
मनसे रिपोर्ट | MNS Report
@mnsreport9 • 21,582 subscribers
विचार महाराष्ट्राचा | निर्धार स्वराज्याचा | सुरवात नवनिर्माणाची: Follow @mnsreport9 📩 Promo/News: [email protected] #RajThackeray,#MNS,#Marathi #मराठी
Shorts
Videos

आज मुंबईत भाजपची तिरंगा रॅली होती! तिथे कॉलेजच्या पोरांना जबरदस्ती पाठविले गेले असल्याचे दिसून येतेय. मुलांना आपण कशासाठी आलो आहोत हे कळण्यासाठी तरी वेळ दिला पाहिजे होता. बसेस भरून काहीं जण आणून GenZ आमच्या सोबत आहे हे दाखविण्याचा भाजपचा हा केविलवाणा प्रयत्न आहे.... तो देखील फसलाय 😭
मनसे रिपोर्ट | MNS Report27,002 views • 10 days ago

हेडलाईन :- भाजपचे पुण्यात जोरदार आंदोलन ! भारतीय जनता पक्षाचे पुण्यात ११९ नगरसेवक, ९ आमदार, २ खासदार अशी ताकद आहे. आणि आज रस्त्यावरच्या भाजपाच्या आंदोलनात १३ कार्यकर्ते होते. ( २ झेंडा पकडण्यासाठी राखीव) बाकी १० प्रायव्हेट फोटोग्राफर, २५ मिडिया कर्मचारी, १२० पोलिस कर्मचारी तिथे उपस्थित होते. इतक्या मोठ्या मोर्चासाठी सामान्य पुणेकर ह्यांना रस्ता बंद करून वेठीस ठेवले गेले होते. आता रस्ता का बंद केला होता इतक्या मोठ्या मोर्चा साठी हे कोडे आता पोलिस सोडवत आहेत. बाकी आंदोलनाचा परिणाम इतका जबरदस्त होता की कुत्रा सुद्धा बाजूला हलला नाही. #bjp #pune
मनसे रिपोर्ट | MNS Report45,627 views • 29 days ago

तरुणांचा नेता , तरुणांच्या सोबत! #RajThackeray ❤️ ठाकरेंना रस्त्यावरची लढाई लढायला शिकण्याची गरज नाही, ते त्यात पारंगत आहेत. आज तरुणाई ने हाक देताच दोन्ही ठाकरे तरुणांसोबत रस्त्यांवर उतरत आहेत. राजकारण बाजूला सोडा, मात्र महाराष्ट्र पुन्हा पेट घेतोय हे चांगले आहे.
मनसे रिपोर्ट | MNS Report40,343 views • 29 days ago

चोपले... चोपले... बदडवले..! महाराष्ट्रात महिलांकडे वाकड्या नजरेने बघाल, तर गाठ मनसेशी आहे! ठाण्यात एका परप्रांतीय फेरीवाल्याने अमराठी महिलेशी भोजपुरी भाषेत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने त्या महिलेला भोजपुरी समजत असल्याने, त्याचा विकृत हेतू तिच्या लक्षात आला आणि तिने तात्काळ ठाण्यातील मनसे कार्यालय गाठले. मनसेकडे प्रकरण गेल्याचे समजताच तो फेरीवाला पळून गेला होता. पण, मनसेपासून किती दिवस आणि कुठे पळून जाणार? भरबाजारात त्याचा हिशोब चुकता केला,आज अखेर मनसेच्या महाराष्ट्र सैनिकांनी त्याला मार्केटमध्ये गाठलंच. आधी त्या पीडित महिलेने स्वतः त्याला चोप देऊन आपला संताप व्यक्त केला, आणि नंतर मनसे महिला आघाडीने त्याला चांगलाच 'प्रसाद' देऊन जाहीर माफी मागायला लावली. मनसेकडून कडक इशारा देण्यात आला आहे,या कारवाईनंतर परिसरातील सर्व दुकानदारांना आणि व्यावसायिकांना मनसेने कडक शब्दांत ताकीद दिलीय. "छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात जोपर्यंत आदरणीय राजसाहेब ठाकरे यांची 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' आहे, तोपर्यंत महिलांवरील कोणताही अन्याय सहन केला जाणार नाही!"
मनसे रिपोर्ट | MNS Report40,533 views • 1 month ago

ठाकरी बाणा! जशी खेळपट्टी, तशीच फलंदाजी! 🎯 अमित ठाकरेंनी दिल्लीच्या मैदानात उतरून तिथल्याच भाषेत संवाद साधला. त्यामुळे उगाच हिंदीवरून उपदेश करण्याचे कष्ट कोणी करू नये. 'जसा देश तसा वेश' पाळत त्यांनी दिल्लीत हिंदीचा वापर केला, पण सोबतच इंग्रजी आणि मराठीतही तितक्याच प्रभावीपणे आपली बाजू मांडली आहे, हे लक्षात असू द्या!
मनसे रिपोर्ट | MNS Report36,113 views • 1 month ago

भावपूर्ण श्रद्धांजली दादा..🙏 सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी एका जाहीर सभेत अजित पवार यांचे भरभरून कौतुक केले होते, ते क्षण आजही स्मरणात आहेत. त्यावेळी त्यांनी स्पष्टपणे म्हटले होते की, "माझे अजित पवारांशी अनेक मतभेद असतील, पण या माणसाला जातीच्या राजकारणाने कधीही शिवले नाही." या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर वेळोवेळी टीका केली, कोट्या केल्या आणि नकलाही केल्या; परंतु वैयक्तिक द्वेष न ठेवता दोन्ही नेत्यांनी आपल्या राजकीय मर्यादा कायम जपल्या.
मनसे रिपोर्ट | MNS Report147,980 views • 6 months ago

