Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )'s banner
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )'s profile picture

Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )

@rajupatilmanase74,505 subscribers

Leader-Maharashtra Navnirman Sena | Former Member of the Legislative Assembly - Kalyan Rural, Maharashtra.

Shorts

महाराष्ट्राच्या राजकारणातला खरा दादा हरपला ! उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला. प्रशासनावर वचक असलेला,स्पष्टवक्तेपणा आणि तत्काळ निर्णय घेणारा, एक धडाडीचा लोकनेता म्हणून अजितदादांची ओळख जनमानसात कायम राहील. भावपूर्ण श्रद्धांजली ! ॐ शांती ! 🙏🏻

42,936 views

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनामूळे क्रिकेट सामन्यांचे मराठी समालोचन सुरू झाले ! मराठीतच क्रिकेट सामने पाहिले तर त्यांना कळेल की आपण आपल्या भाषेसाठी आग्रही असतो. क्रिकेटभोवती मराठी भाषेची इकोसिस्टीम तयार होते. जिओ हॉटस्टार वर मराठीचा पर्याय निवडूनच क्रिकेट सामने पहा ही विनंती. राज ठाकरे

17,223 views

कल्याणमध्ये गर्दुल्यांसाठी पोलिसांचा सिंघम अवतार पाहायला मिळाला. कल्याणचे डीसीपी झेंडे साहेबांनी काल कल्याण स्थानक आणि सभोवतालच्या परिसरात सार्वजनिक जागी चरस-गांजा ओढणाऱ्या गर्दुल्यांना चांगलाच चोप देत त्यांची भर रस्त्यात धिंड काढली.यातील बहुतांश गर्दुल्ले हे अमराठी आहेत व यातून पोलिस खात्यानेही बोध घेणे गरजेचे आहे. खरंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाला अधिक बळ देणे ही काळाची गरज आहे. आज अनेक ठिकाणी मग त्या झोपडपट्ट्या असोत की उच्चभ्रू वस्त्या, सगळीकडेच अंमली पदार्थांचे सेवन केलेले तरूण झिंगताना दिसत आहेत. डिसीपी साहेबांनी अतिशय उल्लेखनीय काम केलं आहे आणि अशीच कारवाई सातत्याने व्हावी अशी आशा आहे. यामुळे हे समाजकंटक वठणीवर येऊन महिला आणि मुलींसाठी एक सुरक्षित वातावरण निर्माण होण्यास मदत होईल व समाज विघातक कृत्यांना आळा बसेल. Devendra Fadnavis @OfficeOfDevendra ठाणे पोलीस.. Thane Police महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police

27,798 views

आजचे डोंबिवली रेल्वे स्थानकावरचे हे चित्र ! हे रोजचेच आहे. राज्य सरकारला रेल्वे म्हणजे केंद्र सरकारची जबाबदारी वाटते. फार फार एखादी दुर्घटना झाली की ५ लाखाचा चेक घेऊन सत्ताधारी कॅमेऱ्यासहीत तयारही असतात, पण कोणालाही मुंबईकडे जाणाऱ्या या चाकरमान्यांच्या रोजच्या व्यथा दिसत नाहीत. निव्वळ टक्केवारी काढण्यासाठी पटापट होणारे मोठमोठे प्रकल्प हाती घेण्यापेक्षा मुंबई लोकलचे महाराष्ट्राचे स्वायत्त रेल्वेबोर्ड स्थापन करून लोकलसेवा कशी सुधारता येईल यासाठी एक योजना हाती घेणे आवश्यक आहे.उत्तरेकडून येणाऱ्या व उत्तरेकडे जाणाऱ्या काही बिनकामाच्या मेल-एक्सप्रेस मुंबई बाहेरून सोडल्यास लोकलच्या अधिक फेऱ्या वाढवता येतील.वंदे भारतला दिलेली प्राथमिकता या गोंधळात अधिक भर टाकत आहे अश्याही तक्रारी प्रवासी करत आहेत. या लोकलने प्रवास करणारे चाकरमनी मुंबईच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत, त्यांची काळजी सरकारने घ्यायलाच हवी. आपण ज्या मुंबईच्या जीवावर देशभरात नंबर एकची जी टीमकी वाजवतो त्या मुंबईला संपन्न करण्यासाठी आपले जीव रोजच धोक्यात घालणाऱ्या प्रवाशांची जबाबदारी ही राज्य सरकारची पण आहे. सरकारने केंद्राकडे याबाबत पाठपुरावा करावा. सध्या दिल्लीत अधिवेशन सुरू आहे तिकडे जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी पण याबाबत आवाज उठवावा. Devendra Fadnavis Ashwini Vaishnaw

18,927 views

‘ठाण्याची रिक्षा’ भ्रष्टाचाराच्या खड्ड्यात ! दिव्यात दातीवली येथे ५ कोटी रूपये खर्चून तलावाच्या सुशोभिकरणाचे काम सुरु असताना नवीन बांधण्यात येणारी भिंत कोसळली. ठाण्यातील आकाचे हस्तक व अधिकारी यांच्या तोंडात कोंबलेल्या टक्केवारीमुळे याची चौकशी होणार नाही याची ठेकेदाराला खात्री असेलच. अर्थातच प्रचंड अव्यवस्थेत होरपळलेल्या व भ्रष्टाचारात बरबटलेल्या दिवा विभागातील नागरिकांच्या हे सर्व अंगवळणी पडले आहे.एक उत्तम शहर निर्माण होऊ शकतो अश्या भौगोलिक स्थानावर वसलेला दिवा विभाग राजकारण्यांच्या व अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारामुळे दिवसेंदिवस बकाळ होत चालला आहे.

