
माझी Mumbai, आपली BMC
@mybmc • 1,005,272 subscribers
Official handle of Brihanmumbai Municipal Corporation, disseminating verified, credible & relevant updates. Not monitored 24/7.
Shorts
Videos

📚बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांमध्ये गणित आणि विज्ञान विषयांची गोडी निर्माण करण्यासाठी सुरू केलेले अभिनव उपक्रम ‘गणित गुरुवार’ आणि ‘सायन्स सोमवार’ आता संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहे.📝 🔹बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये यशस्वीपणे राबविण्यात आलेल्या या उपक्रमांची दखल घेत महाराष्ट्र शासनाने हे उपक्रम राज्यभर राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईत रुजलेली या दोन संकल्पना आता संपूर्ण महाराष्ट्रात अंमलात येणार आहेत. 🔹खान अकॅडमीच्या सहकार्याने आणि ‘गणित गुरुवार’ उपक्रमांच्या माध्यमातून गत वर्षभरात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील तब्बल ३१ हजार विद्यार्थ्यांनी गणित विषयात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. #MyBMCUpdates CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी Khan Academy
माझी Mumbai, आपली BMC78,414 次观看 • 7 天前

🔹बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी विहार तलाव आज रात्री ०९ वाजता ओसंडून वाहू लागला आहे. मागील काही दिवसांमध्ये पाणलोट क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या दमदार पावसामुळे इतर ६ जलाशयांची पाणी पातळीही वाढत आहे. 🔹आज ओसंडून वाहू लागलेल्या विहार तलावाची कमाल जलधारण क्षमता ही २,७६९.८ कोटी लीटर (२७,६९८ दशलक्ष लीटर) एवढी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ धरणांची एकूण कमाल पाणी साठवण क्षमता ही सुमारे १,४४,७३६.३ कोटी लीटर (१४,४७,३६३ दशलक्ष लीटर) इतकी आहे. #MyBMCUpdates
माझी Mumbai, आपली BMC251,575 次观看 • 23 天前

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूलमध्ये अभ्यासासह संगीत आणि कला शिक्षणाचेही धडे देऊन विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव दिला जातो. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत संगीताची आवड जपणार्या प्रत्येक विद्यार्थ्याला योग्य दिशा देण्याचे काम महानगरपालिकेच्या संगीत कला अकादमीचे शिक्षक करत आहेत.🎶 विद्यार्थ्यांना केवळ कलाकारच नाही, तर एक उत्तम माणूस म्हणून घडवणार्या सर्व शिक्षकांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा! 🌸🙏 #Gurupurnima #Gurupurnima2026 #गुरुपौर्णिमा #music
माझी Mumbai, आपली BMC21,955 次观看 • 2 天前

🔹बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी पूर्व उपनगरातील मानखुर्द आणि गोवंडी परिसरातील स्वच्छतेविषयक कामांची आज सकाळी प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली. तसेच, कचरा संकलनासाठी कार्यरत असलेल्या कॉम्पॅक्टर वाहनाच्या मार्गाची आकस्मिक पाहणी करून कार्यपद्धतीची तपासणी केली. 🔹या भेटीदरम्यान मानखुर्द रेल्वे स्थानक आणि गोवंडी रेल्वे स्थानकाजवळील घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या चौक्यांना भेटी दिल्या. स्वच्छता कर्मचाऱ्यांची उपस्थिती, हजेरीपट, स्वच्छतेसाठी लागणारी यंत्रसामुग्री आदींची देखील माहिती घेतली. 🔹एम पूर्व विभागातील दैनंदिन कचरा गोळा करण्यासाठी दोन सत्रात काम करावे. वाहनांच्या फेऱ्यांमध्ये वाढ करावी. काही संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. दंडात्मक कारवाई करावी, असे निर्देश श्रीमती भिडे यांनी दिले. 🔹यावेळी श्रीमती भिडे यांनी कचरा संकलन करणाऱ्या कॉम्पॅक्टर वाहनाच्या मार्गाची आकस्मिक तपासणी केली. कार्यपद्धतीचे बारकाईने निरीक्षण करत त्यांनी स्वच्छता व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने संबंधित यंत्रणेला आवश्यक त्या महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. 🔹श्रीमती भिडे यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधून दैनंदिन कचरा संकलन, त्याचे वर्गीकरण कसे केले जाते याचा आढावा घेतला. तसेच झोपडपट्टी परिसरातील नागरिकांचे कचऱ्याचे वर्गीकरण संदर्भात प्रबोधन करण्याच्या सूचना दिल्या. 🔹मानखुर्द व गोवंडी रेल्वे स्थानक परिसरात दुतर्फा सुरू असलेल्या स्वच्छतेच्या कामांची पाहणी करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूने उभी असलेली बेवारस वाहने व अस्वच्छते बाबत स्वतंत्र मोहीम हाती घेऊन येत्या काही दिवसात हा रस्ता स्वच्छ करण्याचे निर्देश श्रीमती भिडे यांनी दिले. 🔹उप आयुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) श्री. प्रशांत गायकवाड, उपायुक्त (परिमंडळ ५) श्रीमती संध्या नांदेडकर, सहाय्यक आयुक्त श्री. उज्ज्वल इंगोले यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. #MyBMCUpdates CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी Ashwini Bhide
माझी Mumbai, आपली BMC19,095 次观看 • 2 天前

