
माझी Mumbai, आपली BMC
@mybmc • 1,005,658 subscribers
Official handle of Brihanmumbai Municipal Corporation, disseminating verified, credible & relevant updates. Not monitored 24/7.
Shorts
Videos

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी महापौर निवासस्थानी श्रीगणेशाचे घेतले दर्शन 🔷श्रीगणेशोत्सवाच्या पावन प्रसंगी, महापौर निवासस्थानी विराजमान विघ्नहर्त्या श्रीगणरायाचे दर्शन घेण्यासाठी राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी आज (दिनांक १४ सप्टेंबर २०२६) सायंकाळी उपस्थिती लावली. 🔷यावेळी त्यांनी श्रीगणेश मूर्तीचे पूजन - आरती करून संपूर्ण मुंबई व महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी, समृद्धीसाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी श्रीचरणी प्रार्थना केली. 🔷याप्रसंगी मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे, महापौरांचे पती श्री. राजेश तावडे, सुपुत्र यश, सुकन्या ॲड. मधुरा, इतर कुटुंबीय आणि भाविक उपस्थित होते. CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी
माझी Mumbai, आपली BMC35,156 views • 1 day ago

🔷भांडूप पश्चिम येथील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे मार्ग बृहन्मुंबई महानगरपालिका विशेष दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांनी झाडांच्या पानांपासून श्रीगणेश साकारून पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचा संदेश दिला. CMO Maharashtra Ashish Shelar Bappa.org #ganeshotsav #ganeshfestival #Ganeshotsav2026 #गणेशोत्सव #घरोघरीबाप्पा #राज्यउत्सव
माझी Mumbai, आपली BMC21,574 views • 1 day ago

महापौर निवासस्थानी गणपती बाप्पाचे भक्तिभावाने स्वागत शाडू मातीची मूर्ती, पर्यावरणपूरक आरास आणि महानगरपालिका शाळेतील चिमुरड्या रितिकच्या कलेचा विशेष सन्मान 🔷श्रीगणेश चतुर्थीच्या पावन पर्वावर मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या शासकीय निवासस्थानी अर्थात महापौर बंगल्यावर विघ्नहर्त्या श्रीगणरायाची अत्यंत भक्तिभावाने व मंगलमय वातावरणात आज (दिनांक १४ सप्टेंबर २०२६) सकाळी प्रतिष्ठापना करण्यात आली. दीड दिवसांच्या या लाडक्या बाप्पाच्या आगमनाने चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. 🔷महापौर निवासस्थानावरील श्रीगणेशोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे पर्यावरणपूरकतेला दिलेले प्राधान्य होय. महापौर निवासस्थानी विराजमान झालेली मूर्ती ही पर्यावरणपूरक शाडू मातीची आहे. आरास देखील विविध फुले व पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून साकारण्यात आली आहे. 🔷बृहन्मुंबई महानगरपालिका संचालित प्रभादेवी महानगरपालिका शाळेतील इयत्ता दुसरीचा विद्यार्थी रितिक पासवान याने स्वतःच्या हाताने बनवलेली, शाडू मातीची छोटी गणेशमूर्ती मागील आठवड्यात महापौरांना भेट दिली होती. त्या बालसुलभ कलेचा आणि भावनेचा सन्मान राखत, महापौरांनी या मूर्तीचीही निवासस्थानी प्रतिष्ठापना केली. याप्रसंगी रितिक व त्याची आई उपस्थित होते. आपल्या हाताने साकारलेला बाप्पा थेट महापौरांच्या घरी पुजला जात असल्याचे पाहून रितिक व त्याच्या मातेचा आनंद गगनात मावत नव्हता. 🔷यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महापौर श्रीमती रितू तावडे म्हणाल्या की, "महाराष्ट्राचा राज्य महोत्सव असलेल्या श्रीगणेशोत्सवाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा प्रदान करते. लाडका बाप्पा आपल्या मुंबई नगरीवर कृपादृष्टी ठेवो आणि प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य प्रदान करो, हीच प्रार्थना," अशा शब्दांत महापौर श्रीमती रितू तावडे यांनी भावना व्यक्त केल्या. #ganpatifestival #ganeshotsav #ganeshfestival #Ganeshotsav2026 #MyBMCUpdates #गणेशोत्सव #राज्यउत्सव
माझी Mumbai, आपली BMC21,837 views • 2 days ago

