
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )
@rajupatilmanase • 74,513 subscribers
Leader-Maharashtra Navnirman Sena | Former Member of the Legislative Assembly - Kalyan Rural, Maharashtra.
Shorts
Videos

आमचा रॉकी... भलताच अतरंगी, घरातल्यांसाठी प्रचंड लाडका आणि प्रेमाचा सागर, पण शत्रू किंवा संकटासाठी साक्षात काळ ! हा पठ्ठा स्वभावानं जितका इमानदार, तितकाच भयंकर धाडसी आहे. यापूर्वी त्याने अनेकदा विषारी साप गरागरा फिरवून मारले आहेत. एकदा तर एका विषारी सापाने चावा घेतल्यामुळे त्याला रक्ताच्या उलट्या झाल्या होत्या, तो मरणाच्या दारापर्यंत पोहोचला होता. पण त्याही संकटावर मात करून तो चमत्कारिक रित्या सुखरूप बाहेर पडला !🧿 अशा या आमच्या 'रॉक स्टार' रॉकीने काल संध्याकाळी ७:१५ च्या सुमारास मुरबाड येथील आमच्या फार्म हाऊसवर स्वतःचाच एक नवा रेकॉर्ड केला. बेसावध असताना कंपाऊंडच्या जाळीवरून उडी मारून काल एका बिबट्याने रॉकीवर पाठीमागून हल्ला केला ! पण समोर बिबट्या असला तरी त्याची गाठ आमच्या पठ्ठ्यासोबत होती. रॉकीने क्षणाचाही विलंब न करता बिबट्याचा डावा गाल आणि हनुवटीवर असा काही मजबूत चावा घेतला की बिबट्या स्वतःची सुटका करण्यासाठी धडपडू लागला. अखेर रॉकीने पकड सैल करताच बिबट्याने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. या थरारक झटापटीत रॉकीला बिबट्याची नखे लागून जखमा झाल्या, पण तरीही हा पठ्ठा त्याचा शत्रू कुठे गेला हेच छाती ठोकून पाहत उभा होता. त्याने दाखवून दिले की लढायला वाघाचं कातडं नाही तर वाघाच काळीज हवं ! नंतर आम्ही CCTV फुटेज पाहिले तेव्हा अंगावर काटाच आला. रात्रीच तिथे जाऊन डॉक्टरांना बोलावून रॉकीवर प्रथमोपचार केले आणि आता तो सुरक्षित आहे. मुरबाड वनविभागालाही तातडीने याची माहिती देण्यात आली असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. परंतु इथे विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की यात दोष नक्की कोणाचा ? मुरबाड आणि आसपासच्या परिसरात तसेच राज्यात इतरत्रही मानव-वन्यजीव संघर्ष सातत्याने समोर येत आहे. हा प्रश्न केवळ आमच्या रॉकीच्या कौतुकाचा नाही, तर एका गंभीर समस्येचा आहे. विकासाच्या नावाखाली आपण माणसांनी जंगले नष्ट केली, प्राण्यांचे हक्काचे घर हिरावून घेतले. जेव्हा त्यांचा अधिवास संपतो, तेव्हा अन्नाच्या शोधात हे वन्यजीव मानवी वस्त्यांकडे वळणारच ! काल आमचा रॉकी होता ज्याने शौर्याने बिबट्याला पळवून लावले, पण उद्या तिथे एखादा निष्पाप माणूस, महिला किंवा लहान मूलही असू शकते, याला जबाबदार कोण ? वन्यजीवांवर रागवण्यापेक्षा आपण निसर्गाचा समतोल राखायला हवा, अन्यथा हे संकट प्रत्येकाच्या दारापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही ! हा धोका मानव व अर्थातच सरकारच्या विकासाच्या नावावर उद्योगपती धार्जिण्या चुकीच्या योजनांना पाठबळ देण्यामुळे निर्माण झाला आहे हे मान्य करावेच लागेल. #RockyTheHero #SaveForests #RealHero #NatureBalance #Wildlife
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )72,779 次观看 • 1 个月前

ज्या पुण्याचे गणेशोत्सव, भाषा आणि शिस्त संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्श होती, तिथे आज काय पाहायला मिळतंय ? कानठळ्या बसवणारा डीजे, लेझर शो, भाषेचे होत चाललेले हिंदीकरण आणि रस्त्यांवरची वाढती विकृती ! 'गायपट्ट्यातील' चुकीच्या प्रथांची री ओढताना आपण आपली मूळ पुणेरी संस्कृती नष्ट तर करत नाही ना ? विचार करण्याची वेळ आली आहे, नाहीतर पुण्याच्या संस्कृतीला 'काशी'ला जायला वेळ लागणार नाही ! #पुणे #PuneCulture #पुणेरीसंस्कृती
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )26,500 次观看 • 23 天前

