
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
@mieknathshinde • 1,111,796 subscribers
Dy. Chief Minister, Maharashtra | Minister of Urban Development, Housing & Public Works (Public Ent.)
Shorts
Videos

📍पुणे पर्व महिला सक्षमीकरणाचे.. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना - वचनपूर्ती सोहळा!
Eknath Shinde - एकनाथ शिंदे472,836 Aufrufe • vor 2 Jahren

दुर्मिळ रत्न हरपले नैतिकता आणि उद्यमशीलता यांचा अपूर्व आणि आदर्श संगम रतनजी टाटा यांच्या ठायी होता. सुमारे १५० वर्षांची श्रेष्ठत्व आणि सचोटीची परंपरा असलेल्या टाटा ग्रुपची जबाबदारी यशस्वीरित्या पेलणारे रतनजी टाटा हे एक जिवंत आख्यायिका होते. त्यांनी वेळोवेळी दाखविलेला निर्णायक खंबीरपणा आणि मानसिक कणखरपणी टाटा ग्रूपला वेगळ्या औद्योगिक उंचीवर घेऊन गेला. त्यांना मी आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. रतनजी टाटा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. रतनजी टाटा हे भारताचा अभिमान होते, येत्या पिढीच्या उद्योजकांसाठी ते नेहमीच एक आदर्श राहतील. रतनजी टाटा यांनी अतिशय कौशल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या अनेक कंपन्यांना टेकओव्हर करुन व्यवसाय वाढवला. माहिती तंत्रज्ञानाच्या नव्या क्षेत्रांतही त्यांनी दमदारपणे आघाडी घेतली. टाटा ग्रूपची विश्वासार्हता जपत त्यांनी टाटा ग्रूपचा विस्तार केला. आपल्या निर्णयक्षमतेने त्यांनी टाटा ग्रुपच्या कंपन्यांमध्ये सळाळते चैतन्य निर्माण केले. नैतिकता जपत उद्योगाबरोबरच देश आणि समाजाचा विकास करण्याची टाटांची विचारधारा आणि परंपरा त्यांनी समर्थपणे सांभाळली. रतनजी टाटा यांची औद्योगिक झेप आकाशाला गवसणी घालणारी होती. तरुणांमधील कर्तृत्वाला, प्रयोगशिलतेला प्रोत्साहन देण्यात ते कायम आघाडीवर होते. १९९१ मध्ये रतनजी टाटा टाटा समूहाचे अध्यक्ष झाले. त्यांच्या कार्यकाळात टाटा समूहाचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला. त्यांनी टेल्को (नंतर टाटा मोटर्स) ची कार निर्मिती क्षेत्रात आणि टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस (TCS) ची माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीची कंपनी बनवली. तसेच, टाटा केमिकल्स, टाटा टी, टाटा स्टील यासारख्या अनेक कंपन्यांना त्यांनी यशस्वी केले. २०१२ मध्ये ते टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त झाले. मात्र, त्यानंतरही ते विविध उद्योगांना मार्गदर्शन करत होते. २००८ च्या मुंबई हल्ल्यांनंतर रतनजी टाटा यांनी दाखवलेला खंबीरपणा सगळ्यांच्या कायमच स्मरणात राहील. त्यांचे निर्णय, धाडसी वृत्ती आणि सामाजिक बांधिलकी यांचे स्मरण कायम राहणार आहे. #RatanTata
Eknath Shinde - एकनाथ शिंदे407,791 Aufrufe • vor 1 Jahr

मुंबई महाराष्ट्रासाठी.. महाराष्ट्राच्या जनतेसाठी.. 'शिवसेना जनतेच्या दारी' अभियान!
Eknath Shinde - एकनाथ शिंदे19,310 Aufrufe • vor 1 Monat

जय हिंद! मुंबई, लोकभवन येथील वीरसैनिक व वीरपत्नींचा सन्मान सोहळा. #कारगिल_दिवस
Eknath Shinde - एकनाथ शिंदे17,410 Aufrufe • vor 29 Tagen

ठाणे शहरात आणि ठाणे- खारेगाव तसेच ठाणे- नाशिक महामार्गावर जागोजागी खड्डे पडल्याने प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत होत्या. आज रविवारी सकाळी मी व्यक्तीशः या मार्गाला भेट देऊन खड्डे बुजवण्याच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली.
Eknath Shinde - एकनाथ शिंदे366,559 Aufrufe • vor 3 Jahren

परदेशी कशाला जायाचं गड्या आपला गाव बरा शेत पिकाची दुनिया न्यारी वसे जिथे विठूरायाची पंढरी... लोकसभा निवडणुकीच्या धकाधकीतून थोडा वेळ काढून महाबळेश्वर तालुक्यातील दरे या माझ्या मूळ गावी जाऊन थोडा विसावा घेतला. यावेळी शेतशिवारात फेरफटका मारून शेती आणि मातीची पाहणी केली. जीवाला जीव देणाऱ्या गाई गुरांची चौकशी करून त्यांना प्रेमाने दोन घास खाऊ घातले. तसेच शेतात जाऊन चिकू, फणस, सुपारी आणि भाज्यांच्या लागवडीची पाहणी केली. इथली माती माझ्या मनाला शांतता देतेच पण पुन्हा एकदा नव्या जोमाने नवी आव्हाने सर करण्याचे बळही देते.
Eknath Shinde - एकनाथ शिंदे271,364 Aufrufe • vor 2 Jahren

📍ठाणे वंदन महामानवाला.. वंदन गुरुवर्याला.. 🙏🏻 ◆ धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या 'शक्तीस्थळ' या समाधीस्थळी वंदन करून आशीर्वाद घेतले. ◆ महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ( ५ डिसेंबर २०२४)
Eknath Shinde - एकनाथ शिंदे212,084 Aufrufe • vor 1 Jahr

मुंबईतील घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन सुरू असलेल्या मदतकार्याचा आढावा घेतला. या दुर्घटनेत आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला असून ५७ लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात बचावपथकाला यश आले आहे. मदतकार्य वेगाने सुरू असून होर्डिंगच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. यावेळी भाजप नेते किरीट सोमय्या, आमदार पराग शहा, आमदार मिहीर कोटेचा, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे उपस्थित होते. #Mumbai #EknathShinde
Eknath Shinde - एकनाथ शिंदे260,875 Aufrufe • vor 2 Jahren

