
Rohit Pawar
@RRPSpeaks • 787,167 subscribers
Committed to a better Maharashtra & @NCPspeaks MLA from Karjat-Jamkhed CEO Baramati Agro https://t.co/fT5K3JYHRS
Shorts
Videos

देशाच्या शिक्षणमंत्र्यांची ज्यांनी विकेट घेतली ते विद्यार्थी नेता अभिजित दिपके हे #MPSC च्या विद्यार्थ्यांच्या सत्याग्रहात सहभागी होण्यासाठी आणि पाठींबा देण्यासाठी आज संध्याकाळी येत आहेत. Abhijeet Dipke #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह #भिमनवारांचा_राजीनामा_झालाच_पाहिजे #आता_माघार_नाही
Rohit Pawar137,493 次观看 • 1 个月前

मुख्यमंत्री साहेबांचे नवे ‘मोपलवार’ - अनिलकुमार गायकवाड साहेब! MSRDC चे व्यवस्थापकीय संचालक असलेल्या गायकवाड साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ठेकेदारांनी लाखो रुपये खर्च करून जाहिराती दिल्या आहेत. सरकारी अधिकाऱ्यासाठी अशा जाहिराती देता येतात का? ठेकेदार अशा जाहिराती का देत आहेत? याचा अर्थ काय? एकीकडं दुष्काळ आणि दुसरीकडं लाखोंच्या जाहिराती का? cost escalation करून संपूर्ण राज्याची तिजोरी ओरबाडून खाल्ली जातेय, ही वस्तुस्थिती आहे, पण कुणीही काहीही बोलत नाही … हे असंच चालू राहिलं तर राज्य कंगाल होईल हे लक्षात असू द्या!
Rohit Pawar26,688 次观看 • 7 天前

कर्जत तालुक्यात (जि. रायगड) सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या भीमाशंकर वन्यजीव अभयारण्याला लागून असलेल्या सायडोंगर वनक्षेत्रात सध्या विकासाच्या नावाखाली निसर्गाचा भयानक विनाश सुरू आहे. पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्पासाठी २३३ हेक्टरवरील घनदाट जंगलातील तब्बल ३२ हजारांहून अधिक झाडांची अक्षरशः कत्तल सुरु झालीय. कागदावर हा आकडा ३२ हजार दिसत असला तरी उद्या तो लाखापर्यंत जाईल आणि हे होत असताना जीवाच्या आकांताने ओरडणाऱ्या तेथील हजारो-लाखो पक्षांचा आकांत कुणालाही ऐकू येत नाही, हे दुर्दैव आहे. एखाद्या कसायाप्रमाणे निर्घृणपणे पक्षांची घरटी, अंडी आणि अजून पंखही न फुटलेली घरट्यातील पिल्लं नष्ट केली जातायेत… सिंमेंटच्या जंगलात राहणाऱ्यांना जंगलातील पक्षांची ही आर्त किंकाळी ऐकू येणार आहे की नाही? हा प्रकार केवळ वृक्षतोड नसून एका इकोसिस्टिमचा अंत आहे आणि हे याचे गंभीर परिणाम माणसाला भविष्यात भोगावे लागणार आहेत. हे घनदाट जंगल महाराष्ट्राचा राज्यप्राणी असलेल्या शेकरूसह बिबटे, भेकर, उदमांजर, खेकडे आणि शेकडो दुर्मिळ पक्षांचं हक्काचं निवासस्थान आहे. पण या झाडांची कत्तल होत असल्याने आता ते पूर्णपणे बेघर होतायेत. मौल्यवान औषधी वनस्पती, दुर्मिळ कीटक आणि वैशिष्ट्यपूर्ण जैवविविधतेने नटलेली सह्याद्रीची ही रांग या बेसुमार कत्तलीमुळे कायमची नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यातच भर म्हणून या प्रकल्पासाठी डोंगरांमध्ये जे शक्तीशाली सुरुंगाचे स्फोट केले जातील त्यातून संपूर्ण डोंगराचा भाग कमकुवत होऊन भविष्यात माळीण किंवा इर्शाळवाडीची पुनरावृत्ती होण्याचाही धोका आहे. कर्जतसारखा निसर्गरम्य परिसर जो मुंबई-पुण्याचं हवामान संतुलित राखण्यात मोठी भूमिका बजावतो, तिथली वनसंपदा नष्ट झाल्यास पर्यावरणीय समतोल बिघडणार असून स्थानिक आदिवासींचा जगण्याचा प्रश्नही गंभीर बनणार आहे. याला सर्वस्वी भांडवलदारांच्या हातचं बटीक बनून काम करणारं हे भाजप सरकार जबाबदार असून याच भांडवलदारांच्या फायद्यासाठी मुक्या पशू-पक्ष्यांचा बळी देऊन हा निसर्गाचा विनाश सुरुय. ३ नोव्हेंबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटन होणार असून तोपर्यंत येथील संपूर्ण जंगल यांना नष्ट करायचंय आणि अशा प्रकारे जंगल नष्ट करुन होणारा विकास पंतप्रधान साहेबांना तरी मान्य असेल का? निसर्गाचा विनाश करून होणारा विकास हा विनाशकारी असून तो कोणत्याही परिस्थितीत आम्हाला मान्य नाही. या प्रकल्पाला आणि संबंधित कंपनीला विरोध असण्याचं काहीच कारण नाही, परंतु त्यांनी जे स्थान निवडलंय ते पूर्णतः चुकीचं आणि पर्यावरणाच्या मुळावर उठणारं आहे. त्यामुळं जिथं पर्यावरणाचा नाश होणार नाही, अशा ठिकाणी हा प्रकल्प नेला तर त्याला कुणाचाच विरोध असणार नाही. तसा प्रयत्न सरकार का करत नाही. त्याऐवजी या ‘झाडखाऊ’ सरकारने महाराष्ट्राचं वाळवंट करण्याचा विडाच उचलला की काय अशी शंका येते. एक जागरूक नागरिक म्हणून या पर्यावरणाच्या विनाशाविरोधात आपण सर्वांनीच एकत्र येऊन आवाज उठवणं गरजेचं आहे. माध्यमांनीही पर्यावरणाचा आणि पुढच्या पिढीच्या भविष्याचा विचार करुन यावर आवाज उठवला पाहिजे. यामध्ये ‘शिवाई न्यूज’ यासारखी एक वात वादळातही मिणमिणतेय आणि या स्थानिक चॅनलचे पत्रकार यावर पोटतिडकीने निसर्गाचा होणारा हा विनाश ओरडून जगाला दाखवतायेत याचं निश्चितच कौतुक आहे. भविष्यात त्यांच्यावरही दबाव आणला जाऊ शकतो. तसंच ज्यांनी हा विनाश रोखायचा त्या सर्व संस्था देखील सरकारच्या दबावाखाली काम करत आहेत. त्यामुळं हे थांबवायचं असेल तर त्याला एकमेव पर्याय आहे तो म्हणजे जनतेचा दबाव.. तो आपण सर्वजण मिळून निर्माण करु आणि आपलं पर्यावरण वाचवू… यापासून आपण आज अलिप्त राहिलो तर उद्याची पिढी आपल्याला माफ करणार नाही. #SaveSahyadri #SaveForests #SaveEnvironment #सह्याद्री_वाचवा #जंगलतोड_थांबवा #पर्यावरण_वाचवा #SaveWildlife
Rohit Pawar47,621 次观看 • 13 天前

