
Rohit Pawar
@RRPSpeaks • 783,687 subscribers
Committed to a better Maharashtra & @NCPspeaks MLA from Karjat-Jamkhed CEO Baramati Agro https://t.co/fT5K3JYHRS
Shorts
Videos

रामटेक येथील श्रीनिका रोहित माकडे (वय २ वर्षे १० महिने) ही चिमुकली SMA Type 2 या दुर्मिळ आजाराने ग्रस्त असून तिच्यावर वैद्यकीय उपचार करण्यासाठी १० कोटी रुपयांची गरज आहे. मी माझ्यापरिने आणि विविध संस्थांच्या माध्यमातून मदत करण्याचा प्रयत्न करतच आहे. आपल्यासारख्या दानशूरांनी सोबत दिलेल्या स्कॅनरवर आपल्या इच्छेप्रमाणे आर्थिक योगदान द्यावं, तसंच हे स्कॅनर सोशल मिडियात शेअर करुन या पवित्र कार्यात आपला खारीचा वाटा उचलावा आणि या चिमुकलीच्या उपचारास हातभार लावावा, ही विनंती!
Rohit Pawar23,380 Aufrufe • vor 3 Tagen

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे साहेब यांचा अवमान केल्याप्रकरणी आणि मनुस्मृतीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसकडून नागपुरात काढलेल्या मोर्चादरम्यान पोलिसांनी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांना केलेल्या मारहाणीचा तीव्र निषेध! काँग्रेसने मनुस्मृतीचा निषेध केल्याने या सरकारला दुःख झालं का, म्हणून पोलिसांना पुढं करून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांवर बळाचा वापर केला गेला, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. पण सरकारची ही मुजोरी आम्ही कदापि खपवून घेणार नाही. Shivraj More Maharashtra Congress Indian Youth Congress
Rohit Pawar16,845 Aufrufe • vor 3 Tagen

भाजप कार्यकर्त्याकडून ताब्यात घेतलेले हे SIR चे फॉर्म काल खारघर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यामुळं SIR (Special Intensive Revision) ही मोहिम केवळ भाजपाच्या मतदारांचीच नावे मतदार यादीत ठेवून विरोधी पक्षाच्या मतदारांना वगळण्याचं ‘राष्ट्रीय अभियान’ असल्याचं आता जगजाहीर झालंय. त्यामुळं या मोहिमेचं SIR हे नाव बदलून Special BJP Voter Confirmation (SBVC) असं ठेवायला हरकत नाही. भाजप आणि निवडणूक आयोग असं ‘ताकाला जाऊन किती दिवस भांडं लपवणार?’ #SIR #ElectionCommission #मतदार_यादी #निवडणूक_आयोग
Rohit Pawar65,801 Aufrufe • vor 15 Tagen

उपोषणाचा आज 14 वा दिवस.. पोटात अन्नाचा कणही नाही... पण सरकारकडं या विद्यार्थ्यांना भेटायला एक क्षणही नाही? किती संतापजनक प्रकार आहे. या विद्यार्थ्यांच्या आरोग्याला काही झालं तर शासन आणि शासनाचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री महोदय तुमची जबाबदारी राहील. तुमच्यात थोडीही संवेदना शिल्लक असेल आणि काळजात थोडाही ओलावा असेल तर विद्यार्थ्यांच्या मागण्या तातडीने मान्य करून त्यांचं उपोषण सोडवाल. देशाच्या उद्याच्या भविष्याला असं तडपायला लावून तुम्ही काय मिळवत आहात? Devendra Fadnavis Dr.Ashok Uike #StudentsRights #StudentsProtest #आदिवासी_विद्यार्थी_आंदोलन
Rohit Pawar40,435 Aufrufe • vor 17 Tagen

एका उपमुख्यमंत्र्यांचा पुणे जिल्हा आणि राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री या दोघांचाही सातारा जिल्हा या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या कानवडी-खानापूर रस्त्याची ही दुर्दशा पहा. या रस्त्यासाठी स्थानिकांनी केलेल्या आंदोलनामुळं सरकारच्या कथित ‘वेगवान’ कारभारावर अक्षरशः चिखल फासला गेला. आता आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी तरी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाममंत्री याकडं लक्ष देतील का, याकडं आमचं लक्ष आहे. Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Shivendrasinh A Bhonsle
Rohit Pawar58,096 Aufrufe • vor 29 Tagen

राज्यातील लाखों विद्यार्थ्यांच्या विश्वासाचा खुन करणाऱ्या #MPSC च्या अध्यक्षांनी तत्काळ राजीनामा द्यावा आणि पेपरफुटीचा योग्य तपास व्हावा यासाठी आज अमरावती येथे विद्यार्थ्यांनी मोर्चा काढत आपल्या भावना मांडल्या. सरकारने वेळीच MPSC च्या गैरकारभाराची दखल घेऊन कठोर पावले उचलावीत, अन्यथा आज अमरावतीत हा मोर्चा झालाय उद्या राज्यभरात यापेक्षा मोठे आंदोलन उभं राहिल्याशिवाय राहणार नाही. Devendra Fadnavis Maharashtra Public Service Commission #MPSC #पेपरफुटी #अमरावती #विद्यार्थी_आंदोलन
Rohit Pawar17,166 Aufrufe • vor 8 Tagen