🔷बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून श्रीगणेश मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम विसर्जन तलावांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. चला पर्यावरणस्नेही मुंबईचा, पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सव साजरा करूया 🌺♻️ #ganpatifestival #ganeshotsav #ganeshfestival #Ganeshotsav2026 #MyBMCUpdates #गणेशोत्सव #राज्यउत्सव
माझी Mumbai, आपली BMC17,326 views • 2 days ago

🔷बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी दैनिक इंडियन एक्सप्रेसच्या ‘Idea Exchange’ आणि दैनिक लोकसत्ताच्या ‘लोकसंवाद’ या उपक्रमात सहभाग नोंदवला. 🔷रस्ते, पाणी, स्वच्छता यांसह पायाभूत सुविधांच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुरू असलेले प्रकल्प, उपाययोजनांबाबत त्यांनी सविस्तर मांडणी केली. या संवादाची ही चित्रफीत…. Ashwini Bhide
माझी Mumbai, आपली BMC18,933 views • 2 days ago

🔹बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने बृहन्मुंबई क्षेत्रात ‘पादचारी प्रथम’ (Pedestrian First) अभियान राबविण्यात येत आहे. 🔹या अंतर्गत, आज विविध ठिकाणी अनधिकृत फेरीवाले, अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. #PedestrianFirst #MyBMCUpdates CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी
माझी Mumbai, आपली BMC25,840 views • 4 days ago

🔹बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी विहार तलाव आज रात्री ०९ वाजता ओसंडून वाहू लागला आहे. मागील काही दिवसांमध्ये पाणलोट क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या दमदार पावसामुळे इतर ६ जलाशयांची पाणी पातळीही वाढत आहे. 🔹आज ओसंडून वाहू लागलेल्या विहार तलावाची कमाल जलधारण क्षमता ही २,७६९.८ कोटी लीटर (२७,६९८ दशलक्ष लीटर) एवढी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ धरणांची एकूण कमाल पाणी साठवण क्षमता ही सुमारे १,४४,७३६.३ कोटी लीटर (१४,४७,३६३ दशलक्ष लीटर) इतकी आहे. #MyBMCUpdates
माझी Mumbai, आपली BMC251,991 views • 2 months ago

