
Dr.Amol Kolhe
@kolhe_amol • 418,524 subscribers
Member of Parliament, Shirur Lok Sabha, Maharashtra. RTs are not endorsement. @ncpspeaks
Videos

जब दिल और दिमाग में जंग हो तो दिल की सुनो। शायद दिमाग कभी कभी नैतिकता भूल जाता है … पर दिल कभी नहीं। #मी_साहेबांसोबत Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Sharad Pawar Jayant Patil- जयंत पाटील Supriya Sule Dr.Jitendra Awhad TV9 Marathi SakalMedia ABP माझा Maharashtra Times Saamana Online Sarkarnama थोडक्यात LoksattaLive @News18lokmat Lokmat Lokshahi Marathi Max Maharashtra ZEE २४ तास TOI Mumbai Mumbai Tak Pune Times TOI Pune AajTak BBC News Hindi BBC News Marathi India TV Hindi
Dr.Amol Kolhe831,316 просмотров • 2 лет назад

आजचा धक्कादायक अनुभव- मुंबईत सिग्नल्स वाहतूक शाखेच्या महिला पोलिसांनी गाडी अडवून ड्रायव्हरला ऑनलाईन दंड भरण्यास सांगितले. मी स्वतः काय प्रकार आहे याची माहिती घेताना त्या भगिनीने थेट मोबाईलवरील मेसेज दाखवला- प्रत्येक चौकात २५००० रूपयांची वसुली व २० वाहनांवर कारवाई झाली पाहिजे! मुंबईत 652 ट्रॅफिक जंक्शन आहेत. 25,000×652 = 1,63,00,000/ प्रति दिन म्हणजे फक्त एकट्या मुंबईत तब्बल 1.63 कोटी रुपये.. इतर शहरांचं काय? संबंधित मंत्रीमहोदयांनी वा अधिकाऱ्यांनी खुलासा केल्यास वाहतूक शाखेचा उपयोग वाहतूक नियमनापेक्षा वसुलीसाठी होतोय का याची जनतेला माहिती मिळेल! ट्रिपल इंजिन.. ट्रिपल वसुली??? Devendra Fadnavis Sharad Pawar Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Jayant Patil- जयंत पाटील Supriya Sule TV9 Marathi SakalMedia ABP माझा Maharashtra Times Saamana Online Sarkarnama थोडक्यात LoksattaLive @News18lokmat Lokmat Lokshahi Marathi Max Maharashtra ZEE २४ तास TOI Mumbai Mumbai Tak Pune Times TOI Pune BBC News Marathi
Dr.Amol Kolhe407,388 просмотров • 2 лет назад

कुरुप विचारांचा भोंदूपणा, सगळ्या नैतिकतेचंच 'चाक' रुतवून टाकतो... हे महाराष्ट्र आज अनुभवतोय..!
Dr.Amol Kolhe34,881 просмотров • 2 месяцев назад

मुघली आक्रमणासमोर उत्तर भारताने पळी पंचपात्र दडवून मान झुकवलेली असताना, सह्याद्रीच्या कातळावर तलवारीच्या पात्याने इतिहास कोरणाऱ्या महाराष्ट्राला उत्तरेतून येऊन चुकीच्या आणि अर्धवट माहितीच्या आधारे कोणी छत्रपती शिवाजी महाराज शिकवण्याचा प्रयत्न करू नये.. शिवविचारांवर पिंड पोसलेल्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ आराध्य दैवत नाहीत तर आमची अस्मिता, स्वाभिमान आणि ओळख आहेत… काल, आज आणि उद्याही! जय शिवराय 🙏
Dr.Amol Kolhe19,532 просмотров • 1 месяц назад

विचारांची लढाई विचारांनी लढण्याची हिंमत अंगी नसणारे लोक हिंसेचा मार्ग अनुसरतात हा अनुभव आहे. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी या भूमीला दिलेला विचार समस्त मानवजातीला नवी प्रकाशवाट दाखविणारा आहे. या वाटेवरुन चालण्याची हिंमत नाही म्हणून त्यांच्या पुतळ्यावर हल्ला करण्यात आला. परंतु हा भ्याड हल्ला करणाऱ्यांना हे माहित नाही की, महात्मा फुले आणि सावित्रीमाईंचा विचार या देशाच्या कणाकणात रुजलेला आहे. आजही 'गुलामगिरी' तशीच आहे... 'शेतकऱ्याचा आसूड' आणखी प्रखरतेने ओढावा लागणार... 'सार्वजनिक सत्यधर्म' जागवावा लागणार . आणि त्यासाठी आम्ही तत्पर आहोत. जय ज्योती, जय क्रांती ! #mahatmaphule #telangana
Dr.Amol Kolhe42,383 просмотров • 4 месяцев назад