14,794 views

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे यांच्या खात्याचा कारभार बघा. ४ जुलै ला सुरू केलेल्या #पलावा_पुल आजची परिस्थिती ही अशी आहे. Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे MMRDA NDRF India I राष्ट्रीय आपदा मोचन बल 🇮🇳 #भ्रष्टाचार #कॅांक्रिट_घोटाळा #टक्केवारी #KDMC #कल्याण_शिळ #देसाईखाडी_काटई_पुल #पलावापुल

12,335 views

आम्हीच खातो माती….मग ‘त्यांना’ कशी राहील भिती ? #सत्ताकारण

10,965 views

Videos

rajupatilmanase's profile picture

मराठा समाजाचा चेहरा असलेले श्री.एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षे मुख्यमंत्री पद उपभोगले, दसरा मेळाव्यात मराठा समाजाला आरक्षण देणारच हे शिवरायांची शपथ घेऊन ठामपणे सांगितले, त्यानंतर नवी मुंबईत श्री.मनोज जरांगे पाटील यांना आरक्षणाचा मसुदा देऊन लोकसभा निवडणूकी आधी वेळ मारून नेली व आपले खासदार निवडून आणले. तरीही त्यानंतर ते मराठा समाजाला आरक्षण का देऊ शकले नाही ? आज मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासह लाखो मराठा समाज बांधव भर पावसात तिथे आंदोलनाला बसले आहेत, त्यांना धड साध्या पाण्याचीही सोय महायुती सरकारने केली नाही. असे असताना विद्यमान उपमुख्यमंत्री व मुंबईचे पालकमंत्री इकडे हरभजन सोबत गप्पा मारत आहेत ? हे बरोबर नाही ! #मराठा_आरक्षण

Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )

50,247 views • 10 months ago

rajupatilmanase's profile picture

या आहेत पुण्यातील खासदार, नाहीतर आमचे….! गरब्याला ( दांडिया ) आमचाही विरोध नाही, मात्र सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांनी गरब्याचा ( दांडिया ) इव्हेंट करून टाकला आहे त्यामुळे डिजे च्या गोंगाटाचा व वाहतुककोंडीचा समस्त डोंबिवलीकरांना प्रचंड त्रास होऊ लागलाय.असाच प्रकार पुण्यात घडल्याने सत्ताधारी पक्षातील खासदार डॅा.मेधाताई कुलकर्णी यांनी समाचार घेत खरी परिस्थिती मांडली. डोंबिवलीकरांना या दांडिया इव्हेंटचा त्रास होत असला तरी आमचे नशीबवान सत्ताधारी नेते थंड आहेत,कारण तेच आयोजक आहेत ! त्यामुळे सध्या तरी डोंबिवलीकरांची या गोंगाटातून व वाहतुक कोंडीतून सुटका होईल असे दिसत नाही . असो ! मेधाताई आपण लोकांसाठी प्रामाणिकपणे व ठाम भुमिका घेतली त्याबद्दल आपले मनसे आभार ! Dr. Medha Kulkarni #डोंबिवलीकर

Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )

39,843 views • 9 months ago

rajupatilmanase's profile picture

मा. Pratap Baburao Sarnaik दादा, तुम्ही तसे पुर्वाश्रमीचे डोंबिवलीकर ! आज तुम्ही ठाणेकर झाला असलात तरी मला खात्री आहे की आपल्या डोंबिवलीकरांप्रती तुमचे जुने प्रेम आजही तसेच आहे. कधी काळी डोंबिवलीत रिक्षा चालवून व हलाकीचे दिवस सोसून आज आपण स्वकतृत्वाने कष्ट करून मोठे झालात,परिवहन मंत्री पण झालात याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. आपल्या डोंबिवली व कल्याणचे परिवहन व्यवस्थापन व नियोजन अत्यंत ‘थर्ड क्लास’ आहे.इथल्या राजकीय ‘भाई-दादा’ यांच्या रिक्षा युनियनचे सदस्य असल्याने रिक्षाचालकांची मुजोरी तर एवढी वाढली आहे की विचारून सोय नाही.तरी कृपया तुम्ही एकदा कल्याण-डोंबिवलीत येऊन इथल्या वाहतूक व परिवहन व्यवस्थेची तुमच्या पद्धतीने झाडाझडती घ्यावी ही विनंती.

Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )

14,022 views • 2 months ago

rajupatilmanase's profile picture

मराठी माणसांच्या मेळाव्यात दोन्ही ठाकरे बंधूंना ‘जय जवान दहिहंडी पथक’ या पथकाने मराठी माणसांचे आशास्थान म्हणून सलामी दिली होती. याचाच राग धरून काही भैय्यांची तळी उचळणारे गांडूळ वळवळले होते व आकसापोटी त्यांना एका स्पर्धेत प्रवेश नाकारण्याचा नीच राजकारण केले होते. आज पण ठाण्यात एका गोविंदा पथकाने ‘त्यांच्या’ इथे पहिल्यांदा १० थर लावले, त्या गोविंदा पथकाचे मनापासून अभिनंदन केलेच पाहिजे. परंतु इथेही यांच्या राजकारणाचे गांडूळ वळवळले व या विजयी पथकाचा नामोल्लेख करताना अप्रत्यक्ष जय जवान गोविंदा पथकाला टोला मारला. आज त्याच जय जवान गोविंदा पथकाने एकदा नाही चक्क तीन वेळा १० थर लावून एकाच दिवसात हॅट्रिक मारली व या गांडूळांना माती दाखवली. जय जवान गोविंदा पथकातील सर्व मित्रांचे व त्यांच्या पाठी खंबीरपणे उभा राहणाऱ्या आमच्या अविनाश जाधवांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.संस्कार व ‘संस्कृती’ ही वागण्यात असली पाहिजे……नुसत्या नावात काय आहे ? #मनसे #मराठी_मनांसाठी_मराठी_सणांसाठी #दहिहंडी

Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )

31,607 views • 10 months ago

rajupatilmanase's profile picture

आज एक रूग्णवाहिका डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांच्या अतिक्रमणात अडकल्याचा व्हिडिओ पाहिला.हे सर्व बघून प्रचंड चीड निर्माण होत आहे.हे सर्व अजून किती दिवस चालणार ? लोकप्रतिनिधी “डॅाक्टर” असला म्हणून सर्व काही चांगले आहे व त्यांनाच सर्व कळते असे नाही. त्या लोकप्रतिनिधीला लोकांच्या ‘समस्यांची नाडी’ पण पकडता आली पाहिजे, त्यांच्या समस्या पण समजल्या पाहिजेत. रेल्वे स्थानकाच्या १५० मीटर पर्यंत फेरीवाल्यांना मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुद्धा मनाई आहे, प्रश्न आहे फक्त इच्छाशक्तीचा ! या मुजोर व अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करणे सहज शक्य आहे.बरं त्या नगरविकास खात्यावर पण यांच्याच बापजाद्यांची जहागीरदारी आहे,मग आयुक्तांना आदेश द्यायला काय अडचण आहे ? काहीजण तर या फेरीवाल्यांकडून हप्ते गोळा करता करता त्याच पैश्यातून #वोटचोरी करून आमदार ही झाले….अरे आता तरी बस्स करा की ! तुमच्या नाकर्तेपणाचा सामान्यांना होणारा त्रास आता तरी तुम्हाला दिसणार आहे का ? #मिंधे #भ्रष्ट #आमदार #खाजदार #KDयमC #डोंबिवलीकर

Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )

16,603 views • 8 months ago

rajupatilmanase's profile picture

आजचे डोंबिवली रेल्वे स्थानकावरचे हे चित्र ! हे रोजचेच आहे. राज्य सरकारला रेल्वे म्हणजे केंद्र सरकारची जबाबदारी वाटते. फार फार एखादी दुर्घटना झाली की ५ लाखाचा चेक घेऊन सत्ताधारी कॅमेऱ्यासहीत तयारही असतात, पण कोणालाही मुंबईकडे जाणाऱ्या या चाकरमान्यांच्या रोजच्या व्यथा दिसत नाहीत. निव्वळ टक्केवारी काढण्यासाठी पटापट होणारे मोठमोठे प्रकल्प हाती घेण्यापेक्षा मुंबई लोकलचे महाराष्ट्राचे स्वायत्त रेल्वेबोर्ड स्थापन करून लोकलसेवा कशी सुधारता येईल यासाठी एक योजना हाती घेणे आवश्यक आहे.उत्तरेकडून येणाऱ्या व उत्तरेकडे जाणाऱ्या काही बिनकामाच्या मेल-एक्सप्रेस मुंबई बाहेरून सोडल्यास लोकलच्या अधिक फेऱ्या वाढवता येतील.वंदे भारतला दिलेली प्राथमिकता या गोंधळात अधिक भर टाकत आहे अश्याही तक्रारी प्रवासी करत आहेत. या लोकलने प्रवास करणारे चाकरमनी मुंबईच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत, त्यांची काळजी सरकारने घ्यायलाच हवी. आपण ज्या मुंबईच्या जीवावर देशभरात नंबर एकची जी टीमकी वाजवतो त्या मुंबईला संपन्न करण्यासाठी आपले जीव रोजच धोक्यात घालणाऱ्या प्रवाशांची जबाबदारी ही राज्य सरकारची पण आहे. सरकारने केंद्राकडे याबाबत पाठपुरावा करावा. सध्या दिल्लीत अधिवेशन सुरू आहे तिकडे जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी पण याबाबत आवाज उठवावा. Devendra Fadnavis Ashwini Vaishnaw

Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )

18,927 views • 11 months ago