
Omprakash Rajenimbalkar
@OmRajenimbalkr • 29,031 subscribers
Member of Parliament, Dharashiv Constituency, Maharashtra, India.
Videos

धाराशिव शहराच्या विकासाला नवी गती देणारा महत्त्वपूर्ण निर्णय! उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून धाराशिव नगरपरिषद क्षेत्रातील विविध विकासकामांसाठी तब्बल १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मंजूर कामे : • आठवडी बाजार विकसित करणे – ८ कोटी रुपये • राजमाता जिजाऊ उद्यान विकसित करणे – ५ कोटी रुपये • छत्रपती संभाजी महाराज उद्यान विकसित करणे – ३ कोटी रुपये • हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यान विकसित करणे – २ कोटी रुपये एकूण मंजूर निधी – १८ कोटी रुपये या कामांमुळे धाराशिव शहराच्या सौंदर्यात भर पडणार असून नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. धाराशिवच्या विकासासाठी सातत्याने पाठबळ देणारे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांचे मनःपूर्वक आभार! धाराशिवच्या विकासाचा हा प्रवास असाच वेगाने सुरू राहील. #धाराशिव #विकासकामे #एकनाथशिंदे #धाराशिवशहर #विकास #जनतेच्यासेवेसाठी #महाराष्ट्रसरकार #धाराशिवनगरपरिषद #OmrajeNimbalkar #EknathShinde #DharashivDevelopment
Omprakash Rajenimbalkar139,274 просмотров • 2 месяцев назад

भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी #happy father’s day
Omprakash Rajenimbalkar55,946 просмотров • 2 месяцев назад

स्वराज्यप्रेरिका राजमाता जिजाऊ यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन ..! युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज घडले, वाढले आणि त्यांचे 'निश्चयाचा महामेरू । बहुता जनांसी आधारू । श्रीमंत योगी।' असे वर्णन होऊ लागले ती सारी कुणाची पुण्याई ध्येयवेड्या आईची, निराग्रही मातेची आणि वीरमाता, माँसाहेब जिजाऊंची! लोककल्याणकारी अशा स्वराज्याच्या निर्मितीचे ध्येय छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात रूजवण्याचे कार्य जिजाऊंनी केले. कणखर नेतृत्व, अचूक निर्णयक्षमता, धैर्य, नीतीमूल्ये आणि वीरतेचा उत्तम आदर्श त्यांनी घालून दिला. त्या एक आदर्श माता होत्या. त्यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन ..! #राजमाताजिजाऊ
Omprakash Rajenimbalkar58,533 просмотров • 2 месяцев назад

हिंदूहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारावर प्रेरित होऊन,शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली माझ्यासह परभणीचे तीन वेळा निवडून आलेले खासदार संजय (बंडू) जाधव, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे,ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील, यवतमाळ-वाशीमचे खासदार संजय देशमुख आणि हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम, गजानन कीर्तिकर, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे,धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक,मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री भरत गोगावले,माजी मंत्री डॉ तानाजीराव सावंत साहेब तसेच पक्षाचे अनेक मंत्री, खासदार, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. माझी खरी निष्ठा कोणत्याही पदाशी किंवा पक्षाशी नसून माझ्या मतदारसंघातील जनतेशी आहे. निवडणुकीत तुम्ही माझ्यावर दाखवलेला विश्वास हेच माझे सर्वात मोठे बळ आहे. आजचा निर्णयही त्याच विश्वासाला न्याय देण्यासाठी घेतला आहे. मला खात्री आहे की, या निर्णयामुळे आपल्या भागाच्या विकासाला अधिक गती मिळेल आणि आपण सर्व मिळून आपल्या जिल्ह्याला प्रगतीच्या नव्या उंचीवर घेऊन जाऊ. मी आजही तोच ओमराजे आहे, जो तुमच्या सुख-दुःखात उभा राहिला, तुमच्या प्रश्नांसाठी लढला आणि पुढेही लढत राहील. पक्ष बदलला असला तरी जनसेवेचे ध्येय, विकासाची तळमळ आणि तुमच्यावरील प्रेम यात कोणताही बदल होणार नाही. तुमचा विश्वास, तुमचे प्रेम आणि तुमचा आशीर्वाद हेच माझी खरी ताकद आहे. विकास, प्रगती आणि जनसेवा या एकाच ध्येयाने मी पुढील वाटचाल करणार आहे. #Shivsena #EknathShinde #Maharashtra Shivsena - शिवसेना Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde
Omprakash Rajenimbalkar44,357 просмотров • 2 месяцев назад