कल्याण-शीळ रस्ता व शिळफाटा भाग MMRDA व MSRDC ने नालेसफाई न केल्यामुळे तसेच जुने नैसर्गिक नाले व त्यावर झालेली अनधिकृत बांधकामं यावर निर्णय न घेतल्याने ठाणे महानगरपालिकेच्या कृपेने पुर्णपणे पाण्याखाली गेल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. एकंदरीतच संपुर्ण MMR मध्ये कमी अधिक प्रमाणात हीच परिस्थिती आहे त्यामुळे लोकांची ‘राजाने मारले व पावसाने झोडले ‘अशी गत झाली आहे.
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )53,451 次观看 • 3 个月前

जर कोणाला वाटत असेल की मोदींच्या अंधभक्तांना (अंड्डूल्ल्यांना) प्रती पोस्ट ४० पैसे द्यायला पक्ष कमी पडत असेल म्हणून आदरणीय मोदीजी रोज रात्री येऊन अश्या पोस्ट टाकत आहेत तर ते चुक आहे,खरंतर मोदीजींच्या अंडूल्ल्यांनी गेली १२ वर्ष समाज माध्यमांमध्ये व समाजात जे पेरले आहे तेच उगवत आहे व तेच या तरूणांच्या तोंडातून बाहेर पडत आहे याची उशिरा का होईना मोदीजींना कल्पना येऊन या #GenZ च्या भावना कळल्या आहेत.आणि म्हणूनच ते आपल्या चुका मान्य करून रोज रात्री #GenZ ना समजावण्याचा व समजून घेण्याचाही प्रयत्न करत आहेत असे वाटते. पण असे रात्री येऊन रिल बनविण्यापेक्षा एकदाची हीच गोष्ट मोदीजींनी मीडिया समोर येऊन सांगितली तर रात्री त्यांचे अंडूल्ले पण सुखाने झोपतील व देशातील जनतेला ही त्यांच्या भावना कळतील !
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )21,286 次观看 • 2 个月前

राजसाहेबांनी सांगितलं… आणि आज पुन्हा एकदा आठवलं ! ११ जानेवारी २०२६ रोजी राजसाहेब ठाकरे यांनी केलेलं भाष्य… आणि आज २६ ऑगस्टला मुंबई विमानतळाबाबत समोर येणारी बातमी! राजसाहेबांचं राजकारण फक्त आजच्या बातम्यांवर प्रतिक्रिया देणारं नाही; उद्याची परिस्थिती ओळखून आधीच इशारा देणारं आहे. काळ पुढे जातो, परिस्थिती बदलते… पण राजसाहेबांनी मांडलेले मुद्दे पुन्हा पुन्हा चर्चेत येतात, हेच त्यांच्या दूरदृष्टीचं उदाहरण आहे. #राजसाहेबठाकरे #मनसे #मुंबई #मुंबईविमानतळ #दिबापाटील_नवीमुंबईविमानतळ
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )12,541 次观看 • 1 个月前

पुण्याच्या जंगली महाराज रस्त्याला गेल्या ४६ वर्षांमध्ये एकही खड्डा पडला नाही हा एक विक्रम आहे.हा रस्ता ज्या रिकांडो नावाच्या पारसी कंपनीने १९७२/७३ मध्ये केला त्याची ही रहस्य कथा ऐका. ४६ वर्षात एकही खड्डा नाही याचे मुख्य कारण हा रस्ता ज्या रिकांडो नावाच्या पारसी कंपनीने केला त्यांनी या कामात कोणालाही टक्केवारी दिली नव्हती.नाहीतर आमचे रस्ते बघा ! एका एका कामात ३/३ हजार कोटींचा भ्रष्टाचार होतोय. बरोबर बोलतोय ना ? MMRDA Eknath Shinde - एकनाथ शिंदे
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )71,916 次观看 • 1 年前

