
Raj Thackeray
@RajThackeray • 1,856,066 subscribers
Official Twitter Handle Of Raj Thackeray
Shorts
Videos

NEET परीक्षेत केंद्रसरकारने जो अभूतपूर्व गोंधळ घातला आणि त्याने विद्यार्थ्यांचं अपरिमित नुकसान झालं त्या विरोधात देशभर आंदोलन सुरु आहे. त्या आंदोलनाला चिरडण्याचा सरकारचा सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहे. त्याविरोधात आज मी आणि शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली. पदावर बसलेल्या व्यक्तीने झालेल्या चुकांची जबाबदारी घ्यायची असते आणि जर भारतीय जनता पक्षाने विरोधात असताना तत्कालीन सरकारच्या मंत्र्यांचे राजीनामे मागितले होते मग आता भारतीय जनता पक्षाने स्वतःच्या मंत्र्यांचा राजीनामा घ्यायला हवा. आम्ही कोणाशी बोलणार नाही, कुठलंही आंदोलन झालं तर आंदोलनकर्त्यांशी बोलणार नाही, हा सत्तेचा उद्दामपणा आहे. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी येत्या २६ जुलै २०२६ ला सकाळी १० वाजता आम्ही मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथील महाराजांच्या पुतळ्यापासून ते सिद्धिविनायक असा मोर्चा काढणार आहोत. हा मोर्चा अराजकीय असेल, या मोर्च्यात कुठल्याच पक्षाचे झेंडे असणार नाहीत. या मोर्च्यात विद्यार्थी सामील होतीलच पण त्यांच्या पालकांनी पण सामील व्हावे ही मनापासून विनंती. हा प्रश्न एका परीक्षेचा नाही तर ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळलं जातं आहे त्याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी हा मोर्चा आहे.
Raj Thackeray228,318 просмотров • 9 дней назад

तरुणांच्या आंदोलनाचा विजय झाला. धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा द्यायला तरुणांनी भाग पाडलं. आम्ही कोणाचं ऐकणार नाही, कोणाशी बोलणार नाही, आम्हाला कोणी सांगायचं नाही असा या सरकारचा जो माज होता तो या आंदोलकानी उतरवला. यासाठी या देशातील तमाम तरुण-तरुणीचं आणि त्यांच्या पालकांचं मनापासून अभिनंदन. हे अभिनंदन करण्यासाठी आज मी आणि शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. उद्या २६ जुलै २०२६ ला जो तिरंगा मार्च होणार होता त्याचं रूपांतर विजयोत्सव सोहळ्यात होत आहे. उद्या ठरलेल्या वेळेतच सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आपण सगळे ठरलं तसं जमणार आहोत. देशभरातील तरुण-तरुणींनी केलेल्या संघर्षाचं कौतुक आणि अभिनंदन करणार आहोत. तेंव्हा आपलं ठरलं आहे तसं भेटूया. पत्रकार परिषदेत बाकी जे काही बोललो त्याची चित्रफीत सोबत जोडली आहे.
Raj Thackeray97,673 просмотров • 6 дней назад
1:50
Sensitive content
This media may contain sensitive content.

On Saturday, July 18, 2026, the central government forcibly admitted Sonam Wangchuk into hospital. They claim it was out of concern for his health. However, the way he was dragged away makes it evident that the government had no genuine concern for him. After witnessing the brutal lathi-charge against protesters yesterday, it appears that the government itself has become mentally unstable and needs to be hospitalized. Those in power seem obsessed with demonstrating to the world how they crush legitimate protests and take pleasure in showing it off to the other heads of state, even when you don’t share a common language, by flashing a booming, theatrical laugh for the cameras. After all, who exactly is Dharmendra Pradhan that the government views his resignation as a personal failure? When Manipur was in flames, this same government shielded the then-Chief Minister, Biren Singh, in a similar fashion. The truth is, the two top leaders in power have absolutely no affection for individuals like him or others of his ilk. Their attitude is: No one tells us what to do. Not the opposition, and certainly not the public. After all, we do not get elected based on votes. Our victories rely on manipulating the entire administrative machinery, exploiting chaos in voter lists, and, of course, the power of EVMs. Who cares about the students? Yesterday, the Prime Minister spoke about everything except the actual issue at hand. There is an English term called ‘Lame Duck President’. It refers to a leader in their final term who is relatively relaxed, tours the globe, and sees their influence wane while their successor handles the actual governance. It appears that Modi has currently reached a similar stage. Even if Modi harbored a genuine desire to act on these matters, the forces vying for succession likely compelled him to turn a blind eye. History will certainly remember that the students' protest was ruthlessly crushed during Modi's tenure as Prime Minister! If anyone desires such an image for him, and if Modi is willing to fall prey to it, then there is nothing more to be said. I have a request for Prime Minister Narendra Modi: You hold events like 'Pariksha Pe Charcha' (Discussion on Exams), so why not engage in a dialogue with the students now? Their demands are legitimate. The outcry of the nation's students is far more important than the egos of Dharmendra Pradhan and the government. The government must also realize that this protest is not merely about students or a single examination. There is deep-seated public anger against the establishment. Anger over how a single industrialist is being propped up and the entire nation is being handed over to him. How inflation has peaked. How forests are being razed to benefit contractors. How cities are suffocating under the guise of development. And how hospitals are overflowing. This outcry is against all these issues. Protesters are being brutally beaten on orders from the Home Ministry, yet the young men and women refuse to budge an inch. This courage stems not from anger over a single issue, but from the despair caused by the overall state of the country. Therefore, the government should abandon its ruthlessness and show some understanding. It is certain that the power gained through the Lokpal Bill movement will be lost through this student protest! Since 2018-19, I had been telling the public that they might not grasp what I was saying about this government at the time, but the day injustice knocks on their doors, they would understand! Today, that moment has arrived!
Raj Thackeray156,583 просмотров • 11 дней назад
1:50
Sensitive content
This media may contain sensitive content.