मुंबई येथील नंदनवन येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांची सदिच्छा भेट घेऊन श्री तुळजाभवानी मंदिरातील पुजारी व मंदिर प्रशासन यांच्यात अधिक प्रभावी समन्वय साधला जावा, तसेच राज्यभरातून येणाऱ्या लाखो भाविकांना सुलभ, सुरळीत व जलद दर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. या मागणीची गांभीर्याने दखल घेत उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांनी तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून स्पष्ट निर्देश दिले की, “तुळजाभवानी मंदिराचे सर्व कामकाज पुजाऱ्यांना विश्वासात घेऊनच करा. मंदिराची परंपरा, पावित्र्य आणि धार्मिक भावना अबाधित ठेवत भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्या.” यामुळे मंदिर प्रशासन, पुजारी आणि शासन यांच्यात समन्वय वाढून भाविकांना अधिक सुलभ व व्यवस्थित दर्शन व्यवस्था उपलब्ध होण्यास निश्चितच मदत होणार आहे. #Tuljapur #dharashiv #omrajenimbalkar #eknathshindesaheb #tuljabhavani Eknath Shinde - एकनाथ शिंदे Shivsena - शिवसेना
Omprakash Rajenimbalkar25,070 просмотров • 1 месяц назад

उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेबांच्या वेगवान कार्यशैलीने वारकरी भारावले! आषाढी वारीदरम्यान चंद्रभागा वाळवंट परिसर तसेच दर्शन रांगेतील पत्राशेडजवळील गैरसोयी कायमस्वरूपी दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेबांनी तात्काळ ₹५ कोटींच्या निधीची घोषणा केली. विशेष म्हणजे, अवघ्या २० मिनिटांत शासन निर्णय (GR) जारी करून त्यांनी आपल्या निर्णयक्षम आणि गतिमान कार्यपद्धतीची पुन्हा एकदा प्रचिती दिली. वारकऱ्यांना सुरक्षित, सुसज्ज आणि अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शिंदे साहेबांची ही तत्परता निश्चितच कौतुकास्पद आहे. वारकरी सेवा हीच ईश्वर सेवा याच भावनेतून शिंदे साहेबांचे कार्य अविरत सुरू आहे. #ShivSena #EknathShinde #Pandharpur #AshadhiWari #Varkari
Omprakash Rajenimbalkar15,534 просмотров • 1 месяц назад

आज पहाटे 3 वाजता या पिंगळे कुटुंबातील मुलीने व आमचे जिल्हा प्रमुख रणजीत ज्ञानेश्वर पाटील यांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर मी प्रथम जिल्हाधिकारी धाराशिव यांच्याशी 4 च्या आसपास चर्चा केल्यानंतर तात्काळ नाशिकचे कर्नल सिंग यांच्याशी त्यांच्याशी बोलून हेलिकॉप्टर सेवा देऊन हेलिकॉप्टर द्वारे सदरील नागरिकांना बाहेर काढण्याची विनंती केली होती त्यानंतर सतत च्या प्रयत्नानंतर 12 वाजता या नागरिकांना बाहेर काढण्यात यश आले लाखी तालुका परंडा येथे अतिवृष्टीमुळे अडकलेल्या 16 ते 17 नागरिकांना काढण्यास व सुखरूप ठिकाणी पोहोचवण्यास यश आली असून आणखी जर काही ठिकाणी असे नागरिक अडकले असतील तर तात्काळ संपर्क करावा या प्रयत्नात तात्काळ सहकार्य लाभलेल्या प्रशासनातील सर्व अधिकाऱ्याचे व हेलिकॅप्टर सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार व अभिनंदन
Omprakash Rajenimbalkar64,548 просмотров • 11 месяцев назад

नेहमीप्रमाणेच, शनिवार दिनांक २५ जुलै २०२६ रोजी धाराशिव येथील माझ्या जनसंपर्क कार्यालयात जनता दरबार पार पडला… संकटातून मार्ग काढण्यासाठी, समस्या सोडवण्यासाठी आणि नागरिकांच्या हक्कासाठीच हा जनता दरबार असतो आलेल्या प्रत्येक तक्रारीकडे, प्रत्येक प्रश्नाकडे गांभीर्याने आणि संवेदनशीलतेने पाहिलं. संबंधित विभागांशी त्वरित संपर्क साधत अनेक समस्यांवर जागेवरच तोडगा काढला. जनतेचे प्रश्न म्हणजे माझी वैयक्तिक जबाबदारी! आपल्या भागातील प्रत्येक नागरिकाचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी मी नेहमीच सज्ज आहे… आणि असेच पुढेही राहणार! आपल्या प्रेमाला, विश्वासाला आणि पाठिंब्याला मी खंबीरपणे न्याय देईन हेच माझं वचन! #Dharashiv #जनता_दरबार #लोकसेवा #धाराशिवच्या_सेवेत #OmrajeNimbalkar
Omprakash Rajenimbalkar10,814 просмотров • 1 месяц назад

