
Sachin Sawant सचिन सावंत
@sachin_inc • 145,768 subscribers
National Secretary - All India Congress Committee, Bachelor of Engineering - Electronics (hon's)
Shorts
Videos

ही मुंबई महानगरपालिकेची नालेसफाई! आज तुरळक सरी बरसल्या आणि अंधेरी सब-वे भरला. खरा पाऊस पडेल तेव्हा काय अवस्था होईल? ट्रिपल इंजिन लाऊन भाजपा भ्रष्टाचार करत आहे हे स्पष्ट आहे. मुंबईकरांनो पावसाळ्याची वाट पाहत आहात ना! उन्हाळ्याच्या आगीतून पावसाळ्यात भाजपा निर्मित फुफाट्यात जाणार हे नक्की!
Sachin Sawant सचिन सावंत32,989 次观看 • 21 天前

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत नेलपॉलिश रिमुव्हरने बोटावरची शाई जाते याचे हे प्रात्यक्षिक... राज्य निवडणूक आयोगाकडून यावेळी प्रचंड गैरव्यवस्थापन झाले आहे. हा प्रकार दुर्दैवी आहे. शाईची टेस्टींग कोणी केली? अगोदरच काळजी घेतली नव्हती का? अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे.
Sachin Sawant सचिन सावंत71,494 次观看 • 5 个月前

साताऱ्यातील शीतल दनावले या महिलेला ती सोशल मीडियावर भाजपाला अडचणीत आणणारे व्हिडिओ टाकते म्हणून भाजपाचे कार्यकर्ते त्रास देत आहेत. तीची पोलीसांकडे तक्रार करत आहेत तसेच तीच्या कुटुंबीयांवर दबाव आणला जात आहे. महिलांना न्याय देण्याच्या मोदीजींची इच्छेला फडणवीसांच्या राज्यात भाजपा कसे मूर्त स्वरूप देत आहे हे त्या महिलेनेच सांगितले आहे. भाजपाचे महिलांना न्याय देण्याचे ढोंग हे मणिपूर असेल, हाथरस असेल किंवा महिला खेळाडूंच्यावरील अत्याचारातून समोर आले आहेच. भाजपातील बलात्काराच्या आरोपी नेत्यांची संख्याही अभूतपूर्व आहे. मात्र महिलांचा आवाज दाबण्यासाठी किती खालच्या स्तरावर भाजपाचे कार्यकर्ते जात आहेत हे ही स्पष्ट होते. या महिलेच्या सुरक्षिततेची जबाबदारी सातारा पोलीस आणि राज्य सरकारची आहे हे लक्षात ठेवा.
Sachin Sawant सचिन सावंत19,209 次观看 • 1 个月前
0:44
Sensitive content
This media may contain sensitive content.

फडणवीस साहेब, मुंबईचा महापौर दलित वंचित का होऊ शकत नाही? दलित महिला का होऊ शकत नाही?बौध्द, जैन, शीख व अल्पसंख्याक का होऊ शकत नाहीत? डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने समानतेचा मार्ग दाखविला. आज त्याच संविधानाची शपथ घेऊन संविधानिक पदावर बसलेले मुख्यमंत्री त्याच संविधानावर घाला घालत आहेत. हा संविधानाचा अवमान आहे. मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली पाहिजे.
Sachin Sawant सचिन सावंत21,473 次观看 • 5 个月前

भाजपाच्या ट्रोल गँगने बौध्द धर्मिय असलेल्या मुंबई काँग्रेस अध्यक्षा Prof. Varsha Eknath Gaikwad यांना एका व्हिडिओ द्वारे "वर्षा बेगम" संबोधून त्यांचा धर्म बदलवून एका गरीब मुस्लिम व्यक्तीला त्या पक्षाचे तिकीट देत आहेत असे दाखवून त्यांच्यावर तुष्टीकरणाचा आरोप केला आहे. खरे तर सत्तेच्या राजकारणासाठी हिंदू धर्माचे नाव घेणाऱ्या BJP Mumbai चा हा हिंदू धर्माच्या दुष्टीकरणाचा प्रयत्न आहे. हिंदू धर्म हा सहिष्णू व सर्वांना बरोबर घेऊन जाणारा वसुधैव कुटुंबकम् हे तत्वज्ञान जगाला सांगणारा धर्म आहे. या धर्माला असहिष्णू व दुष्ट ठरविण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे.हा हिंदू धर्माचा अवमान आहे. एका मागासवर्गीय समाजातील महिला मुंबई काँग्रेसचे नेतृत्व करते ही खरी या मनुवाद्यांची पोटदुखी आहे. हे केवळ संविधानाने शक्य झाले. भाजपा ची मनुस्मृती असती तर ते शक्य झाले नसते. महिलेने नेतृत्व करु नये का? मनुवादी भाजपा बौध्द धर्मासारखे इतर धर्म, अल्पसंख्याक आणि महिलांच्या विरोधात आहे हे या व्हिडिओतून स्पष्ट होते.
Sachin Sawant सचिन सावंत16,790 次观看 • 5 个月前