🙏 आपली सुरक्षितता हीच माझी प्राथमिकता! मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांचे मुंबईकरांना विनम्र आवाहन.. सध्या मुंबईत मुसळधार पाऊस आणि ‘रेड अलर्ट’ आहे. जोरदार वाऱ्यांमुळे झाडे व फांद्या कोसळण्याच्या घटना घडत आहेत. अशा स्थितीत आपण आणि आपले कुटुंब सुरक्षित राहणे सर्वात महत्त्वाचे आहे. 👉 कृपया अनावश्यक बाहेर पडू नका 👉 झाडांपासून दूर राहा 👉 वाहने सुरक्षित ठिकाणी उभी करा 👉 अफवांवर विश्वास ठेवू नका 📞 आपत्कालीन मदतीसाठी संपर्क: 1916 प्रशासनाच्या सूचनांचे कृपया पालन करावे. #MumbaiRains CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी
माझी Mumbai, आपली BMC152,089 次观看 • 26 天前

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा करणा-या ७ तलावांपैकी मोडक-सागर हा तलाव गुरुवारी रात्री २.०७ वाजेच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला आहे. यंदाच्या मोसमातील भरून वाहू लागलेला मोडक-सागर तलाव हा चौथा तलाव आहे. या तलावाची कमाल पाणी साठवण क्षमता ही १२,८९२.५ कोटी लीटर (१,२८,९२५ दशलक्ष लीटर) इतकी आहे. ------ Modak-Sagar Lake, one of the 7 lakes supplying water to the entire Mumbai metropolitan area, started overflowing at around 2:07 AM today. Modak-Sagar Lake is the fourth lake to overflow this season. The full storage capacity of Modak-Sagar Lake is 12,892.5 crore liters (1,28,925 million liters). #MyBmcUpdates #MumbaiRains
माझी Mumbai, आपली BMC37,785 次观看 • 8 天前

🌧️पावसाळा आला, आरोग्याची काळजी घ्या! ☔️ ✅ साचलेल्या पाण्यातून चालणे टाळा ✅ लेप्टोस्पायरोसिसची लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा ✅ महानगरपालिकेच्या रुग्णालयांत व दवाखान्यांत मोफत उपचार उपलब्ध आहेत सुरक्षित राहा, पावसाचा आनंद घ्या! #MyBMCUpdate #MumbaiRains #Leptospirosis #Health
माझी Mumbai, आपली BMC85,408 次观看 • 19 天前

🔹शहर झोपलेले असतानाही काही पावलं मात्र थांबत नाहीत... काही हात विश्रांती घेत नाहीत... कारण त्यांच्यासाठी मुंबई आणि मुंबईकर प्रथम असतो! 🔹रस्त्यावर साचलेले पाणी असो, पडलेले वृक्ष असोत, वाहतूक सुरळीत ठेवण्याचे आव्हान असो किंवा परिसर स्वच्छ व सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी... प्रत्येक आव्हानाला बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अग्निशमन दल, पर्जन्य जलवाहिन्या, रस्ते व वाहतूक, उद्यान, सार्वजनिक आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन आणि इतर विभागांचे अधिकारी व कर्मचारी धैर्याने सामोरे जात आहेत. 🔹प्रत्येक पावसाच्या सरीसोबत ते केवळ आपले कर्तव्य बजावत नाहीत, तर लाखो मुंबईकरांचा विश्वास जपत आहेत. 🔹मुंबईची ओळख फक्त तिच्या वेगाने नाही... तर संकटातही न थकता उभ्या राहणाऱ्या या कर्मयोग्यांमुळे आहे. 🔹या प्रत्येक कर्मयोग्यांना मनःपूर्वक सलाम!🫡 #MyBMCUpdates CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी
माझी Mumbai, आपली BMC99,293 次观看 • 24 天前

🔷 Under the Special Intensive Revision (SIR) Programme of the Electoral Rolls – 2026, Booth Level Officers (BLOs) will conduct door-to-door visits from 30th June to 29th July 2026. 🔷 It is appeal to all citizens to extend their cooperation by providing the necessary information to the concerned officials during these visits. #MyBMCUpdates #SIR #SpecialIntensiveRevision Election Commission of India Maharashtra SEC ChiefElectoralOffice
माझी Mumbai, आपली BMC46,947 次观看 • 12 天前