श्रीगणेशोत्सवासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सज्ज - महापौर श्रीमती रितू तावडे श्रीगणेशोत्सवाच्या पूर्वतयारीची महापौर श्रीमती रितू तावडे, उपमहापौर श्री. संजय घाडी यांनी केली पाहणी 🔷मुंबईमध्ये श्रीगणेशोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर श्रीगणेशोत्सवाच्या कालावधीत मुंबईकर नागरिक, श्रीगणेशभक्त तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आवश्यक नागरी सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने सर्वंकष तयारी केली आहे. पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मूर्तीकारांना शाडूची माती आणि पर्यावरणपूरक रंग उपलब्ध करून देण्यात आले आहे. सहा फूट किंवा त्यापेक्षा कमी उंचीच्या घरगुती श्रीगणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी संपूर्ण मुंबईत सुमारे ३८३ हून अधिक कृत्रिम तलावांची उभारणी करण्यात आली आहे. तसेच, सहा फुटांपेक्षा अधिक उंचीच्या श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येणाऱ्या नैसर्गिक विसर्जन स्थळांवरील तलावांमधील गाळ व कचरा काढून तलाव स्वच्छ करण्यात आले आहेत. त्यामुळे यंदाचा श्रीगणेशोत्सव मुंबईकर नागरिक स्वच्छ, सुरक्षित व सुंदर वातावरणात साजरा करतील, असा विश्वास मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी व्यक्त केला. 🔷यंदाच्या सार्वजनिक श्रीगणेशोत्सवाला दिनांक १४ सप्टेंबर २०२६ रोजी प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेली पूर्वतयारी, विशेषतः श्रीगणेशमूर्ती विसर्जन स्थळांवरील व्यवस्था तसेच उपलब्ध करून देण्यात आलेल्या नागरी सेवा-सुविधांची पाहणी करण्यासाठी मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे आणि उपमहापौर श्री. संजय घाडी यांनी आज उपनगरातील विविध विसर्जन स्थळांचा पाहणी दौरा केला. 🔷श्रीगणेशभक्त, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे तसेच मुंबईकर नागरिकांना श्रीगणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या उपाययोजनांचा महापौर श्रीमती रितू तावडे आणि उपमहापौर श्री. संजय घाडी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. यावेळी विविध नैसर्गिक विसर्जन स्थळे तसेच कृत्रिम तलावांना भेट देऊन तेथील एकंदर व्यवस्थेची पाहणी करण्यात आली. 🔷या पाहणी दौऱ्याची सुरुवात कुर्ला येथील शीतल तलावापासून झाली. त्यानंतर मुलुंड येथील मोरया तलाव, पवई तलाव, के-उत्तर विभागातील शामनगर तलाव तसेच जुहू चौपाटी येथील विसर्जन स्थळाची पाहणी करण्यात आली. 🔷विसर्जन स्थळांवर आवश्यकतेनुसार पुरेशा संख्येने तराफे उपलब्ध करून देण्यात यावेत. श्रीगणेशभक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, पुरेशा प्रमाणात जीवरक्षकांची नियुक्ती करण्यात यावी. तसेच, पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र फिरत्या शौचालयांची व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देश महापौर श्रीमती रितू तावडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. 🔷सर्व विसर्जन स्थळांवर श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी करण्यात आलेली व्यवस्था, कृत्रिम तलावांची उभारणी, श्रीगणेशभक्तांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या नागरी सेवा-सुविधा तसेच विसर्जनाच्या दिवशी आवश्यक असलेल्या सुरक्षा उपाययोजनांचा यावेळी सर्वंकष आढावा घेण्यात आला. 🔷उपमहापौर श्री. संजय घाडी यांनीदेखील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येणाऱ्या तलावांचे सुशोभीकरण करण्यात यावे, सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या संख्येने जीवरक्षकांची नियुक्ती करण्यात यावी. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने समन्वय साधून विसर्जन स्थळी आवश्यक ती कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले. 🔷तसेच, विसर्जन स्थळी संकलित होणाऱ्या निर्माल्यापासून खतनिर्मिती करण्याच्या प्रक्रियेबाबत सर्व संबंधित विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात यावे, अशी सूचनाही उपमहापौर श्री. संजय घाडी यांनी केली. 🔷या पाहणी दौऱ्यात एस व टी प्रभाग समिती अध्यक्षा श्रीमती साक्षी दळवी, महिला व बालकल्याण समिती अध्यक्षा श्रीमती मीनल तुर्डे, नगरसेवक श्री. चंदन शर्मा, सहआयुक्त (परिमंडळ ४) डॉ. (श्रीमती) भाग्यश्री कापसे, उप आयुक्त (परिमंडळ २) तथा श्रीगणेशोत्सव समन्वयक श्री. प्रशांत सपकाळे, उप आयुक्त (परिमंडळ ५) श्रीमती संध्या नांदिवडेकर, उप आयुक्त (परिमंडळ ६) श्री. संतोषकुमार धोंडे, एल विभागाचे सहायक आयुक्त श्री. अनिल जाधव, टी विभागाच्या सहायक आयुक्त श्रीमती योगिता कोल्हे, एस विभागाच्या सहायक आयुक्त श्रीमती समरीन सय्यद, के-उत्तर विभागाच्या सहायक आयुक्त श्रीमती रूपाली कदम, के-पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त श्री. चक्रपाणी अल्ले आदी उपस्थित होते.
माझी Mumbai, आपली BMC17,648 views • 5 days ago

मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या मुंबईतील विविध दहीहंडी उत्सवांना भेटी; गोविंदा पथकांचा वाढवला उत्साह केईएम रुग्णालयात जाऊन जखमी गोविंदांची केली विचारपूस; दर्जेदार उपचारांचे प्रशासनाला निर्देश 🔷मुंबईत मोठ्या उत्साहात साजऱ्या झालेल्या दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने, मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी काल (दिनांक ५ सप्टेंबर २०२५) दिवसभरात शहर व उपनगरांतील विविध भागांत आयोजित दहीहंडी उत्सवांना प्रत्यक्ष भेटी दिल्या. विविध मंडळांच्या ठिकाणी उपस्थित राहून मानवी मनोरे रचणाऱ्या गोविंदा पथकांचे मनोबल वाढवले. तसेच, रात्री उशिरा परळ येथील राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालयाला भेट देऊन उपचारासाठी दाखल जखमी गोविंदांची आस्थेने विचारपूस केली. तसेच, त्यांच्यावर योग्य व तत्पर उपचार करण्याच्या सूचना रुग्णालय प्रशासनाला दिल्या. मुंबईतील विविध दहीहंडी मंडळांना महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या भेटी 🔷मुंबईतील दहीहंडी उत्सवात गोविंदांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी महापौर श्रीमती रितू तावडे यांनी शहर आणि उपनगरांतील विविध प्रमुख दहीहंडी मंडळांना भेटी दिल्या. त्यामध्ये वरळीतील जांबोरी मैदान येथे 'परिवर्तन इंडिया फाउंडेशन' आयोजित परिवर्तन दहीहंडी, भोईवाडा येथे 'स्प्रिंग मिल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ' पुरस्कृत व 'भारतीय जनता पार्टी वडाळा विधानसभा' आयोजित दहीहंडी उत्सव, घाटकोपर (पश्चिम) येथे श्रेयस सिग्नल परिसरात आमदार श्री. राम कदम आयोजित मानाची दहीहंडी, 'लोकसेवा चॅरिटेबल ट्रस्ट' पुरस्कृत कै. सुहास चौधरी मित्र मंडळ आयोजित 'भटवाडीचा लाडका' दहीहंडी उत्सव, 'भारतीय जनता पक्ष' व 'सत्कार्य सेवा संघ' आयोजित भटवाडी नाक्याची मानाची दहीहंडी, असल्फा व्हिलेज येथे 'शिवसेना' पुरस्कृत, नगरसेवक श्री. किरण लांडगे व मित्र परिवार आयोजित 'सन्मान दहीहंडी', घाटकोपर (पश्चिम) येथील सॅनेटोरियम मार्ग येथे 'भारतीय जनता पक्ष' आणि 'महात्मा गांधी मार्ग व्यापारी मंडळ' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दहीहंडी उत्सव, 'भारतीय जनता पक्ष घाटकोपर पूर्व विधानसभा' मतदारसंघ आयोजित 'विक्रांत सर्कल' दहीहंडी उत्सव, घाटकोपर (पूर्व) मधील नारकर मार्ग येथे 'युवा मित्र मंडळ' आयोजित दहीहंडी उत्सव, भांडुप (पश्चिम) येथे कोकण नगर नाका येथील 'भारतीय जनता पक्ष भांडुप' आयोजित दहीहंडी उत्सव, दहिसर (पूर्व) येथे 'शिवसेना शाखा क्रमांक ५' आणि 'भूमिपुत्र प्रतिष्ठान' आयोजित दहीहंडी उत्सव, तसेच दहिसर (पूर्व) मध्ये अशोकवन परिसरातील 'भारतीय जनता पक्ष मागाठाणे विधानसभा' आणि 'शिवराज प्रतिष्ठान' आयोजित दहीहंडी उत्सव यांचा समावेश होता. 🔷या भेटींदरम्यान केंद्रीय मंत्री श्री. पीयूष गोयल, मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे उपसभापती श्री. सचिन अहिर, सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. आशिष शेलार, आमदार श्री. कालिदास कोळंबकर, आमदार श्री. अमित साटम, आमदार श्री. प्रवीण दरेकर, आमदार श्री. पराग शाह, आमदार श्री. राम कदम, उपमहापौर श्री. संजय घाडी आणि इतर लोकप्रतिनिधी, नगरसेवक, नगरसेविका व मान्यवर उपस्थित होते. 🔷गोविंदा पथकांनी शिस्त, संघभावना आणि सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन दहीहंडीचा सण उत्साहात साजरा करावा, अशा शुभेच्छा महापौरांनी यावेळी दिल्या. केईएम रुग्णालयात जावून महापौरांनी जखमी गोविंदांची आस्थेने केली विचारपूस 🔷दहीहंडी उत्सवादरम्यान मानवी मनोरे रचताना शासकीय व महानगरपालिका रुग्णालयांमध्ये रात्री उशिरारापर्यंत झालेल्या नोंदीनुसार एकूण १६८ गोविंदा जखमी झाले. 🔷या पार्श्वभूमीवर, महापौर श्रीमती रितू तावडे यांनी रात्री महानगरपालिकेच्या राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालयाला भेट दिली. 🔷रुग्णालयात अस्थिव्यंग शल्यक्रिया विभागात उपचाराधीन असलेल्या सात गोविंदांच्या प्रकृतीची आणि वैद्यकीय स्थितीची महापौर श्रीमती तावडे यांनी सविस्तर माहिती घेतली. तसेच जखमी गोविंदांशी व त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. 🔷केईएम रुग्णालयात दिवसभरात ४२ गोविंदा वैद्यकीय उपचारासाठी दाखल झाले. पैकी ३५ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. तर, सात जण अस्थिव्यंग शल्यक्रिया विभागात उपचार घेत आहेत, सुदैवाने कोणालाही गंभीर इजा नाही, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. 🔷रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सर्व गोविंदांना आवश्यक ते सर्व वैद्यकीय उपचार प्राधान्याने, वेळेत आणि दर्जेदारपणे देण्याचे निर्देश महापौर श्रीमती रितू तावडे यांनी रुग्णालय प्रशासनाला दिले. 🔷यावेळी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हरीश पाठक, अस्थिव्यंग शल्यक्रिया विभाग प्रमुख डॉ. मोहन देसाई आणि संबंधित वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी
माझी Mumbai, आपली BMC29,697 views • 10 days ago