निवडणूक आयोगाच्या (ECI) मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कोणत्याही बूथ पातळीवरील अधिकाऱ्याने (BLO) कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यालयात बसून मतदार यादीचे काम करणे किंवा तिथे नागरिकांना बोलावणे ही अत्यंत गंभीर चूक मानली जाते. याचे कारण आणि नियम खालीलप्रमाणे आहेत: १. निवडणूक आयोगाची तटस्थता (Neutrality of ECI) निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे निष्पक्ष, पारदर्शक आणि स्वतंत्र असणे आवश्यक आहे. BLO हा निवडणूक आयोगाचा प्रतिनिधी म्हणून काम करत असतो. त्याने कोणत्याही एका राजकीय पक्षाच्या कार्यालयात बसून काम केल्यास निवडणूक प्रक्रियेच्या तटस्थतेवर (Neutrality) प्रश्नचिन्हनिर्माण होते. २. पक्षपातीपणाची शक्यता (Bias and Influence) राजकीय पक्षाच्या कार्यालयात काम केल्याने ठराविक पक्षाच्या मतदारांची नावे वाढवणे किंवा विरोधी पक्षाच्या मतदारांची नावे हेतुपरस्पर वगळणे (Deletion) असे प्रकार घडू शकतात. यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर किंवा मतदारांवर राजकीय दबाव येऊ शकतो. ३. प्रत्यक्ष घरटी सर्वेक्षणाचा भंग आधी स्पष्ट केल्याप्रमाणे, SIR अंतर्गत BLO ने प्रत्यक्ष मतदाराच्या घरी (House-to-House) जाणे बंधनकारक आहे. पक्ष कार्यालयात बसून कागदपत्रांची गोळाबेरीज करणे हा नियमांचा सरळ सरळ भंग आहे. अशी परिस्थिती आढळल्यास काय करावे? (How to Report) जर तुमच्या भागात असा प्रकार घडत असेल, तर तुम्ही नागरिक म्हणून खालील ठिकाणी तातडीने तक्रार नोंदवू शकता: निवडणूक आयोगाचे पोर्टल (National Voters' Service Portal): तुम्ही वर किंवा Voter Helpline App वर थेट तक्रार (Grievance) नोंदवू शकता. टोल-फ्री क्रमांक: निवडणूक आयोगाच्या 1950 या राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांकावर फोन करून या प्रकाराची तक्रार करा. मतदार नोंदणी अधिकारी (ERO) / तहसीलदार: तुमच्या तालुक्याचे तहसीलदार किंवा मतदार नोंदणी अधिकारी (Electoral Registration Officer - ERO) यांच्याकडे लेखी किंवा तोंडी तक्रार दाखल करा. जिल्हा निवडणूक अधिकारी (DEO): जिल्ह्याचे जिल्हाधिकारी (Collector) हेच जिल्हा निवडणूक अधिकारी असतात. त्यांच्या कार्यालयातील निवडणूक शाखेत जाऊन तुम्ही थेट पुराव्यासह (शक्य असल्यास फोटो किंवा व्हिडिओ) तक्रार करू शकता. निवडणूक आयोग अशा प्रकरणांमध्ये संबंधित BLO वर तातडीने निलंबनाची (Suspension) किंवा शिस्तभंगाची कारवाई करतो. Election Commission of India
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )18,056 次观看 • 2 个月前

मराठा समाजाचा चेहरा असलेले श्री.एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षे मुख्यमंत्री पद उपभोगले, दसरा मेळाव्यात मराठा समाजाला आरक्षण देणारच हे शिवरायांची शपथ घेऊन ठामपणे सांगितले, त्यानंतर नवी मुंबईत श्री.मनोज जरांगे पाटील यांना आरक्षणाचा मसुदा देऊन लोकसभा निवडणूकी आधी वेळ मारून नेली व आपले खासदार निवडून आणले. तरीही त्यानंतर ते मराठा समाजाला आरक्षण का देऊ शकले नाही ? आज मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासह लाखो मराठा समाज बांधव भर पावसात तिथे आंदोलनाला बसले आहेत, त्यांना धड साध्या पाण्याचीही सोय महायुती सरकारने केली नाही. असे असताना विद्यमान उपमुख्यमंत्री व मुंबईचे पालकमंत्री इकडे हरभजन सोबत गप्पा मारत आहेत ? हे बरोबर नाही ! #मराठा_आरक्षण
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )50,258 次观看 • 1 年前

डोंबिवलीत प्रभाग क्रमांक २९ मध्ये भाजपाचे गांधी प्रेम …….! सर्रास पैसे वाटप सुरू आहे. कालचा रेट ३०००/- होता, हे प्रकरण उघडकीस आल्यावर रेट ५०००/- प्रति मत केल्याचे ऐकायला येत आहे. डोंबिवलीत पैसा व गुंडगीरीचा वापर सुरूच आहे.सत्तेचा माज ओसाढून वाहत आहे.
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )34,861 次观看 • 9 个月前