केंद्र सरकारने शनिवार १८ जुलै २०२६ ला सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने उचलून रुग्णालयात भरती केलं. सोनम वांगचुक यांच्या तब्येतीची काळजी वाटून त्यांना रुग्णलयात दाखल केलं असं सरकारचं म्हणणं आहे. सरकारने त्यांना ज्या पद्धतीने फरफटत नेलं त्यावरून सरकारला वांगचुक यांची काळजी नव्हती हे नक्की. त्यानंतर काल आंदोलकांवर केलेला बेफाम लाठीचार्ज, हे पाहून हे सरकारच मानसिक रुग्ण झालं आहे आणि त्यांनाच रुग्णालयात भरती करण्याची गरज आहे असं दिसतंय. आम्ही रास्त मागण्यांसाठीची आंदोलनं कशी चिरडतो हे जगाला दाखवण्याची आणि ती कशी चिरडली हे आपल्याला स्वतःला आजूबाजूच्या इतर राष्ट्राध्यक्षांच्या कोणत्याच भाषा येत नसताना फक्त कॅमेऱ्यासाठी गडगडाटी हास्य करून जगभरातील राष्ट्राध्यक्षांना ते सांगण्याची हौस सध्या सत्ताधीशांना जडली आहे . मुळात धर्मेंद्र प्रधान कोण लागून गेले की ज्यांचा राजीनामा घेणं हे सरकारला स्वतःच अपयश वाटत आहे ? मणिपूर पेटलेलं असताना त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना बिरेन सिंग यांना पण याच सरकारने असंच अभय दिलं होतं. बरं हे दोघे असतील किंवा यांच्यासारखे इतर असतील त्यांच्याबद्दल वरच्या दोन सत्ताधीशांना शून्य प्रेम आहे. आम्ही काय करायचं हे कोणी सांगायचं नाही, मग ते विरोधी पक्षांनी पण नाही आणि जनतेने तर नाहीच नाही. कारण तुमच्या मतांवर आम्ही थोडी निवडून येतो. आम्ही निवडून येतो ते सगळ्या यंत्रणा, मतदार याद्यातील गोंधळ आणि अर्थात ईव्हीएमच्या जोरावर. मग विद्यार्थ्यांना कोण विचारतं. काल पंतप्रधान हा मुद्दा सोडून सगळं बोलले.इंग्रजीत एक शब्दप्रयोग आहे, 'लेम डक' प्रेसिडेंट. म्हणजे ज्या पंतप्रधानांचा किंवा राष्ट्राध्यक्षांचा शेवटचा कार्यकाळ सुरु असतो ते पंतप्रधान हे निवांत असतात, जगभर दौरे करतात, आणि त्यांचा प्रभाव कमी झालेला असतो आणि त्यांचा उत्तराधिकारीच सगळा कारभार हाकत असतो. सध्या मोदींची अवस्था अशी झाली आहे असं दिसतंय. मोदींच्या मनात या सगळ्याबद्दल समजा कृती करण्याची इच्छा जरी असली तरी उत्तराधिकारी होण्याच्या स्पर्धेत असलेली शक्ती त्यांना दुर्लक्ष करायला भाग पाडत असावी. अर्थात मोदी पंतप्रधान असताना विद्यार्थ्यांचं आंदोलन निर्दयीपणे चिरडलं गेलं हे इतिहास लक्षात ठेवेलच ! तशीच प्रतिमा व्हावी अशी कोणाची इच्छा असेल आणि मोदी त्याला बळी पडणार असतील तर मग प्रश्नच संपला ! माझी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती आहे. ती 'परीक्षा पे चर्चा' इत्यादी करता ना मग आता विद्यार्थ्यांशी चर्चा करा. त्यांच्या मागण्या रास्त आहेत. धर्मेंद्र प्रधान आणि सरकारचा इगो यापेक्षा या देशातील विद्यार्थ्यांचा आक्रोश महत्वाचा आहे. आणि सरकारने हे देखील समजून घ्यावं की हे आंदोलन फक्त विद्यार्थ्यांचं, एका परीक्षेपुरतं नाही आहे. लोकांच्या मनात सरकारच्या कारभाराबद्दल राग आहे, ज्या पद्धतीने एकाच उद्योगपतीला मोठं केलं जात आहे, त्याच्या घशात संपूर्ण देश घातला जात आहे, ज्या पद्धतीने महागाईने कळस गाठला आहे, जंगल तोडून कंत्राटदारांच भलं केलं जात आहे , शहरच्या शहर विकासाच्या नावाखाली गुदमरली आहेत, रुग्णालय खच्चून भरली आहेत , अशा अनेक गोष्टींच्या विरोधातील हा आक्रोश आहे. गृहखात्याच्या आदेशावरून आंदोलकांना जसं निर्दयीपणे मारलं जात आहे आणि तरीही आंदोलक मुलं-मुली इंचभर हलत नाही आहेत यावरून एक नक्की की हे धैर्य एका मुद्द्यावरच्या रागातून नाही तर देशातील एकूणच परिस्थितीतून आलेल्या नैराश्यातून आहे. त्यामुळे सरकारने निर्दयीपणा सोडून समजूतदारपणा दाखवावा. लोकपाल विधेयकाच्या आंदोलनातून मिळवलेली सत्ता विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून जायला लागणार हे निश्चित ! २०१८/१९ पासून मी जनतेला सांगत होतो की मी काय या सरकार बद्दल बोलतोय हे तुम्हाला आज नाही कळणार पण ज्या दिवशी तुमच्या दरवाजावर अन्यायाची टकटक होईल तेव्हा मी काय सांगत होतो हे समजेल ! आज सर्वांच्याच दरवाजावर टकटक सुरू झाली आहे ! या सगळ्यात विद्यार्थ्यांनी जो संघर्ष उभा केला आहे त्याचं मनापासून कौतुक. शेजारच्या श्रीलंकेत २०२२ ला विद्यार्थ्यांनी असंच आंदोलन उभं केलं होतं. २०११ चं अरब स्प्रिंग, नेपाळ मध्ये देखील तेच. ही सगळी अगदी ताजी उदाहरण आहेत. जय प्रकाश नारायण यांनी संपूर्ण क्रांतीचं आंदोलन उभं केलं त्याचा पाया हा पण विद्यार्थ्यांच्या असंतोष होता. आज आपल्या देशातील विद्यार्थ्यांच्या या धैर्याला पण सलाम ! महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा या आंदोलनाला, या मागण्यांना पाठींबा आधीपासून होता आणि यापुढे राहील. खरतर निट सारख्या परिक्षांनाच आम्ही पहिल्यांदा विरोध केला होता, विनाकारण केंद्राने या इतकी वर्षे चालू असलेल्या पद्धतीत ढवळाढवळ करू नये पण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही हेच खरे !
Raj Thackeray68,996 просмотров • 11 дней назад

