Dr.Amol Kolhe's banner
Dr.Amol Kolhe's profile picture

Dr.Amol Kolhe

@kolhe_amol419,067 subscribers

Member of Parliament, Shirur Lok Sabha, Maharashtra. RTs are not endorsement. | Marathi Warasa YT Channel : https://t.co/S1z0fOgUZN

Videos

kolhe_amol's profile picture

आजचा धक्कादायक अनुभव- मुंबईत सिग्नल्स वाहतूक शाखेच्या महिला पोलिसांनी गाडी अडवून ड्रायव्हरला ऑनलाईन दंड भरण्यास सांगितले. मी स्वतः काय प्रकार आहे याची माहिती घेताना त्या भगिनीने थेट मोबाईलवरील मेसेज दाखवला- प्रत्येक चौकात २५००० रूपयांची वसुली व २० वाहनांवर कारवाई झाली पाहिजे! मुंबईत 652 ट्रॅफिक जंक्शन आहेत. 25,000×652 = 1,63,00,000/ प्रति दिन म्हणजे फक्त एकट्या मुंबईत तब्बल 1.63 कोटी रुपये.. इतर शहरांचं काय? संबंधित मंत्रीमहोदयांनी वा अधिकाऱ्यांनी खुलासा केल्यास वाहतूक शाखेचा उपयोग वाहतूक नियमनापेक्षा वसुलीसाठी होतोय का याची जनतेला माहिती मिळेल! ट्रिपल इंजिन.. ट्रिपल वसुली??? Devendra Fadnavis Sharad Pawar Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Jayant Patil- जयंत पाटील Supriya Sule TV9 Marathi SakalMedia ABP माझा Maharashtra Times Saamana Online Sarkarnama थोडक्यात LoksattaLive @News18lokmat Lokmat Lokshahi Marathi Max Maharashtra ZEE २४ तास TOI Mumbai Mumbai Tak Pune Times TOI Pune BBC News Marathi

Dr.Amol Kolhe

407,407 次观看 • 2 年前

kolhe_amol's profile picture

विचारांची लढाई विचारांनी लढण्याची हिंमत अंगी नसणारे लोक हिंसेचा मार्ग अनुसरतात हा अनुभव आहे. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी या भूमीला दिलेला विचार समस्त मानवजातीला नवी प्रकाशवाट दाखविणारा आहे. या वाटेवरुन चालण्याची हिंमत नाही म्हणून त्यांच्या पुतळ्यावर हल्ला करण्यात आला. परंतु हा भ्याड हल्ला करणाऱ्यांना हे माहित नाही की, महात्मा फुले आणि सावित्रीमाईंचा विचार या देशाच्या कणाकणात रुजलेला आहे. आजही 'गुलामगिरी' तशीच आहे... 'शेतकऱ्याचा आसूड' आणखी प्रखरतेने ओढावा लागणार... 'सार्वजनिक सत्यधर्म' जागवावा लागणार . आणि त्यासाठी आम्ही तत्पर आहोत. जय ज्योती, जय क्रांती ! #mahatmaphule #telangana

Dr.Amol Kolhe

42,401 次观看 • 5 个月前

kolhe_amol's profile picture

आज मान. राहुलजी गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा स्वीकारताना आपसूकच पादत्राणे बाजूला काढतानाचं चित्र माझ्यासह तमाम शिवशंभु भक्तांना अनामिक समाधान देणारं आहे. एक कलाकार व शिवशंभू भक्त या दोन्ही भूमिका निभावताना माझ्याकडूनही वैयक्तिक व सामाजिक जीवनात काही पथ्ये आपसूकच पाळली गेली आहेत. छत्रपतींची प्रतिमा स्वीकारताना पादत्राणे काढून वंदन करणे, छत्रपतींचा पेहराव नसताना जिरेटोप न घालणे, पेहराव नसताना महाराजांचे संवाद न म्हणणे, जिरेटोप व कवड्यांची माळ घालताना नतमस्तक होणे... या गोष्टी कुणी सांगितल्या नाहीत किंवा मीही कधी आवर्जून ठरवलं नाही.. हे सगळं आपसुकच घडलं. आज मान. राहुलजी गांधी Rahul Gandhi यांची कृती पाहून 'मनात खरी श्रद्धा असेल तर काही कृती आपल्याकडून आपसूकच घडतात' ही भावना दृढ झाली.

Dr.Amol Kolhe

62,625 次观看 • 1 年前