PMRDA's banner
PMRDA's profile picture

PMRDA

@OfficialPMRDA • 25,371 subscribers

Pune Metropolitan Region Development Authority (PMRDA) is the Planning and Development Authority for the Pune Metropolitan Region.

Videos

OfficialPMRDA's profile picture

🚇 पुणे मेट्रो मार्गिका ३ : प्रगतीला वेग देणारे नवे पर्व! ✅ पुणे मेट्रोच्या ‘हिंजवडी माण ते शिवाजीनगर’ या २३.२०३ किमी लांबीच्या महत्त्वपूर्ण मार्गिकेवरील ट्रायल रन चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली असून, व्यावसायिक सेवा सुरू होण्याच्या दिशेने आणखी एक मोठा टप्पा गाठला गेला आहे. या यशस्वी चाचणीमुळे लवकरच नागरिकांना अत्याधुनिक, सुरक्षित आणि जलद मेट्रो सेवांचा लाभ मिळणार आहे. 💼 हिंजवडी आयटी पार्क, शैक्षणिक संस्था आणि प्रमुख व्यावसायिक केंद्रांना जोडणारी ही मार्गिका हजारो आयटी व्यावसायिक, विद्यार्थी आणि दैनंदिन प्रवाशांसाठी खऱ्या अर्थाने ‘गेम-चेंजर’ ठरेल. 🌿 वाहतूक कोंडी कमी करून वेळेची बचत, प्रदूषणात घट आणि पर्यावरणपूरक प्रवास यामुळे पुणे महानगर अधिक स्मार्ट, गतिमान आणि शाश्वत बनणार आहे. 🏗️ पुणे महानगराच्या आधुनिक पायाभूत सुविधांकडे वाटचाल करत, शहरी विकासाचा नवा आदर्श निर्माण करणारे हे एक महत्वाचे पाऊल! #MetroLine3 #TrialRun #HinjewadiITPark #HinjawadiShivajinagar #Metro #UrbanMobility #PMRDA

PMRDA

23,294 просмотров • 7 месяцев назад

OfficialPMRDA's profile picture

पुणे महानगरच्या वाहतुकीला नवा श्वास, डबल डेकर उड्डाणपूल प्रकल्प! ✅ पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोसह डबल डेकर उड्डाणपूल प्रकल्प पुणे महानगरच्या वाहतूक व्यवस्थेला दिलासा देणारा महत्त्वाचा टप्पा ठरत आहे. पुणे विद्यापीठ चौक व गणेशखिंड रस्त्यावरील तीव्र वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उभारण्यात आलेल्या या प्रकल्पात एकाच खांबावर मेट्रो मार्गिका व खालच्या स्तरावर वाहनांसाठी उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. ✅ औंध–शिवाजीनगर मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला असून उर्वरित मार्गांचे काम अंतिम टप्प्यात आहे. पाषाणकडील रॅम्पचे कामही वेगाने सुरू आहे. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर औंध, बाणेर, पाषाण व शिवाजीनगर परिसरातील प्रवास अधिक जलद, सुलभ व सुरक्षित होणार असून वाहतूक कोंडी, प्रवासाचा वेळ, इंधनाचा वापर आणि प्रदूषणात लक्षणीय घट होणार आहे. #DoubleDeckerBridge #PuneUniversityFlyover #PuneMetro #IntegratedFlyover #GaneshkhindRoad #UniversityChowk #UrbanInfrastructure #SmartMobility #TrafficRelief #SustainablePune #PMRDA #PuneDevelopment

PMRDA

21,952 просмотров • 7 месяцев назад

OfficialPMRDA's profile picture

🚆 पुणे मेट्रो लाईन-३ लवकरच आपल्या सेवेत! 🔥 🚇 माण-हिंजवडी आयटी पार्क ते शिवाजीनगर... पुणेकरांच्या दैनंदिन प्रवासाला मिळणार वेग, सोय आणि आधुनिकतेची जोड! 🏁 ‘मेट्रो लाईन ३’ चे काम अंतिम टप्प्यात असून, महानगराच्या वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडवण्यास सज्ज आहे. आयटी हब हिंजवडीपासून पुण्याच्या मध्यवर्ती भागापर्यंतचा प्रवास आता अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे. ✅ मे २०२६ पर्यंत पहिल्या टप्प्यातील १२ स्थानके प्रवाशांसाठी खुली करण्याचे उद्दिष्ट ✅ प्रकल्पाचे तब्बल ९४.२०% काम पूर्ण ✅ सिग्नलिंगची तांत्रिक चाचणी व सुरक्षा तपासणी (RDSO/CMRS) पूर्ण ✅ शिवाजीनगर ते हिंजवडी अंतर आता काही मिनिटांत पार ✅ सार्वजनिक-खासगी भागीदारीतील (PPP) देशातील पहिली मेट्रो लाईन ✨ पुणेकरांसाठी जलद, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा नवा अध्याय सुरू होण्याच्या उंबरठ्यावर…🚇 #PuneMetro #MetroLine3 #ComingSoon #SmartCityPune #HinjewadiToShivajinagar #FutureOfPune #ITPark #Connectivity

PMRDA

13,104 просмотров • 6 месяцев назад

Больше нет контента для загрузки