Omprakash Rajenimbalkar's banner
Omprakash Rajenimbalkar's profile picture

Omprakash Rajenimbalkar

@OmRajenimbalkr29,151 subscribers

Member of Parliament, Dharashiv Constituency, Maharashtra, India.

Videos

OmRajenimbalkr's profile picture

धाराशिव शहराच्या विकासाला नवी गती देणारा महत्त्वपूर्ण निर्णय! उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून धाराशिव नगरपरिषद क्षेत्रातील विविध विकासकामांसाठी तब्बल १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मंजूर कामे : • आठवडी बाजार विकसित करणे – ८ कोटी रुपये • राजमाता जिजाऊ उद्यान विकसित करणे – ५ कोटी रुपये • छत्रपती संभाजी महाराज उद्यान विकसित करणे – ३ कोटी रुपये • हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यान विकसित करणे – २ कोटी रुपये एकूण मंजूर निधी – १८ कोटी रुपये या कामांमुळे धाराशिव शहराच्या सौंदर्यात भर पडणार असून नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. धाराशिवच्या विकासासाठी सातत्याने पाठबळ देणारे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांचे मनःपूर्वक आभार! धाराशिवच्या विकासाचा हा प्रवास असाच वेगाने सुरू राहील. #धाराशिव #विकासकामे #एकनाथशिंदे #धाराशिवशहर #विकास #जनतेच्यासेवेसाठी #महाराष्ट्रसरकार #धाराशिवनगरपरिषद #OmrajeNimbalkar #EknathShinde #DharashivDevelopment

Omprakash Rajenimbalkar

138,820 Aufrufe • vor 16 Tagen

OmRajenimbalkr's profile picture

स्वराज्यप्रेरिका राजमाता जिजाऊ यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन ..! युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज घडले, वाढले आणि त्यांचे 'निश्चयाचा महामेरू । बहुता जनांसी आधारू । श्रीमंत योगी।' असे वर्णन होऊ लागले ती सारी कुणाची पुण्याई ध्येयवेड्या आईची, निराग्रही मातेची आणि वीरमाता, माँसाहेब जिजाऊंची! लोककल्याणकारी अशा स्वराज्याच्या निर्मितीचे ध्येय छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात रूजवण्याचे कार्य जिजाऊंनी केले. कणखर नेतृत्व, अचूक निर्णयक्षमता, धैर्य, नीतीमूल्ये आणि वीरतेचा उत्तम आदर्श त्यांनी घालून दिला. त्या एक आदर्श माता होत्या. त्यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन ..! #राजमाताजिजाऊ

Omprakash Rajenimbalkar

58,374 Aufrufe • vor 23 Tagen

OmRajenimbalkr's profile picture

हिंदूहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारावर प्रेरित होऊन,शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली माझ्यासह परभणीचे तीन वेळा निवडून आलेले खासदार संजय (बंडू) जाधव, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे,ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील, यवतमाळ-वाशीमचे खासदार संजय देशमुख आणि हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम, गजानन कीर्तिकर, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे,धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक,मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री भरत गोगावले,माजी मंत्री डॉ तानाजीराव सावंत साहेब तसेच पक्षाचे अनेक मंत्री, खासदार, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. माझी खरी निष्ठा कोणत्याही पदाशी किंवा पक्षाशी नसून माझ्या मतदारसंघातील जनतेशी आहे. निवडणुकीत तुम्ही माझ्यावर दाखवलेला विश्वास हेच माझे सर्वात मोठे बळ आहे. आजचा निर्णयही त्याच विश्वासाला न्याय देण्यासाठी घेतला आहे. मला खात्री आहे की, या निर्णयामुळे आपल्या भागाच्या विकासाला अधिक गती मिळेल आणि आपण सर्व मिळून आपल्या जिल्ह्याला प्रगतीच्या नव्या उंचीवर घेऊन जाऊ. मी आजही तोच ओमराजे आहे, जो तुमच्या सुख-दुःखात उभा राहिला, तुमच्या प्रश्नांसाठी लढला आणि पुढेही लढत राहील. पक्ष बदलला असला तरी जनसेवेचे ध्येय, विकासाची तळमळ आणि तुमच्यावरील प्रेम यात कोणताही बदल होणार नाही. तुमचा विश्वास, तुमचे प्रेम आणि तुमचा आशीर्वाद हेच माझी खरी ताकद आहे. विकास, प्रगती आणि जनसेवा या एकाच ध्येयाने मी पुढील वाटचाल करणार आहे. #Shivsena #EknathShinde #Maharashtra Shivsena - शिवसेना Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde

Omprakash Rajenimbalkar

44,060 Aufrufe • vor 17 Tagen

OmRajenimbalkr's profile picture

दि. २५.०६.२०२६ रोजी आंध्र प्रदेशातील पवित्र तिरुपती बालाजी येथे श्री व्यंकटेश्वर स्वामींचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. या पदयात्रेत माझ्यासह खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे, खासदार श्रीरंग आप्पा बारणे, चंद्रहार पाटील आणि माझे बंधू डॉ. जय राजेनिंबाळकर सहभागी झाले होते. श्री व्यंकटेश्वरांच्या चरणी मतदारसंघातील नागरिक, शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या सुख, समृद्धी, प्रगती व कल्याणासाठी प्रार्थना केली. समाजसेवेचे कार्य अधिक प्रभावीपणे करण्यासाठी बळ, प्रेरणा आणि आशीर्वाद लाभावा, अशी प्रार्थना व्यंकटेश्वरांच्या चरणी अर्पण केली. श्रद्धा, भक्ती आणि समर्पणाने परिपूर्ण असलेला हा अविस्मरणीय आध्यात्मिक अनुभव मनाला नवी ऊर्जा, सकारात्मकता आणि जनसेवेची नवचेतना देणारा ठरला. #tirupati #balaji #darshan #omrajenimbalkar

Omprakash Rajenimbalkar

11,806 Aufrufe • vor 13 Tagen

OmRajenimbalkr's profile picture

Cervical Cancer म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर हा भारतातील महिलांमध्ये आढळणाऱ्या कॅन्सरपैकी दुसऱ्या क्रमांकाचा गंभीर आजार आहे. याचे मुख्य कारण Human Papillomavirus (HPV) या विषाणूचा दीर्घकाळ संसर्ग असून सुमारे ९९.७% प्रकरणांमध्ये तो कारणीभूत ठरतो. या आजाराच्या निर्मूलनासाठी लवकर निदान, उपचार आणि HPV विरोधी लसीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. Gardasil-4 ही लस सुरक्षित आणि प्रभावी असून जगभरात मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. गोरगरिब कुटुंबांतील मुलींनाही ही जीवनरक्षक लस मोफत मिळावी यासाठी मी खाजगी विधेयकाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे ठाम मागणी केली होती. महाराष्ट्रात ८ मार्चपासून HPV लसीकरण मोहीम सुरू झाली असून १४ वर्षे पूर्ण पण १५ वर्षे न झालेल्या मुलींना ही लस सरकारी रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे. मी स्वतः माझ्या मुलीला ही HPV लस दिलेली आहे. सर्व पालकांना विनंती आहे की कोणत्याही अफवांना बळी न पडता आपल्या मुलींना ही लस अवश्य द्यावी. योग्य वेळी घेतलेला हा निर्णय भविष्यातील कॅन्सरपासून संरक्षण देऊ शकतो. #hpv #vaccine HPV vaccine India, Cervical cancer awareness, Gardasil vaccine, Women health India, HPV vaccination Maharashtra, Cancer prevention vaccine, Government vaccination scheme, Free HPV vaccine, Girls health awareness, Cancer prevention India

Omprakash Rajenimbalkar

32,586 Aufrufe • vor 3 Monaten

OmRajenimbalkr's profile picture

आज पहाटे 3 वाजता या पिंगळे कुटुंबातील मुलीने व आमचे जिल्हा प्रमुख रणजीत ज्ञानेश्वर पाटील यांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर मी प्रथम जिल्हाधिकारी धाराशिव यांच्याशी 4 च्या आसपास चर्चा केल्यानंतर तात्काळ नाशिकचे कर्नल सिंग यांच्याशी त्यांच्याशी बोलून हेलिकॉप्टर सेवा देऊन हेलिकॉप्टर द्वारे सदरील नागरिकांना बाहेर काढण्याची विनंती केली होती त्यानंतर सतत च्या प्रयत्नानंतर 12 वाजता या नागरिकांना बाहेर काढण्यात यश आले लाखी तालुका परंडा येथे अतिवृष्टीमुळे अडकलेल्या 16 ते 17 नागरिकांना काढण्यास व सुखरूप ठिकाणी पोहोचवण्यास यश आली असून आणखी जर काही ठिकाणी असे नागरिक अडकले असतील तर तात्काळ संपर्क करावा या प्रयत्नात तात्काळ सहकार्य लाभलेल्या प्रशासनातील सर्व अधिकाऱ्याचे व हेलिकॅप्टर सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार व अभिनंदन