काही अधिकारी आणि त्यांच्या राजकीय मालकांना सत्तेची मस्ती चढली आहे की, सर्वसामान्य माणूस म्हणजे त्यांना गुलामच वाटायला लागला आहे. असाच काहीसा प्रकार पुण्यात घडला आहे. महापालिकेची जागाच नसलेल्या आणि महापालिका हद्दीत नसल्याचे स्वतः महापालिकेनेच सांगितलेल्या जागेवर महापालिकेचे अधिकारी येऊन बळजबरीने अतिक्रमणाचा ठपका ठेवत कारवाई करत आहेत. कारवाई करण्याआधी किमान नोटीस द्यावी लागते. 'आधी नोटीस दाखवा,' असे ती महिला सांगत असतानाही राजकीय आदेश पाळणारे हे अधिकारीरूपी गुंड मात्र सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत आहेत. एवढा माजुर्डेपणा करण्याची हिंमत येते कुठून? घरात पती आजारी आहे. कष्टाने व्यवसाय करणाऱ्या या भगिनीचे व्यावसायिक नुकसान करण्याचा अधिकार या गुंडगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना कोणी दिला? या गुंडगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आयुक्त काय कारवाई करतात, याकडे आमचे लक्ष आहे. या महिलेला न्याय मिळेपर्यंत आम्ही पाठपुरावा करत राहू! Devendra Fadnavis
Rohit Pawar20,440 次观看 • 7 天前

एक ज्येष्ठ वकील थेट देशाच्या सरन्यायाधीशांना 'बोगस, चोर आणि पंतप्रधानांचे एजंट' म्हणून जाहीरपणे हिणवतायत, तर दुसरीकडं सोशल मीडियावर 'Gen-Z' पिढी देशाच्या सर्वोच्च पदांची अक्षरशः नक्कल करून सर्रास शिवीगाळ करतेय.. स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांच्या इतिहासात आपल्या घटनात्मक संस्थांची एवढी बेइज्जती आणि अधोगती कधीच झाली नव्हती. आणि या सर्व अराजकतेला सर्वस्वी भाजप आणि त्यांचे अंधभक्त जबाबदार आहेत! कोणत्याही लोकशाहीप्रेमी नागरिकासाठी हे चित्र अत्यंत वेदनादायी आणि निराशाजनक आहे. हे बदलण्यासाठी खूप कष्ट करावे लागणार आहेत आणि एकजूट दाखवली तर हे अशक्य नाही...! #संविधान #लोकशाही
Rohit Pawar36,392 次观看 • 23 天前