या आहेत पुण्यातील खासदार, नाहीतर आमचे….! गरब्याला ( दांडिया ) आमचाही विरोध नाही, मात्र सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांनी गरब्याचा ( दांडिया ) इव्हेंट करून टाकला आहे त्यामुळे डिजे च्या गोंगाटाचा व वाहतुककोंडीचा समस्त डोंबिवलीकरांना प्रचंड त्रास होऊ लागलाय.असाच प्रकार पुण्यात घडल्याने सत्ताधारी पक्षातील खासदार डॅा.मेधाताई कुलकर्णी यांनी समाचार घेत खरी परिस्थिती मांडली. डोंबिवलीकरांना या दांडिया इव्हेंटचा त्रास होत असला तरी आमचे नशीबवान सत्ताधारी नेते थंड आहेत,कारण तेच आयोजक आहेत ! त्यामुळे सध्या तरी डोंबिवलीकरांची या गोंगाटातून व वाहतुक कोंडीतून सुटका होईल असे दिसत नाही . असो ! मेधाताई आपण लोकांसाठी प्रामाणिकपणे व ठाम भुमिका घेतली त्याबद्दल आपले मनसे आभार ! Dr. Medha Kulkarni #डोंबिवलीकर
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )39,856 次观看 • 1 年前

मराठी माणसांच्या मेळाव्यात दोन्ही ठाकरे बंधूंना ‘जय जवान दहिहंडी पथक’ या पथकाने मराठी माणसांचे आशास्थान म्हणून सलामी दिली होती. याचाच राग धरून काही भैय्यांची तळी उचळणारे गांडूळ वळवळले होते व आकसापोटी त्यांना एका स्पर्धेत प्रवेश नाकारण्याचा नीच राजकारण केले होते. आज पण ठाण्यात एका गोविंदा पथकाने ‘त्यांच्या’ इथे पहिल्यांदा १० थर लावले, त्या गोविंदा पथकाचे मनापासून अभिनंदन केलेच पाहिजे. परंतु इथेही यांच्या राजकारणाचे गांडूळ वळवळले व या विजयी पथकाचा नामोल्लेख करताना अप्रत्यक्ष जय जवान गोविंदा पथकाला टोला मारला. आज त्याच जय जवान गोविंदा पथकाने एकदा नाही चक्क तीन वेळा १० थर लावून एकाच दिवसात हॅट्रिक मारली व या गांडूळांना माती दाखवली. जय जवान गोविंदा पथकातील सर्व मित्रांचे व त्यांच्या पाठी खंबीरपणे उभा राहणाऱ्या आमच्या अविनाश जाधवांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.संस्कार व ‘संस्कृती’ ही वागण्यात असली पाहिजे……नुसत्या नावात काय आहे ? #मनसे #मराठी_मनांसाठी_मराठी_सणांसाठी #दहिहंडी
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )31,618 次观看 • 1 年前

हिंदीसक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर मराठी माणसांकडून विविध पद्धतीनं जल्लोष साजरा करण्यात येत आहे.अशातच मुंबईच्या लोकलमध्येही तरुणाईनं "मराठी बोला" म्हणत आनंद साजरा केला. याचा व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. #LokmatMumbai #आपलीमराठी #marathi #महाराष्ट्रात_मराठीच
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )30,236 次观看 • 1 年前

मा. Pratap Baburao Sarnaik दादा, तुम्ही तसे पुर्वाश्रमीचे डोंबिवलीकर ! आज तुम्ही ठाणेकर झाला असलात तरी मला खात्री आहे की आपल्या डोंबिवलीकरांप्रती तुमचे जुने प्रेम आजही तसेच आहे. कधी काळी डोंबिवलीत रिक्षा चालवून व हलाकीचे दिवस सोसून आज आपण स्वकतृत्वाने कष्ट करून मोठे झालात,परिवहन मंत्री पण झालात याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. आपल्या डोंबिवली व कल्याणचे परिवहन व्यवस्थापन व नियोजन अत्यंत ‘थर्ड क्लास’ आहे.इथल्या राजकीय ‘भाई-दादा’ यांच्या रिक्षा युनियनचे सदस्य असल्याने रिक्षाचालकांची मुजोरी तर एवढी वाढली आहे की विचारून सोय नाही.तरी कृपया तुम्ही एकदा कल्याण-डोंबिवलीत येऊन इथल्या वाहतूक व परिवहन व्यवस्थेची तुमच्या पद्धतीने झाडाझडती घ्यावी ही विनंती.
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )14,036 次观看 • 5 个月前