आज महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने झालेल्या, माझ्या भाषणात दुसऱ्या महायुद्धाचा संदर्भ देताना विन्स्टन चर्चिल यांचा मुद्दा मांडताना मी चुकीने व्ही फॉर व्हिक्टरी आणि व्ही फॉर विन्स्टन म्हटलं. खरंतर मला भाषणाच्या मांडणीत व्ही फॉर इनव्हिन्सीबल असं अपेक्षित होतं. वी आणि व्ही मधे बोलताना गडबड झाली. ही चूक नंतर माझ्या लक्षात आली म्हणून त्याचं स्पष्टीकरण दिलं. बाकी मुद्दे आणि भाषणाची चित्रफीत सोबत जोडली आहेच. १) २००८ ला रेल्वे भरती प्रकरणावरून आंदोलन झालं, त्यातून पक्ष वाढत गेला, पक्ष मोठा होत गेला. पक्षाला चिन्ह देखील रेल्वे इंजिन मिळालं. २००८ ला जे रेल्वेचं आंदोलन आपण केलं होतं ते विसरू नका. महाराष्ट्रातल्या रेल्वे भरतीत मराठी टक्का वाढला पाहिजे यासाठीचं ते आंदोलन होतं. त्यावेळेस माझ्यासकट असंख्य महाराष्ट्र सैनिकांवर केसेस टाकल्या गेल्या, जेलमध्ये टाकलं गेलं. खरंतर प्रश्न साधा होता. महाराष्ट्रात जर रेल्वे भरती आहे तर त्याच्या जाहिराती मराठी वर्तमानपत्रांत न येता त्या उत्तरेकडच्या राज्यांच्या वर्तमानपत्रांत कशा येतात यावरून ते आंदोलन सुरु झालं. त्यावेळेस इथल्या स्टेशनांवर ही उत्तर प्रदेश बिहारच्या तरुणांची गर्दी होती. आपल्या महाराष्ट्र सैनिकांनी जेंव्हा त्यांना विचारलं की तुम्ही इकडे कशाला आलात त्यावेळेस त्यांच्यातल्या काही लोकांनी आपल्या महाराष्ट्र सैनिकांना शिव्या दिल्या, त्यातून आंदोलन उभं झालं. पुढे या आंदोलनामुळेच हजारो मराठी तरुण-तरुणींना रेल्वेत नोकरी मिळाली. त्यामुळे रेल्वे भरतीवर महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे. २) मिसिंग लिंकवर दरड कोसळून तिकडे पाणी गळत होतं यावर लोकांनी टीका केल्यावर मुख्यमंत्री म्हणतात या घटनेवर राजकारण करू नका. अरे वा ! तुम्ही दुसऱ्यांच्या वेळेस काय करत होतात ? तेंव्हा तुम्ही जी आंदोलनं केली, टीका केली, ते राजकारण नाही आणि हे मात्र राजकारण. मुख्यमंत्री म्हणतात एकवेळ मला बोला पण महाराष्ट्राला काही बोलू नका. लोकं मिसिंग लिंकबद्दल बोलत आहेत, यात कुठे महाराष्ट्राचा अपमान आला? हे वरपासून खालपर्यंत सुरु आहे. केंद्राची एखादी गोष्ट चुकली आणि तुम्ही काही बोललात की तुम्ही देशविरोधी. लोकांनी प्रश्न विचारायचे नाहीत ? इतके दिवस सत्ताधारी जे ट्रोलिंग विरोधकांना करत होते, ते यांच्या अंगलट आलं आहे. आज यांच्यावर जेंव्हा दामदुप्पट टीका सुरु झाली तेंव्हा हे मात्र कांगावा करायला लागलेत. ३) राम मंदिराच्या दानपेटीतील अपहाराबद्दल बोललो की म्हणे धर्माचा अपमान. अरे चोरी आहे ना ती याच्यात धर्म कुठे आला ? राममंदिराबद्दल आम्हाला पण आस्था आहे. पण तिथे जेंव्हा १४०० कोटी गायब होतात तेंव्हा आम्ही बोलायचं नाही. बरं आम्ही बोलल्यावर आम्हाला म्हणणार वक्फ बोर्डावर का नाही बोलत. आम्हाला काय करायचं आहे वक्फ बोर्डात काय सुरु आहे त्याच्याशी? या देशातील हिंदू भाविकांनी श्रद्धेने देवाला अर्पण केलेल्या पैशाचा अपहार होतो यावर बोललो की तुम्ही आम्हाला धर्मविरोधी ठरवणार? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दत्तात्रय होसबळे म्हणाले की गैरहिंदू या घटनेचा गैरफायदा घेतील. काय बोलताय ? या ट्रस्टवर भाजप, आरएसएस आणि त्यांच्याशी संबंधित संघटनांची लोकं आहेत. कल्पना करा असा अपहार भाजप सत्तेत नसताना झाला असता तर? भाजप असो आरएसएस असो की विश्व हिंदू परिषद असो यांनी मोर्चे काढले असते, आंदोलनं काढली असती. त्याला राजकारण म्हणलं असतं तर कोणी ? ४) २००५ ला मुंबईत प्रचंड ढगफुटी होऊन काही तासांत हजार मिलिमीटरच्या आसपास पाऊस पडला होता. त्यावेळेस मुंबई पाण्याखाली गेली होती. यावेळेस ३०० मिलीमीटर पाऊस झाला तरी मुंबईची तशीच अवस्था झाली. त्यावेळेस टीका करणारे आज गप्प का आहेत ? या सगळ्यावर भाजपचे एक मंत्री म्हणतात, ही नैसर्गिक आपत्ती आहे यावर टीका करू नका. तुमच्याकडून झालं की लगेच नैसर्गिक आपत्ती आठवते का ? ५) काल मुख्यमंत्री विधिमंडळात म्हणाले मिसिंग लिंकवर राजकारण करणाऱ्यांना बघून घेईन. ही कुठली भाषा ? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात ना तुम्ही ? बरं ते झाल्यावर हिंदीत पण तेच बोलले ? कोणासाठी हिंदीत बोललात ? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या विधिमंडळात हिंदीत का बोलतो ? बहुदा वरच्यांना सांगत असतील बघून घेईन म्हणून.
Raj Thackeray74,774 просмотров • 23 дней назад

Over the past few years, the Adani Group has expanded at an extraordinary pace—be it the power sector, ports, airports, or almost every major sphere within the state. One by one, critical sectors are being handed over to a single corporate conglomerate. As Maharashtrians, if we fail to view this rapid consolidation with the seriousness it demands today, inch by inch, vast stretches of land and key assets of this state will slip into the hands of one corporate group. This video lays out the staggering scale of the Adani Group’s expansion across the state and is well worth watching.
Raj Thackeray323,563 просмотров • 6 месяцев назад