रांगा टाळा, वेळ वाचवा… मालमत्ता कर भरा घरबसल्या! 🏠📲 मुंबईकरांनो, बृहन्मुंबई महानगरपालिकेचा मालमत्ता कर भरण्यासाठी आता कार्यालयात जाण्याची गरज नाही. डिजिटल पर्यायांचा वापर करून काही मिनिटांत सुरक्षितपणे कर भरणा करा. 🌐 अधिकृत संकेतस्थळ: 💳 पेमेंटचे पर्याय: UPI, Google Pay, PhonePe, डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग तसेच बिलावरील QR कोड. ⚠️ लक्षात ठेवा: पेमेंट करताना प्राप्त झालेला OTP किंवा कोणतीही गोपनीय माहिती इतरांसोबत शेअर करू नका. #MyBMCUpdates #mumbai #PropertyTax CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी
माझी Mumbai, आपली BMC15,937 views • 5 days ago

पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सवाला बळ देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून पर्यावरणपूरक श्रीगणेश मूर्ती घडविणाऱ्या मूर्तिकारांना मोफत शाडू माती तसेच पर्यावरणपूरक रंगांचे वाटप करण्यात येते. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या या उपक्रमाबाबत सांगत आहेत मूर्तिकार श्री. शैलेश चव्हाण..!🙏🌱 #गणेशोत्सव #राज्यउत्सव #ganeshotsav #ganeshfestival #mybmcecoganesha #ecofriendly #ganpatibappamorya #MyBMC #MyBMCUpdates
माझी Mumbai, आपली BMC23,975 views • 9 days ago

🙏 आपली सुरक्षितता हीच माझी प्राथमिकता! मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांचे मुंबईकरांना विनम्र आवाहन.. सध्या मुंबईत मुसळधार पाऊस आणि ‘रेड अलर्ट’ आहे. जोरदार वाऱ्यांमुळे झाडे व फांद्या कोसळण्याच्या घटना घडत आहेत. अशा स्थितीत आपण आणि आपले कुटुंब सुरक्षित राहणे सर्वात महत्त्वाचे आहे. 👉 कृपया अनावश्यक बाहेर पडू नका 👉 झाडांपासून दूर राहा 👉 वाहने सुरक्षित ठिकाणी उभी करा 👉 अफवांवर विश्वास ठेवू नका 📞 आपत्कालीन मदतीसाठी संपर्क: 1916 प्रशासनाच्या सूचनांचे कृपया पालन करावे. #MumbaiRains CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी
माझी Mumbai, आपली BMC152,717 views • 2 months ago

🔹बृहन्मुंबई महानगरपालिकेने सन २०२४ पासून मुंबईतील बेकरी व्यावसायिकांना स्वच्छ इंधनाचा वापर करण्याचे निर्देश दिले आहेत.यासाठी महानगरपालिकेकडून मार्गदर्शन आणि आवश्यक ते सहाय्य देखील प्रदान केले जात आहे. काही बेकरींमध्ये लाकूड आधारित भट्ट्यांचा वापर होत आहे. अशा बेकरी व्यावसायिकांनी हवेच्या गुणवत्तेत वाढ व्हावी यासाठी वीज किंवा नैसर्गिक वायूसारख्या स्वच्छ इंधनाचा वापर करावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे. #MyBMCUpdates CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी
माझी Mumbai, आपली BMC75,831 views • 1 month ago