🔹अंधेरी (पश्चिम) येथील आराम नगर, जे. पी. मार्ग, वेसावे (वर्सोवा) परिसरात अनिवार्य खुल्या जागेचा सेवा क्षेत्र म्हणून वापर करून त्यावर अनधिकृत आच्छादन उभारणाऱ्या तसेच पदपथांत अडथळा निर्माण करणाऱ्या १७ आस्थापनांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. 🔹तसेच, ८ खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांची बेकायदेशीर सांडपाणी जोडणी खंडित करण्यात आली. यामध्ये अरबाब, बरिस्ता, सोराईझाई, हकीम सलून, पर्शिया दरबार, इंक एन ब्रेटो मेन्यू, दार्जिलिंग लिओचा मोमो, चायना सबअर्ब या खाद्य व्यावसायिक आस्थापनांचा समावेश आहे. 🔹अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांच्या निर्देशांनुसार, उपआयुक्त (परिमंडळ ४) डॉ. (श्रीमती) भाग्यश्री कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक आयुक्त (के पश्चिम विभाग) श्री. चक्रपाणी अल्ले यांच्या नेतृत्वात के पश्चिम विभाग कार्यालयाकडून ही कारवाई करण्यात आली. #MyBMCUpdates CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी Ashwini Bhide
माझी Mumbai, आपली BMC138,147 次观看 • 1 个月前

🔷मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण - २०२६ कार्यक्रम अंतर्गत, दिनांक ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी(बीएलओ) गृहभेटी देणार आहेत. 🔷संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. #mybmcupdates #SIR #SpecialIntensiveRevision Maharashtra SEC Election Commission of India ChiefElectoralOffice
माझी Mumbai, आपली BMC35,174 次观看 • 10 天前

🔷मुंबईतील मॅनहोल्सवर कामे करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल व दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या संकल्पनेतून 'मॅनहोल रेलगार्ड' (Manhole Rail Guard) ही चौकोनी आकारातील प्रतिकृती विकसित करण्यात आली आहे. 🔷ही प्रतिकृती प्रायोगिक तत्त्वावर (Pilot Project) मुंबईतील एल प्रशासकीय विभागामध्ये वापरात आणण्यात येत आहे. 🔷तेथील अनुभव लक्षात घेऊन तसेच तांत्रिक गरजा आणि महानगरपालिका कर्मचारी व नागरिकांकडून मिळणाऱ्या सूचनांच्या आधारे, या प्रतिकृतीचा वापर करावा किंवा कसे, याबाबतचा पुढील निर्णय घेतला जाणार आहे. CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी
माझी Mumbai, आपली BMC47,984 次观看 • 15 天前

लाजू नका, घाबरू नका! वेळेत तपासणी, वेळेत निदान आणि योग्य उपचार! 🎀🩺 🔹बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे 'महिलांसाठी कर्करोग तपासणी महाअभियान' अंतर्गत २२७ प्रभागांमध्ये ३० वर्षांवरील महिलांसाठी स्तन कर्करोगाची प्राथमिक तपासणी मोफत केली गेली. तसेच वजन, रक्तदाब आणि मधुमेहाची तपासणीदेखील करण्यात आली आहे. 🔹माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त,'बहीण लाडकी मुख्यमंत्र्यांची, घेऊ काळजी तिच्या आरोग्याची!’ या ध्येयाने आयोजित महाअभियानाअंतर्गत विविध प्रभागांमध्ये आयोजित शिबिरांमध्ये महिलांनी सक्रियपणे सहभाग नोंदवला. #MyBMCUpdates #cancer #womenshealth #breastcancerawareness #mumbai #लाडकीबहीण #cancerprevention #health #cancercare #cancertreatment #publichealth #cancerfreemaharashtra #cancerinwomen CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी
माझी Mumbai, आपली BMC26,317 次观看 • 8 天前

आई, बहीण, पत्नी, मैत्रीण... अनेक भूमिका बजावणाऱ्या 'ती'च्या आरोग्यासाठी – फक्त ५ मिनिटे! 💗✨ बृहन्मुंबई महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे २२७ प्रभागांमध्ये महिलांसाठी 'कर्करोग तपासणी महाअभियान' आयोजित करण्यात आले आहे. 🩺 स्तन कर्करोग प्राथमिक तपासणी महाअभियानात वजन, रक्तदाब आणि मधुमेहाची तपासणी करण्यात येणार आहे. लाजू नका, घाबरू नका... वेळेवर तपासणी करा आणि निरोगी राहा! 🗓️ २२ जुलै २०२६ 🕙 सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत #Cancer #Womenshealth #BreastCancerAwareness #Mumbai #लाडकीबहीण #CancerPrevention #Health #Cancercare #Cancertreatment #Publichealth #Cancerfreemaharashtra
माझी Mumbai, आपली BMC20,756 次观看 • 10 天前