Cervical Cancer म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर हा भारतातील महिलांमध्ये आढळणाऱ्या कॅन्सरपैकी दुसऱ्या क्रमांकाचा गंभीर आजार आहे. याचे मुख्य कारण Human Papillomavirus (HPV) या विषाणूचा दीर्घकाळ संसर्ग असून सुमारे ९९.७% प्रकरणांमध्ये तो कारणीभूत ठरतो. या आजाराच्या निर्मूलनासाठी लवकर निदान, उपचार आणि HPV विरोधी लसीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. Gardasil-4 ही लस सुरक्षित आणि प्रभावी असून जगभरात मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. गोरगरिब कुटुंबांतील मुलींनाही ही जीवनरक्षक लस मोफत मिळावी यासाठी मी खाजगी विधेयकाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे ठाम मागणी केली होती. महाराष्ट्रात ८ मार्चपासून HPV लसीकरण मोहीम सुरू झाली असून १४ वर्षे पूर्ण पण १५ वर्षे न झालेल्या मुलींना ही लस सरकारी रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे. मी स्वतः माझ्या मुलीला ही HPV लस दिलेली आहे. सर्व पालकांना विनंती आहे की कोणत्याही अफवांना बळी न पडता आपल्या मुलींना ही लस अवश्य द्यावी. योग्य वेळी घेतलेला हा निर्णय भविष्यातील कॅन्सरपासून संरक्षण देऊ शकतो. #hpv #vaccine HPV vaccine India, Cervical cancer awareness, Gardasil vaccine, Women health India, HPV vaccination Maharashtra, Cancer prevention vaccine, Government vaccination scheme, Free HPV vaccine, Girls health awareness, Cancer prevention India
Omprakash Rajenimbalkar32,714 просмотров • 5 месяцев назад

#InternationalYogaDay #yoga #workout #योग #yogaday2024 #yogaday #indianyoga #योगा #अग्निसार
Omprakash Rajenimbalkar80,392 просмотров • 2 лет назад

दि. २५.०६.२०२६ रोजी आंध्र प्रदेशातील पवित्र तिरुपती बालाजी येथे श्री व्यंकटेश्वर स्वामींचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. या पदयात्रेत माझ्यासह खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे, खासदार श्रीरंग आप्पा बारणे, चंद्रहार पाटील आणि माझे बंधू डॉ. जय राजेनिंबाळकर सहभागी झाले होते. श्री व्यंकटेश्वरांच्या चरणी मतदारसंघातील नागरिक, शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या सुख, समृद्धी, प्रगती व कल्याणासाठी प्रार्थना केली. समाजसेवेचे कार्य अधिक प्रभावीपणे करण्यासाठी बळ, प्रेरणा आणि आशीर्वाद लाभावा, अशी प्रार्थना व्यंकटेश्वरांच्या चरणी अर्पण केली. श्रद्धा, भक्ती आणि समर्पणाने परिपूर्ण असलेला हा अविस्मरणीय आध्यात्मिक अनुभव मनाला नवी ऊर्जा, सकारात्मकता आणि जनसेवेची नवचेतना देणारा ठरला. #tirupati #balaji #darshan #omrajenimbalkar
Omprakash Rajenimbalkar12,006 просмотров • 2 месяцев назад

ठाकरे आवाज महाराष्ट्राचा..! #shivsena #thackrey #rajthackrey #uddhavthackeray #melava #marathi
Omprakash Rajenimbalkar37,780 просмотров • 1 год назад

पैश्याची मस्ती. कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी गावातील हत्तिन महादेवी ही जवळपास 36 वर्षे ज्या लोकांबरोबर परिवाराचा सदस्य बनून राहिली तिला असे अचानक वनतारा ला रवाना व्हावे लागले. यावेळी गावकऱ्यांच्या भावना या शब्दात व्यक्त होणार नाही. महादेवी ची काळजी सर्वांनाच आहे पण वनतारा च का हा प्रश्न सर्वांच्याच मनात आहे. मागे एकदा मला ही महादेवी ची भेट घेता आली होती. या भेटीत मुक्या प्राण्यांना ही भावना असतात हे प्रकर्षाने जाणवले. सरकार ला माझे सांगणे आहे की सब कुछ अदानी ,अंबानी असे करू नका रे. लोक सगळे बघत असतात आणि योग्यवेळी हिशोब करतात. #JusticeForMahadevi #SaveMahadevi #VoiceForVoiceless #KolhapurToVantara #ElephantRights #वनतारा_च_का #StopAnimalPolitics #महादेवी_आमची_गर्वाची #पैशाची_मस्ती #KolhapurStandsWithMahadevi #omrajenimbalkar
Omprakash Rajenimbalkar35,479 просмотров • 1 год назад