अंगणवाडीतील मुलांना पोषण आहार म्हणून देण्यात येणारा वाटाणा आणि भरडा शिजत नसल्याची तक्रार करणाऱ्या आंबेगाव तालुक्यातील अंगणवाडी सेविका रेश्मा पारधी यांचं कौतुक करण्याऐवजी त्यांचंच निलंबन करण्याचा तुघलकी निर्णय या सरकारने घेतला. चोर सोडून सन्याशाला फाशी देणारं वाह रे सरकार! व्यवस्था सुधारण्याऐवजी सत्य बोलणाऱ्याचा गळा दाबून सरकार काय लपवतंय? अंगणवाडीतील बालकांच्या ताटातही आडवा हात मारणाऱ्यांवर कारवाई करण्याची हिंमत सरकारने दाखवावी. गैरप्रकारावर आवाज उठवाल तर कारवाई करू, हा मेसेज या सरकारला या कारवाईतून द्यायचाय का? तातडीने रेश्मा पारधी यांचं निलंबन रद्द करून निकृष्ट पोषण आहार पुरवणाऱ्यांची पुढील दहा दिवसांत चौकशी झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. Devendra Fadnavis
Rohit Pawar41,530 Aufrufe • vor 22 Tagen

#NEET पेपरफुटीमुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. याच भ्रष्ट व्यवस्थेविरोधात आणि शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सोनम वांगचुक या देशातील एका महान शिक्षणतज्ज्ञाच्या उपोषणाचा आज १९ वा दिवस आहे. येणाऱ्या पिढीच्या सुरक्षित भविष्यासाठी आता सर्वांनीच जागं होऊन या लढ्याला साथ देण्याची आणि अहंकारी सरकारला जनभावनेपुढं गुडघे टेकवण्यास भाग पाडण्याची गरज आहे. Sonam Wangchuk Abhijeet Dipke Cockroach Janta Party - CJP #We_Support_SonamWangchuk #SonamWangchuk #DelhiProtest #ResignDharmendraPradhan #JusticeForStudents
Rohit Pawar96,672 Aufrufe • vor 1 Monat

जळगाव शहराला बायपास करणारा हा सुरत-नागपूर हायवे बघा, अवघ्या एका वर्षात कोट्यवधींचा चुराडा करून बांधलेल्या या हायवेला भगदाड पडलं.. जनतेच्या रक्ताघामाचा पैसा ठेकेदार आणि 'कमिशनखोरांच्या' खिशात जात असून हे सरकार केवळ विकासाच्या नावाखाली कमिशन खातंय.. रस्ते तर यांच्या कमिशनखोरीचे महामार्गच बनले आहेत. ढासळलेल्या हायवेच्या या कामातही किती टक्के मलिदा हडपला असेल हे तुम्हीच ठरवा…! #कमिशनखोर_सरकार #सुरत_नागपूर_हायवे #जळगाव #भ्रष्टाचार #जनतेच्या_पैशाची_लूट #महाराष्ट्र #HighwayScam
Rohit Pawar53,270 Aufrufe • vor 1 Monat

महाराष्ट्र सरकारकडं मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या दिखाव्यासाठी २ लाख कोटी रुपये आहेत, पण ज्या पालघरमधून हा प्रकल्प जातो तेथील लोकांसाठी एक पूल उभारायला २ कोटी रुपयेसुद्धा नाहीत.. हाच तर खरा प्रॉब्लेम आहे. लोकांना पाहिजे ते दिलं जात नाही आणि नको ते बळजबरीने लादलं जातं, यामुळंच वाडीव (पालघर) गावातील या विद्यार्थ्यांना रोज मृत्यूशी दोन हात करत शाळेत जावं लागतंय.. बघूया आतातरी विद्यार्थ्यांची ही हाक सरकारपर्यंत पोचतेय की नाही..! Narendra Modi Devendra Fadnavis Ashwini Vaishnaw
Rohit Pawar28,563 Aufrufe • vor 20 Tagen

चाकण भागात वाहतुकीची पूर्णपणे वाट लागली असून दीड तासात केवळ 2 k.m. अंतर कापलं जात असेल तर इथल्या कंपन्यांनी इथं का थांबावं? याच त्रासाला कंटाळून हे उद्योजक इथून स्थलांतर करण्याच्या तयारीत आहेत, पण त्यांच्या या निर्णयाने याचा मोठा दुष्परिणाम या भागाला सहन करावा लागणार आहे.. त्यासाठी या उद्योजक व्यावसायिकांनी चर्चा करण्यासाठी मी थोड्याच वेळात पोचतोय.... #चाकण #उद्योगधंदे #व्यावसायिक #सोयीसुविधा
Rohit Pawar33,182 Aufrufe • vor 29 Tagen