🌉राम मंदिर मार्ग ते रिलीफ रोड दरम्यान स्वामी विवेकानंद मार्ग, गोरेगाव (पश्चिम) येथील मृणालताई गोरे उड्डाणपुलाचा विस्तार करण्यात आला आहे. या विस्तारीत कामाचे लोकार्पण महापौर श्रीमती रितू तावडे आणि उपमहापौर श्री. संजय घाडी यांच्या शुभहस्ते आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत आज करण्यात आले. 🔹हा विस्तारित पूल आज सायंकाळपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. 🔹या विस्तारित पुलाची एकूण लांबी ७५० मीटर असून रुंदी १५.५० मीटर (२+२ मार्गिका) अशी आहे. . 🔹उड्डाणपुलाच्या विस्तारामुळे पश्चिम द्रुतगती महामार्ग (गोरेगाव पूर्व) ते रिलीफ रोड तसेच अंधेरी (पश्चिम) कडे जाणाऱ्या जोड रस्त्याला थेट जोडणी उपलब्ध होणार आहे. 🔹या प्रकल्पामुळे ३० मिनिटांचा प्रवास कालावधी कमी होऊन अंदाजे ५ मिनिटांपर्यत येणार आहे. तसेच, स्वामी विवेकानंद मार्ग व परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. #MyBMCUpdates CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी
माझी Mumbai, आपली BMC89,170 次观看 • 1 个月前

ऑनफिल्ड अन् मुंबईकरांच्या सेवेत ! 🌳बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात शहर व उपनगरात वेगवान वार्यामुळे मोठ्या प्रमाणावर फांद्या कोसळणे, वृक्ष उन्मळून पडणे, यासारख्या २५० हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या. 🔹या तक्रारींचा निपटारा उद्यान विभागाच्या चमूने जलदगतीने करण्यात आला. तसेच फांद्या आणि वृक्ष कोसळलेल्या ठिकाणचा परिसर, रस्ता मोकळा करून देण्यात आला. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ऑन फिल्ड कार्यरत असलेल्या मनुष्यबळाची चित्रफीत... #MyBMCUpdates #MumbaiRains CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी
माझी Mumbai, आपली BMC43,710 次观看 • 26 天前

सेवा क्षेत्रासाठी (Service Area) अनिवार्य मोकळ्या जागेचा (Compulsory Open Space) वापर करून त्यावर अनधिकृत आच्छादन करणाऱ्या हॉटेलविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांनी दिले आहेत. त्यानुसार, संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रात ही कारवाई करण्यात येत आहे. या निर्देशानुसार के पश्चिम विभाग कार्यालयाच्या वतीने अंधेरी पश्चिम येथील वीरा देसाई मार्ग आणि ऑफिस न्यू लिंक रोड परिसरातील नामांकित हॉटेलची वाढीव बांधकामे निष्कासित करण्यात आली आहेत. तसेच, वापरातील साहित्य जप्त करण्यात आले आहे. उपायुक्त (परिमंडळ ४) श्रीमती भाग्यश्री कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक आयुक्त (के पश्चिम विभाग) श्री. चक्रपाणी अल्ले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मंगळवारी (दिनांक ९ जून २०२६) ही कारवाई केली. आरोग्य विभाग (MOH), अनुज्ञाप्ती विभाग (license), अग्निशमन विभाग (Fire) व बांधकाम व कारखाना विभाग (B&F) यांच्या संयुक्त पथकाद्वारे ही कारवाई करण्यात आली आहे. अंधेरी (पश्चिम) येथील वीरा देसाई रोड व ऑफिस न्यू लिंक रोड परिसरातील What’s Your Bahana, Trov9, Juliet आणि Yazu या हॉटेलांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान आरोग्य व परवाना विभागामार्फत २४ खुर्च्या, १ कुकिंग रेंज, मायक्रोवेव्ह ओव्हन, ३ कूलर्स, १ इलेक्ट्रिक फ्रायर व २ स्पीकर्स जप्त करण्यात आले. या कारवाईदरम्यान विभागीय अधिकारी-कर्मचारी, मजूर व अग्निशमन दलाचे कर्मचारी मिळून एकूण २० मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते. तसेच, जेसीबी यंत्रसामग्रीचाही वापर करण्यात आला. #mybmcupdates CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी
माझी Mumbai, आपली BMC65,691 次观看 • 1 个月前