
Rohit Pawar
@RRPSpeaks • 781,647 subscribers
Committed to a better Maharashtra & @NCPspeaks MLA from Karjat-Jamkhed CEO Baramati Agro https://t.co/fT5K3JYHRS
Shorts
Videos

ही महाराष्ट्राची बदनामी नाही तर नागपूरची वस्तुस्थिती आहे….! पण कृपया याबाबत कुणीही सरकारला प्रश्न विचारू नयेत, अन्यथा तुमच्या कपाळावरही ‘भाडे के तट्टे’ असा टॅग लागेल. आता अल निनोच्या पार्श्वभूमीवर नागपूरकरांचे पाण्यावाचून हाल होऊ नयेत म्हणून आम्ही थेट शहरातच नदी आणल्याचा दावा या सरकारने करू नये म्हणजे झालं..!
Rohit Pawar26,638 Aufrufe • vor 1 Tag

#NEET पेपरफुटीमुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. याच भ्रष्ट व्यवस्थेविरोधात आणि शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सोनम वांगचुक या देशातील एका महान शिक्षणतज्ज्ञाच्या उपोषणाचा आज १९ वा दिवस आहे. येणाऱ्या पिढीच्या सुरक्षित भविष्यासाठी आता सर्वांनीच जागं होऊन या लढ्याला साथ देण्याची आणि अहंकारी सरकारला जनभावनेपुढं गुडघे टेकवण्यास भाग पाडण्याची गरज आहे. Sonam Wangchuk Abhijeet Dipke Cockroach is Back #We_Support_SonamWangchuk #SonamWangchuk #DelhiProtest #ResignDharmendraPradhan #JusticeForStudents
Rohit Pawar92,259 Aufrufe • vor 13 Tagen

दिल्लीत दुमदुमतोय मराठी आव्वाज....! #CJPProtest #JantarMantar #DharmendraPradhanResign
Rohit Pawar25,375 Aufrufe • vor 8 Tagen

दिल्लीत जनरल डायरने आदेश दिल्याप्रमाणे पोलिसांनी लाठ्याकाठ्या चालवून विद्यार्थ्यांना रक्तबंबाळ तर केलंच पण हे कोण आहेत? पोलिसांनीच हे भाडोत्री गुंड आणले आहेत का? की सरकारने या भाडोत्री गुंडांना विद्यार्थ्यांची डोकी फोडण्याचं लायसन दिलं? हा देश महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालतो. संविधानाशी छेडछाड केलेली आम्ही खपवून घेणार नाही. तातडीने या गुंडांविरोधात गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि त्यांना गजाआडही केलं पाहिजे. #CJPProtest #JantarMantar #Delhi #SonamWangchuk #AbhijeetDipke #DharmendraPradhanResign
Rohit Pawar25,543 Aufrufe • vor 8 Tagen

महाराष्ट्राला काडीचाही उपयोग नसलेल्या बुलेट ट्रेनवर सरकार २ लाख कोटी रुपये खर्च करतं पण लाखो मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या लोकलकडं मात्र साफ दुर्लक्ष होत असल्याने मुंबईकरांवर रोज कशी वेळ येतेय त्याचा हा व्हिडिओ… सरकारने महाराष्ट्राचा पैसा बुलेट ट्रेनवर न उधळता आधी लोकल सक्षम करण्याची गरज आहे. पण केवळ केंद्रातील नेत्यांना खूष करणाऱ्या सत्ताधाऱ्यांकडून हे धाडस केलं जाईल का, हा प्रश्न आहे. #मुंबई_लोकल #MumbaiLocalTrain #मुंबईची_लाईफलाईन
Rohit Pawar56,929 Aufrufe • vor 26 Tagen