महाराष्ट्राला काडीचाही उपयोग नसलेल्या बुलेट ट्रेनवर सरकार २ लाख कोटी रुपये खर्च करतं पण लाखो मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या लोकलकडं मात्र साफ दुर्लक्ष होत असल्याने मुंबईकरांवर रोज कशी वेळ येतेय त्याचा हा व्हिडिओ… सरकारने महाराष्ट्राचा पैसा बुलेट ट्रेनवर न उधळता आधी लोकल सक्षम करण्याची गरज आहे. पण केवळ केंद्रातील नेत्यांना खूष करणाऱ्या सत्ताधाऱ्यांकडून हे धाडस केलं जाईल का, हा प्रश्न आहे. #मुंबई_लोकल #MumbaiLocalTrain #मुंबईची_लाईफलाईन
Rohit Pawar57,105 Aufrufe • vor 2 Monaten

आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या आणि मुख्यमंत्री साहेबांच्या आवाहनाला मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांचा २५ गाड्यांच्या ताफ्यासह उदंड प्रतिसाद! कदाचित त्यांच्या गाड्या पाण्यावर चालत असाव्यात..! भाजीला पाण्याने फोडणी कशी द्यावी याचाही डेमो भाजपा नेत्यांनी जनतेला लवकरच द्यायला हवा! सत्ताधाऱ्यांची अवस्था म्हणजे, 'लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण' अशीच झालीय. #महागाई #दुटप्पीपणा #सत्ताधारी #RealityCheck
Rohit Pawar88,557 Aufrufe • vor 4 Monaten

ही महाराष्ट्राची बदनामी नाही तर नागपूरची वस्तुस्थिती आहे….! पण कृपया याबाबत कुणीही सरकारला प्रश्न विचारू नयेत, अन्यथा तुमच्या कपाळावरही ‘भाडे के तट्टे’ असा टॅग लागेल. आता अल निनोच्या पार्श्वभूमीवर नागपूरकरांचे पाण्यावाचून हाल होऊ नयेत म्हणून आम्ही थेट शहरातच नदी आणल्याचा दावा या सरकारने करू नये म्हणजे झालं..!
Rohit Pawar31,929 Aufrufe • vor 1 Monat

अजितदादांनी बारामतीत कायमच कार्यक्षम अधिकाऱ्यांना आणून त्यांच्या माध्यमातून लोकांना अधिकाधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला. यापैकीच बारामती मेडिकल कॉलेजचे प्रशासकीय अधिकारी नंदकुमार कोकरे हेही होते. परंतु त्यांच्या बदलीनंतर कार्यमुक्त होताना लोकांनी आणि हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर ज्याप्रकारे फुलांची उधळण करुन निरोप दिला यावरून अजितदादांची निवड कशी योग्य होती, हेच दिसून येतं. आता कुणाच्या सांगण्यावरुन तडकाफडकी बदली करण्यात आली, हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे.
Rohit Pawar49,811 Aufrufe • vor 2 Monaten

सोशल मिडियात व्हायरल झालेल्या या ऑडिओ क्लिप अत्यंत धक्कादायक असून त्यांच्या सत्यतेबाबत शहानिशा झाली पाहिजे. या क्लिपमधील चर्चेनुसार आपल्याच पक्षाच्या एका माजी खासदार राहिलेल्या महिलेबाबत भाजपचे लोक किती ‘सुसंस्कृत’ भाषा वापरतात हे स्पष्ट दिसतं. पुरोगामी महाराष्ट्रात लाडकी बहिण असलेल्या आपल्याच पक्षाच्या एका महिलेबाबतची ही भाषा भाजपाची लाज वेशीवर टांगणारी आहे. आपल्याच मित्र पक्षांच्या बाबतीत कटकारस्थान रचून त्यांना गिळंकृत करण्यात भाजप माहीर आहे, पण स्वपक्षाच्या महिला नेत्याबाबतही कसं कटकारस्थान रचलं जातं, याचाही हा एक उत्तम नमुना आहे. याशिवाय संबंधित महिला मा. खासदाराच्या घरात पैसे ठेवायलाही जागा नाही आणि अगदी पिंपातही पैसे भरून ठेवल्याचं या ऑडिओ क्लिपमध्ये स्पष्ट ऐकायला मिळतं. एका माजी खासदाराच्या घरात इतके पैसे असतील तर मंत्र्यांच्या घरात किती घबाड असेल, याचा विचारही करु शकत नाही. आता ED च्या अधिकाऱ्यांनी भाजप विरोधकांवरील कारवायांतून थोडा वेळ काढून इकडंही लक्ष द्यायला हरकत नाही. (सोशल मिडियाच्या माध्यमातून माझ्याकडं आलेल्या या ऑडिओ क्लिप जशाच्या तशा शेअर करत असून केवळ यावरील नावे ब्लर करत आहे. यामध्ये एक नाव हे खान्देशातील भाजपाच्या कॅबिनेट मंत्र्याचं तर दुसरं नाव हे भाजप संघटनेच्या महामंत्र्याचं आहे.)
Rohit Pawar29,553 Aufrufe • vor 1 Monat