बाळासाहेबांनी दिलेला ‘शिवसेना’ हा विचार किती अचूक होता ते आज पुन्हा एकदा कळलं.... #शिवसेना #बाळासाहेब_ठाकरे #Legacy
Raj Thackeray1,022,023 просмотров • 3 лет назад

Between 2014 and 2025, span of just eleven year the Adani Group, with the government’s blessings, has expanded across the country at an unprecedented pace, steadily building dominance across multiple sectors. This video offers a glimpse into that rapid rise and growing monopoly and is well worth watching.
Raj Thackeray129,965 просмотров • 6 месяцев назад

आजच्या निवडणुका आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली. ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली ! आणि आता १००% खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे.. हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे... दुबार मतदार नोंदणीपासून, ते मतदार यादीतील अनेक घोळ या सगळ्यावर एकही प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय ? जबाबदारी तर तुम्ही केंव्हाच झटकली आहेत, आत्ता उत्तरदायित्व पण नाकारणार, मग तुमच्या पदांच करायचं काय ? महाराष्ट्रातील जनतेने ही क्लिप जरूर पहा... तुमच्या मतदानाचा ढळढळीत अपमानाचा उगम कुठून आहे हे तुम्हाला कळेल... बाकी या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारून निवडणूक आयोगाची भंबेरी उडवणाऱ्या पत्रकारांचं मनापासून अभिनंदन...
Raj Thackeray163,439 просмотров • 8 месяцев назад

एका जपानी तरुणीचा एक व्हिडीओ समोर आला. ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्याला आहे आणि ती तिच्या परीने मराठी भाषा शिकायचा प्रयत्न करत आहे. ती एक नवीन मराठी शब्द रोज शिकते आणि त्याची एक चित्रफीत तिने टाकली. ती चित्रफीत पाहिल्यावर एक विचार डोक्यात आला की हे सगळे काही हजार किलोमीटरवरून येणारे परदेशी पाहुणे, पण इथे आल्यावर या प्रांताची भाषा 'मराठी' आहे हे सहज मान्य करतात. ते जर इथे खूप काळ राहणार असतील तर ती भाषा शिकण्याचा प्रयत्न करतात,नाहीतर किमान भाषेचा अनादर कधीच करत नाहीत. उलट आपण त्यांच्यासमोर आपल्या भाषेत बोललो तर त्यांना आनंद होतो. त्यांना जमलं तर आपल्या भाषेतील नाटकं बघायची असतात, इथली खाद्यसंस्कृती समजून घ्यायची असते, इथला इतिहास समजून घ्यायचा असतो. आणि हे सगळं करताना त्यांना मराठीबद्दल जितकं अपार कुतूहल असतं तितका अपार आदर पण असतो. ते इथून इतर राज्यात गेले तर तिकडे जाऊन पण त्याच उत्सुक्याने सगळं बघत असतात, शिकत असतात. मध्यंतरी नवी मुंबईत कोल्डप्लेचा कार्यक्रम झाला तेंव्हा या शहराची, राज्याची भाषा मराठी आहे हे कळल्यावर, ख्रिस मार्टिनने अगदी सहज मराठीत एक दोन वाक्य बोलत प्रेक्षकांना अभिवादन केलं. या शहरांत जेंव्हा जेंव्हा इतर देशांचे राष्ट्राध्यक्ष आलेत तेंव्हा त्यांच्यातील बहुसंख्य राष्ट्राध्यक्षांनी मराठीत अभिवादन केलं आहे. मुंबईत असलेली दूतावासांची कार्यालयं मराठी ही या राज्याची भाषा आहे त्यामुळे महत्वाच्या सणांना मराठीत शुभेच्छा देतात. तिथे मराठी बोलणारा कर्मचारी वर्ग राहील हे बघतात. हे परक्यांना कळतं पण काही स्वकीयांना कळत नाही. त्यांना मुंबईची भाषा मराठी नाही तर इथे अनेक भाषा आहेत हे म्हणावंसं वाटतं. मध्यंतरी सरसंघचालक मुंबईत एका कार्यक्रमाला येऊन गेले. त्यावेळी आपण मुंबईत आहोत, आपण मराठी पण आहोत त्यामुळे थोडाफार संवाद मराठीत पण साधावा असं त्यांना का वाटलं नाही ? माहित नाही. मला संघाच्याच काही लोकांनी सांगितलं की या आधीचे सरसंघचालक सुदर्शनजी यांचा जन्म आणि बालपण रायपूरमध्ये झालं होतं, त्यांना हिंदी यायचं पण ते जे कर्नाटकातून आले होते त्या राज्याच्या कन्नड भाषेचा त्यांना कधी विसर पडला नाही. उलट कर्नाटकात गेले तर आवर्जून कन्नडमध्ये संवाद साधायचे. असो.. माझं मराठी भाषिकांना आवाहन आहे की परदेशी व्यक्ती तुमच्या भाषेचा सन्मान करतील आणि करतात. पण इथल्या मूठभर स्वकीयांना या भाषेत बोलतं करण्यासाठी आपली भाषा ज्ञानाची आणि अर्थार्जनाची बनवूया. जेणेकरून ती शिकल्या शिवाय पर्यायच उरणार नाही. त्या जपानी मुलीला मनःपूर्वक धन्यवाद 🙏 राज ठाकरे ।
Raj Thackeray98,261 просмотров • 5 месяцев назад

इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लहान मुलांवर लादण्याचा सरकारचा प्रयत्न होता, तो प्रयत्न मराठी माणसाच्या एकजुटीने हाणून पाडला. काल २९ जून २०२५ ला सरकारने हा निर्णय मागे घेण्याची घोषणा केली. यानंतर आज ३० जून २०२५ रोजी माध्यमांशी संवाद साधला. हा मराठी माणसाच्या एकजुटीचा विजय आहे आणि त्याबद्दल तमाम मराठी जनांचं मनापासून अभिनंदन. येत्या ५ तारखेला विजयी मेळावा होईल. या मेळाव्यात कोणताही झेंडा नसेल, हा मराठी माणसाचा मेळावा असेल . आणि अजून एक गोष्ट मी पुन्हा एकदा सांगितली ती म्हणजे सरकारने जी काही नवीन समिती नेमली आहे तिचा अहवाल येऊ दे किंवा नको येऊ दे, राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी शिकवली जाणार नाही हे नक्की. बाकी ५ तारखेच्या विजयी मेळाव्याचे तपशील लवकरच कळवण्यात येतील.
Raj Thackeray209,591 просмотров • 1 год назад