अजितदादांनी बारामतीत कायमच कार्यक्षम अधिकाऱ्यांना आणून त्यांच्या माध्यमातून लोकांना अधिकाधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला. यापैकीच बारामती मेडिकल कॉलेजचे प्रशासकीय अधिकारी नंदकुमार कोकरे हेही होते. परंतु त्यांच्या बदलीनंतर कार्यमुक्त होताना लोकांनी आणि हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर ज्याप्रकारे फुलांची उधळण करुन निरोप दिला यावरून अजितदादांची निवड कशी योग्य होती, हेच दिसून येतं. आता कुणाच्या सांगण्यावरुन तडकाफडकी बदली करण्यात आली, हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे.
Rohit Pawar49,684 Aufrufe • vor 1 Monat

एकीकडं शेतकऱ्यांसाठी आम्हाला रस्त्यावर संघर्ष करावा लागतोय आणि इकडं सत्ताधाऱ्यांचं बघा काय चाललंय… हिशोब कसा ठरला? साठ… पाच.. एक-एक, चाळीस लाख, ७ टक्के, १ टक्के, २ टक्के, पैसे परत देतो. मालक कोण? वरती पण करावं लागतं… हे सगळं समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ बघा आणि तुम्हीच ठरवून कमेंटमध्ये सांगा की आता ‘किती खोके आणि एकदम ओक्के’ म्हणायचं. #दलालीची_दलदल #मलिदा_गँग #कमिशनखोर
Rohit Pawar42,194 Aufrufe • vor 1 Monat

आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या आणि मुख्यमंत्री साहेबांच्या आवाहनाला मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांचा २५ गाड्यांच्या ताफ्यासह उदंड प्रतिसाद! कदाचित त्यांच्या गाड्या पाण्यावर चालत असाव्यात..! भाजीला पाण्याने फोडणी कशी द्यावी याचाही डेमो भाजपा नेत्यांनी जनतेला लवकरच द्यायला हवा! सत्ताधाऱ्यांची अवस्था म्हणजे, 'लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण' अशीच झालीय. #महागाई #दुटप्पीपणा #सत्ताधारी #RealityCheck
Rohit Pawar88,557 Aufrufe • vor 2 Monaten

राज्यात धाराशिवसह मराठवाड्यात अनेक भागात गोगलगायींनी उच्छाद मांडला असून सोयाबीनसारखं पीक त्यांनी फस्त केलंय.. हे एक नैसर्गिक संकट असून एकावर एक फ्री यासारखं दुष्काळाच्या संकटासोबतच गोगलगायींचंही संकट फ्री मिळालंय की काय असं वाटतंय. यामुळं अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ ओढावलीय. त्यामुळं सरकारने ज्या-ज्या भागात गोगलगायींचा प्रादुर्भाव वाढला त्याचा पंचनामा करुन तेथील शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई द्यावी, ही विनंती! Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Dattatray Bharane #मराठवाडा #धाराशिव #पीक_नुकसान
Rohit Pawar22,028 Aufrufe • vor 17 Tagen

महाराष्ट्रावरच्या प्रत्येक संकटात दादा आम्हाला तुमची उणीव सतत भासत राहील… जशी आजही भासतेय… तुम्ही असता तर भल्या पहाटेपासून किंबहुना पावसाचा अंदाज घेऊन रात्रीपासूनच नियंत्रण कक्षात ठाण मांडलं असतं, यात शंका नाही. पण आज…. ? अपेक्षा करतो हा व्हिडिओ बघून तरी सत्ताधाऱ्यांना जाग येईल. #Miss_U_दादा #AjitdadaPawar
Rohit Pawar20,651 Aufrufe • vor 23 Tagen