🔹सुगम्य पदपथ (Accessible Footpath) धोरणांतर्गत बृहन्मुंबई क्षेत्रात ‘पादचारी प्रथम’ (Pedestrian First) अभियान राबविण्यात येत आहे. तसेच, कचरा साचण्याची संवेदनशील ठिकाणे (Garbage Vulnerable Point) निर्मूलनाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अनुषंगाने पूर्व उपनगरातील एन, एस व टी या विभागात (Ward) विविध ठिकाणी सुरू असलेल्या कार्यवाहीची महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी आज सकाळी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. सुमारे तीन तासाहून अधिक काळ चाललेल्या या पाहणी दौऱ्यात श्रीमती भिडे यांनी संबंधितांना विविध निर्देश दिले. 🔹‘टी’ विभागातील एकूण मार्गांपैकी १३ मार्ग ‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत हाती घेण्यात आले आहेत. या १३ मार्गांवरील पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यात येत आहेत. मुलुंड पश्चिम परिसरातील सरदार वल्लभभाई पटेल मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात नोकरदार वर्ग तसेच, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. त्यामुळे या मार्गावरील अतिक्रमणे हटविण्याकामी प्राधान्य देण्यात आले आहे. महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी सरदार वल्लभभाई पटेल मार्गावरील पदपथांची पाहणी केली. 🔹भांडुप रेल्वे स्थानक (पश्चिम) येथे 'बेस्ट' बसेसच्या नियमित वाहतुकीसाठी आणि रस्ते वाहतूकीच्या अनुषंगाने 'अर्बन डिझायनर' च्या माध्यमातून वाहतूक आराखडा तयार करावा, अशा सूचना श्रीमती अश्विनी भिडे यांनी दिल्या.कांजूरमार्ग रेल्वे स्थानक (पश्चिम) परिसरातील १३ गाळे निष्कासन करून हा परिसर पादचाऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात यावा, असे निर्देश श्रीमती भिडे यांनी दिले. या गाळेधारकांना पर्यायी जागा देऊन त्यांचे पुनर्वसन करावे, तसेच पदपथ मोकळा करण्यात यावा, अशाही सूचना त्यांनी दिल्या. 🔹'एन' विभागातील पंतनगर (घाटकोपर) येथील शिवाजी टेक्निकल शाळा परिसरातील पदपथांची आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी पाहणी केली. या परिसरातील पाच ठिकाणी पदपथांवरील अतिक्रमण निष्कासन करण्याची कार्यवाही नियोजित करण्यात आली आहे.त्याचा आढावा श्रीमती भिडे यांनी घेतला. 🔹पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले, अतिक्रमणे व इतर सर्व प्रकारचे अडथळे तत्काळ हटवून पदपथ पूर्णपणे अडथळामुक्त करावेत. तसेच, पदपथांची सुधारणा, सुशोभीकरण आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, असे सक्त निर्देश महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी दिले. 🔹कचऱ्याच्या संवेदनशील ठिकाणांचे निर्मूलन करण्याच्या उद्देशाने मुलुंड पश्चिम येथील पंडित जवाहरलाल नेहरू मार्ग आणि भांडुप येथील बदवाईक रूग्णालय येथे नियमितपणे स्वच्छता करण्याचे निर्देश आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी दिले. कचरा संकलनासाठी नियुक्त केलेल्या संस्थांनी स्थानिक परिसरात घरोघरी नियमितपणे कचरा संकलन करावा. तसेच स्थानिक रहिवाश्यांनी कचरा नियमितपणे योग्य ठिकाणी टाकून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्तश्रीमती भिडे यांनी केले. रस्त्यावरील कचरा टाकण्याच्या ठिकानांचे निर्मूलन करण्याच्या उद्देशाने नियमितपणे दंड वसूल करणे, सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून निगराणी करणे, कचरा संकलन वाहनांद्वारे कचरा संकलन करणे आदी गोष्टी नियमितपणे करण्याच्या सूचना श्रीमती भिडे यांनी दिल्या. 🔹उपायुक्त (आयुक्त कार्यालय) श्री. प्रशांत गायकवाड,उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) श्री. किरण दिघावकर,उपायुक्त (परिमंडळ- ६) श्री. संतोषकुमार धोंडे, सहायक आयुक्त ( टी विभाग) श्रीमती योगिता कोल्हे, सहायक आयुक्त (एस विभाग) श्रीमती समरीन सय्यद, सहायक आयुक्त (एन विभाग) श्री. जयदीप मोरे आदी उपस्थित होते. #PedestrianFirst #MyBMCUpdates CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी Ashwini Bhide
माझी Mumbai, आपली BMC38,384 views • 20 days ago

🔹अंधेरी (पश्चिम) येथील आराम नगर, जे. पी. मार्ग, वेसावे (वर्सोवा) परिसरात अनिवार्य खुल्या जागेचा सेवा क्षेत्र म्हणून वापर करून त्यावर अनधिकृत आच्छादन उभारणाऱ्या तसेच पदपथांत अडथळा निर्माण करणाऱ्या १७ आस्थापनांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. 🔹तसेच, ८ खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांची बेकायदेशीर सांडपाणी जोडणी खंडित करण्यात आली. यामध्ये अरबाब, बरिस्ता, सोराईझाई, हकीम सलून, पर्शिया दरबार, इंक एन ब्रेटो मेन्यू, दार्जिलिंग लिओचा मोमो, चायना सबअर्ब या खाद्य व्यावसायिक आस्थापनांचा समावेश आहे. 🔹अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांच्या निर्देशांनुसार, उपआयुक्त (परिमंडळ ४) डॉ. (श्रीमती) भाग्यश्री कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक आयुक्त (के पश्चिम विभाग) श्री. चक्रपाणी अल्ले यांच्या नेतृत्वात के पश्चिम विभाग कार्यालयाकडून ही कारवाई करण्यात आली. #MyBMCUpdates CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी Ashwini Bhide
माझी Mumbai, आपली BMC138,367 views • 2 months ago