आज पुण्यात पत्रकार वरुणराज भिडे स्मृती पुरस्कार २०२६ प्रदान सोहळा झाला. यावेळेस श्रीमती मृणालिनी नानिवडेकर, श्री. कमलेश सुतार, श्री. दीपक कांबळे, श्रीमती मिनाक्षी गुरव यांना माझ्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी माझं आजच्या पत्रकारितेबद्दलचं मनोगत व्यक्त केलं.
Raj Thackeray47,815 просмотров • 3 месяцев назад

Take a close look at the ongoing expansion of the Adani Group across the MMR region. Certain forces, still resentful that Mumbai remained with Maharashtra and did not go to Gujarat, are now attempting—through this corporate giant—to gain influence and control over Mumbai and the wider MMR. The Adani Group’s growing footprint in the MMR deserves careful attention.
Raj Thackeray86,698 просмотров • 6 месяцев назад

आज, ११ जानेवारी २०२६ रोजी शिवतीर्थ दादर येथे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवशक्तीची जाहीर सभा पार पडली. या सभेत माझे व शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांचे भाषण झाले. माझ्या भाषणातील प्रमुख मुद्दे - - आज या क्षणाला आम्ही दोन भाऊ एकत्र आल्यानंतर आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि माँ. मिनाताई असायला हवे होते. - गेले अनेक दिवस मराठीच्या या लढ्यात आम्हाला दीपक पवार व त्यांचे सहकारी, टेलिव्हिजन चॅनल्सचे पत्रकार आणि संपादक यांसारख्या अनेकांनी मदत केली त्यांचे मनःपूर्वक आभार! - मी आणि उद्धव आम्ही एकत्र येण्याचं मूळ कारण म्हणजे या मुंबईवर आलेलं संकट. - अकोटमध्ये भाजपने एमआयएमसोबत युती केली. बदलापुरात भाजपने काँग्रेससोबत युती केली. - भाजपचे ६६ जण बिनविरोध निवडून आले. म्हणजे ६६ ठिकाणी मतदार मतदान करू शकत नाहीत. - तुळजापूरात ड्रग्ज रॅकेटमधला आरोपी विनोद गंगणेला भाजपने तिकीट दिलं. बदलापुरातील बलात्काराच्या प्रकरणातील सह-आरोपी तुषार आपटेला नगरसेवक केलं. ही हिंमत भाजपमध्ये आली कुठून? - सध्या महाराष्ट्रात जे काही सुरू आहे त्याचं चित्र पाहून तुम्हाला भीती वाटली नाही तर निवडणुका न लढवलेल्याच बऱ्या. - जगामध्ये अदानींप्रमाणे १० वर्षांत इतक्या मोठ्या प्रमाणात श्रीमंत झालेला दुसरा माणूस नसेल. सरकारची एकट्या अदानींवर इतकी मेहरबानी का? - वाढवणला बंदर येतंय ठीक आहे. पण विमानतळ कशासाठी तर, सगळे कार्गो वाढवणला नेणार आणि मुंबई विमानतळावरची सगळी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणं नवी मुंबईत हलवणार आणि नंतर मुंबई विमानतळाची जमीन विकायला काढणार. - आधीपासून त्यांच्या डोक्यात आहे मुंबई गुजरातला न्यायची. त्यासाठी पालघरचा जिल्हा ताब्यात घ्यावा लागेल, ठाणे जिल्हा आणि एमएमआर परिसराचा भाग ताब्यात घ्यावा लागेल आणि नंतर मुंबई गुजरातला जोडून घेणं सोपं होईल. - एकदा मुंबई हातातून गेली तर महाराष्ट्र झारखंडपेक्षा वेगळा करणार नाहीत हे. - देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी भुजबळांना जेलमध्ये टाकलं होतं. अजित पवारांविरोधात बैलगाडीभरून पुरावे फडणवीसांनी सादर केले आणि आता त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसलेत. आणि आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करताय? - काल उत्तर भारतातला एक माणूस बोलला, मुंबई महापालिकेत नोकऱ्या द्यायच्या असतील तर इथल्या उत्तर भारतीयांना दिल्या पाहिजेत, बाहेरून कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातून येणाऱ्यांना कशाला द्यायच्या. आमच्या कोल्हापूर, सातारा, सांगलीतून येणारी लोकं बाहेरची झाली? - तुम्ही मराठी म्हणून एकत्र येता कामा नये म्हणून यांचा हा खेळ सुरू आहे. - मराठी माणसाला एकटं पाडण्यासाठी हा डाव रचला जातोय. पण एकटे असलो तरी बास आहोत. - माझा कोणत्याही भाषेला विरोध नाही पण तुम्ही आमच्यावर लादणार असाल तर लाथच मारू. - हिरे, मोती, सोनं, चांदी व अन्य कितीही मौल्यवान वस्तू असतील तरी फक्त जमिनीला रिअल इस्टेट म्हंटलंय कारण तीच खरी संपत्ती आहे. जर जमीन तुमच्या हातातून गेली तर तुमचे अस्तित्व संपते. - ही मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक आहे. आज जर चुकलात तर मुकलात म्हणून समजा. - माझं इतर पक्षांतील मराठी माणसांनाही आवाहन आहे. सोडा ते सगळं मराठीसाठी एक व्हा, महाराष्ट्रासाठी एक व्हा. - ही मुंबई, हा महाराष्ट्र मराठी माणसाच्या हातात रहावा, तुमच्या हक्काचं असावं तुमचंच आहे ते. - जो लढा आजवर मराठा साम्राज्याने दिला तो लढा आता आपल्याला उभा करायचाय. हा महाराष्ट्र वाचवायचाय, महाराष्ट्र समृद्ध करायचाय, ही मुंबई आपल्याला वायचायचीये यासाठी आपण कामाला लागाल अशी अपेक्षा करतो. - 'हिंदीची सक्ती राष्ट्रीय एकतेसाठी घातक ठरेल हे सत्य कोणीही लपवू शकत नाही' हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हे किती घातक आहे हे तेव्हाच लिहून ठेवलंय.
Raj Thackeray75,838 просмотров • 6 месяцев назад