नांदेड जिल्ह्यातील शंकर क्षीरसागर या शेतकऱ्याने आत्महत्येपूर्वी केलेला हा व्हिडिओ मन सुन्न करणारा आहे.. मुख्यमंत्री महोदय या शेतकऱ्याची आर्त हाक कदाचित तुमच्या कानापर्यंत पोचेल पण मनापर्यंत पोचेल की नाही हा अजूनही प्रश्नच आहे. परवा पत्रकार परिषदेत दुष्काळाचं प्रेझेंटेशन करताना ‘शिवार हेल्पलाईन’चे विनायक हेगाना यांनी वर्तवलेली भीती आणि आज पुढं आलेलं वास्तव, हे चिंता वाढवणारं आहे. मायबाप सरकार शेतकऱ्याला वाचवायचं असेल तर अहंकार बाजूला ठेवून आमच्यासारख्या विरोधकांनी मांडलेल्या मुद्द्यांवरही सकारात्मक विचार करा. अन्यथा बळीराजा मरत राहील आणि त्याच्या सरणावर सरकारच्या इज्जतीची रोज राख होत जाईल..! सरकारने अजूनही सुधरावं आणि शंकर क्षीरसागर या शेतकऱ्याच्या डोळ्यातील पाणी आणि त्यांची आर्त हाक ते गेल्यानंतर तरी ऐकावी. आम्हीही तुम्हाला कित्येकदा हेच ओरडून सांगतोय. शंकर क्षीरसागर यांना भावपूर्ण श्रद्धांजली! Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Dattatray Bharane
Rohit Pawar24,415 次观看 • 18 天前

भाजप कार्यकर्त्याकडून ताब्यात घेतलेले हे SIR चे फॉर्म काल खारघर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यामुळं SIR (Special Intensive Revision) ही मोहिम केवळ भाजपाच्या मतदारांचीच नावे मतदार यादीत ठेवून विरोधी पक्षाच्या मतदारांना वगळण्याचं ‘राष्ट्रीय अभियान’ असल्याचं आता जगजाहीर झालंय. त्यामुळं या मोहिमेचं SIR हे नाव बदलून Special BJP Voter Confirmation (SBVC) असं ठेवायला हरकत नाही. भाजप आणि निवडणूक आयोग असं ‘ताकाला जाऊन किती दिवस भांडं लपवणार?’ #SIR #ElectionCommission #मतदार_यादी #निवडणूक_आयोग
Rohit Pawar66,552 次观看 • 2 个月前

#NEET पेपरफुटीमुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. याच भ्रष्ट व्यवस्थेविरोधात आणि शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सोनम वांगचुक या देशातील एका महान शिक्षणतज्ज्ञाच्या उपोषणाचा आज १९ वा दिवस आहे. येणाऱ्या पिढीच्या सुरक्षित भविष्यासाठी आता सर्वांनीच जागं होऊन या लढ्याला साथ देण्याची आणि अहंकारी सरकारला जनभावनेपुढं गुडघे टेकवण्यास भाग पाडण्याची गरज आहे. Sonam Wangchuk Abhijeet Dipke Cockroach Janta Party - CJP #We_Support_SonamWangchuk #SonamWangchuk #DelhiProtest #ResignDharmendraPradhan #JusticeForStudents
Rohit Pawar98,105 次观看 • 3 个月前

मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीत राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी ३१,६०० रुपयांचं पॅकेज जाहीर केलं खरं, पण हे पॅकेज कसं फसवं आणि शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसणारं आहे, हे आम्ही पहिल्या दिवसापासून बोलतोय. याचा सविस्तर ग्राऊंड रिपोर्ट बीबीसी मराठीने केला.. आम्ही बोलतो हे सरकारला पटत नसेल तर किमान माध्यमांनी दाखवलेल्या आरशात तरी एकदा स्वतःचा चेहरा बघावा आणि यंदाच्या दुष्काळी मदतीसोबतच मागील वर्षी जाहीर केलेली पण न दिलेल्या पॅकेजमधील मदतही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी. महत्त्वाचं म्हणजे यापुढं तरी अन्नदात्याची अशा प्रकारे फसवाफसवी करण्याचे धंदे सरकारने बंद करावेत. #बळीराजा #शेतकरी_फसवणूक #पीक_नुकसान #महाराष्ट्र_सरकार
Rohit Pawar19,279 次观看 • 22 天前

एका उपमुख्यमंत्र्यांचा पुणे जिल्हा आणि राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री या दोघांचाही सातारा जिल्हा या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या कानवडी-खानापूर रस्त्याची ही दुर्दशा पहा. या रस्त्यासाठी स्थानिकांनी केलेल्या आंदोलनामुळं सरकारच्या कथित ‘वेगवान’ कारभारावर अक्षरशः चिखल फासला गेला. आता आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी तरी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाममंत्री याकडं लक्ष देतील का, याकडं आमचं लक्ष आहे. Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Shivendrasinh A Bhonsle
Rohit Pawar58,096 次观看 • 2 个月前