चुकीला माफी आहे, धोक्याला नाही..! मी देव पहिला नाही पण राजेसाहेबांच्या रुपात देवमाणूस अनुभवला. या कपटी लोकांनी धोका, दगा करून अतिशय निर्घृण पणे माझ्या वडिलांची हत्या केली. ज्या राजेसाहेबामुळे यांनी सत्ता उपभोगली त्यांची हत्या करून यांनी निचतेचा कळस गाठला. जे स्वतःच्या फायद्यासाठी भावाचा खून करू शकतात त्यांच्या लेखी सामान्य जनतेची काय किंमत असेल ? यांनी केलेल्या या अपराधाला कधीच माफ करता येणार नाही. मी मुलगा म्हणून न्याय व्यवस्थेकडून हीच अपेक्षा आहे की राजेसाहेबांना लवकरात लवकर न्याय मिळावा..! #OmrajeNimbalkar #dharashiv #PawanrajeNimbalkar #Rajesaheb #राजेसाहेब
Omprakash Rajenimbalkar30,284 просмотров • 10 месяцев назад

“ज्या मातीच्या कुशीत जन्म घेतला, त्या मातीची फिकीर करत झोप उडाली होती… ज्याच्या खांद्यावर आयुष्यभर मेंढरं होती, त्याच खांद्यावर आज देशाची जबाबदारी आली आहे…” कधी पायात चप्पल नव्हती, कधी खिशात एक रुपया नव्हता… पण डोळ्यांत एक स्वप्न होतं – UPSC क्लियर करायचं! आज त्या स्वप्नाला पंख मिळालेत… बिरुदेव सिद्धाप्पा ढोणे – UPSC रँक 551 मेंढरं चारणारा ‘बिरू’ आज भारतातल्या सर्वात प्रतिष्ठित यादीत आपल्या मेहनतीच्या बळावर पोहोचला आहे. ◾️ गाव – यमगे ◾️ तालुका – कागल ◾️ जिल्हा – कोल्हापूर “निकाल लागला, तेव्हा बिरू ढोणे मेंढरं चारत होते …” हाच त्यांचा संघर्ष होता, आणि हाच त्यांचा अभिमान आहे! या मातीच्या सुपुत्राला शतशः सलाम आणि हार्दिक अभिनंदन! हे यश फक्त रँक नाही, ही आहे ग्रामीण भागातील प्रत्येक मुलासाठी एक आशा… #UPSC2025 #BiruDhone #ShepherdToIAS #KolhapurPride #RuralDreams #MarathiMulga #MatiChaAbhiman #StruggleToSuccess #InspirationToMany #YamgeToDelhi #UPSCMotivation #GraminYuva #SiddappaDhonde #BirudevDhonde #ShepherdIAS #MaharashtraChiShaan #DreamBigWorkHard
Omprakash Rajenimbalkar33,891 просмотров • 1 год назад

मी कुणाला कळलोच नाही… पण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात कायम राहिलो हा शब्द नाही, ही भावना आहे… पक्षप्रमुख मा. श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांची साधी, पण मनाला भिडणारी ओळ. संघर्ष, संयम आणि निष्ठेचा प्रवास करताना स्वतःची जाहिरात न करता जनतेसाठी काम करणारा नेता म्हणजे उद्धवसाहेब. त्यांची शैली शांत असली तरी विचार ठाम आहेत, आणि हाच खरा नेतृत्वाचा बाणा आहे. #उद्धवठाकरे #शिवसेना #महाराष्ट्रराजकारण #जनतेचानेता #साहेब #मराठी #महाराष्ट्र #नेतृत्व #जयमहाराष्ट्र
Omprakash Rajenimbalkar14,413 просмотров • 5 месяцев назад

आज साबळेवाडी ता. भूम येथील अतिवृष्टी मुळे फुटलेल्या तलावाची पाहणी केली व अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देऊन शेतकऱ्यांच्या शेती पिकांची पाहणी केली. सलग झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर उभ्या पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. या पाहणीदरम्यान प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या की • शेती पिकांचे नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे तात्काळ करून घ्यावेत. • शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळावी यासाठी त्वरीत कारवाई करावी. • शासनाने ज्या निकषांनुसार मदत देणे अपेक्षित आहे ते निकष शिथिल करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. #farmer #शेतकरी #नुकसान #पाहणी #ओमराजे_निंबाळकर #Omrajenimbalkar
Omprakash Rajenimbalkar24,947 просмотров • 11 месяцев назад