Omprakash Rajenimbalkar

64,548 Aufrufe • vor 9 Monaten

OmRajenimbalkr's profile picture

पैश्याची मस्ती. कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी गावातील हत्तिन महादेवी ही जवळपास 36 वर्षे ज्या लोकांबरोबर परिवाराचा सदस्य बनून राहिली तिला असे अचानक वनतारा ला रवाना व्हावे लागले. यावेळी गावकऱ्यांच्या भावना या शब्दात व्यक्त होणार नाही. महादेवी ची काळजी सर्वांनाच आहे पण वनतारा च का हा प्रश्न सर्वांच्याच मनात आहे. मागे एकदा मला ही महादेवी ची भेट घेता आली होती. या भेटीत मुक्या प्राण्यांना ही भावना असतात हे प्रकर्षाने जाणवले. सरकार ला माझे सांगणे आहे की सब कुछ अदानी ,अंबानी असे करू नका रे. लोक सगळे बघत असतात आणि योग्यवेळी हिशोब करतात. #JusticeForMahadevi #SaveMahadevi #VoiceForVoiceless #KolhapurToVantara #ElephantRights #वनतारा_च_का #StopAnimalPolitics #महादेवी_आमची_गर्वाची #पैशाची_मस्ती #KolhapurStandsWithMahadevi #omrajenimbalkar

Omprakash Rajenimbalkar

35,474 Aufrufe • vor 11 Monaten

OmRajenimbalkr's profile picture

“ज्या मातीच्या कुशीत जन्म घेतला, त्या मातीची फिकीर करत झोप उडाली होती… ज्याच्या खांद्यावर आयुष्यभर मेंढरं होती, त्याच खांद्यावर आज देशाची जबाबदारी आली आहे…” कधी पायात चप्पल नव्हती, कधी खिशात एक रुपया नव्हता… पण डोळ्यांत एक स्वप्न होतं – UPSC क्लियर करायचं! आज त्या स्वप्नाला पंख मिळालेत… बिरुदेव सिद्धाप्पा ढोणे – UPSC रँक 551 मेंढरं चारणारा ‘बिरू’ आज भारतातल्या सर्वात प्रतिष्ठित यादीत आपल्या मेहनतीच्या बळावर पोहोचला आहे. ◾️ गाव – यमगे ◾️ तालुका – कागल ◾️ जिल्हा – कोल्हापूर “निकाल लागला, तेव्हा बिरू ढोणे मेंढरं चारत होते …” हाच त्यांचा संघर्ष होता, आणि हाच त्यांचा अभिमान आहे! या मातीच्या सुपुत्राला शतशः सलाम आणि हार्दिक अभिनंदन! हे यश फक्त रँक नाही, ही आहे ग्रामीण भागातील प्रत्येक मुलासाठी एक आशा… #UPSC2025 #BiruDhone #ShepherdToIAS #KolhapurPride #RuralDreams #MarathiMulga #MatiChaAbhiman #StruggleToSuccess #InspirationToMany #YamgeToDelhi #UPSCMotivation #GraminYuva #SiddappaDhonde #BirudevDhonde #ShepherdIAS #MaharashtraChiShaan #DreamBigWorkHard

Omprakash Rajenimbalkar

33,849 Aufrufe • vor 1 Jahr

OmRajenimbalkr's profile picture

आज साबळेवाडी ता. भूम येथील अतिवृष्टी मुळे फुटलेल्या तलावाची पाहणी केली व अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देऊन शेतकऱ्यांच्या शेती पिकांची पाहणी केली. सलग झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर उभ्या पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. या पाहणीदरम्यान प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या की • शेती पिकांचे नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे तात्काळ करून घ्यावेत. • शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळावी यासाठी त्वरीत कारवाई करावी. • शासनाने ज्या निकषांनुसार मदत देणे अपेक्षित आहे ते निकष शिथिल करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. #farmer #शेतकरी #नुकसान #पाहणी #ओमराजे_निंबाळकर #Omrajenimbalkar

Omprakash Rajenimbalkar

23,907 Aufrufe • vor 9 Monaten