सामान्य नागरिकांना दिलासा देणारा निर्णय. अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे ह्यांचा आदेश. 👇 कोणतेही हॉस्पिटल अथवा डॉक्टर त्यांच्याच मेडिकल ( फार्मसी ) वा त्यांनी नेमून दिलेल्या मेडिकल दुकानातूनच औषधे घेण्याची सक्ती करू शकत नाही. तसे आढळल्यास तक्रार करण्याचे त्यांनी आवाहन केले आहे.
मनसे रिपोर्ट | MNS Report45,175 views • 2 months ago

ह्यांना भेटा हे आहेत भाजपचे आमदार अमीत साटम! वर्ष २०२१ साली BMC ने १०४ % नालेसफाई करुन सुद्धा पाणी साठले म्हणून तत्कालीन आयुक्त चहल आणि सत्ताधारी शिवसेनेवर बोंबलत होते. आज वर्ष २०२६ साली भाजप ची BMC वर सत्ता आहे , देशात आणि राज्यात भाजप आहे. ह्यावर्षी कोरोना नाही, पाऊस सुध्दा उशीरा आला आहे आणि ह्यावर्षी तब्बल १३० % नालेसफाई झाली आहे तरी देखील पाणी साठत आहे. आता अमीत साटम सत्ताधारी भाजपच्या महापौर आणि आयुक्त अश्विनी भिडे ह्यांना काही उपदेश देणार का ? कोणत्या कोणत्या उपाययोजना करायच्या असतात हे अगाध ज्ञान ते द्यायला विसरले असतील का ? #BMC #MUMBAI #Mumbairains Ameet Satam
मनसे रिपोर्ट | MNS Report32,714 views • 1 month ago

सह्याद्रीच्या चिकाटीने भारताला सुवर्णपदक! आशियाई U-23 अथेलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताने शानदार विजयाने मोहिमेची सुरुवात केली. मिश्र ४x४०० मीटर रिले स्पर्धेत भारताने यजमान चीनचा अवघ्या ०.१० सेकंदांनी पराभव करत सुवर्णपदक पटकावले. अस्तिक प्रधान, संदरामोल साबू, सेतू मिश्रा आणि श्रावणी सचिन सांगळे यांच्या संघाने ३:१८.६४ वेळ नोंदवत सुवर्ण जिंकले, तर चीनने ३:१८.७४ वेळेसह रौप्यपदक मिळवले. हि शेवटची मुलगी जिने मागे असूनदेखील जिद्दीने अंतर कापून सुवर्पदक घेतली ती आपल्या नाशिकची आहे. *कु. श्रावणी सचिन सांगळे.* हा व्हिडिओ पाहिल्यानंतर छाती अभिमानाने भरून आली. असे क्षण आयुष्यात खुप कमी वेळा येतात. जेव्हा आपण मागे असतो आणि विजयश्री अक्षरशः खेचून आणतो. #Athletics #IndianAthletics #AsianU23 #afiindia #proudmoment #MNS_REPORT
मनसे रिपोर्ट | MNS Report24,378 views • 1 month ago

काय आहे हे? भाजप कडून पुजाऱ्यांना मारहाण. महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील प्रकरण आठवते का? 'साधूंचा अपमान' वगैरे बोलून भाजपने देशात रान पेटवले होते; नंतर ज्याने मारहाण केली, त्यालाच भाजपमध्ये पक्षप्रवेश दिला... आता तर पुजाऱ्याला थेट डिबेटमध्ये मारहाण होत आहे.
मनसे रिपोर्ट | MNS Report21,689 views • 1 month ago

किती हा निर्लज्जपणा! सत्तेच्या मस्तीत मुंबईकरांच्या जिवाशी खेळ? मुंबईत भाजप, राज्यात भाजप आणि केंद्रातही भाजप! सत्ता आणि प्रशासनाची संपूर्ण ताकद हातात असताना, अवघ्या दोन दिवसांत दोन निष्पाप मुंबईकरांना आपल्या प्राणाला मुकावे लागले. हा निव्वळ अपघात नाही, तर प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या अक्षम्य चुकांमुळे झालेला 'प्रशासकीय खून' आहे! या भीषण परिस्थितीवर उत्तर देण्याऐवजी, मुंबईकरांचा जीव गेल्यावरही भाजपचे मुंबई अध्यक्ष माध्यमांसमोर लाजेकाजेस्तव तोंड लपवण्याऐवजी दात काढून हसतायत? जनतेच्या वेदनेवर मीठ चोळणारा हा संवेदनशून्यतेचा कळस आहे!
मनसे रिपोर्ट | MNS Report28,157 views • 1 month ago

राजसाहेबांविरुद्ध वाकडं पाऊल टाकाल, तर 'रसमलाई' नक्कीच मिळेल! 🔥 निवडणुकीच्या निकालानंतर कोपरखैरणेमध्ये मनसेचा पहिला दणका! राजसाहेब आणि ठाकरे परिवाराबद्दल व्हॉट्सॲप ग्रुपवर गरळ ओकणाऱ्या मुजोर परप्रांतीय सोसायटी अध्यक्षाला मनसे सैनिकांनी 'प्रसाद' दिला. रसमलाई अंगावर ओतून त्याला महाराष्ट्राचा दणका दाखवून दिला आहे. सावधान: हा महाराष्ट्र आहे, इथे सन्मान राखलाच पाहिजे! 🚩💪🏻 #मनसे_दणका #राजठाकरे #महाराष्ट्रसैनिक #कोपरखैरणे #MNS MaharashtraFirst Follow @mnsreport
मनसे रिपोर्ट | MNS Report89,236 views • 7 months ago