आज भ्रष्टाचारी नाही थांबवले तर लोकशाही उध्वस्त होत राहिल. पराभूत मानसिकता असलेल्या भाजपाला मतदान करावे म्हणून मुंबई मधील शांतिनगर जनकल्याण येथील वार्ड क्रमांक - ३ मध्ये भाजपचे लोक जनतेला मिक्सर वाटत आहेत. निवडणूक आयोगाने तत्काळ कठोर कारवाई केली पाहिजे. हे भयानक आणि विदारक चित्र आहे. महायुती सरकार जनतेचे पैसे लुटुन, त्याच पैशांतून जनतेची मते विकत घेत आहेत. अशा लोकांना जर तुम्ही मत दिले, तर शेवटी फक्त पश्चात्तापच कराल.
Sachin Sawant सचिन सावंत15,643 次观看 • 5 个月前

काँग्रेस पक्षाची मंत्रालयासमोरील जागा परस्पर आरबीआयला विकण्याचा व्यवहार रद्द करा - सचिन सावंत काँग्रेस पक्षासहित राजकीय पक्षांबरोबर रिझर्व्ह बँकेचीही मेट्रो कॉर्पोरेशन व सरकारने केली फसवणूक. काँग्रेस पक्षाला नरीमन पाईंट या जागीच नवीन कार्यालय बांधून देण्याचे आश्वासन पूर्ण करा अन्यथा न्यायालयात दाद मागू.
Sachin Sawant सचिन सावंत22,155 次观看 • 9 个月前

मोदी सरकारने या वर्षी सोयाबीनला ₹ ५३२८ प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. २०१३ ला प्रदेशाध्यक्ष असताना Devendra Fadnavis जींनी शेतकरी दिंडी काढून सोयाबीनला ₹ ६००० प्रति क्विंटल हमीभाव मागीतला होता. दिंडीला १२ वर्षे आणि मोदी सरकारला ११ वर्षे झाली. फडणवीस साहेब ₹ ६००० भाव तरी कधी मिळणार? २०४७ साली विकसित महाराष्ट्राचे स्वप्न दाखवताना बळीराजाचा तुमच्या राज्यात आदीयुगाकडे उलटा प्रवास सुरू आहे ही वस्तुस्थिती आहे. भाजपाच्या उक्ती आणि कृती मधील हा फरक आहे. आज बाजारात शेतकरी ₹३५०० प्रति क्विंटल भावाला सोयाबीन विकत आहे. अर्थात प्रतिक्विटल ₹१८०० ते ₹२००० शेतकऱ्यांचे थेट नुकसान होत आहे. तुमचे हमीभाव केंद्र सुरू झाले नाहीत. त्यात जाणिवपूर्वक दिरंगाई होत आहे. गंभीर बाब म्हणजे खरेदी केंद्र वाटपात यावेळी अधिकार वाटण्या करून नवा घोळ घालण्यात आला आहे. पूर्वी पणन महासंघाकडे अधिकार होते आता नवीन वाटेकरी आणला आहे. हा घोळ मिटून केंद्र सुरू होण्यास अधिक विलंब लागणार आहे. मूग उडीद अतिवृष्टीने जवळपास पूर्ण गेले. सोयाबीनचे उत्पादन घटून कमी भावामुळे हाती काहीच पडत नाही. अतिवृष्टी ग्रस्तांना सरकारी मदत दिवाळीपूवी देऊ म्हणून कोरड्या घोषणा केल्या. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली आहे. पूर्वी दिवाळीपूर्वी हमीभाव केंद्राकडून खरेदी सुरू व्हायची. शेतकरी अडचणीत आहे हे पाहून हमीभाव केंद्र महिनाभर अगोदर सुरू झाली पाहिजे होती. सोयाबीनची बाजारात आवक सुरू होऊन आता महिना होईल तरी सरकार ढम्म बसून आहे. खरीपाचे उत्पादन बुडाल्याने भाव वाढले पाहिजेत पण कमी होत आहेत. शेतकरी उद्ध्वस्त होत असताना सरकार हात वर करत आहे. भाजपाच्या दृष्टीने निवडणूका व सत्ताच सर्वस्व आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना माणूस म्हणून तुम्ही पाहत नाहीत निदान मतदार म्हणून तरी मदत करा.
Sachin Sawant सचिन सावंत18,770 次观看 • 8 个月前
没有更多内容可加载