
Satej (Bunty) D. Patil
@satejp • 114,014 subscribers
MLC | Legislative Party Leader, INC Maharashtra | President, Fencing Association of India | President, Kolhapur District Congress Committee | Educationist |
Videos

MPSC मधील Computer Based Torture (CBT) रद्द करा आज विधानपरिषदेमध्ये MPSC ची ऑनलाईन CBT परिक्षा विद्यार्थ्यासाठी Computer Based Torture ठरणार असल्याने ती रद्द करावी अशी मागणी केली. या परीक्षेमुळे नॉर्मलायझेशन, सर्व्हर डाऊन, पेपरफुटी, परीक्षा केंद्रांवरील गैरव्यवहार आणि तांत्रिक अडचणी येणार आहेत. UPSC सह अनेक राज्यांमध्ये स्पर्धा परीक्षा ऑफलाईन होत असताना महाराष्ट्रात ऑनलाईनचा हट्ट का? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच सरकारने सर्व सरकारी भरती परीक्षांसाठी 'वन टाइम परीक्षा फी' लागू करून विद्यार्थ्यांवरील आर्थिक भार कमी करावा अशी मागणी केली. MPSC मधील Computer Based Torture (CBT) रद्द करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 👇
Satej (Bunty) D. Patil24,102 次观看 • 7 天前

NCERT मधील मराठा साम्राज्याचा नकाशा पूर्ववत करण्याबाबत सरकारकडे कोणती कार्यवाही आहे? NCERT च्या पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेल्या आणि पुढे अटकेपार विस्तारलेल्या मराठा साम्राज्याचा इतिहास राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक असून हा नकाशा वगळल्याने अपूर्ण इतिहास भावी पिढ्यांपर्यंत पोहोचण्याची भिती आहे. त्यामुळे राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून मराठा साम्राज्याचा संपुर्ण नकाशा पुन्हा समाविष्ट करण्यासाठी अशी सुचना मांडली. सोमवार, 9 मार्च 2026, स्थळ- विधान भवन
Satej (Bunty) D. Patil31,679 次观看 • 3 个月前

गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रेटण्यासाठी महायुती सरकारने दडपशाहीची परिसीमा गाठली आहे. परभणी जिल्ह्यातील सहजापूर (जवळा) या गावामध्ये रात्रीपासून शेतकऱ्यांना अटक, घरांवर नोटिसा, आंदोलकांना ताकदीच्या बळावर ताब्यात घेणे आणि महिला भगिनींना फरपटत नेण्याचे निंदनीय प्रकार पोलीसांमार्फत सरकार करत आहे. शेतकऱ्यांचे शांतीपुर्ण आंदोलनाला चिरडण्यासाठी एवढा पोलीस फौजफाटा कशासाठी? सरकार शेतकऱ्यांच्या एकजुटीला घाबरलयं हे नक्की. शेतकऱ्यांवर आत्मदहनाची वेळ आणणाऱ्या जुलमी सरकारचा जाहीर निषेध !
Satej (Bunty) D. Patil18,713 次观看 • 4 个月前

शक्तिपीठ महामार्गाऐवजी या मार्गातील मंदिरांना 5- 5 हजार कोटींचा निधी देऊन विकास साधावा महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्यपालांच्या अभिभाषणातील विविध मुद्द्यांवर बोलताना नागपूर- गोवा शक्तिपीठ महामार्गावर राज्यपालांनी केलेल्या उल्लेखावर विचार मांडले. यावेळी बोलताना, प्रकल्पाच्या माध्यमातून विकास साधत असल्याचा भास सरकार निर्माण करत असून त्यासाठी समृद्धीमार्गाचे उदाहरण दिले. या महामार्गावर जो टोल मिळणे अपेक्षित होता तो मिळाला नाही तरीही नविन शक्तिपीठ महामार्गाचा प्रकल्प कशासाठी ? 86 हजार कोटी रूपये खर्चून होत असलेल्या शक्तीपीठ महामार्गातून टोल वसूल करण्यासाठी 3 हजार दरवर्षी याप्रमाणे किमान 28 वर्ष लागतील आणि यासाठी दरवर्षी 60 लाख वाहने या रस्त्याने गेली पाहिजेत अशी वस्तुस्थिती मांडली. त्याऐवजी नागपूर- गोवा महामार्गावर जी जी शक्तीपीठे येणार आहेत त्या मंदिराच्या विकासासाठी 5- 5 हजार कोटी रुपयांचा निधी देऊन त्यांचा विकास करावा अशी मागणी केली. त्यामुळे शक्तीपीठांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी सुखसोयी उपलब्ध करून तिर्थक्षेत्रांचा विकास साधला येईल असेही सुचवले. शक्तिपिठाच्या अट्टाहासाखातर राज्यातील 27 हजार शेतकऱ्यांना उघड्यावर टाकू नका अशी आर्जव करताना शक्तिपीठ महामार्ग रद्द झाल्याचा वटहुकुम सरकारने काढला असाताना पुन्हा तो राबवला जात आहे ही नागरीकांची आणि शेतकऱ्यांची फसवणूक नाही काय ? असा अशी विचारणाही सभागृहात केली. शेवटी, राज्यभरात शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला विरोध आहे तरीही राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये हा विषय येतो हे दुर्दैव असून त्याविषयी खेद व्यक्त केला.
Satej (Bunty) D. Patil34,333 次观看 • 1 年前

धाराशीवमध्ये शक्तीपीठला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना दडपशाहीचा वापर करून ताब्यात घेतलं आहे त्याचा आम्ही निषेध करतो. आधीच कर्जात असलेलं महाराष्ट्र शासन हा 86 हजार कोटींचा खर्च का करत आहे ? येणाऱ्या काळात शक्तीपीठ महामार्गाचा मुद्दा निश्चितपणे महाराष्ट्रभर घेऊन जाऊ. ABP माझा
Satej (Bunty) D. Patil16,271 次观看 • 1 年前