अजित पवारांचा अपघात धुक्याने झाला की धोक्याने झाला ? अजित पवारांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर, त्या घटनेबद्दल अनेक शंका-कुशंका व्यक्त होत आहेत. याबाबत आमदार श्री. रोहित पवार हे पोलीस स्थानकांत तक्रार नोंदवून घ्यायला गेलेले असताना, त्यांची तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला गेला. पोलिसांवर एफआयआर नोंदवून न घेण्यासाठी सरकारकडूनच दबाव आणला गेला असं दिसतंय. एफआयआर नोंदवून न घेण्यासाठी सरकार दबाव का टाकतंय? एफआयआर नोंदवून घेतलाच पाहिजे असे सक्त निर्देश असताना जर एका आमदाराची तक्रार नोंदवून घेतली जात नसेल तर मग सामान्य माणसांचं काय होत असेल ? अजित पवारांच्या बाबतीत जे घडलं ते अतिशय दुर्दैवी आहे, अशा घटनेनंतर जर त्यांच्या घरच्यांच्या मनात काही शंका असेल आणि त्यांनी याचा तपास व्हावा अशी मागणी पोलिसांकडे केली आणि त्यावर सरकार अजित पवारांसारख्या नेत्याच्या बाबतीत सुद्धा, पोलिसांनी साधा एफआयआर नोंदवून घेऊ नये यासाठी दबाव टाकत असेल तर यात नक्की काय काळंबेरं आहे हे जनतेला कळलंच पाहिजे.
Raj Thackeray59,171 просмотров • 5 месяцев назад