पदपथ अडथळामुक्त करून पादचाऱ्यांसाठी सुलभ करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या ‘पादचारी प्रथम’ (Pedestrian First) अभियानाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या कार्यवाहीची महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी आज सकाळी सुमारे तीन तासांहून अधिक वेळ मुंबई शहर विभागात ठिकठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. 🔹‘डी’,विभागातील नाना चौक, ग्रँट रोड रेल्वे स्थानक, नौशीर भरुचा छेद गल्ली, शंकरशेट मार्ग (भाजी गल्ली), ताडदेव मार्ग; ‘ई’ विभागातील डॉ. आनंदराव नायर मार्ग, बा. य. ल. नायर रुग्णालय परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, नाथ पै मार्ग, संत सावता मार्ग; ‘बी’ विभागातील लोकमान्य टिळक मार्ग, सिंदूर पूल परिसर, जुना बंगालीपुरा गल्ली, रघुनाथ महाराज स्ट्रीट, काझी सय्यद मार्ग; ‘सी’ विभागातील जगन्नाथ शंकरशेट मार्ग, धोबीतलाव गल्ली, महर्षी कर्वे मार्ग, मरीन लाईन्स, चंदनवाडी परिसर; ‘ए’ विभागातील महात्मा जोतिबा फुले मंडई (क्रॉफर्ड मार्केट), महापालिका मार्ग आदी परिसरातील पदपथांची स्थिती आणि दुरुस्ती आदी बाबींची पाहणी केली. ग्रँट रोड रेल्वे स्थानक, जगन्नाथ शंकरशेट मेट्रो स्थानक, बा. य. ल. नायर रुग्णालय परिसरांना भेटी देत त्याठिकाणी पादचाऱ्यांना सुलभपणे मार्गक्रमण करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना दिल्या. तसेच, पदपथांवरील अधिकृत फेरीवाल्यांच्या परवान्यांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. 🔹पदपथांवरील अधिकृत फेरीवाल्यांनी परवाना निश्चित केलेल्या जागेतच व्यवसाय करावा. विहित क्षेत्रफळांपेक्षा अधिक जागा त्यांनी अतिक्रमित करू नये. अनुज्ञापन विभागाने सर्व परवानाधारक फेरीवाले वापरत असलेल्या क्षेत्रफळांची पाहणी करावी. विहित क्षेत्रफळात व्यवसाय करत नसल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश श्रीमती अश्विनी भिडे यांनी यावेळी दिले. पदपथांवरील सर्व प्रकारचे अडथळे दूर करून ते पादचाऱ्यांसाठी सुलभ करावेत. तसेच, पदपथांची सुधारणा, सुशोभीकरण आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, असेही त्यांनी सांगितले. 🔹दरम्यान,‘ई’ विभागातील सुका कचरा संकलन केंद्र, रे रोडस्थित घनकचरा व्यवस्थापन विभाग चौकी, संत सावता मार्गावरील उदचंन केंद्र येथे त्यांनी भेटी दिल्या. तसेच, मोठ्या प्रमाणात कचरा साचणाऱ्या संवेदनशील ठिकाणांची (Garbage Vulnerable Points-GVPs) श्रीमती अश्विनी भिडे यांनी पाहणी केली. 🔹याठिकाणी तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत आणि कचरा फेकणाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच, सुका कचरा वर्गीकरण केंद्रांची रचना योग्य करावी आणि वर्गीकरण केलेल्या कचऱ्याचा प्रकार संबंधित कचऱ्याच्या थैलीवर दर्शनी भागावर नोंदवावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. 🔹दरम्यान, ‘पादचारी प्रथम’ (Pedestrian First) अभियानाच्या अनुषंगाने बृहन्मुंबई क्षेत्रात सुरू असलेल्या कार्यवाहीबाबत श्रीमती अश्विनी भिडे समाधान व्यक्त केले. तथापि, संबंधित विभागाने अधिक प्रभावीपणे उपाययोजना करून पादचाऱ्यांना पदपथांवरील बदल दृश्य (Visible) स्वरूपात जाणवतील, हे सुनिश्चित करावे, असेही श्रीमती अश्विनी भिडे यावेळी म्हणाल्या. 🔹उपायुक्त (परिमंडळ- १) श्रीमती चंदा जाधव , उपायुक्त (आयुक्त कार्यालय) श्री. प्रशांत गायकवाड, सहायक आयुक्त (डी विभाग) श्री. योगेश साळुंके, सहायक आयुक्त (ई विभाग) श्री. आनंद कंकाळ, सहायक आयुक्त (बी विभाग) श्री. जितेंद्र घोराडे, सहायक आयुक्त (ए विभाग) श्री. उज्ज्वल इंगोले, सहायक आयुक्त (सी विभाग) श्री. सुनील माने आदी यावेळी उपस्थित होते. #MyBMCUpdates #PedestrianFirst CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी Ashwini Bhide
माझी Mumbai, आपली BMC52,199 views • 1 month ago