संतापजनक! हडपसर, पुणे येथे एका व्यक्तीला भररस्त्यात बॅंकेचे वसूली एजंट घेरुन मारहाण करतात. रिझर्व्ह बँकेने स्पष्टपणे नमूद केले आहे की - १. वसुली एजंट कर्जदाराला केवळ सकाळी ७:०० ते संध्याकाळी ७:०० या वेळेतच फोन करू शकतात किंवा भेटू शकतात. २. एजंटांनी कोणत्याही परिस्थितीत शारीरिक किंवा मानसिक छळ, अपमान किंवा मारहाण करणे हा गंभीर गुन्हा आहे. 3. कर्जदाराच्या थकबाकीची माहिती त्याच्या शेजाऱ्यांना किंवा मित्रांना देऊन त्याची बदनामी करता येत नाही. 4. वसुलीसाठी येणाऱ्या व्यक्तीकडे बँकेने दिलेले अधिकृत ओळखपत्र आणि अधिकृत पत्र असणे अनिवार्य आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने देखील स्पष्ट केले आहे की, बँका केवळ गुंडांच्या जोरावर कर्जाची वसुली करू शकत नाहीत.जर बँकेच्या एजंटने कायद्याचे उल्लंघन केले, तर त्यासाठी संबंधित बँकेला जबाबदार धरले जाईल. या सगळ्या गोष्टी धाब्यावर बसवून हडपसरमध्ये ही मारहाण झाली.राज्यात कायदा सुव्यवस्था अस्तित्वात आहे की नाही, याबाबत शंका यावी अशी ही घटना आहे. राज्याच्या गृहखात्याने या घटनेची गांभीर्याने नोंद घ्यावी. सदर वसुली एजंटांवर कारवाई झाली पाहिजेच पण संबंधित बॅंकेचीही जबाबदारी टाळता येणार नाही. या बॅंकेवरही योग्य ती कारवाई झाली पाहिजे. या खासगी फायनान्स कंपन्यांच्या मुजोरीला आळा घालणे गरजेचे आहे. Devendra Fadnavis @punepolicecity Ministry of Finance ReserveBankOfIndia
Dr.Amol Kolhe14,320 просмотров • 1 месяц назад

"बटेंगे तो कटेंगे"ला सडेतोड उत्तर ! #Maharashtra #Unity #AssemblyElections2024 #Election2024
Dr.Amol Kolhe96,846 просмотров • 1 год назад

मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात भेट म्हणून देण्यात आलेला जिरेटोप घालण्यास नम्रपणे नकार दिला, जिरेटोपास श्रध्देने वंदन करून योग्य सन्मान केला ही कृती अतिशय स्तुत्य व स्वागतार्ह आहे. राजकीय मतभेद असले, तरी शिवशंभू विचारांचा पाईक म्हणून ही कृती मनाला भावणारी आहे.
Dr.Amol Kolhe79,051 просмотров • 1 год назад

देशांतर्गत विमानसेवेच्या 'सावळ्या गोंधळा'मुळे फ्लाईटला २ तास उशीर अन् मग ३ तासांनी फ्लाईट कॅन्सल..! सिस्टीम वेळ वाया घालवत असली तरी मी नाही! या अनपेक्षितपणे मिळालेल्या 'निवांत वेळेत' एक महत्त्वाचं लेखन पूर्ण केलं. 😀 ३ तासांनी फ्लाईट कॅन्सल झाली याचा मनस्ताप आहेच, पण होऊ दिला नाही याचं जास्त बरं वाटतंय..! इंडिगोकडून ही अपेक्षा नव्हती… यापुढे इंडिगोचा प्रवास नकोच..! जय शिवराय 🙏🏻 IndiGo #Henceforth_No_to_Indigo #FlightDelay #FlightCancel #IndigoDelay #Indigoairlines #Indigo
Dr.Amol Kolhe34,559 просмотров • 6 месяцев назад

महाराष्ट्राचा इतिहास अफजलखानाच्या फर्मानासमोर गुडघे टेकणाऱ्या खंडोजी खोपड्यांचा नाही, तर वतनावर पाणी सोडणाऱ्या कान्होजी जेध्यांचा आहे. #आम्ही_साहेबांसोबत #शरदपवार #SharadPawar #NCP Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Sharad Pawar Jayant Patil- जयंत पाटील Supriya Sule Dr.Jitendra Awhad Balasaheb Patil Shriniwas Patil Vandana Chavan Ashok Pawar Chetan Vitthal Tupe Rohit Pawar Mahebub Shaikh ( महेबुब शेख ) Rohit R.R. Patil Sakshna Salgar
Dr.Amol Kolhe110,261 просмотров • 2 лет назад