पुरंदर तालुक्यातील दिवे घाटात हातात तलवारी, कोयते घेऊन १००-१५० गाड्यावर बसून या टोळक्याने दहशत माजवल्याची घटना काल रात्री घडली. या टोळक्याला वेळीच वेसण घातली नाही तर कायद्याला भीक न घालणारे हे टाळके उद्या दहशत माजवून, गुन्हेगारी कृत्ये करुन पुण्याच्या गुन्हेगारीत भर घालण्याचं काम करतील. त्यामुळं पोलिसांनी तत्काळ या घटनेची गंभीर दखल घेऊन हे कोणत्याही पक्षाशी संबंधित असले तरी कुणाच्याही दबावाला बळी न पडता या टोळक्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, ही विनंती! Devendra Fadnavis CP Pune City Police #PunePolice #DiveGhat #PuneCrime #LawAndOrder #KoytaGang
Rohit Pawar55,910 Aufrufe • vor 2 Monaten

अजितदादांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या VSR कंपनीची दोन-चार विमाने ग्राऊंड केली असली तरी बहुतांश विमाने अजूनही सुरूच आहेत. रोहित सिंगच्या लग्नात गाणारा, डान्स करणारा हनी सिंग VSR कंपनीच्याच विमानात बसून मुंबईत येत असल्याचा व्हिडिओ शूट करून पुन्हा महाराष्ट्र सरकारलाच हिणवत नाही का? “मेरी पहुंच बहोत ऊपर तक है, कोई मेरा कुछ नहीं उखाड सकता” अशी भाषा वापरणाऱ्या V. K. सिंग याची ही गुर्मी का उतरवली जात नाही? एक मराठी नेता, महाराष्ट्राचा लोकनेता गेला तरी सरकार आरोपी कंपनीवर कारवाई करण्यापेक्षा त्याच कंपनीचे विमान वापरण्यावर भर देत असेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव नाही का? Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar
Rohit Pawar75,229 Aufrufe • vor 4 Monaten

तमिळनाडूमध्ये INDIA आघाडीतील DMK तर प. बंगालमध्ये TMC ची सत्ता येईल, अशी अपेक्षा होती, पण या दोन्ही राज्यांना anti incumbency चा फटका बसल्याचं दिसतंय. त्यातच गृहमंत्री अमित शाह साहेब यांनी निवडणुकीसाठी प. बंगालमध्ये १५ दिवस ठाण मांडलं होतं आणि SIR च्या माध्यमातून ९० लाख मतदारांना वगळून एकप्रकारे विजयाचा मार्गही मोकळा केला होता. यामुळं महाराष्ट्रासह केंद्रातील सत्ताधाऱ्यांना नक्कीच आनंदाच्या उकळ्या फुटल्या असतील, पण त्यांनी हे विसरु नये की, जर आज देशात आणि महाराष्ट्रात निवडणूक झाली तर या पक्षाविरोधातही तेवढीच anti incumbency असल्याने हाच निकष लावून जनता त्यांनाही सत्तेबाहेर हाकलल्याशिवाय राहणार नाही…! पण निवडणुकीत विजय होताच पश्चिम बंगालमध्ये भाजपाने TMC च्या कार्यालयाची तोडफोड करुन यापुढील काळात आपण कसा कारभार करणार, याचाच एक नमुना दाखवून दिला…! अजून संपूर्ण निकालही जाहीर झाले नाही तोच भाजपाने केलेल्या या राड्यामुळं पश्चिम बंगालमधील जनतेला भविष्यात आणखी काय काय बघावं आणि भोगावं लागेल, हे देव जाणं. या तोडफोडीच्या कृत्याचा तीव्र निषेध..! #WestBengalLegislativeAssemblyelection2026
Rohit Pawar54,236 Aufrufe • vor 2 Monaten

गृहमंत्री महोदयांच्याच नागपूर जिल्ह्यात जेसीबीला लटकवली कायदा व सुव्यवस्था..! राज्यात ना चिमुकल्या मुली सुरक्षित आहे… ना महिला सुरक्षित आहेत… ना प्रशासन सुरक्षित आहे.. सुरक्षित आहे फक्त सरकार… तेही जोपर्यंत जनतेच्या संतापाचा उद्रेक होत नाही तोपर्यंत..! #नागपूर
Rohit Pawar35,537 Aufrufe • vor 2 Monaten