आज मुंबईतील "शिवतीर्थ" या मैदानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्याला संबोधित केलं या भाषणातील महत्वाचे मुद्दे - १) गेल्या निवडणुकीत ज्यांनी मतदान करून ज्यांची मतं दिसली त्या मतदारांचे मी आभार मानतो आणि ज्या मतदारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मतदान करून देखील, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये ज्यांची मतं दिसली नाहीत त्यांचे पण मी आभार मानतो. निवडणुकीत जे झालं ते झालं आता पुढे काय ते बघूया.. २) गेल्या काही दिवसात ज्या काही घटना घडल्या त्यांच्याबद्दल मला बोललंच पाहिजे. पहिला विषय कुंभमेळा. बाळा नांदगावकरांनी गंगेचं पाणी आणलं मी पिणार नाही सांगितलं. नव्याने वारं शिरलेल्या हिंदुत्ववाद्यांना वाटलं मी कुंभमेळ्याचा अपमान केला. आपल्या देशातील नद्यांची जी अवस्था आहे जिला आपण माता म्हणतो, त्या नद्यांकडे आपल्या राज्यकर्त्यांचं काय लक्ष आहे त्यावर मी बोललो. स्व. राजीव गांधींनी गंगा साफ करण्याचं काम सुरू केलं, पुढे २०१४ ला मोदीजी पंतप्रधान झाले आणि त्यांनी पण गंगा साफ करण्याचा प्रकल्प हाती घेतला. कुंभमेळ्यानंतर ज्यांनी तिकडे जाऊन स्नान केलं त्यातले लाखो लोक आजारी पडले. प्रश्न कुंभमेळ्याच्या अपमानाचा नाहीये तर गंगा स्वच्छतेचा आहे. ज्यागंगेला आपण माता म्हणतो तिची आजची परिस्थिती काय आहे हे दाखवणारी एक चित्रफीत मी आणली आहे... गंगा शुद्धीकरणावर ३३ हजार कोटी खर्च झालेत. तिकडे घाटावर मृत व्यक्तीला अग्नी दिल्यासारखं करतात आणि नंतर पाण्यात ढकलतात. हा कोणता धर्म ? आपल्या नैसर्गिक गोष्टींच्या आड जर धर्म येणार असेल तर काय उपयोग ? हजार वर्षांपूर्वीची गोष्ट वेगळी होती, आता तीच परिस्थिती कशी चालेल ? आपण निसर्गासाठी काही सुधारणा करणार आहोत की नाही ? आपल्या नद्या स्वच्छ राहिल्या पाहिजेत. धर्माच्या नावाखाली आपण नद्या बरबाद करतोय. प्रत्येकाला धर्म प्रिय असतो पण त्या धर्मात सुधारणा केल्या पाहिजेत. ३) महाराष्ट्रात पण हीच परिस्थिती आहे. सावित्री नदी केमिकलने भरली आहे. देशभरात एकूण ३११ नदीपट्टे प्रदूषणामुळे धोक्याच्या पातळीवर असून यात महाराष्ट्रातील तब्बल ५५ नदीपट्टे प्रदूषित आहेत. ४) प्रदूषणाच्या मानकांनुसार (स्टँडर्ड्स नुसार ) उल्हास, मिठी, मुळा-मुठा, सावित्री, भीमा, पवना, कान्हा, तापी, गिरणा, कुंडलिका, दारणा, इंद्रायणी, नीरा, वैनगंगा, चंद्रभागा, मुछकुंडा, घोड, तितुर, रंगवली, वर्धा, कृष्णा, पाताळगंगा, सूर्या, वाघूर आणि ढोरणा या नद्यांच्या पात्रांमधील पाणी हे अति वाईट आहे. भातसा, पेढी, मोर, बुराई, वेल,पांझरा, सिना, काळू, वेण्णा, कोयना, मांजरा, पैनगंगा, पूर्णा, उरमोडी व कान या नद्यांच्या पात्रांचे पाणी वाईट या कॅटेगरीत म्हणजे तुलनेने कमी वाईट आहे. ५) मुंबईत ५ नद्या होत्या. त्यातल्या चार मेल्या म्हणजे मारल्या. सांडपाणी, झोपडपट्ट्या यांनी मारल्या. मिठी नदी पण मरायला टेकली आहे. मुंबईतील एकमेव राहिलेली नदी मिठी तिची काय अवस्था आहे ते बघा... दरवर्षी मुंबई महापालिका मिठी नदी साफ करणार असं म्हणते, जोपर्यंत नदीच्या दोन्ही बाजूला असलेली घरं हटवत नाही, तोपर्यंत मिठी नदी स्वच्छ होणार नाही. निसर्गाच्या हानीबद्दल कोणी बोललं की आपण म्हणणार धर्माच्या आड येतो. धर्माचं मला सांगूच नका. आपण भिंतीवर झाडं जगवा झाडं लावा असे संदेश लावतो. आणि देशातील हिंदूंचे अंतिम संस्कार लाकडांवर होतात. लाकडं कुठून येतात, जंगलं तोडूनच ना ? विद्युतदाहिन्या आल्या आहेत पण तरीही अनेक लोकं विद्युतदाहिनी नाकारतात. पंतप्रधानांना जंगलांची आवड आहे. आत्ता ते मध्ये अंबानींच्या वंताराला गेले. म्हणजे त्यांना प्राण्यांची आवड आहे. मग जंगलं त्यांनी वाचवली पाहिजेत. ६) भारताचा जन्म-मृत्यूचा आकडा हा दररोज ८१ हजार ७४६ जन्म होतात दररोज २९ हजार ६७९ मृत्यू होतात. दररोज पन्नास हजाराने लोकसंख्या वाढत आहे ७) महिन्याला २४ लाख ५२ हजार ३८० जन्म होतात महिन्याला ८ लाख नव्वद हजार ३७० मृत्यू होतात महिन्याला १५ लाख लोकांची वाढ होते. ८) वर्षाला २ कोटी ९४ लाख २८ हजार ५६० जन्म होतात, वर्षाला १ कोटी ६ लाख ८४ हजार ४४० मृत्यू होतात म्हणून दर वर्षी १ कोटी ८० लाखाने लोकसंख्या वाढते. एका बाजूला आपण दुष्काळाने त्रस्त आहोत म्हणून बोंबलत बसायचं आणि दुसरीकडे जंगलं तोडायची. ९) आपण अडकलोय औरंगजेबाची कबर तोडली पाहिजे का राखली पाहिजे या चर्चेत. आत्ता कुठून आठवला औरंगजेब ? चित्रपट पाहिल्यावर हिंदुत्व आठवलं ? चित्रपट पाहिल्यावर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य आठवतं ? हल्ली कोणीही विधानसभेत इतिहासावर बोलतात... माहिती तरी आहे का हे औरंगजेब प्रकरण ? औरंगजेबाचा जन्म गुजरातमधल्या दाहोदमधला. मग यावरून ब्राह्मण, मराठा आणि इतर जातीत भांडणं लावायची. यांना फक्त तुमची माथी भडकवायची आहेत. यांना छत्रपती संभाजी महाराजांशी घेणंदेणं नाही. या हिंद प्रांतात एक कडवट, प्रभावी स्वप्न ज्यांना पडलं त्या जिजाऊ साहेब. हे त्यांचं स्वप्न. त्यांना कळायचं नाही की आमचीच लोकं यांच्याकडे का चाकरी करत आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराज हिंद प्रांतावर केलेला संस्कार आहे, तो एक चमत्कार आहे, तो एक विचार आहे. १०) छत्रपती शिवाजी महाराज हा विचार जन्माला यायच्या अगोदर या हिंद प्रांताची काय स्थिती होती ? शहाजी राजे पण आधी आदिलशाहीत होते मग पुढे निजामशाहीत गेले. महाराजांचा लढा या सर्वांच्या विरोधात होता. त्यांना तुम्ही जातीत का पाहता ? अफजल खानाचा वकील ब्राह्मण होता आणि महाराजांच्या वतीने त्याच्याशी बोलायला गेलेला पण ब्राह्मणच होता. त्यावेळेस काय निर्णय घेतले असतील आपल्याला काय माहिती ? आग्र्याच्या दरबारात संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर औरंगजेबाची पाच हजारी मनसबदारी घेतली. महाराजांच्या परवानगीशिवाय घेतली असेल काय ? त्या परिस्थितीत जे करणं आवश्यक होतं ते महाराजांनी केलं. मिर्जाराजे जयसिंग, उदयभान राठोड यांच्याशी जो संघर्ष झाला तेही हिंदू होते ना ? औरंगजेब विषय निघाला म्हणून परत सांगतो, त्याचं राज्य अफगाणिस्तान ते दक्षिणेपर्यंत आणि इकडे बंगाल पर्यंत. छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झाल्यावर, औरंजेबाच्या एका मुलाला आसरा छत्रपती संभाजी महाराजांनी दिला आहे. १६८१ ते १७०७ औरंजेब महाराष्ट्रात लढत होता. आमच्या