आव्हान सोपं नव्हतं... दिल्लीतून महाराष्ट्रावर झालेला हल्ला अन् त्यांना लाभलेली काही आपल्याच माणसांची साथ... हे सगळं महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला लालकरणारं होतं. मात्र... "आलं अंगावर, घेतलं शिंगावर" याप्रमाणे शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनतेने ही निवडणूक आपल्या हातात घेतली, महाविकास आघाडीच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी बळ दिलं आणि शिवजन्मभूमीच्या सर्व निष्ठावान मावळ्यांनी निकराचा लढा दिला. हा विजय मी शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेचा, महाविकास आघाडीच्या सर्व स्वाभिमानी कार्यकर्त्यांना समर्पित करतो !
Dr.Amol Kolhe78,148 просмотров • 2 лет назад

किल्ले शिवनेरीचा छावा पुन्हा संसदेत कडाडला! #UncutFullSpeech #AmolKolhe #Sansadratn #ShirurLokSabhaConstituency #Delhi #ParliamentSession #Farmer #Rammandir #Ayodhya #DrAmolKolheInParliament #माझामतदारसंघ_माझाअभिमान #MyConstituencyMyPride #माझीमाणसं_माझाअभिमान #शिरूरलोकसभामतदारसंघ #अमोलकोल्हे #AmolKolhe Sharad Pawar Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Jayant Patil- जयंत पाटील Supriya Sule TV9 Marathi SakalMedia ABP माझा Maharashtra Times Saamana Online Sarkarnama थोडक्यात LoksattaLive @News18lokmat Lokmat Lokshahi Marathi Max Maharashtra ZEE २४ तास TOI Mumbai Mumbai Tak Pune Times TOI Pune BBC News Marathi
Dr.Amol Kolhe84,569 просмотров • 2 лет назад

केवळ एका 'एन्काऊंटर'ने न्याय मिळाला असं कोणाला वाटत असेल तर ही मोठी धूळफेक आहे. स्वतः गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात गेल्या ६ महिन्यात २१३ माता भगिनींवर अत्याचार झाले आहेत. बदलापूर प्रकरणाला आरोपीवर गुन्हा नोंदवताना झालेली चालढकल, इतर गुन्हेगारांचे अद्याप मोकाट असणे ही पार्श्वभूमी देखील आहे. बदलापूरच्या एन्काऊंटर प्रकरणाची न्यायालयाच्या निगराणीखाली सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. TV9 Marathi SakalMedia ABP माझा Maharashtra Times Saamana Online Sarkarnama थोडक्यात LoksattaLive @News18lokmat Lokmat Lokshahi Marathi Max Maharashtra ZEE २४ तास TOI Mumbai Mumbai Tak Pune Times TOI Pune BBC News Marathi
Dr.Amol Kolhe65,055 просмотров • 1 год назад

आज मान. राहुलजी गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा स्वीकारताना आपसूकच पादत्राणे बाजूला काढतानाचं चित्र माझ्यासह तमाम शिवशंभु भक्तांना अनामिक समाधान देणारं आहे. एक कलाकार व शिवशंभू भक्त या दोन्ही भूमिका निभावताना माझ्याकडूनही वैयक्तिक व सामाजिक जीवनात काही पथ्ये आपसूकच पाळली गेली आहेत. छत्रपतींची प्रतिमा स्वीकारताना पादत्राणे काढून वंदन करणे, छत्रपतींचा पेहराव नसताना जिरेटोप न घालणे, पेहराव नसताना महाराजांचे संवाद न म्हणणे, जिरेटोप व कवड्यांची माळ घालताना नतमस्तक होणे... या गोष्टी कुणी सांगितल्या नाहीत किंवा मीही कधी आवर्जून ठरवलं नाही.. हे सगळं आपसुकच घडलं. आज मान. राहुलजी गांधी Rahul Gandhi यांची कृती पाहून 'मनात खरी श्रद्धा असेल तर काही कृती आपल्याकडून आपसूकच घडतात' ही भावना दृढ झाली.
Dr.Amol Kolhe62,625 просмотров • 1 год назад

शेतकऱ्याचा आसूड... संसदेत बरसला..! संपूर्ण भाषण नक्की ऐका :
Dr.Amol Kolhe48,548 просмотров • 1 год назад