स्वातंत्र्यदिनी मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांचा अनोखा पुढाकार महापौर बंगल्याचे आवार स्थानिक नागरिकांच्या प्रभातफेरी (मॉर्निंग वॉक) साठी खुले 🔷मुंबईच्या महापौरांचे शासकीय निवासस्थान असलेला, भायखळा स्थित महापौर बंगल्याचा निसर्गरम्य परिसर आता स्थानिक नागरिकांच्या प्रभातफेरीसाठी अर्थात ‘मॉर्निंग वॉक’ साठी खुला करण्यात आला आहे. 🔷भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून, मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी आज (दिनांक १५ ऑगस्ट २०२६) सकाळी महापौर निवासस्थानी ध्वजारोहण केल्यानंतर स्वतः या निवासस्थानाचे मुख्य प्रवेशद्वार खुले करून परिसरातील रहिवासी नागरिकांना ही विशेष आणि अनोखी भेट दिली. 🔷मुंबईसारख्या गजबजलेल्या महानगरात नागरिकांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना, शांत, मोकळ्या आणि निसर्गरम्य वातावरणात प्रभातफेरीसाठी हक्काची जागा मिळावी, या उद्देशाने महापौर श्रीमती रितू तावडे यांनी हा निर्णय घेतला आहे. 🔷स्थानिक नागरिकांना बंगल्यालगतच्या पदपथावरून आणि तेथून थेट निवासस्थानाच्या विस्तीर्ण आवारात दररोज सकाळी ६ ते ९ या वेळेत नियमित मॉर्निंग वॉक करता येईल. 🔷मुंबईच्या महापौरांचे सध्याचे निवासस्थान हे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय परिसरात स्थित आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये महापौर म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर, जून २०२६ च्या अखेरीस महापौर श्रीमती रितू तावडे यांनी या शासकीय निवासस्थानात वास्तव्यास प्रारंभ केला. 🔷महापौर बंगल्याच्या परिसरातील स्थानिक नागरिकांशी महापौर नियमित संवाद साधत असतात. पुरातन वारसा अर्थात हेरिटेज श्रेणीत असलेल्या या बंगल्याचा परिसर वृक्षांनी वेढलेला आहे. भल्या सकाळी निसर्गाच्या सान्निध्यात फिरणे नागरिकांच्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी असते. हे लक्षात घेऊन आणि स्वातंत्र्यदिनी महापौर श्रीमती रितू तावडे यांनी स्वतः घेतलेल्या या जनहिताच्या निर्णयामुळे स्थानिक रहिवासी आणि ज्येष्ठ नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत असून, महापौरांच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे. #MyBMCUpdates CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी
माझी Mumbai, आपली BMC54,259 views • 1 month ago

📚बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांमध्ये गणित आणि विज्ञान विषयांची गोडी निर्माण करण्यासाठी सुरू केलेले अभिनव उपक्रम ‘गणित गुरुवार’ आणि ‘सायन्स सोमवार’ आता संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहे.📝 🔹बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये यशस्वीपणे राबविण्यात आलेल्या या उपक्रमांची दखल घेत महाराष्ट्र शासनाने हे उपक्रम राज्यभर राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईत रुजलेली या दोन संकल्पना आता संपूर्ण महाराष्ट्रात अंमलात येणार आहेत. 🔹खान अकॅडमीच्या सहकार्याने आणि ‘गणित गुरुवार’ उपक्रमांच्या माध्यमातून गत वर्षभरात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील तब्बल ३१ हजार विद्यार्थ्यांनी गणित विषयात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. #MyBMCUpdates CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी Khan Academy
माझी Mumbai, आपली BMC78,980 views • 1 month ago