संभाजी राजांसोबत लढला, त्यांना क्रूर पद्धतीने मारलं. राजाराम महाराज लढले, संताजी धनाजी लढले. नरहर कुरुंदकरांच्या पुस्तकात एक छान वाक्य आहे, मराठे सर्व लढाया हरत होते पण औरंगजेब एकही लढाई जिंकला नाही. ११) औरंगजेबाची कबर सजवली आहे ती सजावट काढा आणि तिथे लिहा की आम्हा मराठ्यांशी लढायला आलेल्या औरंगजेबाला आम्ही इथेच गाडला. १२) मरहट्ट्यानी ज्यांना ज्यांना गाडलंय त्यांची प्रतीकं उखडून चालणार नाही, उलट आपण जगाला ओरडून सांगितलं पाहिजे की आम्ही कोणाकोणाला गाडलंय ते... शाळेपासून लहान मुलांना दाखवलं पाहिजे महाराजांनी आपल्या धर्माला भ्रष्ट करणाऱ्या औरंजेबाला गाडला... माझी महाराष्ट्रातील तरुण-तरुणींना विनंती आहे की इतिहास व्हाट्सअप वर वाचू नका. इतिहास तुम्हाला जातीतून शिकवायचा प्रयत्न केले जातात त्यामागे कुठलातरी राजकीय पक्ष असणार आहे. तुम्ही एकमेकांच्यात भांडता आणि हे कामं उरकून घेतात. १३) महाराष्ट्रात एअरपोर्ट असेल की बंदर असेल सगळं अदानीला देणं सुरु आहे. अदानी हुशार आहे आणि आपण अडाणी निघालो. १४) लाडकी बहीण योजनेचं काय चाललं आहे? विधानसभेत चर्चा सुरू आहे कशावर तर औरंजेबावर... तुमच्या प्रश्नावर नाही. १५) आपण ज्यांना मुघल म्हणतो ते तुर्की -मंगोल आहेत. धर्माच्या आधारावर देश नाही उभं करता येत. हे समजलं टर्कीला. केमाल पाशा तिकडे आला. तिकडे इस्लाम आता मवाळ आहे. तिकडे मशिदी आहेत पण रस्त्यावर धर्म दिसत नाही. केमाल पाशानी ओट्टोमन खलिफाचे पद संपुष्टात आणले, जे इस्लामिक जगताचे धार्मिक नेतृत्व मानले जात होते. १६) तुर्कीच्या राज्यघटनेत तुर्कीला धर्मनिरपेक्ष राष्ट्र घोषित केले. इस्लामला राज्य धर्माचा असलेला दर्जा काढून टाकला. सध्याच्या टर्कीच्या अध्यक्षांनी पण मवाळ धर्म स्वीकारला. आज टर्कीला पर्यटनासाठी ५ कोटी लोक भेट देतात. विचार करा किती सुंदर देश बनवला असेल. १७) आम्ही मशिदींवरचे लाऊडस्पिकर बंद करा म्हणून आंदोलन केलं तर माझ्या महाराष्ट्र सैनिकांवर केसेस टाकल्या. देवेंद्र फडणवीसांनी आता सांगितलं की रात्री १० ते सकाळी ६ लाऊड स्पीकर लावता येणार नाही. अहो प्रश्न सकाळी ६ ते १० चा नाहीच, दिवसभर भोंगे वाजतात त्याचं काय ? योगी आदित्यनाथ यांनी उत्तरप्रदेशमध्ये मात्र मशिदींवरचे भोंगे उखडून टाकले. त्यांना जमतं मग आम्हाला का नाही जमत ? १८) बीडमध्ये संतोष देशमुख यांना क्रौर्याने मारलं. जे घडलं वीज कंपनीच्या राखेवरून. राखेतून फिनिक्स पक्ष जन्माला येतो म्हणतात बीडमध्ये राखेतून गुंड जन्माला येतात. संतोष देशमुखांना वाल्मिक कराड यांच्या लोकांनी खंडणी आणि पैशाच्या विषयातून मारलं. मग त्यावर कोणीतरी पुढे केलं वंजाऱ्यांनी मराठा माणसाला मारलं. मारणाऱ्याची आणि ज्यांचा मृत्यू झाला त्यांची जात कशी निघू शकते ? १९) आज मुला-मुलींना नोकऱ्या मिळत नाहीत त्याकडे लक्ष नाहीये. इतके मराठा मुख्यमंत्री झाले पण मराठा समाजाची अवस्था का नाही सुधारली ? जात जातीला सांभाळत नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असं आश्वासन दिलं होतं, का नाही झाली कर्जमाफी ? अजित पवारांनी काल सांगितलं की तुम्ही ३० तारखेच्या आत पैसे भरून टाका. २०) लाडकी बहीण योजना सरकार चालवू शकत नाही. सरकारला दरवर्षी ६० हजार कोटींचा या योजनेचा बोजा आहे. सरकारला या योजना परवडणार नाहीत. २१) आज तरुण-तरुणींच्या नोकऱ्यांबद्दल कोणीच बोलत नाहीये, त्यांना सगळ्यांना जातीत गुंतवून त्यांना एकमेकांची डोकी फोडायला लावत आहेत. तुम्ही मराठी म्हणून एकत्र आलं पाहिजे. २२) टॉरस नावाची कंपनी दुप्पट परतावा देतो म्हणून आमिषं दाखवून लुटून गेली. मराठी माणूस सध्या असुरक्षित आहे. आमच्या राज्यात येऊन आम्हाला सांगणार असाल की मराठी बोलणार नाही, कानफाट फोडेन त्यांचं. उद्यापासून बँकांमध्ये जाऊन मराठी कारभार होत आहे का हे बघा. नसेल तर त्यांना करायला लावा. २३) ( आज मी माझ्या आजोबांच्या उठ मराठ्या उठ या १९६६ सालातील पुस्तकातील एक उतारा वाचून दाखवणार आहे. तो काळजीपूर्वक ऐका... "आज महाराष्ट्राचा मराठा आत्मस्वरूपाला पारखा होऊन ना अरत्री ना परत्री अशा मोहमयी अवस्थेत आहे. त्याचा उज्ज्वल भूतकाळ त्याने चुकूनही आठवू नये, या धोरणाने त्याच्या त्या इतिहासाची जडणघडण नव्या राजकारणी रंगढंगाला साजेशी बदलण्याचा उद्योग चालू आहे. काळाच्या कचक्यालाही न जुमानता ग्रंथ दस्तात आणि पिढ्यांपिढ्यांच्या स्मरणात परंपरेने चिरंजीव झालेल्या ठळक ऐतिहासिक घटनांवर ही निरनिराळे बनावट अर्थ बनविण्यात येत आहेत. जिकडे पाहावे तिकडे - गलबला बुद्धी नासते । नाना निश्चय सांगती । ऐकावे कोणकोणाचे । बोलताहे बहुचकी । करंटे मिळाले सर्वही । जो तो बुद्धीच सांगतो ।। असा समर्थोक्त देखावा दिसत आहे. बुद्धिभेदाच्या या वावटळीत शिक्षितांपासून अशिक्षित मजुरांपर्यंत सारे गुरफटले गेले आहेत. जागृतीचा, उत्थानाचा बोध करील, तो जातीयवादी, संकुचित वृत्तीचा, देशद्रोही म्हणून त्याची सर्वत्र निंदानालिस्ती आणि जाहीर सभांतून निषेध करण्यात येतो. कारण स्पष्ट आहे. महाराष्ट्राचा मऱ्हाठा जागा होऊन आपल्या आत्मस्वरूपाचा शोध घेण्याइतका कदरबाज स्वाभिमानी बनू लागला, तर सत्ता स्पर्धेच्या, शर्यतीच्या रिंगणात आपापल्या पक्षीय घोड्यावर स्वार झालेल्याचे रिकिबीतले पाय लटपटल्याशिवाय राहणार नाहीत." प्रबोधनकार ठाकरे । ) २४) तुम्ही मराठी म्हणून एक व्हा आणि बघा यांचे पाय कसे लटपटतील ते... आजच्या मराठी नववर्षाच्या निमित्ताने शपथ घ्या की आम्ही मराठी म्हणून एकत्र येऊ, आणि जो कोणी मराठी माणसाच्या किंवा मराठी भाषेच्या अंगावर येईल त्याला मराठी म्हणून अंगावर घेऊ. आणि जर कोणी हिंदूंच्या अंगावर आलं तर त्यांना हिंदू म्हणून अंगावर घ्या.. २५) आपला एक अहिल्या नगर जिल्ह्यातील महाराष्ट्र सैनिक प्रमोद अरणे हा कोल्हापूरला जाऊन अंबाबाईचं दर्शन घेऊन आजच्या मेळाव्याला चालत आला आहे. अशा सैनिकांमुळे मला ऊर्जा मिळते. #गुढीपाडवामेळावा२०२५
Raj Thackeray140,098 просмотров • 1 год назад

दरवर्षी प्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुंबईतील दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर, ‘दीपोत्सव’ सोहळा साजरा होतो. आज दीपोत्सवाचे उदघाट्न माझे बंधू आणि शिवसेना पक्ष प्रमुख श्री. उद्धव ठाकरे आणि कुटुंबीय यांनी केलं... त्या सोहळ्याची क्षणचित्रं... #दीपोत्सव२०२५
Raj Thackeray88,468 просмотров • 9 месяцев назад