
Satej (Bunty) D. Patil
@satejp • 114,672 subscribers
MLC | Legislative Party Leader, INC Maharashtra | President, Fencing Association of India | President, Kolhapur District Congress Committee | Educationist |
Shorts
Videos

या भगिनीची माहिती कळवा! आपल्या मुलींच्या शिक्षणासाठी एक आई अक्षरशः धडपडताना दिसतेय…आपल्या मुलींना चांगले शिक्षण मिळावे, त्यांचे भविष्य घडावे, यासाठी ती राहुल गांधीजींची भेट घेण्याची इच्छा व्यक्त करत आहे. तिची जिद्द आणि आपल्या मुलींच्या भविष्यासाठीची तळमळ मनाला भिडणारी आहे. या भगिनीचे नाव, गाव किंवा त्यांच्याशी संपर्क साधण्याची कोणतीही माहिती कोणाकडे असल्यास कृपया कळवा. माहिती असेल तर कमेंट करा किंवा मेसेज करा. एक आई आपल्या मुलींसाठी लढतेय… तिच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आता आपली! aajtak marathi Anuja Dhakras
Satej (Bunty) D. Patil80,619 views • 1 month ago

MPSC मधील Computer Based Torture (CBT) रद्द करा आज विधानपरिषदेमध्ये MPSC ची ऑनलाईन CBT परिक्षा विद्यार्थ्यासाठी Computer Based Torture ठरणार असल्याने ती रद्द करावी अशी मागणी केली. या परीक्षेमुळे नॉर्मलायझेशन, सर्व्हर डाऊन, पेपरफुटी, परीक्षा केंद्रांवरील गैरव्यवहार आणि तांत्रिक अडचणी येणार आहेत. UPSC सह अनेक राज्यांमध्ये स्पर्धा परीक्षा ऑफलाईन होत असताना महाराष्ट्रात ऑनलाईनचा हट्ट का? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच सरकारने सर्व सरकारी भरती परीक्षांसाठी 'वन टाइम परीक्षा फी' लागू करून विद्यार्थ्यांवरील आर्थिक भार कमी करावा अशी मागणी केली. MPSC मधील Computer Based Torture (CBT) रद्द करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 👇
Satej (Bunty) D. Patil25,160 views • 3 months ago

NCERT मधील मराठा साम्राज्याचा नकाशा पूर्ववत करण्याबाबत सरकारकडे कोणती कार्यवाही आहे? NCERT च्या पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेल्या आणि पुढे अटकेपार विस्तारलेल्या मराठा साम्राज्याचा इतिहास राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक असून हा नकाशा वगळल्याने अपूर्ण इतिहास भावी पिढ्यांपर्यंत पोहोचण्याची भिती आहे. त्यामुळे राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून मराठा साम्राज्याचा संपुर्ण नकाशा पुन्हा समाविष्ट करण्यासाठी अशी सुचना मांडली. सोमवार, 9 मार्च 2026, स्थळ- विधान भवन
Satej (Bunty) D. Patil31,679 views • 7 months ago

सरकारला आरसा दाखवला म्हणजे महाराष्ट्रद्रोह नव्हे..!
Satej (Bunty) D. Patil14,521 views • 3 months ago

गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रेटण्यासाठी महायुती सरकारने दडपशाहीची परिसीमा गाठली आहे. परभणी जिल्ह्यातील सहजापूर (जवळा) या गावामध्ये रात्रीपासून शेतकऱ्यांना अटक, घरांवर नोटिसा, आंदोलकांना ताकदीच्या बळावर ताब्यात घेणे आणि महिला भगिनींना फरपटत नेण्याचे निंदनीय प्रकार पोलीसांमार्फत सरकार करत आहे. शेतकऱ्यांचे शांतीपुर्ण आंदोलनाला चिरडण्यासाठी एवढा पोलीस फौजफाटा कशासाठी? सरकार शेतकऱ्यांच्या एकजुटीला घाबरलयं हे नक्की. शेतकऱ्यांवर आत्मदहनाची वेळ आणणाऱ्या जुलमी सरकारचा जाहीर निषेध !
Satej (Bunty) D. Patil18,824 views • 7 months ago

कोल्हापूरात फुटबॉल फक्त पाहिला जात नाही, तर जगला जातो!
Satej (Bunty) D. Patil11,097 views • 4 months ago
