Pratap Baburao Sarnaik's banner
Pratap Baburao Sarnaik's profile picture

Pratap Baburao Sarnaik

@PratapSarnaik36,304 subscribers

Transport Minister, Maharashtra State | Guardian Minister, Dharashiv District | MLA, Ovala Majiwada Vidhan Sabha

Videos

PratapSarnaik's profile picture

कधी कधी मोठ्या बदलाची सुरुवात मोठ्या यंत्रणेतून नाही, तर एका छोट्याशा कल्पनेतून होते… कोपरगाव येथील संजिवनी ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता १२वीत शिकणाऱ्या साईश्रद्धा अरविंद साळमुठे हिने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळासाठी प्रवाशांना बसच्या वेळा व रिअल-टाइम बस अपडेट्स सहज उपलब्ध करून देणारे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. या संपूर्ण प्रणालीचा वापर QR Code च्या माध्यमातून करता येतो. प्रवाशांनी QR Code स्कॅन केल्यानंतर कोणतेही साइन-अप किंवा लॉगिन न करता थेट वेबसाइटवर जाऊन आपल्या बसच्या वेळा व उपलब्ध माहिती पाहता येते. या प्रकल्पासाठी तिला भारत सरकारकडून Utility Patent देखील प्राप्त झाले आहे. मोठ्या प्रमाणावर प्रवासी या सुविधेचा उपयोग करत आहेत. सध्या हे सॉफ्टवेअर अहिल्यानगर आणि नाशिक या दोन जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे. विशेष म्हणजे, एवढे उपयुक्त सॉफ्टवेअर विकसित करूनही तिने त्यासाठी कोणत्याही मोबदल्याची मागणी केली नाही. तिच्या या कार्याची दखल घेत, तिच्या पुढील शिक्षणाचा खर्च उचलण्याची जबाबदारी स्वीकारण्यात आली. एका १२वीच्या विद्यार्थिनीने आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग समाजासाठी केला, ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. एका बाजूला स्वतःच्या ज्ञानातून समाजाला काहीतरी देण्याची तिची भावना आणि दुसऱ्या बाजूला तिच्या शिक्षणाला आधार देण्याची ही संधी… हा क्षण निश्चितच मनाला भावणारा आहे. आज तिच्या हातातील कौशल्याला प्रोत्साहन मिळाले आहे, उद्या हेच कौशल्य समाजाच्या प्रगतीला नवी दिशा देईल, असा विश्वास आहे. #PratapSarnaik #TransportMinister #MaharashtraST #YouthPower #Innovation Maharashtra State Road Transport Corporation

Pratap Baburao Sarnaik

51,723 views • 1 month ago

No more content to load