंत पाटील64,160 просмотров • 3 лет назад

एकीकडे मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी फाईव्ह स्टार हॉटेल्स, ३०० गाड्यांचा ताफा, दीड हजार रुपयांची जेवणाची एक थाळी असा शाही थाट... दुसरीकडे मात्र कांद्याला प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याचे सरकारने जाहीर केलेले असताना, मालेगावच्या शेतकऱ्याच्या खात्यावर ११२ क्विंटल कांद्याचे अवघे २५२ रुपये अनुदान जमा करत क्रूर थट्टा केली आहे. लोकांच्या पैशांवर मजा करणाऱ्यांनाही जागतिक लोकशाही दिनाच्या शुभेच्छा! #DemocracyDay
Jayant Patil- जयंत पाटील59,628 просмотров • 3 лет назад

नाशिक जिल्ह्यातील देवरगाव येथील शेतकरी कुटुंबातील सुपुत्र सर्वेश कुशारे याने कॉमनवेल्थ स्पर्धेत उंच उडी या प्रकारात रौप्यपदक पटकावत देशासह महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे. कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर मिळवलेले हे यश प्रत्येक ग्रामीण युवकासाठी प्रेरणादायी आहे. शेतकरी कुटुंबातील मुलांमध्ये असलेली अमर्याद क्षमता सर्वेशने आपल्या कामगिरीतून पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल सर्वेश कुशारे याचे मनःपूर्वक अभिनंदन! भविष्यातही तुझ्या यशाने भारताचा तिरंगा जागतिक स्तरावर फडकत राहो, हीच सदिच्छा! 🇮🇳🥈 #commonwealthgames2026 #silvermedal #sarveshkushare
Jayant Patil- जयंत पाटील10,560 просмотров • 3 месяцев назад

मतदार यादीत नाव घुसवण्याची यंत्रणा निवडणूक आयोगानेच केली आहे का? शून्यापासून, स्वल्पविरमापर्यंत विविध प्रकारचे घर क्रमांक असलेली मतदार यादी माझ्याकडे उपलब्ध आहे. एकाच घरात १८८ नावं, २०० नावं हा पण एक प्रकार आहे. लोकांना माझे आवाहन आहे की, आपल्या घरात किती लोकांची नावे आहे ते बघा. नाहीतर उद्या ती लोकं सुद्धा तुमच्या घरावर क्लेम करतील. #VoteChori #pressconference Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Sharad Pawar
Jayant Patil- जयंत पाटील18,977 просмотров • 1 год назад